पाकिस्तानला उत्तर

Submitted by बेफ़िकीर on 24 August, 2014 - 09:00

टीप - हा एक राजकीय धागाच आहे. मायबोलीवर अनेक प्रकारचे राजकीय धागे अस्तित्वात असताना व जोरात चालू असताना हा आणखी एक धागा का असावा? ह्याचे उत्तर हे की सगळ्या जगात जे मोदी सरकार हिंदूत्ववादी असल्याच्या समजामुळे अस्वस्थता किंवा इतर कोणतीही भावना निर्माण झाली आहे, त्या मोदी सरकारच्या अस्तित्वाने बिथरलेल्या पाकिस्तानने उघड हल्ला केलेला आहे. ह्याशिवाय, निषेध व्यक्त करणे, अद्दल घडवू असे म्हणणे, आंतरराष्ट्रीय समुदायाला दखल घेण्यास भाग पाडणे हे सर्व पारंपारीक उपाय बाजूला ठेवून मोदी सरकारने भारतीय सेनेला 'योग्य वाटेल ती कृती करण्याचे' आदेश दिलेले आहेत. परिणामतः, शौर्याच्या भावनेने सळसळलेल्या जवानांनी जोमदार प्रत्युत्तर देणे सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत.

==============================================

विषारी सापाचे खरे रूप कधी प्रकट होणार हाच जणू प्रश्न होता. पाकच्या सर्वोच्च नेत्याला आपल्या शपथविधीला बोलावण्यातील नावीन्यावर जगभर चर्चा घडवून आणणारे मोदी मुळात हिंदूत्ववादी असल्याने पाकिस्तानला त्यांचे नेतेपदी असणे फार काळ सहन होणार नाही असे वाटत होते. त्याचाच परिपाक बासित ह्यांनी फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यात झाला. ही कुरापत एक लक्षण होते चवताळलेल्या सापाच्या आगामी कृतीचे! पाकशी चर्चा रद्द करण्याचे आदेश भारत सरकारने दिले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या साक्षीने सापाच्या शेपटीवर पाय ठेवला. हा निर्णय निराशाजनक आहे वगैरे मुक्ताफळे जगभरातील नेते उधळत असतानाच पाकिस्तानने बॉर्डरवर हल्ला सुरू केला व निरपराध भारतीय नागरीक मारले गेले.

पण ह्यावेळी, आपापसातील सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रखर राष्ट्रप्रेमाच्या भावनेचे तुषार मनात उडावेत असे काहीतरी घडले.

संरक्षण मंत्रालयाने भारतीय जवानांना 'योग्य वाटेल ती कृती करा' असे खुल्लेआम 'गो अहेड' दिलेले आहे.

युद्ध बाजूलाच राहो, साध्यासाध्या कुरबुरीही अनेक प्रकारे महागच पडतात हे सर्वमान्यच आहे. पण कधी ना कधी इंगा दाखवणेही अतिशय महत्वाचे आहे. आशा आहे की पाकला ह्यावेळी लवकरच अद्दल घडेल आणि अक्कल येईल.

जय हिंद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि राज्यकारभाराच्या नावाने बोंब असतेच. काश्मीर यूनो त नेणे काय, हिंदीचिनी भाइ भाइ काय, तिबेटचे प्रकरण काय, भाषावार प्रांतरचना काय, संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न काय, नि गेल्या दहा वर्षातली लाचलुचपत काय, जे थोर लोकांनी पूर्वी केले तेच आता चालू आहे. पूर्वी इतरांनी नावे ठेवली आता जरा तुम्हाला पण संधि.>>>> Happy

Pages