पाकिस्तानला उत्तर

Submitted by बेफ़िकीर on 24 August, 2014 - 09:00

टीप - हा एक राजकीय धागाच आहे. मायबोलीवर अनेक प्रकारचे राजकीय धागे अस्तित्वात असताना व जोरात चालू असताना हा आणखी एक धागा का असावा? ह्याचे उत्तर हे की सगळ्या जगात जे मोदी सरकार हिंदूत्ववादी असल्याच्या समजामुळे अस्वस्थता किंवा इतर कोणतीही भावना निर्माण झाली आहे, त्या मोदी सरकारच्या अस्तित्वाने बिथरलेल्या पाकिस्तानने उघड हल्ला केलेला आहे. ह्याशिवाय, निषेध व्यक्त करणे, अद्दल घडवू असे म्हणणे, आंतरराष्ट्रीय समुदायाला दखल घेण्यास भाग पाडणे हे सर्व पारंपारीक उपाय बाजूला ठेवून मोदी सरकारने भारतीय सेनेला 'योग्य वाटेल ती कृती करण्याचे' आदेश दिलेले आहेत. परिणामतः, शौर्याच्या भावनेने सळसळलेल्या जवानांनी जोमदार प्रत्युत्तर देणे सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत.

==============================================

विषारी सापाचे खरे रूप कधी प्रकट होणार हाच जणू प्रश्न होता. पाकच्या सर्वोच्च नेत्याला आपल्या शपथविधीला बोलावण्यातील नावीन्यावर जगभर चर्चा घडवून आणणारे मोदी मुळात हिंदूत्ववादी असल्याने पाकिस्तानला त्यांचे नेतेपदी असणे फार काळ सहन होणार नाही असे वाटत होते. त्याचाच परिपाक बासित ह्यांनी फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यात झाला. ही कुरापत एक लक्षण होते चवताळलेल्या सापाच्या आगामी कृतीचे! पाकशी चर्चा रद्द करण्याचे आदेश भारत सरकारने दिले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या साक्षीने सापाच्या शेपटीवर पाय ठेवला. हा निर्णय निराशाजनक आहे वगैरे मुक्ताफळे जगभरातील नेते उधळत असतानाच पाकिस्तानने बॉर्डरवर हल्ला सुरू केला व निरपराध भारतीय नागरीक मारले गेले.

पण ह्यावेळी, आपापसातील सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रखर राष्ट्रप्रेमाच्या भावनेचे तुषार मनात उडावेत असे काहीतरी घडले.

संरक्षण मंत्रालयाने भारतीय जवानांना 'योग्य वाटेल ती कृती करा' असे खुल्लेआम 'गो अहेड' दिलेले आहे.

युद्ध बाजूलाच राहो, साध्यासाध्या कुरबुरीही अनेक प्रकारे महागच पडतात हे सर्वमान्यच आहे. पण कधी ना कधी इंगा दाखवणेही अतिशय महत्वाचे आहे. आशा आहे की पाकला ह्यावेळी लवकरच अद्दल घडेल आणि अक्कल येईल.

जय हिंद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे परत टाकते
सीजफायर व्हायोलेशन : मी मोदींकडून अत्यंत निर्णयात्मक कृतीची अपेक्षा करते आहे.

संरक्षण मंत्रालयाने भारतीय जवानांना 'योग्य वाटेल ती कृती करा' असे खुल्लेआम 'गो अहेड' दिलेले आहे.
<<
<<
एक चांगला निर्णय गृहमंत्रालयाचा.
मागच्या सरकार सारखे इशारे वगैर न देता, ठोस निर्णय घ्यायला हवेत सध्याच्या भारत सरकारने.

कोणतंही सरकार आले तरी मरणारे वेगळेच असतात हो..त्यात नवीन काय !
तुम्ही-आम्हीही इथे, फुकटचे कळफलक, निवांतपणे बडवत केवळ शब्दांचे बुडबुडे निर्माण करतोय...तेही तिथे, आपल्या ह्या निवांतपणासाठी मरायला काही लोक उभे आहेत म्हणूनच ना!

योग्य निर्णय.
आंतराराष्ट्रीय स्तरावर पण जास्त मुसद्देगिरी दाखवावी लागेल, नाहीतर भारतानेच कुरापत काढली असे तुणतुणे वाजवायला पाकिस्तान तयार असणारच.

>>> संमि | 24 August, 2014 - 20:32 नवीन

मोदी आल्यापासुन निकाळजे भौ पद्य कमी आणि गद्य जास्त लिहु लागले आहेत
<<<

जामोप्या,

वाचले नसलेत तर हे वाचा Happy

http://www.maayboli.com/node/50308

लगोजी
आमचं पन पद्य (काश की वख्त़ मिल पाता ) .

चले आना साडी की दुकान से
साडे तीन बजे
रस्ता देखूंगा मै, चाय की दुकान पे
साडे तीन बजे

Baryach varshani ek navi pahat. Befikir ji ekdum manatla vishay dhanyavad. Tumche lekhan nehmi vachat asto. Apratim lekhan karta. Asech sunder lekhan karat ja. Tumhala shubhechaa...

मोदीजींनी सीमेवर जाऊन आपल्या आणि पाकच्याही सैन्याला उद्देशून भाषणे केली पाहिजेत. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने आपल्या सैन्याला स्फुरण चढून ते त्वेषाने लढतील. तर पाक सैन्याला चांगलीच जरब बसेल.

खरच सैन्याचं मनोबल उंचावणारा निर्णय.. पण या बरोबरच मुत्सद्देगिरीत आपण कुठेही कमी पडता कामा नये..>>>> अगदी बरोबर....... आपल्या सैन्याच्या पाठी सरकार आहे हे यातून दिसते जे फार जास्त गरजेच आहे.......

आणि आमच्या देशावर हल्ला केल्यावर आम्ही काय चर्चा करत बसायचे होय कसा ह्ल्ला वैगेरे केला..........इदिरा गान्धीनी सुद्धा जशास तसे पाकला उत्तर दिले होते.....त्यावेळेला फक्त रशिया आपल्याबरोबर होत बाकी कुणीही मदत केली नव्ह्ती..........आणि अमेरिके तर आपली युद्धनौका हिन्दी महासागरात आणली होती पाक च्या मद्तीला.................
............ त्यामुळे हे सरकार देखील योग्यच करत आहे अस मला वाट्त...

बेफ़िकीर. .
कोलकाता या भारत निर्मित विनाशिकेला 'होडी'म्हणणारयां कडून वेगंळं अपेक्षित नव्हंतं...

एका टायपोसाठी देशद्रोहाचा आरोप Sad

हा विषय पक्षीय राजकारणापलीकडचा आहे म्हणूनच काही विशिष्ट सदस्यांशी संवाद तोडण्याचा जुना निर्णय बाजूस सारून येथे लिहिले होते. चुकलेच. Sad Sad Sad

>>>मोदीजींनी सीमेवर जाऊन आपल्या आणि पाकच्याही सैन्याला उद्देशून भाषणे केली पाहिजेत<<<

आणि पाकच्याही सैन्याला उद्देशून का भाषणे केली पाहिजेत तेही समजेल का? तो टायपो नाही म्हणवत आहे.

>>>मोदीजींनी सीमेवर जाऊन आपल्या आणि पाकच्याही सैन्याला उद्देशून भाषणे केली पाहिजेत. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने आपल्या सैन्याला स्फुरण चढून ते त्वेषाने लढतील. तर पाक सैन्याला चांगलीच जरब बसेल.<<<

ह्या वक्तव्यात मोदींनी पाकिस्तानी सैन्याला उद्देशून त्यांना जरब बसवण्यासाठी भाषणे करावीत ही सूचना गंभीरपणे करण्यात आलेली आहे काय? ह्या वक्तव्याचा हेतू जर निव्वळ थट्टामस्करीचा असेल तर त्या व चा ब झाल्यावरून आलेल्या वाक्याचा इतका सात्विक संताप का आला होता? आणि हे वक्तव्य गंभीरपणे केलेले असल्यास एखादे उदाहरण देता येईल का? एका राष्ट्रप्रमुखाने शत्रूराष्ट्राच्या सैन्याला जरब बसावी म्हणून भाषण दिले आणि ते ऐकून घेतले गेले आणि युद्ध टळले वगैरे?

पाकीस्तानी रेंजर्सनी बीएसेफच्या ३५ चौक्यांवर गोळीबार केलाय. आपल्या जवानांनीदेखिल त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. सरकारने हा प्रकार गांभिर्याने घेऊन कारवाई सुरुच ठेवली पाहिजे.

>>> उदयन.. | 25 August, 2014 - 10:45 नवीन

इथुन कोणी कुपवाडा वगैरे अश्या ठिकाणी गेलेले आहेत का .. ?
<<<

हे 'अजून' गप्पांचे पान झालेले नाही. तेव्हा काय म्हणायचे आहे ते विस्तारपूर्वक म्हणालात तरी चालू शकेल. धन्यवाद!

हे 'अजून' गप्पांचे पान झालेले नाही. तेव्हा काय म्हणायचे आहे ते विस्तारपूर्वक म्हणालात तरी चालू शकेल. धन्यवाद! >>>

बेफी मी सरळ लिहिले आहे...... तुमचा फोर्स आहे का मी उध्दटच बोलावे... ??? असल्यास स्पष्ट सांगा ... मला विविध प्रकारात नक्कीच बोलता येते

बेफी मी सरळ लिहिले आहे...... तुमचा फोर्स आहे का मी उध्दटच बोलावे... ??? असल्यास स्पष्ट सांगा ... मला विविध प्रकारात नक्कीच बोलता येते<<<

उदयन,

मूळ लेखाशी तुमचे हे विधानः

>>>इथुन कोणी कुपवाडा वगैरे अश्या ठिकाणी गेलेले आहेत का .. ?<<<

तूर्त तरी अत्यंत असंबद्ध वाटत आहे, संबंध असलाच व तुम्ही तो लावून दाखवलातच तर ते तुम्हाला पहिल्याच प्रतिसादातही करता आले असते हे मी सिद्ध करू शकेनच.

अवांतर - ह्याशिवाय, आत्तापर्यंत अशी कित्येक उदाहरणे झालेली आहेत की वाकडे वळण अशीच वाक्य लिहून लावले गेलेले आहे. एक जिवंत उदाहरण वरच्याच प्रतिसादांमध्ये अजूनही असून त्यावर अजूनही उत्तर देण्यात आलेले नाही.

व चा ब झाल्यावरून केलेल्या एका विधानामुळे इतका सात्विक संताप येत असेल तर त्या सदस्याने ह्या राष्ट्रभक्तीच्या आणि पक्षीय राजकारणापासून दूर ठेवण्याच्या धाग्यावर मोदींनी पाक सैन्याला भाषण द्यावे ही सूचना कोणत्या उद्देशाने केली हे का स्पष्ट करू नये? फक्त ती सूचना गंभीरपणे केली की गंमतीने तेवढेच स्पष्ट करावे.

मुळ लेखा संबधीतच लिहिलेले आहे.. कारण मी तिथे जाउन आलो आहे.. परिस्थिती काय आहे हे प्रत्यक्ष पाहिलेली आहे मी त्यावर लिहु शकत नाही कारणे वेगळी आहेत म्हणुन विचारले इथुन कोणी गेलेले आहे का ? तिथे जाउन आलेले लोक वरील कोणताही प्रतिसादाला समर्थन देणार नाही.. ( मग तो प्रतिसाद सहमतीचा असो या विरोधाचा)
आता याचा तुम्हाला चुकिचाच अर्थ लावायचा असल्यास तुम्ही खुशाल लावा ...

>>>तिथे जाउन आलेले लोक वरील कोणताही प्रतिसादाला समर्थन देणार नाही.. ( मग तो प्रतिसाद सहमतीचा असो या विरोधाचा)
आता याचा तुम्हाला चुकिचाच अर्थ लावायचा असल्यास तुम्ही खुशाल लावा ...<<<

हे सगळे तुम्ही तुमच्या पहिल्या प्रतिसादात आरामात लिहू शकला असतात व वाचकांना ते सगळे समजलेही असते. उगाच लांबण कशाला लावलीत?

आणि वरील कोणत्याही प्रतिसादाला (मग तो प्रतिसाद सहमतीचा असो वा विरोधाचा) जर ते लोक समर्थन देणार नाहीत ह्याची खात्री आहे तर आधी 'मोदींनी पाक सैन्याला भाषण द्यावे' हा अत्यंत अस्थानी व आकसयुक्त विनोद करणार्‍यांना ते सांगावेत.

Pages