काय परीक्षण लिहू.... थिएटरमधील दिवे लागले तरी काही काळ दिसेनासे झालेले. ईतके अश्रूंचे थेंब पापण्यात साठलेले. तरी काही निरीक्षणे नोंदवतो, तेच परीक्षण समजा.
१) या वर्षातला "मी पाहिलेला" सर्वात उत्कृष्ट चित्रपट.
२) स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेची जोडी पुन्हा एकदा हिट.
३) चित्रपट हसवतो, चित्रपट रडवतो, क्लायमॅक्सला अशी काही उंची गाठतो की पुन्हा पुन्हा पाहावे आणि पुन्हा पुन्हा डोळ्यात पाणी यावे.
४) मुन्नाभाईच्या सिक्वेलसारखी करामत मुंबई पुणे मुंबईच्या सिक्वेलनेही केली आहे.
५) आधी मला वाटलेले हा चित्रपट ‘हम आपके है कौन’ सारखा सूरज बडजात्या स्टाईल लग्नाची विडिओ कॅसेट असेल. मात्र अंदाज सपशेल फसला. लग्नाच्या बोहल्यावर चढताना, आयुष्यभराचा जोडीदार निवडताना, आपले आयुष्य बदलवून टाकण्याची शक्यता असणारा हा निर्णय, एकदा लग्न झाले की पुन्हा सहजपणे बदलता न येणारा असा हा निर्णय आपण घाईघाईत आणि चुकीचा तर घेत नाही ना आहोत, यात मुक्ताचा जो वैचारीक गोंधळ दाखवला आहे ते एका स्त्रीच्या द्रुष्टीकोनातून ईतक्या प्रभावीपणे आजवर कुठल्याही चित्रपटात मांडले नसावे. हिच या चित्रपटाची कथा आहे, हाच या चित्रपटाचा गाभा आहे.
६) चित्रपटाचे नाव मुंबई-पुणे-मुंबई असले तरी मुंबई-सोलापूर, पुणे-कोल्हापूर काहीही चालले असते. यात मुंबई विरुद्ध पुणे हा वाद चवीपुरताच आहे. दोघे एकाच शहरातील दाखवले असते तरी वर सांगितलेल्या चित्रपटाच्या मूळ गाभ्याला धक्का लागला नसता.
७) हिरोईनने ड्रिंक्स घेणे, कामानिमित्त रात्री उशीरापर्यंत बाहेर राहणे, तिचे आधीचे अफेअर असणे, ते तुटल्यावरही त्याच्याशी मैत्रीचे संबंध राखून असणे. चित्रपटात एक आधुनिक स्त्री दाखवताना स्त्री-पुरुष समानता अश्या काही गोष्टींतून दाखवली जाते, तसेच याला समाजाने स्विकारले आहे असेही दाखवले जाते. यात हे स्विकारणे सहजपणे आले आहे. एक प्रेक्षक म्हणूनही आपल्याला यात काही वावगे वाटत नाही. एका मराठी चित्रपटासाठी हे यशच आहे.
८) मुक्ताच्या कॅरेक्टरने याच वर्षात पाहिलेल्या तनू वेड्स मनूची आठवण काही ठिकाणी करून दिली. मात्र तो चित्रपट (मला आवडला असला तरी) बरेच ठिकाणी विस्कळीत आणि अतार्किक वाटलेला, हा अचूक बांधला गेलाय.
९) यात तीन कॅरेक्टर असले तरी हा लव ट्रॅंगल नाहीये. चांगल्या लोकांशी काही वाईट होऊ शकत नाही आणि खर्या प्रेमाची कधी ट्रॅजेडी होऊ शकत नाही हे फील गूड वातावरण चित्रपटभर राहते.
१०) मुक्ता बर्वेच्या अभिनयाबाबत शंकाच नव्हती, तिच्यासाठी ही भुमिकाही परफेक्ट होती. पण कित्येक द्रुश्यात स्वप्निलही आपल्या अभिनयाची छाप सोडून जाईल असे खरेच वाटले नव्हते. खास करून चित्रपटाच्या दुसर्या भागात, जेव्हा आपल्यातील अल्लड कॅरेक्टरला जपत तो त्यासोबत प्रगल्भपणाही दाखवतो. स्वप्निलला अश्या भुमिकांसाठी शुभेच्छा.
११) प्रशांत दामले हा रंगभूमी गाजवणारा अवलिया मोठ्या पडद्यावर फारसा दिसत नाही. याला या निमित्ताने बघून घ्या. काय कमाल टायमिंग आहे या माणसाची. हा कधी आपल्या विनोदांनी खळखळून हसवतो तर कधी आपल्या प्रसन्न वावराने चेहर्यावर हास्य फुलवतो.
१२) सुहास जोशी, आसावरी जोशी, सविता प्रभुणे, विजय केंकरे .. हे दोन्हीकडचे सहाय्यक कलाकार आपापली भुमिका आपल्या लौकिकाला जागत चोख बजावतातच, पण यांच्या कास्टींग बद्दल फुल मार्क्स द्यायला हवेत.
१३) गाणी फार काही सुपरहिट नाहीत, जी सिनेमा संपल्यावर गुणगुणत बाहेर पडावे. मात्र बोअरही करत नाहीत. श्रवणीय आहेत.
१४) संवाद मात्र मस्त आहेत. बरेच द्रुश्यात रंगत भरायचे काम संवाद करतात. मग ते चुरचुरीत संवाद असो वा इमोशनल. मस्त मस्त मस्त.
१५) हा माझ्यासारख्या वाह्यात मुलालाही आवडला तर डिसेंट कॅरेक्टरमध्ये मोडणार्या माझ्या ग’फ्रेंडलाही आवडला. हा कोणालाही आवडू शकतो. हा तुम्हालाही आवडेल. आम्ही दोघेही आता आमच्या घरच्यांनाही हा दाखवायचा प्लान बनवत आहोत, म्हणजे हा मागच्या पिढीलाही आवडेल असा आम्हाला विश्वास आहे
- ऋन्मेऽऽष
.......................................................................................................
.......................................................................................................
आधीचा धागा >
मुंबईकर आणि पुणेकर या दोन वृत्ती आहेत, दोन स्वभाव आहेत, दोन भिन्न पैलूंची व्यक्तीमत्वे, दोन जीवनपद्धती आहेत.. वगैरे वगैरे पाल्हाळ मी लावणार नाही कारण हे सर्वांनाच ठाऊक आहे. फक्त उदाहरणे प्रत्येकाच्या अनुभवाप्रमाणे बदलतील.
तर, ही दोन अडीज तासांच्या अंतरावर असलेली दोन शहरे. पण तरीही दोन ध्रुवांवरची असल्यासारखी त्या शहरांतील दोन माणसे. जेव्हा एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडतात, तेव्हा काय धमाल ऊडू शकते, याची चुणूक आपल्याला मुंबई-पुणे-मुंबईच्या पहिल्या भागात दिसली. ज्यांनी तो काही कारणांनी मिसला असेल, शक्यता कमीच आहे, तरीही त्यांनी हा रिलिजायच्या आधी पहिला भाग नक्की बघा. स्वप्निल आणि मुक्ताची यात जशी केमिस्ट्री जमलीय त्याला तोड नाही, या एकाच कारणासाठी ‘मुंबई-पुणे-मुंबई १’ तुम्हाला हमखास आवडेल. त्याऊपर यात आपल्या मुंबई-पुण्याचा आपलेपणाचा एक स्पेशल तडकाही आहे.
पहिल्या भागाची लिंक - https://www.youtube.com/watch?v=jblvKuq_a_k
असो, तर बस्स तीच चटकदार केमिस्ट्री पुन्हा घेऊन आता त्याचा दुसरा भाग येतोय. एक झलक खालच्या लिंकवर बघू शकता.
मुंबई पुणे मुंबई २ - ऑफिशिअल ट्रेलर https://www.youtube.com/watch?v=rmJnb3vMjqM
याच चित्रपटाची चर्चा करायला हा धागा.
........................................................
चर्चेसाठी मुद्दाम वेगळा धागा का?
तर,
1) हा एक बहुचर्चित "मराठी" चित्रपट आहे.
2) पहिल्या आठवड्यात चित्रपट बघून आलेले यावर परीक्षण लिहीतीलच याची खात्री नसते.
3) बरेच चांगले मराठी चित्रपट लोकांपर्यंत वेळीच न पोचल्याने मरतात. असे या चित्रपटाबाबत होऊ नये असे वाटते.
4) याच चित्रपटाबाबत मला हा जिव्हाळा का यामागचे कारण स्वप्निल जोशी किंवा मुक्ता बर्वेचा मी फॅन आहे असे नसून "मुंबई पुणे मुंबई - १" या चित्रपटाचा मी फॅन आहे. हा माझा अत्यंत आवडता (क्रमांक 2 चा) मराठी चित्रपट आहे. कधीही, कितीही वेळा आणि कुठूनही सुरू करून मी हा बघू शकतो. आणि तितक्याच वेळा यातील "कधी तू" हे गाणे ऐकू शकतो.. नव्हे ऐकतो
5) हिंदी चित्रपटांतील खान सुपरस्टार्सचा एक पॅटर्न आहे. सलमान ईदला चित्रपट काढणार, आमीर दिवाळीला चमकणार, तर नाताळचा रोमांटीक सीजन शाहरूखचा. पण यंदा मराठीत एक ब्लॉकबस्टर चित्रपट हिंदी सिनेमांना टक्कर देत ऐन दिवाळीला प्रदर्शित होतोय. तर तो जास्तीत जास्त चालावा हीच ईच्छा. (ब्लॉकबस्टर का याचे उत्तर वरची ट्रेलरची लिंक बघून समजेल. तो फील प्रोमो बघूनच येतोय. आम्हा मुंबईच्या पोरांना काही चित्रपट पोस्टर बघूनच समजतात की सुपरहिट जाणार की सुपरफ्लॉप.)
6) मराठी चित्रपट बरेचदा एकेका साच्यात अडकत आलाय. कधी तमाशापटच बनायचे, तर कधी ग्रामीण बाजाची चलती होती. मग एक नॉनसेन्स कॉमेडीचा काळ आला. त्यानंतर एक गेला काळ होता, ज्यात व्यावसायिक फॅक्टर दुर्लक्षून पुरस्कार मिळवायलाच मराठी चित्रपट बनताहेत का असे वाटू लागलेले. मग हळूहळू व्यावसायिक बाबींकडेही ध्यान दिले जाऊ लागले, पण ते ऐटीत जमवायला दुनियारीपर्यंत वाट बघावी लागली. तरीही मोठमोठे कलाकार घेत ‘हम आपके है कौन’ पठडीतील एक फॅमिली मनोरंजनपट बनवावा हे कोणाला सुचले नव्हते, वा सुचले तरी प्रभावीपणे जमले नव्हते. अखेर मुंबई पुणे मुंबईची सुपरहिट जोडी घेत आता हा चित्रपट येऊ घातलाय. हा चित्रपट एक ट्रेंड सेट करायची शक्यता आहे. तर आपणही या बदलाचे स्वागत करायला हवे.
७) ...........
८) ...............
९) .....
हे तुम्ही भरा,
साथ दे तू मला - https://www.youtube.com/watch?v=i0Cj7FwEDnY
एंजॉय अॅडवान्समध्ये धागा काढलाय, त्याचा फायदा उचलत अॅडवान्स बूकिंगच करा.
- १२ नोव्हेंबर
सलमान ईदला चित्रपट काढणार,
सलमान ईदला चित्रपट काढणार, आमीर दिवाळीला चमकणार, तर नाताळचा रोमांटीक सीजन शाहरूखचा. >>
अरे तु शाहरुखचा फॅन ना मग दिवाळीला शाहरुख आणि आमीर नाताळ इतके साधे गणित माहीत नाही?
खान-दान का नाम मिट्टी में मिला दिया,
सक्रिय यंदा शाहरूखच्या
सक्रिय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
यंदा शाहरूखच्या दिलवालेसाठी नाताळची वाट बघत आहे ना, म्हणून तसे झाले. बाकी शाहरूखचा चित्रपट जेव्हा तोच आमचा दिवाळी दसरा ..
असो, मराठी चित्रपटाचा धागा शाहरूखने हायजॅक करायला नको ..
ऋन्मेष, मस्त!! हा माझा
ऋन्मेष, मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा माझा अत्यंत आवडता (क्रमांक 2 चा) मराठी चित्रपट आहे. कधीही, कितीही वेळा आणि कुठूनही सुरू करून मी हा बघू शकतो. आणि तितक्याच वेळा यातील "कधी तू" हे गाणे ऐकू शकतो.. नव्हे ऐकतो<<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१००००+
हा माझा अत्यंत आवडता (क्रमांक
हा माझा अत्यंत आवडता (क्रमांक 2 चा) मराठी चित्रपट आहे. कधीही, कितीही वेळा आणि कुठूनही सुरू करून मी हा बघू शकतो. आणि तितक्याच वेळा यातील "कधी तू" हे गाणे ऐकू शकतो.. नव्हे ऐकतो<<<१००००+ काही विनोद फारच भारी आहेत. सुरुवातीलाच एकदा स्वप्निल मॅग कॅधी आहे लग्न विचारतो ते.. ती घरी कोण आहेत ते सांगते तो भाग.
हे ट्रेलर पाहिले मस्त आहे. दिवाळीच्या सु ट्टीत नक्की बघणार हा, प्रेम रतन धन आणि स्पेक्टर.
मी ही पहाणार. मलाही पहिला भाग
मी ही पहाणार.
मलाही पहिला भाग आवडलेला (कालच पाहिला पुन्हा एकदा)
पण तरिही हा पहिल्या इतका मस्त नसणार याची खात्री आहे
मला कधी तू पेक्षा का कळेना
मला कधी तू पेक्षा का कळेना जास्त आवडते
पण तरिही हा पहिल्या इतका मस्त
पण तरिही हा पहिल्या इतका मस्त नसणार याची खात्री आहे
>> जास्त छान व पॉलि श्ड आहे. इतर कलाकार फार मजा आणतात. त्यात मुंबई व पुने फरक फार सुरेख घेतले आहेत. लग्नाची गाणी नाच वगैरे वगैरे धमाल आहे.
ओह ! लेट्स सी मला आजपर्यंत
ओह ! लेट्स सी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला आजपर्यंत (तन्नू वेड्स मनू वगळता) एकही पार्ट टू आवडला नाहीये कदाचित त्यामुळे वाटत असेल!
मामीसाहिबा तुम्ही वगैरे असे
मामीसाहिबा तुम्ही वगैरे असे का बरे लिहीत नाहीत ?
अमा + १. पहिल्यापेक्षा हा
अमा + १. पहिल्यापेक्षा हा जास्त मजा येईल बघायला असे वाटते आहे. नक्की बघणार.
पहिला मला अधूनमधून बोअर होतो. मुख्यत्वे दोनच पात्रे असल्याकारणाने. पण पिक्चर छानच आहे आणि थोडासा बोअर झाला तरी मला आवडतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाचगाणी पॉलिश्ड आहेत पण त्यात
नाचगाणी पॉलिश्ड आहेत पण त्यात मराठी लग्नाचा फील येत नाही असे वाटते मला. मराठी पारंपरीक लग्नात पण फार मजा असते ( नाचगाणी नसूनही ) पुर्वी असे काही चित्रपट आलेत ( वर्हाडी आणि वाजंत्री.. यात तर गदीमा आणि सुलोचनांच्या पण विनोदी भुमिका होत्या. विक्रम गोखले आणि इंदुमती पैंगणकर मुख्य भुमिकांत होते. )
अलिकडच्या फेरारी कि सवारी मधे पण एक मराठी लग्न आहे आणि विद्या बालनचा, मला जाऊ द्या.. हा मस्त नाचदेखील.
पण त्यात मराठी लग्नाचा फील
पण त्यात मराठी लग्नाचा फील येत नाही असे वाटते मला.>> साधारण २०१५ मधलं लग्न दाखिवलंय बघा.
मराठी पारंपरीक लग्नात पण फार मजा असते>> हो. मी केलंय एकदा.
मला जाउद्या ही लावणी आहे. ती लग्नात गायची करेक्ट चीज नाही. धन्यवाद कृपया.
इंग्लिश विंग्लिश मधले लग्न पाहिले आहे का? नवराई माझी लाडाची गाणे? साधारण त्या बाजाचे लग्न आहे. आधुनिक+पारंपारिक म्हणता येइल असे.
मला जाऊ द्या.. >> मध्ये मजा
मला जाऊ द्या.. >> मध्ये मजा नाही आली तितकी जेवढे हि पोळी साजूक तुपातली तिला म्हावर्याचा लागलाय नाद मध्ये आहे.
पण तरिही हा पहिल्या इतका मस्त नसणार याची खात्री आहे
>>>
पार्ट वन ब्लॅन्क करून जावा, कारण त्यात ते दोघेच होते आणि इथे गोतावळा, चित्रपट टोटली डिफरंट असणार, अमा म्हणतात तसा..
म्हणून तुलना करणे याबाबत तरी चुकीचे ठरेल.
नवराई माझी लाडाची गाणे? >>
नवराई माझी लाडाची गाणे? >> येस्स, हे मस्त आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमा + १. पहिल्यापेक्षा हा
अमा + १. पहिल्यापेक्षा हा जास्त मजा येईल बघायला असे वाटते आहे. नक्की बघणार.
पहिला मला अधूनमधून बोअर होतो. मुख्यत्वे दोनच पात्रे असल्याकारणाने. पण पिक्चर छानच आहे आणि थोडासा बोअर झाला तरी मला आवडतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<
अमा - अगो ++१
कुठला चांगला ते पार्ट २ बघून कळेल पण पार्ट २ मधले कलाकार आणि कलरफुल लग्नं वगैरे ट्रेलर पाहून जस्तं उत्सुकता आहे :).
पहिल्या पार्ट मधे कायम दोघच Vs इथे सिनिअर दिग्गज कलाकार, लग्नाची गाणी वगैरे अॅट्रॅक्टिव्ह पॅकेज वाटतय !
आजकाल मराठी लग्नांमधेही संगीत,मेंदी ही फंक्शन्स , DJ ,नाच गाणी धमाल असतेच.
ज्या सिनेमाचा सिक्वल ओरिजनल पेक्षा आवडला असा पटकन आठवणारा मुव्ही म्हणजे लगे रहो मुन्नाभाई, इट वॉज हिस्टरी
वर्हाडी आणि वाजंत्री..
वर्हाडी आणि वाजंत्री.. <<<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वाह! दिनेशदा, काय आठवण करून दिलीत!!
व आणि वा >>
व आणि वा >> http://www.dailymotion.com/video/xv797g_varhadi-ani-vajantri_shortfilms
अमा, बघेन नक्की.. पहिला
अमा, बघेन नक्की.. पहिला एमिरेट्सच्या फ्लाईटमधे बघितला होता. हा पण तसाच बघायला मिळेल असे वाटतेय.
सिनियर कलाकार सगळे आवडते आहेत !
पहिलाही आवडला होताच, स्पेशली
पहिलाही आवडला होताच, स्पेशली मुक्ता आणी पुणे दर्शन!, मला एम्पीएम -२चा ट्रेलर आवडलाय! वेटिन्ग फॉर धिस !यावेळा पॉलिश्ड लुक्,ग्लॅमरस सेट वाले ३ चित्रपट रान्गेत आहे
MPM-2
prem rattan dhan payo
bajirao-masatani
टिकिट्स विक्री सूरू नाही का
टिकिट्स विक्री सूरू नाही का झाली अजुन?
कधी होणार?
मुक्ता स्वप्निल बरोबर ऑनलाईन
मुक्ता स्वप्निल बरोबर ऑनलाईन बोलायची संधी मला मिळाली आहे. परंतू मी उद्या उपलब्ध त्यावेळेत नसणार आहे. मी माझे प्रश्न त्यांना पाठवू शकतो.
इथल्या मायबोलीकरांना मुक्ता-स्वप्निल याना काही विचारायचे असल्यास इथे लिहावे. मी आपले प्रश्न त्यांना पाठवून देतो
तिकीट कन्फर्मड् ! उद्या पहाटे
तिकीट कन्फर्मड् ! उद्या पहाटे ९ चा शो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंतर दिवसभर भाऊबीज, तरीसुद्धा एखाद दुसरा मिनिट फुरसत काढून पिक्चर चांगला की ठिकठाक हे दोनचार वाक्यात सांगायचा प्रयत्न करेन ..
नक्की सांग आणि प्लिज खर काय
नक्की सांग आणि प्लिज खर काय ते सांग म्हणजे मी शनिवारचं बूकिंग करते
माझी आई आणि श्यामची आई एकाच
माझी आई आणि श्यामची आई एकाच शाळेत शिकल्याने तसा मी नेहमी खरेच बोलतो,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तरी पाहून झाल्यावर तुम्हाला पर्सनल मेसेज टाकेन
क्लास पिक्चर आहे ! मी या
क्लास पिक्चर आहे !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी या वर्षातील पाहिलेला सर्वात बेस्ट !
नक्की बघाच.
जर मला फुरसतीत लॅपटॉप उघडायला वेळ मिळाला तर नक्कीच परीक्षणाच्या चारचौदा ओळी खरडेन.
पण तुम्ही त्याची वाट न बघता बूकींग करून टाका.
रिया मॅडम तुम्ही तर कराच, तुम्हाला आवडेलच. डोळ्यातून पाणी नाही काढले तर पैसा वापस
आणि हो माझ्या या मतावर मी स्वजो, मुक्ताचा वा मुंबई-पुणे-मुंबई १ चा फॅन आहे याचा काही प्रभाव नाही.
आणि हो माझ्या या मतावर मी
आणि हो माझ्या या मतावर मी स्वजो, मुक्ताचा वा मुंबई-पुणे-मुंबई १ चा फॅन आहे याचा काही प्रभाव नाही.
>>
ह्या: ह्या : ह्या: !
डोळ्यातून पाणी नाही काढले तर
डोळ्यातून पाणी नाही काढले तर पैसा वापस !![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ये हमें रुलाके छोडेगा
रिया मॅडम तुम्ही तर कराच,
रिया मॅडम तुम्ही तर कराच, तुम्हाला आवडेलच. डोळ्यातून पाणी नाही काढले तर पैसा वापस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>
थँक्स
एक विचारायचं होतं.दुनियादारी सारखा मस्त आहे की मुंबई पुणे मुंबई(१) सारखा मस्तय?
परीक्षण कम निरीक्षण
परीक्षण कम निरीक्षण हेडरमध्ये अॅड केले !
@ रीया चित्रपट बघ आणि तूच सांग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुंबई पुणे मुंबई २ - परीक्षण
मुंबई पुणे मुंबई २ - परीक्षण कम निरीक्षण आवडले.
मला मुंबई पुणे मुंबई -१ पण आवडला होता. जेव्हा मुंबई पुणे मुंबई २ आम्हाला बघायला मिळेल तेव्हा अवश्य बघिन.
Pages