१. कोळत घातलेली चिंच- लिंबाएवढी.
२. काळी मिरी दाणे चमचाभर
३. जीरं चमचाभर
४. लसणाची एखाददुसरी पाकळी.
५. सुकी मिरच्या २ (मद्रासी मिरच्या असल्यास दोन तीन घ्या. संकेश्वरी वगैरे असेल तर एखादी ठिक)
६. तूर डाळ दोनेक चमचे
फोडणीसाठी: तेल आणि तूप, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि लाल सुकी मिरची.
१. मिरी, जिरे, लसूण, मिरची आणि तूरडाळ एका पॅनमध्ये कोरडीच परतून घ्या. डाळ चांगली तांबूस होऊ द्यात.
२. हे सगळं गार अक्रून मिक्सरमधेय ओबडंधोबडं वाटून घ्या. फार वस्त्रगाळ पूड करत बसू नका.
३. कोळत घातलेली चिंचेचा पल्प काढून तो पाण्यात मिक्स करून घ्या. (उरलेली चिंच फेकू नका, ती आम्टीत घालून वापरा)
४. आता पाणी उकळत ठेवा. त्यात चवीनुसार मीठ घाला. चांगलं खळखळून उकळत राहू देत.
५. त्यात वर केलेली रसम पावडर घाला. दोन तीन मिनिटे उकळू द्या. दरम्यान तेलातुपाची फोडणी करून घ्या. रसमला चरचरून ही फोडणी मारा. हवं असल्यास वरून कोथींबीर घाला.
६. फोडणी घातल्यावर रस्सम उकळू नका. सरळ पेल्यात ओतून घ्या आणि फू फू करून प्या. (मिरीच्या वाफेनं नाक मो़कळं होइल आणी गरमागरम रस्समने घशाला त्वरित आराम)
७. रस्सम अति उकळू नका.
सर्दी अथवा घसेदुखीनं त्रास होत असेल तर हे रस्सम अतिशय इलाजकारक आहे. यामध्ये मुख्य पदार्थ मिरी आहे हे लक्षात घेऊन मग इतर पदार्थ घालायचे आहेत. सर्वसाधारणपणे बाजारात मिळणारी रसम पावडर मी यात घालत नाही (घातली तरी किंचितच)
रस्सम हे साधारण पातळ सुपासारख्या कन्सिस्टन्सीचे हवे. आंबट आणी तिखट या दोन्ही चवी बरोबर साधल्या तरच रस्सम टेस्टी लागतं. त्यामुळे भसाभसा रस्सम पावडर घालून त्याची चव बिघडवू नये.
रस्समवर फोडणी ऑप्शनल नाही. ती चरचरूनच बसली पाहिजे. पण अतितेल घालू नका. किंचित तेलातुपावर कढीपत्ता आणि हिंगाचा तो अस्सल स्वाद येईल अशीच फोडणी बसायला हवी. क्ढीपत्ता ताजा असल्यास रस्सम तुम्हाला दुवा देईल.
रस्समचे अनेक प्रकार आहेत. पैकी दालरस्सम, टोमॅटो रस्सम, पेपर रस्सम, लेमन रस्सम आणि गार्लिक रसम हे प्रसिद्ध आहेत.
रस्सम भातासोबत खातात, पण मला ते सुप म्हणून अतिशय आवडतं.
इतर रस्समची अथवा रस्सम पावडरची रेसिपी हवी असल्यास लापि वाजवणे मस्ट आहे.
यात बटाटे किंवा पनीर घालायचं असेल तर आजूबाजूला कोण तमिळी नाही ना याची खात्री करून मगच घाला.
आज बनवलं होतं हे रस्सम
आज बनवलं होतं हे रस्सम नंदिनी. रेसेपीसाठी धन्यवाद. सर्दीवर खरंच आराम मिळतो याने.
धन्यवाद.
धन्यवाद.
एका कलिगने कृष्णा ब्रँडची
एका कलिगने कृष्णा ब्रँडची रस्सम पावडर आणुन दिली आहे. ती वापरुन बघणार आहे रस्सम कसे होते ते.
Pages