क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण म्हणाला होता रे कि जिंक्सला फास्ट खेळता येत नाही ? >>> धोनी.

गेला तो. वेल प्लेड रहाणे. जिंकलो नाही तरी एकदम टसल दिली रहाणेने. नेक टू नेक आहे. रोहित आउट झाला नसता तर खरच जिंकलो असतो आत्ता.

मस्तच खेळला तो.. शतक तरी करेल असं वाटलं होतं.. तो फास्ट खेळू शकत नाही म्हणणार्‍यांना मात्र आज चांगला धडा मिळाला असेल..

टारगेटच एवढं आहे की आता मारामारी केल्याशिवाय कोणालाही पर्याय नाहिये..

MS Dhoni (rhb) 5 10 0 0 50.00

१२०
१५०
२००

बोला किती रन्स ने हारू. लावा बेटिंग

ओह. मला लक्षात नाही. चेक करतो. बाय द वे ४३८ म्हणजे ते ऑस्ट्रेलियाविरूद्ध चेस करताना रेकॉर्ड केले होते तोच स्कोअर.

रहाणे नी मस्त फाईट दिली. कोहली, शर्मा खेळले असते तर क्लोज झाली असती. धवन ने प्रॅक्टीस करून घेतली.

रैना ला ब्रेक ची गरज आहे.

साऊथ अफ्रिका केवळ अप्रतिम खेळले.

वाईट पद्धतीने हरलो
शर्मा गेल्यावरच ठरवल्याप्रमाणे मॅच बघायचे बंद केले होते.
त्या नादात अंजिक्यची फलंदाजी मिसली, पण ठिकाय, असे दणकून हरलेल्या सामन्यातील कोणाची चांगली खेळी धड आनंदही देत नाही.

कसोटी मालिका मात्र कमालीची रंगतदार होणार आहे, फक्त आश्विन फिट होऊन परत आला पाहिजे. आजही असता तर कदाचित वेगळे चित्र असते

आपली फलंदाजी व क्षेत्ररक्षण ज्या वेगाने सुधारलंय व सुधारतंय त्यामानाने आपली गोलंदाजी [ तेज व फिरकी] खूपच मागें पडतेय हेंच कटू सत्य कालच्या सामन्याने अधोरेखीत केलंय !!
<< मी जेंव्हा तो "त्याचे बॉल खूप वळत नाहीत.मला तो बरा वाटतो. पण ही हॅज लिमिटेशन्स" लिहिले तेंव्हा फक्त 'फिरकी' हाच निकष नव्हता. (जरी तो लिहिण्यात वाटत असेल तरी) त्यामुळेच, 'ही हॅज लिमिटेशन्स' लिहिले. त्याच्याकडे भेदकता नाही. तो भारतीय पिच वर देखील 'ओके' कॅटॅगिरी बॉलर आहे. >> केदारजी, मीं फिरकीचा निस्सीम चाहता असल्याने तुमच्या विधानाचा आधार घेवून फिरकीवर बोलण्याची माझी खाज भागवून घेतली इतकंच. अक्षर पटेल मला आवडत असला व ' प्रॉमिसींग ' असला, तरीही सध्या तरी तो ' आऊटस्टँडींग स्पीनर ' वाटत नाही हें मला मान्य आहे.

मुंबईची खेळपट्टी फलंदाजीलाच अनुकूल केल्याबद्दल म्हणे शास्त्रीबुवानी सुधीर नाईकना शिवीगाळ केली ! समजा, भारताने त्यामुळेच ३५०- ३७५ धांवा करून द. आफ्रिकेवर दडपण आणून सामना जिंकला असता तर याच शास्त्रीबुवानी सुधीर नाईक यांचा श्रेयनामावलींत उल्लेख तरी केला असता का ? शास्त्रीबुवा, एवढं क्रिकेट खेळून, जगूनही साधं सौजन्य व खिलाडूवृत्तीही अंगीं रुजूं नये !!!!! Sad

साधं सौजन्य व खिलाडूवृत्तीही
च्च!
अहो हे सगळे जगातल्या सर्व सामान्यांसाठी, नाहीतर खर्‍या मोठ्या लोकांसाठी,

पण जगातल्या हळद पिऊन गोरे होणार्‍यांनी काय करावे? मग मुजोरी, कुणाबद्दल आदर नाही, जास्तीत जास्त उशीर करून येणे, दुसर्‍याला बोलू न देता तासन तास बडबड, असे केले म्हणजेच तो मोठा!!
जगात कुठे गेलात तरी हेच दिसेल!

असे असते.

शास्त्री ह्या माणसाने गावसकर च्या वशिल्याने क्रिकेटकडून त्याला जे काही मिळालय त्याबद्दल धन्यता मानून कृतज्ञ रहावं. त्याचं क्रिकेट बघितलेले लोक अजुनही हयात आहेत.

शिवीगाळ करणे अयोग्य आहे हे मान्य करूनही शास्त्रीच्या बोलण्यामधे तथ्य आहे. आफ्रिकेने कधीही भारताला धार्जीण्या खेळपट्ट्या दिलेल्या नाहित, मग ते सौजन्य आपण का दाखवावे ? बॉलिंग हा आपला वीक पॉईंट आहे नि फिरकी हा त्यातल्या त्यात आफ्रिकेचा तेंव्हा फिरकीला धार्जिणी खेळपट्टी हवी होती असे मलाही वाटले. ह्या पिचवर बॉल फारसा वळत नव्हता हा विचित्र प्रकार होता. अगदी ताहिरलाही फारसे वळवता येत नव्हते तिथे बाकीच्यांची गोष्टच सोडा. आफ्रिकेकडे स्टेन, मॉर्केल, अ‍ॅबोट्ट, रबाडा असे ४ extra pace and zing असणारे बॉलर्स असताना फ्लॅट पिच वर आपलीच नांगी आपण मोडल्यासारखे होते. 'हव्या तशा खेळपट्ट्ञांवर खेळून जिंकणे' हे कागदावर कितीही श्रेयस्कर असले तरी आपल्या लिमिटेड बॉलिंग बरोबर ते अशक्य आहे. (नजिकच्या भविष्यकाळातही ते शक्य असेल असे मला तरी वाटत नाही) ज्या दिवशी लॉर्डसमधे किंवा डरबनमधे पहिल्या दिवशी हातभर वळलेला बॉल दिसेल त्यादिवशी आपण आपले पिचेस खणून नवीन बनवायला सुरूवात करूया. Wink

BTW MCA नेहमी झक्कींच्या BCCI बरोबर नेहमीच झगड्यामधे असते का कोण जाणे ? आधी स्रिनीवास कँपमूळे असेल असे वाटलेले पण आता तर स्वतः मनोहर आहे तरीही ?

असामी सहमत
आधीच्या खेळपट्ट्या देखील काही फिरकीचा आखाडा नव्हत्या, स्पोर्टींग विकेटच होत्या. पण ही खेळपट्टी मात्र अनाकलनीय होती. ते हिट द डेक काहीतरी म्हणतात त्या निव्वळ एकाच प्रकाराला सूट होणारी होती आणि याचा फायदा अर्थातच एकाच संघाचे गोलंदाज उचलणार होते. गेला बाजार आपला इशांत किंवा उमेश यादवही संघात नव्हता. भुवनेश्वर वा मोहीत इथे धोपटलेच जाणार होते. आणि बॉल वळत नसल्याने बाऊन्स स्पिनरच्या अगेन्स्ट जात त्यांनाही षटकार मारणे सोपे जात होते.
सामना अंतिम होता, निर्णायक होता, त्यामुळे ही एक चूकच होती.

बाकी शास्त्रीने काय शिवीगाळ चिडचीड केली ते मला माहीत नाही, मला ही न्यूज इथेच समजतेय

शास्त्रीबुवा, एवढं क्रिकेट खेळून, जगूनही साधं सौजन्य व खिलाडूवृत्तीही अंगीं रुजूं नये >>> शास्त्रीचा राग आला ती बातमी वाचून. एवढ्या सिनीयर आणि वेल रिस्पेक्टेड व्यक्तीशी एवढ्या माजाने वागण्याचे कारण कळत नाही. याला आधी सांगता आले नाही का कसे हवे पिच ते. मुळात "आयडियली" टीम मॅनेजमेण्ट चा हात नसतो असे म्हणतात पिच कसे असावे हे ठरवण्यात. प्रत्यक्षात हस्तक्षेप नेहमीच होत असतो, सगळीकडेच.

आश्चर्याचे दुसरे कारण म्ह्ण्जे शास्त्रीची इमेज वैयक्तिकरीत्या चपखल मॅनर्स असलेला अशीच होती आत्तापर्यंत - त्याच्या खेळाबद्दल कितीही वाद असूदेत - त्यामुळे तो लेटेस्ट खेळाडूंच्या पिढीसारखा अ‍ॅरोगण्ट वागला हे आश्चर्य आहे.

त्यामुळे तो लेटेस्ट खेळाडूंच्या पिढीसारखा अ‍ॅरोगण्ट वागला हे आश्चर्य आहे. >> कोहली बरोबर राहतो ना हल्ली, हवा लागली Proud

झक्कींच्या BCCI
बी सि सि आय माझे?
पैसे तरी द्या, मग झगडे, शिव्या काहीहि करा!
मला तर एम सी ए कोण हेहि माहित नाही. पण मी मायबोलीवर भांडायला तयार आहे. इतक्या जणांशी भाम्डतो त्यातलेच ते एक. कुणि का असेनात.

असाम्या खेळपट्ट्या तयार करायला सांगायला उशिर झाला त्यात क्युरेटरला का शिव्या द्याव्या. चांगले २-४ दिवस आधीच सांगावे ना.:P

एकतर आपले बॉलर बॅटसमनच्या पायापाशी बॉल टाकण्याऐवजी स्व:ताच्याच पायाशी बॉल आपटत राहीले. त्या रबाडाने रैनाची बघा दांडी उडवली. आणी बॅटींग खेळपट्टी होती तर आपले बॅटसमन होते ना? का क्युरेटरने मधेच येऊन बॉलींगल्या योग्य खेळपट्टी केली? नाचता येईन _गण वाकडे.

आपली माध्यमं बातम्या चुकीच्या पद्धतीने कशी सादर करतात याचे उदाहरण आता पहायला मिळाले. सकाळ, लोकसत्ता आणि मटा तिन्ही प्रमुख मराठी वृत्तपत्रांनी एकाच आशयाची हेडलाइन वापरली आहे..
"सचिन फक्त शतकांसाठीच खेळायचा... इति कपिल देव" .
संपूर्ण बातमी वाचल्यावर काय समजतं, तर खलीज टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत कपील देव म्हणाला की
"सचिन तेंडुलकर द्विशतक, त्रिशतकच नव्हे तर तो एकेवेळी ४०० धावाही काढू शकला असता. हा प्रचंड क्षमतेचा फलंदाज होता, मात्र दुर्दैवानं तो मुंबईतल्या शाळकरी क्रिकेटमधून बाहेरच आला नाही. सचिनने केवळ शतकाचाच विचार केला, त्यापुढचा विचार त्याने केलाच नाही. माझ्या मतांचा चुकीचा अर्थ घेऊ नका . त्याने जी कामगिरी केली आहे, त्याही पेक्षा खूप अधिक तो करू शकला असता"
काहीतरी सनसनाटी लिहायच्या नादात, सगळेच जण असलं काहीतरी दिशाभूल करणारं लिहू लागलंय. Sad

>>> फेरफटका | 28 October, 2015 - 19:24

शास्त्री ह्या माणसाने गावसकर च्या वशिल्याने क्रिकेटकडून त्याला जे काही मिळालय त्याबद्दल धन्यता मानून कृतज्ञ रहावं. त्याचं क्रिकेट बघितलेले लोक अजुनही हयात आहेत.
<<<

Rofl

+१००

शास्त्री ह्या माणसाने गावसकर च्या वशिल्याने क्रिकेटकडून त्याला जे काही मिळालय त्याबद्दल धन्यता मानून कृतज्ञ रहावं. त्याचं क्रिकेट बघितलेले लोक अजुनही हयात आहेत.
>>>>>

१९९२ च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ बॉलमध्ये ५७ रन्सची महान इनिंग खेळली होती शास्त्रीबुवानी!
भारताने ती मॅच अवघ्या १ रनने गमावली होती. त्यानंतर शास्त्रीला वन डे मधून गचांडी मिळाली!

शास्त्री ने त्या काळात (आणी आधी देखील) अशा बर्याच ईनिंग्ज खेळल्या आहेत (३३ बॉल १ वगैरे). म्हणूनच वयाच्या ३० व्या वर्षी रिटायर व्हायची वेळ त्याच्यावर आली. ती ऑडी मिळाली ती बेन्सन अ‍ॅण्ड हेजेस सिरीज पण तो असाच अ‍ॅव्हरेज वाढवत खेळला होता. असो.

कपिलदेव ची न्यूज वाचली. मुळात प्रश्न काय होता हे कळलं नसल्यामुळे त्या उत्तरावर काही बोलता येत नाहीये.

मला किडा सोडायचा नाहीये, पण एक निरीक्षण नोंदवतो: ज्या ज्या प्लेयर्स ची नावं मॅच फिक्सिंग मधे आली (ज्यात कपिलदेव पासून दिनेश मोंगिया पर्यंत सगळे आले), त्या सर्व प्लेयर्स ना बीसीसीआय ने क्रिकेट (ऑफिशियल) पासून दूर ठेवलं आहे.

काहीतरी सनसनाटी लिहायच्या नादात, सगळेच जण असलं काहीतरी दिशाभूल करणारं लिहू लागलंय. >> सचिन ने कपिल पाजीबद्दल त्याने माझ्या कोचिंगच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहित असे लिहिले आहे ह्याची पार्श्वभूमी त्याला आहे असेही वाचले.

आणी बॅटींग खेळपट्टी होती तर आपले बॅटसमन होते ना? > >राजा समोर बॉलर्स कोण आहेत ह्यालाही तेव्हढेच महत्व असते ना ?

Pages