श्रीलंका सहल - भाग ९ ( अंतिम ) - कोलंबो

Submitted by दिनेश. on 23 October, 2015 - 02:31

श्रीलंका सहल - भाग १ - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/55306
श्रीलंका सहल - भाग १ - एअरपोर्ट ते नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55355
श्रीलंका सहल - भाग २ अ - हॉर्टॉन प्लेन्स नॅशनल पार्क
http://www.maayboli.com/node/55444
श्रीलंका सहल - भाग २ ब - हॉर्टोन प्लेन्स नॅशनल पार्क http://www.maayboli.com/node/55445
श्रीलंका सहल -भाग ३ - न्यू झीलंड फार्म, अशोक वाटीका, अरालिया ग्रीन हिल्स
http://www.maayboli.com/node/55526
श्रीलंका सहल - भाग ४ - व्हीक्टोरिया गार्डन, नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55845
श्रीलंका सहल - भाग ५ - नुवारा एलिया ते कँडी http://www.maayboli.com/node/55900
श्रीलंका सहल - भाग ६ - सिगिरीया http://www.maayboli.com/node/55940
श्रीलंका सहल - भाग ७ - कँडी रॉयल बोटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/56086
श्रीलंका सहल - भाग ८ - कँडी रॉयल बोटॅनिकल गार्डन- ऑर्किड्स http://www.maayboli.com/node/56101
इथून पुढे...
कँडीहून कोलंबोचा प्रवासही मजेत झाला. एखादे शहर जवळ येऊ लागते तसे जसे वातावरण बदलत जाते, तसेच झाले तरी पण कोलंबोत बर्यापैकी हिरवाई आहे.
आणखी एक म्हणजे मी ज्या दिवसात प्रवास केला तो रामबुटान या फळाच्या बहराचा मौसम होता, त्यामूळे ठिकठिकाणी त्या फळांचे ढीग लागले होते.

आम्ही शहरात शिरलो तो रविवार होता, त्यामूळे रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. मुंबईच्या फोर्ट भागात आहेत, साधारण त्याच शैलीतल्या इमारती तिथे आहेत पण फेरीवाल्यांची गर्दी नाही. आणि हो, बर्यापैकी स्वच्छताही आहेच.

एकंदर सर्व प्रवासात मला काही घरांवर मोठ्या संख्येत एखाद्या रंगाचे झेंडे ( लाल, हिरवे, निळे ) लावलेले दिसत. ते
कशाला, असे विचारल्यावर मात्र मजेशीर माहिती मिळाली. तिथे राजकिय पक्ष्यांना निवडणूक चिन्हासोबतच एखादा रंगही निवडता येतो. हा रंग प्रचारासाठी वापरतात पण त्याचा वापर सार्वजनिक ठिकाणी करता येत नाही. फक्त उमेदवाराच्या घरावर आणि कार्यालयावरच करता येतो. प्रचारासाठी सभा होतात त्यात भाषणेही होतात पण रस्त्यावरून लाऊडस्पीकर्स वरून प्रचार करायला अजिबात परवानगी नाही. उमेदवारांची पोस्टर्स पण अगदीच मोजकी होती आणि त्यावर फक्त उमेदवाराचा एकट्याचाच फोटो होता.

त्याच काळात क्रिकेटची मॅचही तोंडावर आली होती, त्यासंबधातही कुठे फलक दिसले नाहीत. एकंदर खरेच शहर असूनही खुप शांत होते. हवामान मात्र मुंबईसारखेच म्हणजे उष्ण आणि दमट होते.

थिवांकाने मला बरेच फिरवले पण मी शक्यतो गाडीतून न उतरताच ते सर्व बघितले ( कारण.. हवामान ) श्रीलंकेवर ब्रिटिशांच्या आधी डचांचे राज्य होत त्यामूळे काहि इमारतींवर तो प्रभाव आहे. सर्व इमारती नीट राखलेल्या आहेत

माझे हॉटेल मिराज मात्र अगदी समुद्रकिनार्यावरच होते. खरे तर किनारा आणि हॉटेलच्या मधे रस्ताच नव्हे तर दुहेरी रेल्वेलाईनही होती, पण रुममधून समुद्र अगदी हाताच्या अंतरावर आहे असे वाटत होता.
पण शहरातील हॉटेल असल्याने, थिवांकाची तिथे सोय होणार नव्हती. तो त्याच्या नातेवाईकांकडे राहणार होता. मला फिरवायला परत येऊ नकोस असे सांगून मी त्याला दुसर्या दिवशी सकाळी ये असे सांगितले. कधीही फोन कर मी अर्ध्या तासात हजर होतो, असे असे सांगून तो गेला.

हॉटेलसमोरचा रस्ता, मग त्याला जोडून काही छोटे रस्ते आणि मग एक मोठा समांतर हमरस्ता असे एकंदर माझ्या
लक्षात आलेच होते. असुरक्षित वाटायचे काही कारण नव्हतेच आणि रस्ता चुकायचाही प्रश्न नव्हता. ( चुकलो असलो तरी मदत मिळालीच असती. ) त्यामूळे मी एकट्यानेच भटकायचे ठरवले.

कुठल्याही शहरी गेल्यावर मला तिथल्या किराणामालाच्या दुकानात जायला फार आवडते. कपडे आणि इतर खरेदी उद्यावर ठेवली होती तरी बरीच फुटकळ खरेदी मी करून घेतली. स्थानिक मसाले, लोणची, चटण्या वगैरे.

मग त्या रस्त्यावरून मनमुराद भटकलो. विदेशी पर्यटक फार दिसले नाहीत, बहुतेक सर्व स्थानिकच होते तरीही ते वेगळे वाटत नव्हते. तिथल्याच एका शाकाहारी हॉटेलात जेवायला शिरलो. तिथे इडली आणि नयीअप्पम मोठ्या ताटात समोर आणून ठेवतात. त्यातले आपल्याला हवे तेवढे घ्यायचे आणि तेवढ्याचेच पैसे लावतात. त्या सोबत सांबार, भाज्या, चटण्या फुकट. छान चव होती. दही पण छान होते.

हॉटेलच्या समोरुनच रेल्वेगाड्या जात होत्या तरी रुममधे त्याचा फारसा आवाज येत नव्हता. ब्रेकफास्टही समुद्राच्या साथीनेच झाला. मग परत त्या रस्त्यावरून भटकून आलो.

ठरल्याप्रमाणे थिवांका आलाच. मग आम्ही गाडी तिथे ठेवून पायी भटकायला लागलो. मला तिथला भाजीबाजार बघायचा होता. छान ताज्या ताज्या भाज्या होत्या. तिथेच मी रामबूटान आणि मँगोस्टीन घेतले. भारताच्या मानाने फारच स्वस्त होते.

तिथे साड्या घ्याच्या हे मी आधीच ठरवले होत. साध्या सुती साड्या पण अत्यंत तलम पोताच्या आणि खुपच कमी किमतीत मिळाल्या. तिथल्या प्रींटेड साड्याही छान होत्या. रंगसंगतीही छान होती. मग आम्ही एका भारतीय हॉटेलात , आंध्र पद्धतीचे जेवण जेवलो.

थॉमस कूकतर्फे मला एडेल चे डिस्काऊंड कूपन दिले होते, त्यामूळे तिथे जाणे भाग होते.

हा ब्रँड तिथला प्रसिद्ध ब्रँड आहे. भरपूर मोठे शोरुम होते आणि जबरदस्त कलेक्शन होते. मित्रमैत्रिणी, भाचेमंडळी, भाचेसुनबाई, जावईबापू आणि नात यांच्यासाठी भरपूर खरेदी केली. आणि तरीही एकूण रक्कम मला वाटले होते त्यापेक्षा खुपच कमी झाली.

रत्यावर जरा ट्राफिक होते पण कुठे जॅम झालेला नव्ह्ता. खुप मोठे रस्ते नाहीत तरी ट्राफिक शिस्तीत होते. कोलंबो शहरात मध्यभागीच एक मोठे उद्यानही आहे. शिवाय स्टेडीयम आहे. नॅशनल थिएटर आहे. ( हे सगळे गाडीतूनच बघितले )

मला परत चहाही हुक्की आली म्हणून आम्ही फ्लोटींग मार्केट मधे गेलो. चालू असलेल्या रेल्वेलाईला लागून
एखादे ओपन एअर हॉटेल असेल अशी क्ल्पना मी मुंबईत तरी करू शकत नाही, पण तिथे ते बघितले आणि चहादेखील घेतला. एका तळ्याच्या काठाने हे मार्केट बांधलेय. ऐन शहारात असूनही छान निवांत जागा आहे.
मग तिथे असलेले किंग कोकोनट पण घेतले. अगदी मधुर पाणी असते यातले.

विमानतळावर जायला नव्याने हायवे बांधलाय तरी विमानाला बराच वेळ असल्याने, मी जून्या मार्गानेच जायचे ठरवले. तिथेही एक मोठे सुपरमार्केट दिसले मग वाचवलेले सर्व पैसे तिथे खर्च करुन टाकले.

विमानतळ फार मोठा नाही पण सुंदर आहे. अगदी चेक इन एरियाच्या आधीदेखील काही किराणामालाची दुकाने आहेत आणि शहरात ज्या किमती आहेत त्याच किमतीला तिथे वस्तू मिळतात. तिथे आणखी एक खास प्रकार घेतला तो म्हणजे बर्न्ट काजू.. हो करपवलेले काजू पण अगदी कोळसा नसतो केलेला. चवीला मस्तच लागतात
ते. एअरपोर्टवर बर्यापैकी ड्यूटी फ्री एरिया आहे.

माझ्याकडे अगदी मोजके श्रीलंकन रुपये राहिले होते. अगदी गेटजवळच्या दुकानातही मी काजू घेतले,
तिथल्या सेल्सगर्लला माझ्या हातातले रुपये दिसले आणि मी डॉलर्स देऊ केल्यावर ती म्हणाली, रुपये दिलेस
तरी चालतील... मी म्हणालो नाही मला आठवण म्हणून हवेत..

परत जायची खुप इच्छा आहे पण बहुतेक नाही मला शक्य होणार.. वेळ थोडा आणि बघायचे देश फार उरलेत !

1) कोलंबो शहरातील इमारती

2)

3)

4)

5)

6)

7)

8)

9)

10)

11) मिराज हॉटेलमधली रुम

12)

13) आणि रुममधून दिसणारा समुद्र

14) Breakfast

15) by the Sea ( you can see the Railway Tracks on the beach )

16) हॉटेल रिसेप्शन वर दिसलेली वेगळी डबल तगर

17) नवयुग भारतीय रेस्टॉरंट

18)

19) Navayuga Entrance

20) कोलंबो शहर

21) नाटकाचे थिएटर

22) King coconuts

23) Floating Market by the Railway line

24)

25)

26)

27)

28)

29) या भिंतीच्या वर रेल्वेचे रुळ दिसताहेत. आणि त्यावरून गाड्याही जातात.

30)

31)

32)

33) आपटा आणि त्याची फुले

34) एअरपोर्टच्या दारातली बकुळ

35) Colombo Airport

36)

37)

समाप्त..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते नॅशनल थिएटर चायनाने बांधून दिलेले आहे. कोलम्बो ते गॉल (गॅले) ह्या एक्सप्रेसवे मध्ये चायनाची गुंतवणूक आहे. हणमतोटा इथले बंदर ही चायना विकसीत करीत आहे . या सर्व बाबी भारतासाठी चिंताजनक आहेत

हो रॉबीन,
भारत आपल्या सर्वच शेजारी देशांशी डिप्लोमॅटीक संबंध ठेवण्यात अयशस्वी ठरलाय. श्रीलंकेत उद्योजकांना पण बराच वाव आहे, नैसर्गिक साधने भरपूर आहेत.. पण तसे काही होताना दिसत नाही. त्यांच्याकडे अगदी छोट्या छोट्या बाबतीत, भारताला योग्य तो मान दिलेला आहे मग ते एखाद्या जागेचे तिकिट असो कि झाडावरचा माहितीफलक असो. आपल्या देशात असे कुठे दिसते ?

आणि श्रीलंकाच का, इथे अंगोलातल्या कित्येक रस्त्यांवर आपण चायनात आहोत असेच वाटत राहते.

वाह्ह!!! खूपच सुंदर, नीट नेटकं शहर आहे कोलंबो..
खरेदी ही स्वस्त वाटतीये. Happy

आपट्याला फुलं असतात ही गोष्ट पहिल्यांदाच समजली.. सुंदर आहेत फुलं..
इतकी डीटेल ओळख करून दिलीस ना श्रीलंकेची.. आता नक्की जाणार तिकडे..
थिवांका चा नंबर जपून ठेव.. मी घेईन तुझ्याकडून लौकरच.. Happy

त्यांच्याकडे अगदी छोट्या छोट्या बाबतीत, भारताला योग्य तो मान दिलेला आहे मग ते एखाद्या जागेचे तिकिट असो कि झाडावरचा माहितीफलक असो. आपल्या देशात असे कुठे दिसते ?>>>>

अगदी बरोबर आहे हे भा‍रताबद्दलचा असाच दृष्टिकोण बर्मा आणि जापनीज लोकांमध्ये ही दिसतो.
त्याचे कारण पण आहे
या देशांमधे बुद्धानां मानणारे लोकं खुप आहेत ते भारताला बुद्धांची जन्मभुमी म्हणुन खुप मान देतात.

बर्‍याच वेळा त्यांना इथे टुरिस्ट म्हणुन खुप वाईट अनुभव येतात तरी ते बुद्धांच्या शिकवणी नुसार त्यांना क्षमा करतात.

आभार सर्वांचे,

भारताने श्रीलंका, मालदीव, नेपाळ, भूतान एवढेच नव्हे तर म्यानमार आणि अफगाणिस्तानशी उत्तम संबंध ठेवले असते तर चायनाची भिती वाटायचे कारणच नव्हते. असो.. अजूनही करता येईल ते.

वर्षू, अगदी नक्की जा, नक्कीच आवडेल हा देश.

या मालिकेतल्या फोटोंमुळे श्रीलंकेला जावंसं वाटतंय. माझी एक कलिग श्रीलंकन आहे (सिंहली नाही) ती लहान असताना त्यांनी देश सोडला आणि आता ती परत गेलीच नाहीये. त्यांचं तिथलं सगळा जमीन-जुमला लुटला गेला असेल असं कधीतरी म्हणते. असो.

आभार वर्षू,

वेका, काही वर्षे त्यांच्यासाठी खुप कठीण होती, पण मला वाटते त्या काळातही फक्त जाफना भागातच अशांती होती ( त्या काळातच ट्रव्हल एजंट, बाकी श्रीलंका सुरक्षित आहे, असे सांगत असत )

या कठीण काळातून बाहेर आल्यावर, बरेच देश हिंसाचाराचा तिटकारा करू लागतात. त्याची झळ सर्वांनाच लागलेली असते ( हे मी अंगोला आणि रवांडा मधेही अनुभवतोय ) सध्या तरी तिथे शांतता आहे आणि ती तशीच राहो, असे मनापासून वाटते. त्या मैत्रिणींला जरुर तिथे भेट द्यायला सांगा.

मस्त होती संपूर्ण मालिका आणि खूप सुंदर प्रचि Happy
वर्षू, मँगूस्तिन म्हणजेच कोकम आहेत का गं? अगदीच सारखे दिसतायत..

दिनेशदा खूप सुंदर आहेत चित्र. इतकं मोकळं ढाकळं शहर क्वचित पहायला मिळतं हल्लीच्या जगात.

त्या नारळाच पाणी गोड होतो का? थाई नारळांच पाणी साखरेसारखे गोड असत. तर मलेशियन नारळाच्या पाण्याला किंचित तुरट चव असते.

मी ईंडोनेशियाला फिरायला गेलो होतो बांडुंगमधे तिथे मला एका कारवाल्याने रंबुतान ह्या फळाचा अर्थ सांगितला. मलय आणि ईंडोनेशियामधे रंबुत म्हणजे केस. अर्थात डोक्यावर केस असलेले फळ. इथे वाचा:
Rambutan is native to tropical Southeast Asia and commonly grown throughout Indonesia, Malaysia, Thailand and the Philippines.[3] It has spread from there to various parts of Asia, Africa, Oceania and Central America.[6] The widest variety of cultivars, wild and cultivated, are found in Malaysia.[3]
https://en.wikipedia.org/wiki/Rambutan

Aatmadhun, cocum is different fruit, though the appearance is similar. The pulp of mangosteen is much sweeter. The peel is very thick and bitter, but has some medicinal properties.