एक्झिक्युटिव्ह मॅचमेकिंग - भाग २ : मंजूडी

Submitted by संयोजक on 30 August, 2010 - 04:13

2010_MB_Ganesha3_small.jpgएक्झिक्युटीव्ह मॅचमेकींग - भाग १

"गूड आफ्टरनून सर!!"

"गूड आफ्टरनून बेटी| माफ करना, मेरी छुट्टीके कारण आपको तकलीफ उठानी पडी|"

अरे काय!! मला अगदी गहीवरूनच आलं.. एक डायरेक्टर एका एक्झिक्युटिव्हला 'माफ करना' म्हणतो म्हणजे काय?

"सर, कोई तकलीफ नहीं| आखिर पेमेंट टाईम पे होना जरूरी है, विदाऊट एनी पेनल्टी|"

"सही बात है बेटी| आप जैसे नेक लोग हमारे साथ है इस लिए कंपनी दौड रही है|"

आता गहीवरण्याचा कडेलोट होऊन मी त्यांच्या कुशीत वगैरे शिरेन ह्या भीतीने मी बसल्या जागेवरूनच चेकचं एन्व्हलप काढून त्यांच्या हातात दिलं.

"बडी बेटी की शादी थी इस लिए मैं छुट्टी पे था|" नोकराने ट्रे भरून आणलेल्या मिठाईकडे हात दर्शवत डायरेक्टर साहेब म्हणाले. यावेळी ट्रे उंची होता आणि मोठ्ठाही होता, मिठाई पण उंची होती, पण ती ट्रेभर गोssड मिठाई पाहूनच मला अजिर्ण झालं. गाढवाला गूळाची चव काय?

"शादी इधर थी या..."

"अहमदाबादमें बेटी, अहमदबादमें...आप मूँह तो मिठा करो|"

आता मूँह मिठा करायचं म्हणजे एवढ्या भरलेल्या ट्रेमधून मिठाईचा एक तुकडा उचलायचा की एक कण उचलायचा, एकट्यानेच खायचा की त्या दोघांनाही 'आप ले लो' म्हणायचं किंवा कसं काय ते न सुचून मी शांतच राहिले. तेवढ्यात रुचीही उठून आत निघून गेली.

"घर एकदम खाली हो गया| बेटी की बिदाई बडी तकलीफ देनेवाली बात है|"

"सही है...."

"आप अपने पिताजी दर्द समझती हो बेटी| मुझे तो ये दो ही बिटीया... एक की शादी कर दी अभी ये छोटीवाली के लिए कोई अच्छा सा लडका देखना है|"

"सर!! अपने ऑफिसमेंही एक अच्छा लडका है रुची के लिए| योगेश मेहता नाम है उसका... CS रँकर है, अभी LLM कर रहा है| अपने सेक्रेटरियल डिपार्टमेंटमें मॅनेजर रँक फाईव्ह पे काम कर रहा है| रुची से दो साल बडा है| रुची भी CS है, दोनोंका फिल्ड सेम ही है| उसके घर का भी बहुत बडा ..." मिठाई खाता जीभ चावली गेली म्हणून थांबले ती थांबलेच...

न कळे काय घडला प्रमाद हा? काय म्हणून मी हे बोलून गेले सगळं? त्यांनी 'बेटी, बेटी' म्हणून आपल्याला आदर दिला त्याचा गैरफायदा घेतला का आपण? की रुचीचे पॉझिटीव्ह सिग्नल्स आपण ओळखले म्हणून बोलायचं धाडस केलं? की योगेशच्या मोबाईलमधला फोटो डिलीट झाल्याचा अपराधी भाव कुठेतरी मनात होता, त्याची ही भरपाई होती? काहीही कारण असूदे, मी भयंकर आगाऊपणा केला होता. आता काय म्हणेल एवढा मोठा माणूस? जाऊ दे!! आपली कीव करेल फारतर.. नाहीतरी साधे एक्झिक्युटिव्ह आपण.. पुढे कधी काय संबंध येणार आहे ह्यांच्याशी....

"सॉरी सर!!"

"अरे सॉरी नही बेटी.. अच्छी बात कही है आपने| आज का दिन ही अच्छा है| आज सब नेक काम हो रहे है| हम HR से वह लडकेकी सब इन्फॉर्मेशन निकालेंगे बेटी|"

"ठीक है सर.. मैं निकलू?? रुची??"

"आ रही है.. एक मिनीट|"

रुची हातात एक कसलातरी बॉक्स घेऊन बाहेर आली.

"यह शादी की मिठाई ले जाना बेटी|"

"बाय..."

रुचीचा गोड आवाज कानात साठवत, भयंकर अपराधीपणाचे भाव मनात घेऊन मी निघाले. त्यातल्या त्यात एक ठीक होतं की चेकवर सही झाली होती.

ऑफिसला परतले तेव्हा पुढचा दोन दिवसांचा विकएन्ड साजरा करण्यासाठी सगळे वेळेत पळाले होते. मितुल शाहला चेकवर सही झाल्याचा SMS पाठवला. त्यावर त्याचा रीप्लायः "Ok, arrange for pmt on Monday"

well done नाही, Good नाही, thanks नाही...काहीही नाही.

रितू एकटीच काहीतरी आवराआवर करत बसली होती. विषण्ण मनाने तिच्याकडे जाऊन सगळा वृत्तांत तिला दिला.

आधीच मोठे असलेले डोळे अजून वटारत ओरडलीच ती, "अरे यार, यह क्या कर दिया तुमने? योगेश सिर्फ 'अच्छी लगती है' इतनाही बोला था.. तुमने तो उसको 'मिस्टर ग्रूम' ही बना डाला..."

"अरे वो बोला तो था इन्फर्मेशन निकालनी है.. "

"हां लेकिन इसका मतलब ये तो नही होता की उसको उसके साथ शादी करनी है| ये आजकल के लडकोंका ऐसा नही होता माय डियर| उनको कोई कमिटमेंट नही चाहिये|"

"ओह गॉड रितू.. अभी क्या होगा? मैं क्या करू? योगेशको फोन करके सब बोलू क्या?"

"तू अभी कुछ मत कर... योगेशको मै बोलती हूँ| और ग्रूपमेंभी कुछ बोलने की जरूरत नही है, समझी? अभी आरामसे घर पर जा|"

मी वेडपटासारखी मान डोलावत तिथून निघाले.

रविवारी सकाळी योगेशचा SMS : m going to ABD. talk to u later

हरे राम!! रागावला वाटतं माझ्यावर..

सोमवार, मंगळवार फारसं काही घडलं नाही ऑफिसात... नेहमीची कामं शांतपणे सुरू होती. रितूचं बाळ अचानक आजारी पडलं म्हणून ती सुट्टीवर होती. योगेश नव्हता त्यामुळे दिव्या, अ‍ॅन्डी, सुकूर इत्यादी मंडळीही तशी शांत होती.

बुधवारी सकाळी मी ऑफिसला आले तर माझ्या टेबलवर चॉकलेट्सचा मोठ्ठा बॉक्स आणि त्यावर लेबल, Thanks a lot!! no more words to express, YR

मी बॉक्स उलट सुलट करून पाहिला, पाठवणार्‍याचं नाव कुठेच नाही. चुकून माझ्या टेबलवर ठेवला गेला असेल असं समजून अ‍ॅडमिनला फोन केला तर मॅनेजर म्हणे तुमच्याचसाठी आहे. मी अवाक्!!

कॉम्प चालू केल्या केल्या धडाधड चार पाच मेसेज बॉक्सेस, Hurray!!, u r gr8, thx a lot, wonderful!!

मला कळेचना की काय चालू आहे ते.. मेसेजेस सगळे ग्रूपमेंबर्सकडून आले होते. कशाबद्दल सगळे एवढे माझ्यावर खूष झालेत??

धावतच रितूकडे गेले, पण मॅडम आजही आल्या नव्हत्या. मग सुकूरचं टेबल गाठलं. मला पाहून तो इतका एक्साईट झाला की ऑफिसात त्याने नाचणं बाकी ठेवलं होतं.

त्याच्याकडून कळलेली हकीकत अशी की मी केतन पारेखच्या घरून बाहेर पडल्यावर माझी सगळी बडबड त्यांनी रुचीला ऐकवली. त्या सग़ळ्याबद्दल रुचीची काही हरकत नाहीये, उलट तिलाच त्याच्यात विशेष रस आहे हे ऐकून त्यांनी ताबडतोब पावलं उचलली होती. HR President कडून योगेशशी संबंधित संपूर्ण माहिती मागवून शनिवारीच त्याच्या आई-वडिलांशी संपर्क साधला होता. योगेशचे आई-बाबा थोडीच एवढं चांगलं 'स्थळ' हातचं जाऊ देणार होते? त्यांनी ताबडतोब योगेशला बोलावून घेतलं, त्याच्यासमोर थेट लग्नाचाच प्रस्ताव मांडून त्याचा होकार वदवून घेऊन सोमवारी इकडची मंडळी अहमदाबादला जाऊन साखरपुड्याची, लग्नाची बोलणी करून मंगळवारी परत आली होती. लगेचच्या रविवारी साखरपुडा इकडे.. आणि तीन महिन्यांनी लग्न!! झट मंगनी पट ब्याह!!

मला चक्करच यायची बाकी होती. टेबलवर ठेवलेल्या चॉकलेटच्या बॉक्सचा उलगडा झाला आणि त्या मेसेजमधल्या YR चाही..

तेवढ्यात बॉसचा मला फोन आला, "क्या किया आपने? KP से नोट आई है, जिसमें लिखा है Pls. send your assistant, Ms. Executive Matchmaking.. क्या है ये? what is this?"

"सर, मैं उनसे मिलके आती हूँ और बताती हूँ आपको|" मी हसत हसतच त्याला बोलले.

Executive Matchmaking...

माणूस करायला जातो एक.. आणि घडतं भलतंच! नकळत कधीतरी आपल्याकडून भलतीच अतर्क्य कृती घडून जाते आणि मग खात राहतं आपलं मन... पण त्याचा परिणाम असा चांगला झाला, मंगल झाला तर काय बहार येते.

आगाऊपणा कधी कधी कल्याणप्रद ठरतो तो असा.

त्यामुळे वाचकहो, माझा एक फुकट सल्ला तुम्हाला... स्वभावात नसला तरी आवश्यक तिथे आवश्यक तेवढा आगाऊपणा नक्की करा....भीडभाड, संकोच, मर्यादा न बाळगता.. कोण जाणे कदाचित कोणाचंतरी आयुष्यही घडवून जाईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा भाग आलेला कळलाच नाही. आज पहिला भाग वाचला आणि दुसर्‍या भागाची वेडपट सारखी वाट बघत बसले. Happy मस्त लिहीलीयेस गोष्ट. मला तुझी शैली खुप आवड्ते.

मस्तच एकदम. खुसखुशीत.. दोन्ही भाग आवडले.

जरा लवकर संपली काहीच वळणे न घेता, प्यार मे नो ट्विस्ट Happy

झक्कास Happy

एका भागात चालली नसती.
पण दुसरा भाग फारच लहान आहे. हेही खरंच..

पण एकुण भारी.

रच्याक : तुम्ही असंच वन्स इन अ ब्लु गणपती लिवता का ? Light 1

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

गणेशोत्सव संयोजकांचे अनेक आभार.

पहिला भाग जास्त आवडला.. दुसरा जरासा फिल्मी वाटला..>>>

फार्सिकल कथा लिहिताना कथेची मागणी तशी होऊन जाते बर्‍याचदा.. Happy

पहिल्या भागाच्या प्रतिक्रियांत आर्च म्हणतेय तशी वळणं देता आली असती कथेला, पण आधीच एकाच भागात लिहिलेली कथा तिच्या लांबीमुळे संयोजकांना दोन भागात प्रकाशित करावी लागली, तर मग तश्या वळणांमुळे पूर्ण गणेशोत्सवभर ह्याच कथेचे १०-१२ भाग प्रकाशित करावे लागले असते. Happy

तुम्हा सर्वांचा लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा ही बाप्पाचरणी प्रार्थना.

गणपती बाप्पा मोरया!!

अरे वावावा.. एका सीएसचं भलं झालं की.. मस्त गं मन्जूडे! स्मित

केतन पारेख काय आणि? हाहा इतक्या भल्या माणसाचं हे नाव! फिदीफिदी दिवा घ्या

>> +१

इतके दिवसांनी वाचली.. मस्तये.. Happy

Pages