..
आज नाताळच्या शुभमुहुर्तावर वर्तमानपत्रात एक छान बातमी वाचण्यात आली. एक मराठी माणूस म्हणून अभिमान तर वाटलाच पण स्वप्निलचा चाहता म्हणून खूप कौतुकही वाटले.
बातमी होती,
"स्वप्नील जोशीचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाइड करण्यात आलं आहे.
त्यामुळे व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंट असणारा स्वप्नील हा पहिला मराठी अभिनेता ठरला आहे."
बातमीत पुढे लिहिले होते,
"यामुळे स्वप्नील नाव सर्च केल्यावर स्वप्नील जोशीचं नाव सर्च रिझल्टमध्ये पहिल्यांदा झळकेल."
आणि लगोलग मी "Swapnil" या ईंग्रजी आद्याक्षरांसह गूगल करताच पान "स्वप्निल जोशी" या मराठी अभिनेत्याच्या नावाने आणि माझे मन अभिमानाने भरून राहिले.
सविस्तर बातमी इथे वाचू शकता -
http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/swapnil-joshi/moviearti...
............
स्वप्निल जोशी (जन्म १९७७) हा मला स्वप्निल जोशी बनायच्या कैक आधीपासून आवडू लागला होता. कृष्णा (१९९३) या मालिकेत त्याने कृष्णाची भुमिका वठवली होती. कृष्णाचे रूप साकारायला यापेक्षा गोंडस आणि लोभसवाणे व्यक्तीमत्व दुसरे सापडू नये. पण केवळ रूपच नाही तर त्यासोबत होती ती लहान वयापासून असलेली अभिनयाची जाण. त्या बरेच आधी रामायणातील (१९८७) लवकुश पैकी कुश’ची भुमिकाही त्याने साकारून झाली होती. थोडेफार महागुरू सचिन पिळगावकर यांच्यासारखीच बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारा हा आणखी एक मराठी गुणी अभिनेता उगवला आहे हे तेव्हाच लक्षात आले होते.
कुश ते कृष्णा !
त्याच्यात दडलेला कलाकार मात्र मला गवसला ते गुलाम-ए-मुस्तफा (१९९७) या हिंदी चित्रपटात. नाना पाटेकरसमोर सर्वार्थाने बच्चा असलेला तेव्हाचा स्वप्निल त्या छोट्याश्या भुमिकेत आपला प्रभाव पाडून गेला. चित्रपटात नानाला उस्ताद म्हणत संबोधणारा हा त्याचा छोटू फंटरही तितकाच लक्षात राहिला.
पुढे त्याने हिंदीत जम बसवायला कित्येक मालिका केल्यात, काही गाजल्याही, मराठीतही काही चित्रपट आले, पण त्याच्या प्रतिभेकडे पाहता ते पुरेसे नव्हते. पण त्याच काळात सोनीवर ‘कॉमेडी सर्कस’ नावाची स्टॅंडअप कॉमेडीची मालिका सुरू झाली आणि त्याचा आणखी एक पैलू समोर आला. ती सर्कस मी ज्या दोन-तीन निवडक अदाकारांसाठी बघायचो त्यात स्वप्निलचा नंबर सर्वात वरचा होता. विनोदात कुठलाही सवंग प्रकार न करता, नकलांचा सहारा न घेता, संयत अभिनयही करता येतो, हे त्यात त्याने दाखवले. नव्हे हे त्याच्याकडून शिकण्यासारखे होते. तिथे त्याने कैक सीजन गाजवले. "कॉमेडी सर्कस सीजन-१" (२००७) मध्ये तो उपविजेता राहिला, तर "कॉमेडी सर्कस कांटे की टक्कर" (२००७) मध्ये भल्याभल्यांना टक्कर देत तो विजेता ठरला.
हिंदीतील याच पुण्याईच्या जीवावर त्याला मराठी "फू बाई फू" (२०१०) या अश्याच धर्तीच्या कार्यक्रमात जज (परीक्षक) बनवण्यात आले. इथेही त्याच्यातला आणि सचिन पिळगावकर यांच्यातला समान धागा शोधण्याचा मोह आवरत नाही. त्यांनीही "नच बलिये - पहिलाच सीजन" चे विजेते पद पटकावले होते आणि त्यानंतर ते आपल्याला मराठी कार्यक्रमात महागुरू म्हणून दिसले होते. अर्थात यात एक फरक होता. सचिनजी हे सारे घडत असताना लाईफटाईम अचीवमेंटच्या टप्प्यावर होते तर स्वप्निलची कारकिर्द फुलायची बाकी होती. त्यामुळे मी कित्येकांना, ‘अरेच्छा, याला का जज बनवले?’ अशीही प्रतिक्रिया व्यक्त करताना पाहिले आहे. पण अंगभूत कलागुण हे फार काळ लपून राहत नाही हे त्याच्या पुढच्याच चित्रपटाने दाखवून दिले.
"मुंबई - पुणे - मुंबई" .. (२०१०).. नावाप्रमाणेच दमदार चित्रपट. ज्याने स्वप्निलला निव्वळ एका रोमांटीक अभिनेत्याची ओळखच नाही मिळवून दिली, तर त्याचा चाहता वर्गही निर्माण केला. पुन्हा पुन्हा बघूनही कंटाळा येऊ नये अशी एक हलकीफुलकी निखळ प्रेमकहाणी केवळ ‘स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे’ या जोडीने खेचली. तो चित्रपट पाहताना मला नेहमीच ‘शाहरूख खान आणि काजोल देवगण’ यांची कुछ कुछ होता है मधील जोडी आठवते, पण अर्थातच कुठेही त्यांची नक्कल वगैरे नाहीये. फक्त ती जोडी जशी गाजली तशीच हिनेही धमाल उडवून दिली.
यापुढेही हि जोडी अश्याच फॉर्ममध्ये पुन्हा दिसायला हवी हि इच्छा "एका लग्नाची दुसरी गोष्ट" (२०१२) या मालिकेने पुर्ण केली. पुन्हा एकदा टिपिकल सांस-बहू आणि कौटुंबिक मालिकांपेक्षा किंचित वेगळी आणि सादरीकरणाचा निकष लावता फ्रेश लूक असलेली मालिका. स्वप्निल या मालिकेनंतर घराघरांत पोहोचला, लाडका झाला, म्हणून हि मालिका त्याच्या कारकिर्दीत विशेष महत्व राखावी.
ए.ल.दु.गो. - स्वप्निल आणि मुक्ता
पण अजूनही ईतिहास घडणे बाकी होते....
.... आणि तो लवकरच घडला.
हिंदीमध्ये "शोले" कि "डीडीएलजे" हा वाद पूर्वापार चालत आलाय. पण मराठी चित्रपटसृष्टीला ब्लॉकबस्टर या शब्दाची सवय अशी नव्हती. मधल्या काळात तर मराठी चित्रपटसृष्टी तग धरतेय की नाही अशी परीस्थिती निर्माण झालेली. अनुदान घेऊन बनणार्या चित्रपटांचा दर्जाही तसाच सुमार होता. पण गेल्या काही वर्षात चित्र बदलू लागले. अर्थपूर्ण आणि दर्जेदार आशय असलेले चित्रपट बनू लागले. तरीही अपवाद वगळता तिकीटबारीवर खडखडाटच होता. पण एक चित्रपट आला ज्याने बॉक्स ऑफिस नुसते दणाणूनच नाही सोडले तर मराठी चित्रपट सुद्धा व्यावसायिक यश मिळवू शकतो हा आत्मविश्वास पुर्ण मराठी चित्रपटसृष्टीला मिळवून दिला.. आणि तो चित्रपट म्हणजे..
अर्थातच,
दुनियादारी .. !!
हा चित्रपट स्वप्निलला नक्कीच सात-आठ वर्षे आधी करायला आवडला असता. पण आयुष्यात काही घडण्याचीही एक वेळ यावी लागते, आणि ती ज्या वेळी येते तीच योग्य वेळ असते. आजच्या वरच्या गोड बातमीच्या मागेही याच चित्रपटाचे यश आहे. यात स्वप्निलची जोडी जमली ती ‘सई ताम्हाणकर’ या बोल्ड अॅण्ड ब्यूटीफूल अभिनेत्रीशी.
दुनियादारी - स्वप्निल आणि सई
या चित्रपटाच्या यशाचे श्रेय स्वप्निलचे की सईचे की दोघांच्या जोडीचे याची चर्चा काही मायने ठेवत नाही. किंबहुना चित्रपट हे टिमवर्क मानले तर या चित्रपटावर एक वेगळा लेख बनेल. म्हणून तुर्तास इथेच थांबतो. पण मराठी चित्रपटाच्या इतिहासात माईलस्टोन ठरलेला हा चित्रपट स्वप्निलच्या कारकिर्दीतही तेवढेच महत्व राखून ठेवतो. जसे सेट झालेला फलंदाज अर्धशतक वा शतक पुर्ण झाल्यावर मुक्तपणे फटकेबाजी करतो त्याच प्रकारे स्वप्निलची पुढची कारकिर्द बहरावी अशी आशा व्यक्त करत मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो ! अभिनंदन स्वप्निल
- ऋन्मेऽऽष
तळटीप - चित्रे आंतरजालावरून ..
स्वप्निलची क्रेझ पाहता इथे
स्वप्निलची क्रेझ पाहता इथे लाखो पोस्ट येण्याची भिती होतीच
>>>>>>
आवरा!
हे म्हणजे असे झाले पिकात
हे म्हणजे असे झाले पिकात वखरताना बैलान्ना मुसके द्यायचे.
आजुबाजुला मस्त पैकी कणसं तरारलेली पण तोंड नाय लावु शकत.
धागा आहे पण परतिसाद वाहुनिया जाताहेत.
स्वप्निलची क्रेझ पाहता इथे
स्वप्निलची क्रेझ पाहता इथे लाखो पोस्ट येण्याची भिती होतीच ........
>>स्वप्निलची क्रेझ पाहता इथे
>>स्वप्निलची क्रेझ पाहता इथे लाखो पोस्ट येण्याची भिती होतीच
ए अरे ए, कोण आहे रे तिकडे, हे असले काहीतरी लिहिणारे आयडीच का नाही वाहते करत ?
हा धागा वाहता केल्याने, याची
हा धागा वाहता केल्याने, याची अवस्था अवास्तव फुगलेल्या फुग्यातली हवा काढून घेतल्यासारखी झाली आहे.
बाफचा वागळे झाला
बाफचा वागळे झाला
लाख म्हंजी किती रे भाउ ? :
लाख म्हंजी किती रे भाउ ? ::फिदी:
आज स्वजोचा वाढदिवस. कितवा ते
आज स्वजोचा वाढदिवस.
कितवा ते माहित नाही
तेविसावा असेल.
तेविसावा असेल.
अडतीस पूर्ण झाली त्याला
अडतीस पूर्ण झाली त्याला
स्वप्निल जोषीला वाढदिवसाच्या
स्वप्निल जोषीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
स्वप्निलची क्रेझ पाहता इथे
स्वप्निलची क्रेझ पाहता इथे लाखो पोस्ट येण्याची भिती होतीच
>>>>
शाहरूख किती वर्षांचा आहे?
शाहरूख किती वर्षांचा आहे?
अडतीस पूर्ण झाली त्याला >>>
अडतीस पूर्ण झाली त्याला >>> नक्की कधी उगवणार आहेत म्हणे हे सुप्प्पर्रस्टार्र!!!
३८??? पण स्वजो त्याहुन सिनियर
३८???
पण स्वजो त्याहुन सिनियर दिसतो ना?
अडतीस पूर्ण झाली त्याला >>>>
अडतीस पूर्ण झाली त्याला >>>> वो एक नन्हासा, नटखटसा बाहुला है रे.
मी त्याला म्हणुनच तर प्रेमाने
मी त्याला म्हणुनच तर प्रेमाने झबा म्हणतो.
झपाटलेला बाहुला...झबा
पण स्वजो त्याहुन सिनियर दिसतो
पण स्वजो त्याहुन सिनियर दिसतो ना? >> वीग घालतो तो काम करताना. टक्कल लपवायला.
शाहरूखला याच वर्षी ५० पुर्ण
शाहरूखला याच वर्षी ५० पुर्ण झाली बहुधा. ६५ सालचा जन्म आहे त्याचा.
सोप्या ७७ चा आहे.
शाहरूखला याच वर्षी ५० पुर्ण
शाहरूखला याच वर्षी ५० पुर्ण झाली बहुधा. ६५ सालचा जन्म आहे त्याचा >>>
यावरुन आठवलं, एक जाहिरात येते पानमसाल्याची शाखा आणि रिमा लागुची. त्यात तो तिला 'दादी गुस्सा नाही' असं काहीतरी म्हणतो. त्याच्या आईचा रोल करणारी रीमा आता त्याच्यासाठी दादी झाली.
ज्या गोष्टीचे कौतुक व्हायला
ज्या गोष्टीचे कौतुक व्हायला हवे त्यावर टिका का करत आहात?
मराठीमधील एकमेव सुप्परस्टार
मराठीमधील एकमेव सुप्परस्टार सुश्री स्वप्नीलराव जोशी ह्यांना वाढदिवसाच्या मंडळातर्फे हार्दिक (भाजपवाल्यांची माफी मागून ) शुभेच्छा!
असेच स्वर्णिम यश उत्तरोत्तर लाभो ...
(कार्यबाहुल्यामुळे शुभेच्छा देण्यास उशीर झाला तरी गोड करून स्वीकारून घ्याव्यात )
कार्यबाहुल्यामुळे>>> झपाटलेला
कार्यबाहुल्यामुळे>>> झपाटलेला बाहुला सारखा कार्यबाहुला का
उगवला का हो?
उगवला का हो?
झपाटलेला बाहुला सारखा
झपाटलेला बाहुला सारखा कार्यबाहुला का
>>
जी
बाजीराव मस्तानी मधलं एक गाणं
बाजीराव मस्तानी मधलं एक गाणं पाहिलं आणी स्वप्नील बाजीराव हवा होता असं वाटून गेलं
च्रप्स यांच्या माहितीसाठी....
च्रप्स यांच्या माहितीसाठी....
आज दुनियादारी सिनेमा पाहीला.
आज दुनियादारी सिनेमा पाहीला. आवडला.