नवी मुंबई / ठाण्यामध्ये स्त्री मानसतज्ञ माहित आहेत का?

Submitted by निल्सन on 12 October, 2015 - 08:45

मी लिहणार आहे तो विषय तसा खुप संवेदनशील आहे त्यामुळे इथे लिहु की नको हा विचार गेले कित्येक महिने मी करतेय. पण माझ्या प्रश्नाला अजुन उत्तर नाही मिळाले म्हणुन मी आज इथे तो प्रश्न मांडतेय तरी तुम्हाला मी हा विषय इथे लिहणे योग्य नाही असे वाटत असेल तर मी हा धागा उडवुन टाकेन. खरतर कोतोबा मध्ये लिहणार होते पण माहितीपण हवी आहे म्हणुन इथे लिहते.

तर, माझ्या जवळच्या नात्यातल्या मुलीचे ३ वर्षापुर्वी तिच्याचसोबत शिकणार्या तिच्या मित्रासोबत लग्न अर्थातच प्रेमविवाह झाला. एकुलता एक मुलगा, श्रीमंत घराणे, आंतरजातीय विवाह म्हणुन सुरवातीला मुलाच्या घरातल्यांकडुन विरोध होता पण शेवटी मुलाच्या हट्टापुढे नमतं घेऊन लग्न झाले. मुलीनेही सासरी गेल्यावर सगळ्यांची मने जिंकुन घेतली आता उलट ते स्वतःच्या मुलापेक्षा तिचेच लाड करतात.

सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना काही महिन्यांनी तिच्या आईने मला सांगितले की ती मुलगी आपल्या पतीसोबत लैंगीक संबंध ठेवायला तयारच होत नाही. त्यानंतर मी मुलीशी मी बोलले तर तिला या प्रकाराची भिती वाटते म्हणुन ती तयार होत नाही असे तिने सांगितले. लग्नाच्या वेळेस तिचे वय २१ वर्षे होते, नवराही तिच्या ओळखतीला २-३ वर्षे एकत्र फिरलेला आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांवर प्रेम आहे. तिच्या मनातील भितीचे कारण काढुन घेण्यासाठी तिला अनेक प्रश्न विचारले जसे, की याआधी तिच्यावर कोणी जबरदस्ती केली किंवा करण्याचा प्रयत्न केला आहे का? कुठुन चुकीची माहिती ऐकली, वाचली किंना बघीतली आहे का?, याआधी कुणासोबत संबंध ठेवले होते का? त्याबद्दल नवर्याला कळु नये म्हणुन त्याला टाळते आहेस.

यावर तिने दिलेले उत्तर होते की माझ्याच जावेने तिला सांगितले की पहिल्यांदा संबंध ठेवताना खुप pain होऊन रक्तस्त्राव होतो तसेच swelling पण होते. बाकी कोणताही प्रोब्लेम नाही फक्त दुखण्याला घाबरतेय ती. त्यानंतर मी तिला योग्य प्रकारे समजवुन तिची भिती घालविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मधेमधे मी तिला विचारत होते तेव्हा ती सर्व काही ठिक आहे म्हणुन सांगत होती.

एक दिड वर्षानंतर पुन्हा तिची आई मला सांगु लागली की ती अजुन तसेच करते तेव्हा मी मुलीला विचारले असता ती तिच्या आईवर चिडचिड करु लागली की तिला काय माहित आमच्या बेडरुममध्ये काय होते ते. पण तिच्या आईला सांगणारा तिचा नवराच आहे हे तिला समजले आणि ती नवर्याशीपण भांडु लागली. पण मुळातच समजुतदार असेलेला तिचा नवरा तिला त्याही परीस्थितीत संभाळुन घेत होता. लग्नाला २ वर्षे उलटल्यावर सासरची मंडळी बाळासाठी मागे लागल्यावर तिचा नवरा तिला घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनीही बरेच उपाय केले तिच्या मनातील भिती काढण्याचा पण काहीच उपयोग झाला नाही.

मी याआधीही त्यांना बरेचदा मानसतज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला पण त्यांनी तो ऐकला नाही. त्यांनी बरेच डॉक्टर बदलले पण उपयोग शुन्य. आज तिच्या लग्नाला ३.५ वर्षे झाली तरीही त्यांच्यामध्ये लैंगीक संबंध नाही झाले. आता घरातल चित्रही बदलु लागलयं, तिचा नवराही भांडतो तिच्याशी आता त्याचे परिणाम कामावर, तब्येतीवर होऊ लागलेत. जर तिच्या सासरी ही गोष्ट कळली तर ते तिला हाकलुन देतील घरातुन.

आपल्याकडे आजही मानसतज्ञांकडे जाणे हे टाळतात लोक. मी समजविल्यामुळे आता ते दोघे तयार तर झालेत पण त्यांनी हि जबाबदारी मला दिली आहे आणि मला घेऊनच ते जाणार आहेत.
इंटरनेटवर शोधले तर मला अनेक मानसतज्ञ मिळतील पण मला तुमच्याकडुन/ माबोकडुन जास्त अपेक्षा आहेत. तसेच मानसतज्ञांकडे जाणे हा माझा पर्याय बरोबर आहे ना हेही मला पडताळुन घ्यायचे आहे. अशी परिस्थिती खुप रेअर येत असेल कुणावर पण जर आलीच तर काय करावे याचेही मार्गदर्शन करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठाण्यात I P H (Institute for Psychological Health) ही संस्था अत्यंत विश्वासू आहे. संचालक आहेत डॉ. आनंद नाडकर्णी... सर्व प्रकारचे प्रशिक्षीत Counsellers ऊपलब्ध आहेत... प्रयत्न करुन बघा...
विषय अत्यंत नाजूक आहे...

निल्सन ठाण्याला आय पी एच ही खूप मोठी मानसिक आजाराविषयी काम करणारी संअथा आहे.

http://www.healthymind.org/contact.html

या लिंकवर सगळी माहिती मिळेल.
त्या मुलीचे पती किंवा / आणि तुम्ही प्रथम तिथे अपॉईंटमेंट घेऊन जाऊन बोलून या आणि मग पाहिजे असल्यास स्त्री मानसोपचार तज्ज्ञच पाहिजेत अशी विनंती केल्यास ते अरेंजमेंट करून देतील.
शुभेच्छा!