Submitted by सुधीर जी on 2 November, 2014 - 08:34
मायबोली वर दांडेली बद्दल खुप काही वाचले आहे
मला माझ्या 6 मित्रांबरोबर जायचे आहे
मुबईहुन दांडेली आणि आसपासचि ठिकाने
professional tour operator बरोबर नाहि जायचे आहे
कोनितरि क्रुपया सविस्तर प्लान देइल का
जसे
मुबई वरुन कधि आनि कोनत्या ट्रेन ने जावे
कुठे जावे, दांडेलि मधे कुठे रहावे आणि फिरन्याची ठिकाने, कसे कसे जावे
दांडेलि जवळिल प्रेक्श्निय ठिकाने इत्यादि इत्यदि
एकदम सविस्तर tour plan सुचवा please
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही मागच्या वर्षी गेलो
आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो. ठाण्याहून कार ने गेलो होतो फक्त दांडेलीला, सो ट्रेन चे माहीत नाही. तिथे हॉर्न्बील रिसॉर्ट मध्ये उतरलो. बर आहे. दांडेली अॅड्व्हेंचर वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे. रिव्हर राफ्टींग जरुर करा. बाकी रिसॉर्ट वर सगळ्य्या अॅक्टीव्हीटीज असतात ( कयाकींग वगैरे) . ३ दिवस पुरतात. मिळाले तर ट्री हाऊस मध्ये रहा. अगदी बेसिक आहे पण व्ह्यू सुरेख दिसतो. ( माकडांची भिती वाटत नसेल तर ).
धन्यवाद गुगलुन पहातो
धन्यवाद
गुगलुन पहातो
professional tour operator ची
professional tour operator ची गरज नाही
दांडेलि जवळिल प्रेक्श्निय ठिकाने इत्यादि इत्यदि - दांडेली ला साधारण ३-४ दिवस पुरेसे होतात . अगदी जवळपास काही नाही बघायला. जे काही आहे ते resort वाले package करून देतातच.
Rafting नक्की करा.
आंम्ही स्वताची गाडी घेवून गेलो होतो त्यामुळं ट्रेन ची काही माहिती नाही
दांडेलीला अतिशय सुरेख अरण्य
दांडेलीला अतिशय सुरेख अरण्य आहे. निवांत राहण्यासाठी अतिशय छानच आहे. पण प्राणी बघण्यासाठी जाणार असाल तर अजिबात नाही. आम्ही चार दिवस राहीलो, पक्षी सोडले तर एक ससा दिसला फक्त.
रिसॉर्टपेक्षा एक चांगले ठिकाण आहे. बऱ्यापैकी जंगलात आहे. अर्थात एसी रुम, गरम पाणी वगैरे सोयी नाहीत. पण अतिशय स्वस्त आणि मस्त आहे. रात्री बाहेर चांदण्या आणि आजूबाजूला पसरलेले निवांत जंगल पाहणे हा एक अप्रतिम अनुभव आहे.
http://www.stayzilla.com/india/Dandeli-hotels/book-Pansoli_Guest_House-o...
ही त्याची लिंक
बाकी रिसॉर्ट कमालीची महागडी आहेत.
दांडेलीला जाण्यासाठी स्वतचे वाहन असणे आवश्यक आहे. अन्यथा रिसॉर्टमध्ये बुकींग केले असल्यास ते गाडीची व्यवस्था करतात. (अर्थातच जादा आकार पडतो). पण माझ्या माहीतीनुसार तिकडे जाण्यासाठी एकही सोयीची ट्रेन नाही. जास्तीत जास्त बेळगाव गाठावे आणि तिथून दांडेली १०० किमी आहे. आणि बेळगाव मधून एक गाडी भाड्याने घेता येईल. तरच आजूबाजूची ठिकाणे फिरणे शक्य होईल.
अरे हो. तिथून दुध सागर धबधबा
अरे हो.
तिथून दुध सागर धबधबा ( तो चेन्नई एक्सप्रेस मध्ये दाखवलाय तो ) तो बघायला जाता येते. रेल्वे च्या वेळाच्या गणितामुळे १ पूर्ण दिवस जातो.
आम्ही त्यामुळे नाही गेलो
खुप धन्यवाद आशुचँप मि पन
खुप धन्यवाद आशुचँप
मि पन गुगलले तेव्हा pansoli gust house होते तिथे पन स्वस्त होते म्हनुन दर्जा बाबत सांशक होतो, पण तुम्हि शंका घालवलित
खुप धन्यवाद मृणाल १
आयला हे माहित नव्हते, आता हे दुध सागर धबधबा ठिकाण पन प्लान मधे घेनार
ही लिंक बघा : दांडेली.
ही लिंक बघा : दांडेली.
दांडेलीला जायला हुबळी रेल्वे स्टेशन सोयीचे पडते. आणि खुद्द दांडेलीत मराठी बोलणारे बरेच जण आहेत.
recently कोणी जाऊन आलाय का
recently कोणी जाऊन आलाय का दांडेलीला … ? आम्ही दिवाळीच्या आठवड्यात प्लान करतोय ..
४ दिवसात दंडेली बरोबर अजून काही cover होईल का ? पुणे to पुणे असे ४ दिवस …
राहण्यासाठी हॉटेल्स / रेसोर्ट … ? खवय्येगिरी साठी काही options… ?? तिथे करता येतील अशा activities … ???
गूगल वर मिळतेय माहिती पण जाणकारांचे मार्गदर्शन हवेच ..
कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा …