"गर्भसंस्कार"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 26 September, 2015 - 10:39

डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. अरुण गद्रे
गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा
आपलं मूल गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं, ही पालकांची नैसर्गिक इच्छा. नेमक्या याच इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, पण त्यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट गर्भसंस्कार म्हणजे भयंकर सापळा आहे भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. पालकांनो, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून तुम्ही बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
ग्णांकडून हळूहळू कानावर यायला लागलं, प्रश्न येऊ लागले. अमुक बाबा, तमुक देवी, बापू यांच्यातर्फे गर्भावर संस्कार होण्यासाठी पुडय़ा मिळू लागल्या होत्या.. त्या घेतल्या तर चालेल? आम्ही सांगत होतो की, या बाबा, बापू, देवींपैकी कुणीही आयुर्वेदातले तज्ज्ञ नाहीत. नका घेऊ! काळ पुढे गेला अन् आजूबाजूला गारुडय़ाची एक पुंगी वाजू लागली. नुसती वाजली नाही, तर आयुर्वेदात शिक्षणसुद्धा न घेतलेले अनेक जणसुद्धा ती आयुर्वेदाच्या नावाने वाजवू लागले. ही पुंगी होती व आहे ‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले. डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता!
या गर्भसंस्काराच्या बाजाराने आता पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे; पण गंमत म्हणजे आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये आम्ही विचारणा केली, तर आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यात आला की, ‘गर्भसंस्कार? काय भानगड आहे बुवा?’ मग आम्ही ही भानगड काय आहे ते अभ्यासायचं ठरवलं. कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’
बाजार नेहमीच मोहमयी स्वप्ने विकतो. गर्भसंस्कारांबद्दल हे निव्वळ खरं आहे. कुणा आईबापाला असं नाही वाटणार की, आपलं मूल हे सुंदर, गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं? नैसर्गिकच आहे ही इच्छा. नेमक्या याच नैसर्गिक इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे; पण शास्त्रीय पुरावे? अहं! काहीही शास्त्रीय पुरावे नाहीत. गर्भसंस्कारांची अमुक एक व्याख्यासुद्धा नाही. ज्याची त्याची आपापली व्याख्या व पद्धती! फक्त उदाहरणे दिली जातात मोघम. इकडून तिकडून गोळा केलेली संस्कृत वचने शास्त्र म्हणून माथी मारली जातात. काही आयुर्वेदातले सर्वसाधारण उल्लेख असतात. मुख्य म्हणजे हे गर्भसंस्कारवाले उदाहरण देतात अभिमन्यूचे! बघा, आईच्या पोटात असताना आईबापाचं बोलणं अभिमन्यूनं ऐकलं अन् चक्रव्यूह कसा तोडायचं ते समजलं महाराजा, आहात कुठे? ठीक आहे. आपण असंच उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व ही तर ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे! जिजाऊ जेव्हा गर्भवती होत्या, त्या अक्षरश: मोगल पाठीवर ठेवत घोडय़ावरून पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची, भावाची हत्या झाली होती त्या कालावधीत! रणधुमाळी होती. त्यांना ना हे गर्भसंस्कारांचे व्यापारी भेटले ना त्यांनी काही गर्भसंस्कार केले! तरीही शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडले. खुद्द जिजाऊंनी लहान शिवबावर संस्कार केले म्हणून ते घडले; पण हे संस्कार झाले शिवाजी महाराजांची जडणघडण होताना, ते आईच्या पोटात असताना नाही.
ठीक. आपण थोडे वर्तमान काळात येऊ.
भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली? रवींद्रनाथ टागोर,चंद्रशेखर वेंकट रामन, अमर्त्य सेन आदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! किती सुवर्णपदके मिळाली ऑलिम्पिकमध्ये, तीही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच अन् बाहेरच्या जगात जिथे गर्भसंस्काराचे नावसुद्धा माहीत नाही तिथे? शेकडोंनी नोबेल पारितोषिके अन् हजारोंनी ऑलिम्पिक सुवर्णपदके.
बरं आपण महाराष्ट्रात येऊ.
आज गर्भसंस्कार विकत घ्यावे लागतात हजारो रुपये मोजून. ते परवडतात फक्त शहरी सधन वर्गाला. दुसरीकडे असंही एक जग आहे ज्यांच्यासाठी जगणं हीच रोजची लढाई आहे. कविता राऊत अशीच एक ग्रामीण मुलगी. आज दीर्घ पल्लय़ाची यशस्वी धावपटू आहे, पण तिच्या कुटुंबाला गर्भसंस्कार माहीतही नाहीत.
डॉ. प्रकाश व मंदा आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीकडे जाऊयात. तिथे शिकलेला डॉ. कन्ना मडावी हा आमच्यासारखाच स्त्रीरोगतज्ज्ञ! कांदोटी या आजही दुर्गम असलेल्या गावात जन्मलेला, १९७६ साली लोकबिरादरी प्रकल्पात प्राथमिक शाळेत दाखल झाला अन् पुढे स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. अशी तिथली अनेक उदाहरणे आहेत. अर्धनग्न, अर्धपोटी अन् अशिक्षित आईबापांपोटी जन्मलेली ही मुले. प्रकाशाची पहिली तिरीप तिथे पोचली ती १९७३ साली डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या रूपाने आधुनिक वैद्यकाची. अशा परिस्थितीत या मुलांच्या आयांवर गर्भसंस्कार कसे होणार? कन्ना मडावी गर्भसंस्कारांमुळे नाही घडला. तो घडला बाबा, प्रकाश व मंदा आमटेंच्या मदतीच्या हातांनी!
तेव्हा गर्भसंस्काराच्या समर्थनासाठी दिली जाणारी अभिमन्यूच्या कथेसारखी उदाहरणे फोल आहेत. गर्भसंस्कार विकणाऱ्यांकडे फक्त अशा पुरावा नसलेल्या कथा आहेत, त्याविरुद्ध आहेत हजारो नोबेल व ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्यांची वास्तवातली उदाहरणे! गेल्या पाचशे वर्षांत ज्या ज्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आपले आयुष्य बदलले त्यांच्या मातांनी, आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्‍स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? तेव्हा अभिमन्यूच्या या भ्रामक उदाहरणाच्या मोहिनीतून आपण आधी बाहेर पडूयात. हा प्रश्न विचारू या की, गर्भसंस्कारात नेमकं काय घडतं?
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही, किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!
दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. अष्टांग हृदय, (वाग्भटकृत) यात शरीरस्थान या प्रकरणात गर्भावस्थेबद्दल काही मजकूर सापडला. त्यातली काही उदाहरणे अशी, जिला आधुनिक विज्ञानाचा पाया नाही. ती म्हणजे, गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो, मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संबंध राहून मूल राहिले तर नवरा मरतो, मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी संबंध राहून गर्भ राहिला तर ते मूल मरते. (सार्थ भाव प्रकाश, पूर्व खंड श्लोक १३-१६, वैद्य नानल प्रत), मासिक पाळीनंतर समरात्री (४, ६, ८, १०, १२) समागम केला तर मुलगा होतो व विषम रात्री केला तर मुलगी होते. (मासिक पाळीनंतर पहिल्या दहा दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते हे शास्त्रीय सत्य आज शाळांमध्येसुद्धा शिकवले जाते!). काही गर्भादान संस्कार आयुर्वेदात आहेत. त्यातल्या एका संस्कारात, ‘अनवमोलन संस्कारात’ होणाऱ्या गर्भपातापासून बचाव कसा करायचा ते सांगितले आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहबाधा यामुळे होणारा! अर्थातच आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास. वाईट हे आहे की, आजचे तथाकथित व्यापारी बिनधास्तपणे प्रतिष्ठा मिळवायला हे गर्भसंस्कार आयुर्वेदाच्या नावावर खपवत आहेत.
गर्भसंस्कारांच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! दुसऱ्या एके ठिकाणी गर्भवती स्त्रीच्या पोटासमोर देवाचा फोटो धरायला लावतात. गाडीतून प्रवास करणाऱ्या गर्भवती स्त्रीसमोर काही काळ एखादे घाण सिनेमाचे पोस्टर आले तर? गर्भसंस्कार करणारे या गोष्टींवर भर देत असतात की, गर्भसंस्कारांमुळे बाळ तेजस्वी होईल. बाळ तेजस्वी असण्यासाठी याची गरजच काय? खरं तर प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी वाटते! अन् तिच्यासाठी ते असते.
आजचे विज्ञान व समाजशास्त्र गर्भसंस्कारांबद्दल काय सांगते? कारण आज बिनदिक्कतपणे हाही दावा केला जात आहे की, मंत्रांचे गर्भसंस्कार वैज्ञानिक आहेत. आजच्या पुराव्यांनुसार गर्भ चार महिन्यांचा झाला, की तो ऐकू शकतो. म्हणजे त्याला आवाज झालेला कळतो. हे ऐकणे म्हणजे ऐकून समजणे नाही! चौथ्या महिन्याअखेर गर्भाच्या नव्र्हवर (मज्जारज्जूंवर) मायलीनेशन सुरू होते. मायलीनेशन म्हणजे आवरण. हे आल्याशिवाय मज्जारज्जू काम करू शकत नाही. मज्जारज्जूंचे काम संवेदना इकडून तिकडे पोहोचवणे असे असते. जन्मवेळेपर्यंत जेमतेम १२ ते १५ टक्के मज्जारज्जू अशा मायलीनेशनसह असतात. जन्मानंतरही मायलीनेशन होणे सुरू राहाते व वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत पूर्ण होते.
मायलीनेशनने गर्भाची शिक्षणक्षमता ठरते. मंत्रांनी बुद्धी वाढवण्याचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासावा लागतो. ३२ आठवडे पूर्ण होताना अगदी प्राथमिक अशी शिक्षणक्षमता गर्भाकडे येते. ती हॅबिच्युएशन पद्धतीची असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूयात. तो प्रतिसाद नसतो, तर फक्त प्रतिक्रिया असते. अगदी एकपेशीय अमिबासुद्धा त्यावर तीव्र प्रकाशझोत टाकला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने दूर जातो. पोटातला गर्भसुद्धा कानावर पडणाऱ्या आवाजांना- ओरडणे, बोलणे, मंत्रोच्चार, फटाके, हॉरर मुव्हीतले संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व उत्तेजनांना (स्टिम्युलसला) एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतो. तो हलतो. बास! त्याला काहीही समजून तो हलत नाही. तो फक्त आवाजाने दचकून हलतो. गर्भसंस्काराचे प्रणेते नेमके हे त्याचे हलणं? व्यापारासाठी वापरतात. म्हणतात, बघा हा पोटातला हलणारा अभिमन्यू! वास्तविक पाहाता गर्भाशयाच्या बाजूने मोठय़ा रक्तवाहिन्या असतात व त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे प्रचंड आवाज सतत होत असतो, जणू गर्भासाठी सतत एखादी डॉल्बी यंत्रणा वाजत असते. त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. आपण इतिहासात डोकावलो तर अनेक जन्मत: मूकबधिर अशा कर्तृत्ववान व्यक्ती आढळतात. त्यांना तर पोटात काय, बाहेरसुद्धा मंत्र वा बोललेले ऐकू येत नाही! पण यामुळे त्यांचे कर्तृत्व कधी लोपले नाही.
गर्भ पोटात शिकतो या दाव्याचा फोलपणा आता सामाजिक शास्त्रे अजून एका अंगाने उद्ध्वस्त करत आहेत. ऐकलेल्या व बघितल्यापैकी १० टक्के, प्रयोग बघून २० टक्के, प्रत्यक्ष कृती करून ३० टक्के, मनन करून ५० टक्के, शिकलेले ज्ञान वापरून ७५ टक्के व दुसऱ्यांना शिकवून ९० टक्के अशा क्रमाने प्रत्येक व्यक्तीचे शिक्षण घेणे परिपूर्ण होत असते. आपण बघितले त्याप्रमाणे मायलीनेशनच पूर्ण प्रमाणात न झाल्यामुळे आपण ढीग मंत्र शिकवले वा गणितही (शिकवतीलसुद्धा या बाजारात उद्या. अगदी आयआयटीचे सुद्धा भरपूर पैसे घेऊन) तरी गर्भ- वाचन, मनन, प्रयोग अन् ज्ञानाचा उपयोगही करू शकणार नाही. तो शिकूही शकणार नाही! याचा अर्थ असा की, आजचे विज्ञान निर्विवादपणे सांगते की, गर्भसंस्कारांचा जो मूलभूत दावा आहे की, मंत्र बाळाची ‘बुद्धी’ वाढवतात, ती एक अंधश्रद्धा आहे.
मग त्यांचा हा दावा तरी बरोबर आहे का? की आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही.
आता वळू या हातात भरपूर पैसा खेळणाऱ्या सुशिक्षितांकडे, ज्यांना झुकवत या झुकानेवाल्यांचा व्यापार चालला आहे. आज शिक्षणाचा बाजार आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आजचे पालक साहजिकच आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेत असतात! अन् हल्लीच्या इंस्टंट जगात गर्भसंस्कारांचा मोह पडतोच पडतो. काही तोटा तर नाही ना? असा विचार केला जातो. दुर्दैवाने तोटासुद्धा आहे या गर्भसंस्कारांच्या जाळ्यात सापडण्याचा. एक केस तर आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे. अत्यंत श्रद्धेने एका स्त्रीने गर्भसंस्कारांचा मार्ग स्वीकारला, पण ते बाळ आठव्या महिन्यातच पोटात असतानाच दगावले. अत्यंत निराश झालेल्या तिचा सतत प्रश्न होता, ‘मी गर्भसंस्कार करून घेत होते! असं झालंच कसं?’
गर्भसंस्कारांचा स्वीकार असा पैसे टाकून जेव्हा हे होणारे आईबाप करत असतात, कुठे तरी अवास्तव अशा अपेक्षा आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिकेत! भयंकर सापळा आहे हा- भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. त्यांना आपल्या अपेक्षांचा बळी करण्याचा. हा गंभीर तोटा नाही का? आमचे आवाहन आहे की, या जोडप्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारावा की, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून आपण बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
खरं पाहाता पालक म्हणून त्यांना खूप काही करायचंय. जमलं तर सहा महिने निव्वळ स्तनपान द्यायचंय. बाळाचे मायलीनेशन पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होते. हा कालखंड बाळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचं पोषण योग्य रीतीने करायचं आहे. बाळाशी ते जसं प्रतिसाद द्यायला लागेल, तसं भरपूर बोलायचंय, आपला मौल्यवान वेळ त्याला द्यायचाय. कारण गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून त्याला काही फायदा नाही, पण बाळ प्रतिसाद देऊ लागले की, त्याच्याशी भरपूर संवाद करून मात्र बाळाची वाढ छान पद्धतीनं होणार आहे. बाळासाठी स्पर्शाची भाषा हा सर्वात उत्तम संस्कार आहे आणि शेवटी चिरंतन सत्य हेच आहे की, मुलांवर खरे संस्कार फक्त पालकांच्या वागण्यातून/ कृतीतून होत असतात, गर्भसंस्कारांमुळे नाही.
खलील जिब्रानने म्हटल्याप्रमाणे तुमचे बाळ हे तुमच्या हातातून सुटलेला बाण आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तुमची मालमत्ता नाही. गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा तुम्हाला नेमके हेच सत्य विसरावयाला भाग पाडणार आहे. म्हणून विचारी पालक व्हा. गर्भसंस्कारांच्या मोहमयी बाजारापासून सावध राहा. त्यासाठी शुभेच्छा.
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
डॉ. चंद्रकांत संकलेचा -internalos@hotmail.com
डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmailcom
(दोन्ही लेखक एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय ठरलं मग? बर आधि एक सांगा ... संस्कार बिन्स्कार फार दूर राहिले ... त्या गर्भाला काही सांगितलं तर लक्षात तरी राहील का?

मृण्मयी, पोस्ट आवडली. हर्पेन, तू ही शांतपणाने, दुसर्‍यांना शिकवायला न जाता पोस्टी टाकत आहेस ह्याचे कौतुक :).

गर्भसंस्काराचं दुकान टाकणं, गर्भसंस्काराच्या नावाखाली इतर गोष्टी खपवणं हे चूकच आहे. पण 'जे अजून सायंटीफीकली प्रूव्ह झालेले नाही ते चुकच' ही वृत्तीही चुकीची आहे. अमेरिकेत "योगा" प्रसिद्ध झाल्यावर आपल्याकडे योगासनाचीही दुकानं निघाली. जाणारे तिथेही जातात. अगदी एका छोट्या खोलीपासून ते वातानूकुलीत जिम्स मध्ये पैसे टाकून लोकं जातात. ओंकारपठण, गायत्रीमंत्र ह्यांच्या पठणाने जी कंपनं निर्माण होतात त्याचा मेंदूवर होणारा अनुकूल परिणाम ह्यावर विदेशात केल्या गेलेल्या रिसर्च बद्दल मी एका विदेशी डॉक्युमेंटरीमध्ये पाहिले होते. ह्या ओंकाराच्या पठणाने जे ultrasonic vibrations निर्माण होतात त्याचा मेंदुवर, आणि शरीरावर कसा परीणाम होतो ह्याबद्दल पाश्चात्य शास्त्रज्ञांनी केलेल्या रिसर्चबद्दल ती डॉक्युमेंटरी होती. Autism, down syndrome च्या पेशंट्स ना ह्या चँटींगचा कसा फायदा होतो ह्यावर भाष्य होतं, वगैरे वगैरे. सहसा असं दिसून येतं की विदेशी लोकांनी रिसर्च करुन आपल्या गोष्टी डोक्यावर घेतल्या की आपला देशाभिमान लगेच उफाळून येतो. योगाभ्यास, मंत्रपठण ह्याबदल आपल्याला इतकी तुटपुंजी माहिती आहे आहे आणि योग्य तो रिसर्चही अजून पूर्ण झालेला नाही आहे त्यामुळे ह्या प्रचंड पोटेन्शिअल असलेल्या विषयाबद्दल आपण अजुनही फार उदासीनही आहोत. अगदी मनशक्तीच्या सायंटीफिक रिसर्चबद्दलच्या लिंक्स मी पाहिल्या नाहीत पण उद्या जॉन हॉपकीन्सने गर्भसंस्काराबद्दल काही आर्टीकल रिलीज केले तर लगेच 'मेरा भारत महान' म्हणून लोक ती लिंक फेसबूक वर लगेच शेअर करतील. Happy

माझ्या मते गर्भसंस्कार म्हणजे मातेकरता पॉझिटिव्ह फीलींग्स/एनर्जी (मंत्रोच्चार, पॉझिटिव्ह विचार, चांगले संगीत, योगासनं, प्राणायाम इत्यादी), पित्याचा ह्या प्रवासात सहभाग वगैरे. आता ह्या गोष्टी कुठल्याही शिबिराशिवायही तुम्ही आचरु शकता, पण जशी योगासनाची दुकानं निघालीत तशी गर्भसंस्काराची. ह्यातल्या काही दुकानांनी गर्भसंस्कारातले मुळ मुद्दे बाजूला ठेवून अवास्तव आश्वासने, पैसे उकळणे हे धंदे सुरु केले. आपल्या देशात सध्या कुठल्याही गोष्टीचे बाजारीकरण करण्याची वृत्ती वाढली आहे त्याचेच हे एक फळ आहे. पण ह्याने मुळ गर्भसंस्कार मोडीत निघत नाही. सर्वच Gynecologists समुपदेशन करत नाहीत (त्यांचीही दुकानं असतात, आणि पेशंट्सच्या भाऊगर्दीत वेळ नसतो) आणि काही लोकं अश्या शिबिरांना जाणं प्रेफर करतात. वर आलेल्या काही प्रतिसादांवरुन कोणाला प्रतिकूल अनुभव आलेला दिसला नाही (पैसे justifiable आहेत का हा वेगळा मुद्दा).

मला वाटतं आपण अजून Science S सुद्धा पूर्णपणे जाणत नाही आणि अनेको गोष्टींवर अजुनही अगदी initial stage मध्ये research सुरु आहे. Neuroscience इतके व्हास्ट आहे आणि आपल्या मेंदूबद्दल कित्येक गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत. मुद्दा हा की एखादी गोष्ट जिच्यावर रीसर्च पूर्ण झाला नाही, किंवा सुरुवातीच्या स्टेज मध्ये आहे ती आउटराईट रिजेक्ट करणंही योग्य नव्हे. एकेकाळी पृथ्वी गोल आहे ह्यावरही लोकांचा विश्वास नव्हता!!

असो, तर माझं म्हणणं एवढंच की, गर्भसंस्काराचं बाजारीकरण अयोग्य आहे पण गर्भसंस्कार हे थोतांड आहे हा मुद्दाही चुकीचा आहे.

मो +१११११११११

>> एकेकाळी पृथ्वी गोल आहे ह्यावरही लोकांचा विश्वास नव्हता!!

काही दांभिक लोकांचा अजूनही Santa Claus वर विश्वास नाही. शतकानुशतके हा भला संत आपल्या अस्तित्वाची प्रचिती देतोय. निव्वळ काही पालक स्वत:च त्याच्यासारखा मेकप करतात म्हणून तो अस्तित्वातच नाही हे सिद्ध होत नाही. मी यावर एक सुंदर डॉक्युमेंटरी पहिली होती. त्यामध्ये त्याचे घर दाखवले होते. त्याची स्लेज हवेत कशी हवेत उडायची याची कारणमीमांसा केली होती. हे सर्व शास्त्रीय दृष्ट्या वादातीतपणे सिद्ध झालेले असतानापण कित्येक पुरोगामी मंडळी पूरेपर रिसर्च केल्याशिवायाच त्याला आउटराईट रिजेक्ट करतात.

या मूर्खपणाचा जाहीर निषेध!!!

सुंता ..... धार्मिक कारणासाठी मुसलमान जु धर्मात सुंता करतात.

लहान वयात सुंता केलेल्या लोकांमध्ये पेनिस कॅन्सर कमी प्रमाणात आढळतो. सुंता न केलेल्या लोकांमध्ये पेनिस कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे.

( पण धार्मिक कारणाने करतात ते या फायद्यासाठी करत नाहीत. )

टण्या | 30 September, 2015 - 10:56

लिम्ब्या, रोजच्या आयुष्यात कम्प्युटर, अनेक विविध प्रकारची विद्युत शक्तीवर चालणारी उपकरणे, दुचाकी/चारचाकी, आगगाडीतून प्रवास अश्या अनेक गोष्टी करत असशील. या सर्वात जर अशी श्रद्धेवर चालणारी टेस्टिंग, इन्स्पेक्शन आणि पासिंग असेल तर जग चालेल का? तू वापरशील का या गोष्टी?

<<
ही पोस्ट.

टग्या,
कवी कालीदास हा बोलून चालून कवी.
मेघदूत ही त्याची एक श्रेष्ठ कलाकृती
त्यामधे कथानक असे आहे की तडीपार विरही यक्ष आपल्या प्रियेला संदेश पाठवतो आहे एका ढगामार्फत
म्हणजे मेघ हा त्याचा दूत
तर या मेघदूताला तो यक्ष आपल्या घराचा रस्ता सांगतो कसा कसा जा, वाटेत कोणकोणती शहरे गावे डोंगर नद्या लागतील ढगाला ते ऊंचावरून कसकसे दिसेल याची तपशीलवार वर्णने करतो. ही वर्णने इतकी तपशीलवार कशी असा प्रश्न एका पुण्यातल्या डॉक्टरला पडला. ते स्वतः एक हौशी वैमानिक तर होतेच पण त्यांच्या जवळ स्वतःचे एक विमानही होते. ( पाशा ऑन - इथे विशिष्ट शहर, डॉक्टर, त्याच्याकडे स्वतःचे विमान ? अशी कसलीही अवांतर टिप्पणी टाळण्यात यावी Proud मुळ मुद्दा पुढे आहे Wink पांशा ऑफ )

डॉक्टरांनी हा प्रवास यक्षाने मेघाला ज्या मार्गाने करायला सांगीतला त्याच मार्गाने वैयक्तिक पातळीवर त्यांच्या विमानातून केला. तो करत असताना त्यांना आढळले की कालीदासाने मेघदूतात वर्णन केलेले सगळे तपशील तंतोतंत जुळताहेत. वाटेत लागणारे पर्वत, आडव्या येणार्‍या नद्या, कुठल्याशा पर्वतावर भरपूर संख्येने आढळणारे मोर, गावं ई सर्व त्यांना आजमितीस *इतक्या वर्षांच्या अंतरानंतरही आढळले.

अर्थात डॉक्टरांनी हे स्वांत सुखाय केले असावे कारण त्यावर त्यांचा संशोधन पर निबंध (लिहिला आहे असेही) कुठे वाचण्यात आले नाही. पण त्यांची निरिक्षणे कालीदासाच्या वर्णनाशी जुळणे आपल्याला अधिक संशोधन करायला हवे अशा टप्प्यापर्यंत तर नक्कीच आणते

पण आपण संशोधन करत नाही Sad

कडुलिंब आणि हळदी सारखे जेव्हा आपल्याला इतरांना पैसे मोजावे लागणार असतील तरच संशोधन करणार का आपण!

* कालीदासाच्या कार्यकालाविषयी निश्चित स्वरुपाची एकमान्यता नाही. https://en.wikipedia.org/wiki/K%C4%81lid%C4%81sa सांगते की बहुदा पाचव्या शतकात तो होऊन गेला आणि त्याची नाटकं आणि काव्य ही पुराणांवर आधारित आहेत.

>>>भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली?
आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्‍स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? <<<<<

लेखामध्ये वरचे वाचून साहाजिकच असा ग्रह होतो की गर्भसंस्कार करणारे, "या, आम्ही गर्भसंस्कार करुन तुमच्या मुलाला आइन्स्टाइन बनवतो / बिल गेट्स बनवतो, तो नोबेल पारितोषिक मिळवेल"... वगैरे अथवा असल्या प्रकारचे दावे करतात.

पण इथे आलेल्या प्रतिसादांमध्ये ज्यांनी गर्भसंस्कार शिबिर केले निदान त्यांना तरी असा अनुभव आल्याचे दिसत नाहीय. काही दहा एक मिनिटे मंत्रे म्ह्टली / शिकवली पण बहुतेक भर आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग, यावर होता असे म्हटले आहे.

तेव्हा गर्भसंस्कार करणारे खरेच "तुमच्या अपत्याला अमुक बनवु / तमुक पारितोषिक मिळवुन देउ, असे दावे करतात का?" असे दावे करणारे, तशा जाहिराती / पत्रक / फलक इ. कुणी पाहिले आहेत का?

तेव्हा गर्भसंस्कार करणारे खरेच "तुमच्या अपत्याला अमुक बनवु / तमुक पारितोषिक मिळवुन देउ, असे दावे करतात का?" असे दावे करणारे, तशा जाहिराती / पत्रक / फलक इ. कुणी पाहिले आहेत का? +१

या प्रतिसादांत बालाजी ताम्बे व सकाळ वृत्तसमूह ही नावे वारंवार येत आहेत. सकाळ वाचणाऱ्यांना माहीत आहेच की त्यात या गर्भसंस्कार पध्दतीचं जोरदार प्रमोशन व मार्केटिंग केलं जातं. एक शुक्रवारची ख़ास पुरवणीही असते. हा वृत्तसमूह माननीय माजी केंद्रीय मंत्री व पुरोगामी नेते शरदरावजी पवार व पवार कुटुंबियांचा आहे.
तर या बाफवर बागडणाऱ्या पुरोगाम्यांनो, पवारसाहेब पुरोगामी आहेत का? गर्भसंस्कार विधी पुरोगामी विचारसरणीत बसतात का?

>>>सकाळ वाचणाऱ्यांना माहीत आहेच की त्यात या गर्भसंस्कार पध्दतीचं जोरदार प्रमोशन व मार्केटिंग केलं जातं<<<<

जाहिरातीचा नमुना आहे का एखादा? लिंक देऊ शकाल का? काय लिहिलं असतं या जाहिरातींत ते बघायचे आहे.
(आम्ही हैद्राबादेत, उपनगरात असल्याने मराठी वृत्तपत्रे मिळणे जरा कठीण आहे)/

इथे दिव्य संतान-प्राप्तीचा मार्ग दाखवला आहे.मनशक्ती तेजस्वी, सुदृढ व सुसंस्कारी हे शब्द वापरते.

त्या संकेतस्थळावर अभिमन्यूप्रमाणेच महावीर आणि मेरीचेही दाखले आहेत. मनशक्तीप्रमाणेच यांनीही आधुनिक विज्ञानाचा व वैद्यकशास्त्राचा दाखला दिला आहे.

"चिकित्सा विज्ञान यह स्वीकार कर चुका है कि गर्भस्थ शिशु किसी चैतन्य जीव की तरह व्यवहार करता है तथा वह सुनता और ग्रहण भी करता है"
"आज विज्ञानही म्हणते की पोटातील बाळसुद्धा शिकते व त्यास स्मृती असते;" (मनशक्ती)

या पुस्तकात म्हटले आहे की गर्भसंस्काराचा वैद्यकशास्त्राशी संबंध नाही. गर्भवतीचे खानपान, औषधे, व्यायाम, प्रसूती या गोष्टी म्हणजे गर्भसंस्कार नाहीत. गर्भसंस्कार फक्त मानसिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे. त्यांचा उद्देश : उद्देश : स्वस्थ, सुदृढ, समृद्ध, विद्वान, निर्दोष, दीर्घायू, न्रिभय एवं आनंदमय दिव्य संतानप्राप्ती.

मागच्या पानावरचा एक मुद्दा पुन्हा मांडतोय. या पुस्तकाच्या पान ३३ वर म्हटले आहे की वैद्यकशास्त्रानुसार गर्भ चार महिन्याचा होईतो त्याचे लिंग ठरत नाही. दुसर्‍या महिन्यात पुंसवन विधी केला की गर्भ पुल्लिंगी होतो. हा पुंसवन विधी परंपरागत सोळा संस्कारांपैकी एक आहे असे दिसते.
आधुनिक विज्ञान लिंगनिश्चितीबद्दल काय म्हणते ते बाजूला ठेवू. (X and Y chromosomes etc)
पण या विधीची उपयुक्तता स्टॅटिस्टिकली सिद्ध करणे कठीण नसावे.

गर्भसंस्काराचे समर्थन करणार्‍यांनी तो पुरातन आणि पारंपरिक असल्याने त्याची सत्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी विरोधकांवरच ढकलून हात वर केले आहेत. पण एवढ्या एका मुद्द्याबाबत त्यांचे मत ऐकायला आवडेल.

पुरातन अशा भारतीय विमान शास्त्राचाही काही वैज्ञानिकांनी मागोवा घेतला, तेव्हा ते शास्त्र तितकेसे पुरातन नसून अर्वाचीन असल्याचा शोध लागलेला.

.>>>>या पुस्तकाच्या पान ३३ वर म्हटले आहे की वैद्यकशास्त्रानुसार गर्भ चार महिन्याचा होईतो त्याचे लिंग ठरत नाही. दुसर्‍या महिन्यात पुंसवन विधी केला की गर्भ पुल्लिंगी होतो.<<<<<

बाप रे!!!!!!!!!

डॉक्टर कैलास,

१.
>> यात काही चूक...काही अशास्त्रीय नाही वाटत गामा?

सामाजिक दृष्ट्या हे हानिकारक आहे. शंकाच नाही. पण शास्त्रीय की अशास्त्रीय हे प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिल्यावर मगंच कळणार ना?

२.
>> गर्भ कसा दचकतो हे आम्हा पामरास कळू द्या.

गर्भ आवाजाला प्रतिसाद देतो खरा. कसा ते माहीत नाही.

आ.न.,
-गा.पै.

>>>"आज विज्ञानही म्हणते की पोटातील बाळसुद्धा शिकते व त्यास स्मृती असते;"<<<<<

असेलही. म्हणजे पोटातील बाळाला काय जाणीव असते?, ते कशा कशाला प्रतिसाद देते?, वगैरे विषयी संशोधक प्रयोग करत असतात आणि एखाद्या Rythm ला किंवा मातेच्या आवाजाला प्रत्येक वेळी एकाच प्रकारचा गर्भाने प्रतिसाद दिला तर "Scientists find evidence of learning in womb" अशी बातमी कुठेतरी झळकुन जाते.

नेमके तेवढे वाक्य उचलुन गर्भसंस्काराला विज्ञानाचा पाया असण्याचा दावा करणे हास्यास्पद आहे.

In humans, sex is determined by a specific set of chromosomes. Females have two X chromosomes (XX), whereas males have an X and a Y chromosome (XY). A mature female will produce eggs, each with one X chromosome, a mature male will produce sperm with either an X chromosome or a Y chromosome. When an egg and a sperm fuse during reproduction, the chromosome that the sperm carries determines the sex of the child.

गर्भाचं लिंग नक्की केव्हा ठरतं? गर्भ राहिल्यावर दोन महिन्यांनी? मग शाळाशाळांत चुकीचं विज्ञान शिकवून राहिलेत.

भरत,

गर्भाचे लिंग फर्टिलायझेशनच्या वेळेस ठरत असले, तरी जवळपास सात आठवड्यापर्यंत त्यांच्यात लिंगसंबंधित बाह्य अवयव निर्माण होत नाहीत. ह्यानंतर पुढील पाच आठवड्यापर्यंत गर्भामध्ये हॉर्मोन सिक्रीशन सुरू होते, ज्यामुळे त्याच्यात पुरूष किंवा स्त्री चे अवयव निर्माण होतात. अर्थात पुंसवन विधीचा काही संबंध असायचे कारण नाही. ते चूकच आहे.

गर्भाचे लिंग फर्टिलायझेशनच्या वेळेस ठरत असले, तरी जवळपास सात आठवड्यापर्यंत त्यांच्यात लिंगसंबंधित बाह्य अवयव निर्माण होत नाहीत. ह्यानंतर पुढील पाच आठवड्यापर्यंत गर्भामध्ये हॉर्मोन सिक्रीशन सुरू होते, ज्यामुळे त्याच्यात पुरूष किंवा स्त्री चे अवयव निर्माण होतात.
<<
महत्वाची शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

महत्वाची शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! >> हे माहीत नाही आणि मायलीनेशनबद्दल लिहीताय? Proud

>>>एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात >> बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे अजून काहीच घटक नसतात का? बाळे जन्माला आल्या आल्या त्यांची तोंडी परीक्षा घेउन बुद्धिमत्ता मोजली जाते का?

भास्कराचार्य, तुमच्या पोस्टीत 'बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे अजून काहीच घटक' आणि ते नेमकं लेखात ज्या संदर्भात आहे तो भाग पुन्हा वाचल्यावर 'आयडेंटिकल (मोनोझायगॉटिक) ट्विन्ससुद्धा जेनेटिकली आणि काही बाबतीत फिनोटिपिकली वेगळे असतात, ह्याचं कारण एपिजेनेटिक्स' असं वाचल्याचं आठवतंय. उदा: A twin approach to unraveling epigenetics : http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3063335/

मो | 2 October, 2015 - 23:16
ओंकारपठण, गायत्रीमंत्र ह्यांच्या पठणाने जी कंपनं निर्माण होतात त्याचा मेंदूवर होणारा अनुकूल परिणाम ह्यावर विदेशात केल्या गेलेल्या रिसर्च बद्दल मी एका विदेशी डॉक्युमेंटरीमध्ये पाहिले होते. ह्या ओंकाराच्या पठणाने जे ultrasonic vibrations निर्माण होतात >>

मुख्य समस्या ही आहे की गर्भसंस्कार, ज्योतिष, वगैरे चे supportors या गोष्टींना आधुनिक विज्ञानाची जोड देऊ पाहतात. मनुष्याचे स्वरयंत्र ultrasonic frequencies तयारच करु शकत नाही. त्यामुळे वरील वाक्यापासुन सुरु झालेले जे गर्भसंस्काराचे समर्थन आहे ते पुर्णतः false ठरते.

BTW, हा रिसर्च कुठे पब्लिष झाला आहे? विदेशात होणारे सर्वच संशोधन हे standard असते अशी जर कुणाची 'श्रद्धा' असेल तर लक्षात घ्या की ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे.

---
(विदेशात ६ वर्ष संशोधनात घालवलेला) कानडा

>>>>>विदेशात होणारे सर्वच संशोधन हे standard असते अशी जर कुणाची 'श्रद्धा' असेल तर लक्षात घ्या की ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. <<<<< १ नंबर!

लोकसत्तेच्या आजच्या चतुरंग पुरवणीत या वरच्या लेखावरच्या प्रतिक्रिया पूर्ण पान भरून छापलेल्या आहेत.
त्यात मायबोलीकर ज्ञानेश यांच्या पत्राचा समावेश असून त्यांनी पुंसवन विधीचाही उल्लेख केला आहे.
मनःशक्ती केंद्राच्या वतीने पत्र

हे माहीत नाही आणि मायलीनेशनबद्दल लिहीताय?
<<
नाही ना. माहिती असतं तर धन्यवाद कसे काय दिले असते?

आता तुमच्या लेखालासुद्धा बराच विरोध होईल (एव्हाना सुरू झालाही असेल), मात्र सगळेच सुधारक विचार नेहमी अल्पमतात असतात, हे लक्षात घेत तुम्ही हे प्रबोधन सुरू ठेवले पाहिजे, तुम्ही तसेच कराल याचा विश्वास वाटतो

.प्रतिक्रिया मधिल मायबोलीकर ज्ञानेश यांचे हे वाक्य खुप पटले.

आता चुकू नका
<<
चुकू नका? काय "चुकलं" ते सांगणार का जरा? माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दिले होते. ते चुकलं का?

मायलिनेशनबद्दलची अधिक माहिती कुठे मिळेल?

मनःशक्तीच्या लेखात आईला नैराश्याचा त्रास झाल्यास .....

हे जे म्हटले आहे ते काही नवे नाही. आत्यंतिक ताण-तणाव, नैराश्य, पर्यावरणातील पॉल्यूटंट्स याचा परीणाम गर्भावर / प्रेग्नंसी आउटकमवर होतो. मात्र असे नैराश्य वेगळे आणि रोजच्या व्यवहारात जाणवणार्‍या सुखदु:खाच्या भावभावना वेगळ्या. क्लिनीकल नैराश्य असेल तर प्रेग्नंसीत फार काळजी घ्यावी लागतेच. इनफॅक्ट अशा आजारात आधी डॉक्टर्सशी बोलूनच प्रेग्नंसी प्लॅन करायचा सल्ला दिला जातो.
आयुर्वेदात गर्भवती स्त्रीची आणि पुढे प्रसूती झाल्यावर मातेची आणि बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दल त्या काळाला अनुरुप मार्गदर्शन आहे. मात्र या शास्त्राला त्याच्या स्वत:च्या अशा मर्यादाही आहेत. आमच्या कुटुंबात आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी या दोन्ही शास्त्राचे शिक्षण घेतलेले वैद्य आणि डॉक्टर्स आहेत. कुणीही या नव्याने निघालेल्या गर्भसंस्कार दुकानांचे समर्थन केले नाही. घरात वैद्य असूनही गर्भसंस्कार , सुवर्णप्राशन वगैरे काहीही आमच्या घरातल्या कुणालाही रेकमेंड केले नव्हते. फॉलीक अ‍ॅसीड, सकस आहार, माफक व्यायाम, शक्यतो हॉटेलचे खाणे नाही, कॅफिन - अल्कोहोल नाही, सेकंड हॅंड स्मोक नाही आणि प्रत्येक रेग्युलर प्रीनेटल चेकअपला नवर्‍याची उपस्थिती असा साधा सोपा दिनक्रम होता.
चांगले डॉक्टर्स्/वैद्य फॅमिली हेल्थ हिस्ट्री, गर्भवतीची मेडीकल हिस्ट्री लक्षात घेवून प्रीनेटल केअर बाबत सुचना देतात. प्रीनेटल केअरमधे बाळाच्या बाबांचा सहभाग हा काही नवा कन्सेप्ट नाही. माझे आजोबा वैद्य होते. ते याबाबत आग्रही असत. 'त्याला काय कळतेय' असे म्हणून सुनेच्या प्रेग्नंसीत मुलाला सहभागी होवू न देणे हे खरे तर किचन पॉलिटिक्स. जेवढी इमोशनल इन्वॉल्मेंट कमी तेवढे सोईचे असा सोप्पा हिशोब असे. मात्र आजोबा आयुर्वेदाच्या मर्यादा लक्षात घेवून गरजेप्रमाणे मॉडर्न मेडीसीनची मदत घेत असत आणि प्रसंगी पदरमोड करुन तज्ञ डॉक्टरांकडे पाठवत असत.
Give birth to a brilliant, beautiful, healthy, cultured and a hereditary disease free baby by using our scientifically proven garbh sanskar technique अशा जाहीरात करणारे काय किंवा सुवर्णप्राशन वाले काय केवळ लोकांच्या भावनांशी खेळतात.
रच्याकने , नेट वर सर्च करताना http://timesofindia.indiatimes.com/india/Mahabharata-redux-MP-varsity-tr... ही बातमी वाचनात आली.

काय "चुकलं" ते सांगणार का जरा? > ही माहिती नसताना इतकी वर्षे डॉक्टरकी केली हे चुकलंच.

मायलिनेशनबद्दलची अधिक माहिती कुठे मिळेल? > ही घ्या - https://www.sciencemag.org/content/346/6207/318.short

Pages