श्रीलंका सहल - भाग १ - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/55306
श्रीलंका सहल - भाग १ - एअरपोर्ट ते नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55355
श्रीलंका सहल - भाग २ अ - हॉर्टॉन प्लेन्स नॅशनल पार्क
http://www.maayboli.com/node/55444
श्रीलंका सहल - भाग २ ब - हॉर्टोन प्लेन्स नॅशनल पार्क http://www.maayboli.com/node/55445
श्रीलंका सहल -भाग ३ - न्यू झीलंड फार्म, अशोक वाटीका, अरालिया ग्रीन हिल्स
http://www.maayboli.com/node/55526
श्रीलंका सहल - भाग ४ - व्हीक्टोरिया गार्डन, नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55845
इथून पुढे..
नऊ वाजायला आले म्हणून नाईलाजानेच गार्डन मधून बाहेर पडलो. गाव आता चांगलेच जागे झाले होते. बससाठी
लोक वाट पहात ऊभे होते तरीही रस्त्यावर फार रहदारी होती, अशी बाब नाही. अरालिया ग्रीन, गावापासून जरा
लांब आहे पण अगदी चालतही पाच मिनिटावर.
थेट ब्रेकफास्टलाच गेलो. कालचा ब्रेकफास्ट पॅक्ड नेला होता पण आज मात्र मस्त स्प्रेड होता. भरपूरच व्हरायटी
होती. युरोपियन लोकांबरोबरच अरब लोक पण फार दिसत होते. भारतीय नमूना मी एकटाच होतो. तरी तिन्ही
लोकांना आवडतील असे भरपूर प्रकार होते ( मी तिन्ही प्रकारातले घेतले )
दहा वाजता आम्ही निघालोच. जाताना अगदी दारापर्यंत पोहोचवणारा आणि हातात हात घेऊन, परत ये सांगणारा
हॉटेल मॅनेजर मी फक्त इथेच बघितला. खरेच ते गाव सोडताना मलाही उदास वाटले. एकतर ती जागा आवडली होतीच, आणि बघण्यासारखे आणखीही बरेच काही तिथे आहे.
कँडीला जायचे म्हणजे पूर्ण उताराचा रस्ता. कँडी खाली असले तरी तिथेही चहाचे मळे आहेतच आणि या
रस्त्यावर सततच लागतात ते. त्याशिवाय तिथे भाजीपाल्याचे भरपूर उत्पादन होते. लीक, बीट, वांगी, गाजरे,
मिरच्या अश्या मस्त ताज्या भाज्यांचे स्टॉल्स सगळीकडेच होते. लहान मूले कोवळ्या गाजराच्या जूड्या
घेऊन गाडीजवळ येत असत. खुप मोह होत होता. त्याशिवाय नर्सरीज पण खुप होत्या.
दोन्ही बाजूला सुंदर दृष्ये होती.. मी थिवांकाला म्हणालो कुठेतरी थांबूया तर तो म्हणाला एका खास जागी थांबूया.
आणि खरेच अगदी सुंदर स्पॉट होता तो. डाव्या बाजूला आणि समोर हिरवेगार डोंगर, त्यातच दिसणारे धबधबे,
उजव्या हाताला एक नदी.. भरपूर फोटो काढले तिथे.
ती चक्क एका हॉटेलची पार्किंगची जागा होती ( टी बूश हॉटेल ) रस्त्याच्या पातळीवर फक्त त्यांचे रेस्टॉरंट होते.
मी एरवी चहाबाज नाही पण श्री लंकेत मला वारंवार चहाची हुक्की यायची. मग आम्ही त्या हॉटेलमधे चहा
घेतला. इतक्या सुंदर जागी बसून घेतलेला चहा.. खरेच अहाहा झाले.
त्या हॉटेलमधे रहायची पण सोय आहे, रुम्स रस्त्याच्या पातळीच्या खाली पण दरीकडे तोंड करून आहेत.
मला तिथे दोन दिवस रहायची खुप इच्छा झाली पण माझे पुढचे सगळे बूकिंग झाले होते, पण ते हॉटेल
माझ्या विशलिस्टवर कायम राहील.
( भारतातही उत्तरेकडे आणि केरळमधे अशी हॉटेल्स नक्कीच असतील. पण माझे भारतात अजिबातच फिरणे
झाले नाही... म्हणून..,. )
रस्त्यात मला दूरियान पण दिसलेच.. ते फळ मला खुप आवडते ( अत्यंत घाण वासाचे पण उत्तम चवीचे ते फळ असते. त्याच्या घाण वासामूळे थायालंड, सिंगापुर मधे ते सार्वजनिक वाहनातून किंवा हॉटेलात न्यायला बंदी
आहे. भारतात ते बहुदा नाहीच मिळत. ) पण लहानात लहान फळ घेतले तरी ते मला एकट्याला संपत नाही.
हे फळ साधारण फणसासारखेच दिसते, पण काटे मोठे आणि टोकदार असतात. आत तीन किंवा चार कप्पे
असतात आणि त्यात फणसाच्या गर्यासारखेच गरे असतात, बियाही तश्याच असतात. पण चारकांडे ( पाती ) नसतात.
तिथे वाटेवर अनेक घरांच्या आवारात एक सुंदर फुलांची वेल बघितली. एका जागी थांबून फोटोही घेतले. ( त्याचे
नाव पुढच्या भागात लिहीन. )
साधारण २ तासांनी कँडीला पोहोचलो. गावात शिरण्यापुर्वी कँडी युनिव्हर्सिटीचा रम्य परीसर लागतो.
या गावात मी हॉटेल थिलंका मधे राहणार होतो. या गावात मधे एक सरोवर आणि सभोवताली टेकड्या आहेत.
हॉटेलही एका टेकडीवर आहे. हे हॉटेलही सुंदर होते. रुमच्या बाल्कनीतून सुंदर दृष्य दिसत होते.
पण इथे बाल्कनीचा दरवाजा कायम बंद ठेवावा लागतो कारण माकडे आत येतात ( तश्या सूचना आहेत तिथे,
पण मला नाही दिसली ती. )
आजचा प्रोग्रॅम म्हणजे कँडी कल्चरल शो. त्याचे तिकिट मला थिवांकाने काढून दिले, पण तो शोला थांबणार नव्हता. शो सुरु व्हायला अवकाश होता, म्हणून मी पायी पायी त्या सरोवराला फेरी मारायचे ठरवले.
ऐन गावात असूनही सरोवर स्वच्छ आहे. त्याशिवाय भोवतालचा रस्ताही स्वच्छ आहे. या सरोवराच्या काठीच,
बुद्धाचे एक देऊळ आहे. ( तिथे आपण मग जाणार आहोत )
सरोवराच्या काठाने वेगवेगळी झाडे आहेत आणि त्यावर व्यवस्थित पाट्याही आहेत. देवळाचा परीसर सोडल्यास इतर कुठेही विक्रेते नाहीत त्यामूळे अगदी रमत गमत हि फेरी मारली.
कँडी कल्चरल शो हे त्या गावातले एक आकर्षण आहे. रोज संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान बंदीस्त थिएटरमधे
हा शो होतो ( खरे तर शेजारी शेजारी ३ थिएटर्स आहेत. तिन्ही ठिकाणी एकाच वेळी हा शो होतो. )
मी गेलो तो हॉल अगदी खचाखच भरलेला होता. अगदी वेळेवर हा शो सुरु होतो. काही तरुण आणि तरुणी हा शो
सादर करतात. या नाचावर मला आपल्या मोहिनीअट्टमचा प्रभाव जाणवला. अत्यंत जोशपुर्ण असे हे नाच
असतात. त्याच्या फोटोंवरुन नीट कल्पना येणार नाही म्हणून काही क्लीप्सच्या लिंक्सही देतोय. मीच
अपलोड केल्यात त्या. अगदी मिनिटभराच्याच आहेत, अवश्य बघा.
खास करून ते तरुण जागच्या जागी गोलांटी उडी कशी मारतात ते बघाच. मुख्य नाच झाल्यावर त्या शोचाच
भाग म्हणून अग्निदिव्य करतात ( हो सीतेच्या स्मरणार्थच ते करतात. ) यावेळी हे स्टेजवर न करता खाली
करतात आणि प्रेक्षकांना स्टेजवर बसायला लागते. जळत्या निखार्यावरून चालत जातात.
हे सर्व इतके जोशपूर्ण असते कि त्याचे फोटो देखील नीट काढता येत नाहीत. तरी मी जे दिलेत, त्यावरून किंचीत
कल्पना येईलच.
शो संपल्यावर थिवांका मला न्यायला आलाच होता. मग आम्ही दोघे कँडी पॉईंटला गेलो. उंचावर एका टेकडीवर
हि जागा आहे. इथून सरोवर छान दिसते. इथेच एक जेम ( मौल्यवान खडे ) म्यूझियम आहे. तिथे मी पुतण्यासाठी
कॅट्स आय विकत घेतला. तिथे तो सरकारी प्रमाणपत्रासकट मिळतो. श्रीलंकेत खरेदी करण्याची ही एक खास वस्तू आहे, पाचू वगैरेही मिळतात पण शक्यतो सरकारमान्य दुकानातून घेतलेले बरे.
आता असेच गावात एका ठिकाणी आम्ही जेवलो आणि हॉटेलवर गेलो.. उद्याही पहाटे ५ वाजताच आम्हाला
निघायचे होते.. कुठे ते पुढल्या भागात ...
1) Roses in Hotel Garden
2) Continental Breakfast !
3) Carving at Breakfast Table
4)
5) At Hotel Reception
6) To Kandy
7) Fresh Vegetables
8) Nursery on the road
9)
10)
11) From the parking lot of Tea Bush Hotel
12)
13)
14)
15)
16)
17)
18)
19)
20)
21) Inside the hotel
22)
23)
24)
25)
26)
27)
28)
30) One unusual tree.. seen in that area
31) Duriyan
32)
33) Many houses had this creeper on the gate
34)
35) Kandy University Campus
36)
37)
38) Kandy Town
39) Hotel Thilanka , Balcony of my room
40)
41) View from the Balcony
42)
43) Kandy Lake
44) Bahawa
45)
46)
47)
48)
49)
50) Huge monitor lizard.. resting near the lake
51)
52) Kusumb
53) Kandy Cultural Show
54)
55) Fire walking
56)
57)
58) View from Kandy Point
59)
इथे या नाचाच्या काही क्लीप्स आहेत.
https://www.youtube.com/watch?v=qtXM1VDhMmM
https://www.youtube.com/watch?v=oXF1jCebvwU
https://www.youtube.com/watch?v=iEkTec-M1_I
https://www.youtube.com/watch?v=EluKwqP3z4M
क्रमश :
ओ एम जी... श्रीलंकेच्या
ओ एम जी... श्रीलंकेच्या प्रेमातच पडायला झालंय.. ब्यूटी आहे नुस्ती!!!
चलो.. नेक्स्ट डेस्टीनेशन पक्का..
फारच सुंदर आहेत फोटोज.. फळांचं कार्विंग, दुरिअन?? हे आता थायलँड चा मक्ता राहिलेला दिसत नाहीये..
ते झाडावर काय आहे?? इग्वाना???????
हो वर्षू, मला पण परत
हो वर्षू, मला पण परत जायचेय.
आणि मॉनिटर लिझार्ड आहे ती.. भयंकर दिसते पण निरुपद्रवी असते.
सगळे फोटो
सगळे फोटो अप्रतिम.
केरळ्,मुन्नार चा भास होतोय
कँडीतील बुद्धाच्यां दंत मंदिराचे फोटो नाही काढले का?
दिनेशदा, एकदम प्रेमात पाडलं
दिनेशदा, एकदम प्रेमात पाडलं तुम्ही श्रीलंकेच्या. मस्तच आहेत फोटो.
मस्त फोटो. केरळ्,मुन्नार चा
मस्त फोटो.
केरळ्,मुन्नार चा भास होतोय >> अगदी अगदी. तो धबधबा पाहून मला अथिरापल्लीच आठवलं.
"ओ एम जी... श्रीलंकेच्या
"ओ एम जी... श्रीलंकेच्या प्रेमातच पडायला झालंय.. ब्यूटी आहे नुस्ती!!!"........हजार वेळा सहमत.
वर्णन आणि फोटो अप्रतिम.
अप्रतिम.
अप्रतिम.
आभार.. क्र्मांक ९ ते २८ फोटो
आभार..
क्र्मांक ९ ते २८ फोटो मी एकाच स्पॉटवरून म्हणजे त्या हॉटेलमधूनच घेतलेत.. खरेच फार सुंदर जागा आहे ती.
केरळलाही जायचेय मला एकदा
मस्त फोटोस आणि वर्णन..
मस्त फोटोस आणि वर्णन.. श्रीलंकेला जायची इच्छा व्हावी इतकं सुरेख.. दिमतीला जी गाडी आहे, ती Toyota Prius आहे का?
Ho, teech gaaDee hotee.
Ho, teech gaaDee hotee. Chhaan comfortable hotee.
वॉव, फारच मस्त दिसतंय
वॉव, फारच मस्त दिसतंय श्रीलंका... सुर्रेख वर्णन आणि फोटुही भारीचेत ....
मस्त आहेत सगळे फोटो. ती
मस्त आहेत सगळे फोटो. ती लिझर्ड केवढी अजस्त्र आहे!
खूप छान.
खूप छान.