"गर्भसंस्कार"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 26 September, 2015 - 10:39

डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. अरुण गद्रे
गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा
आपलं मूल गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं, ही पालकांची नैसर्गिक इच्छा. नेमक्या याच इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, पण त्यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट गर्भसंस्कार म्हणजे भयंकर सापळा आहे भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. पालकांनो, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून तुम्ही बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
ग्णांकडून हळूहळू कानावर यायला लागलं, प्रश्न येऊ लागले. अमुक बाबा, तमुक देवी, बापू यांच्यातर्फे गर्भावर संस्कार होण्यासाठी पुडय़ा मिळू लागल्या होत्या.. त्या घेतल्या तर चालेल? आम्ही सांगत होतो की, या बाबा, बापू, देवींपैकी कुणीही आयुर्वेदातले तज्ज्ञ नाहीत. नका घेऊ! काळ पुढे गेला अन् आजूबाजूला गारुडय़ाची एक पुंगी वाजू लागली. नुसती वाजली नाही, तर आयुर्वेदात शिक्षणसुद्धा न घेतलेले अनेक जणसुद्धा ती आयुर्वेदाच्या नावाने वाजवू लागले. ही पुंगी होती व आहे ‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले. डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता!
या गर्भसंस्काराच्या बाजाराने आता पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे; पण गंमत म्हणजे आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये आम्ही विचारणा केली, तर आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यात आला की, ‘गर्भसंस्कार? काय भानगड आहे बुवा?’ मग आम्ही ही भानगड काय आहे ते अभ्यासायचं ठरवलं. कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’
बाजार नेहमीच मोहमयी स्वप्ने विकतो. गर्भसंस्कारांबद्दल हे निव्वळ खरं आहे. कुणा आईबापाला असं नाही वाटणार की, आपलं मूल हे सुंदर, गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं? नैसर्गिकच आहे ही इच्छा. नेमक्या याच नैसर्गिक इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे; पण शास्त्रीय पुरावे? अहं! काहीही शास्त्रीय पुरावे नाहीत. गर्भसंस्कारांची अमुक एक व्याख्यासुद्धा नाही. ज्याची त्याची आपापली व्याख्या व पद्धती! फक्त उदाहरणे दिली जातात मोघम. इकडून तिकडून गोळा केलेली संस्कृत वचने शास्त्र म्हणून माथी मारली जातात. काही आयुर्वेदातले सर्वसाधारण उल्लेख असतात. मुख्य म्हणजे हे गर्भसंस्कारवाले उदाहरण देतात अभिमन्यूचे! बघा, आईच्या पोटात असताना आईबापाचं बोलणं अभिमन्यूनं ऐकलं अन् चक्रव्यूह कसा तोडायचं ते समजलं महाराजा, आहात कुठे? ठीक आहे. आपण असंच उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व ही तर ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे! जिजाऊ जेव्हा गर्भवती होत्या, त्या अक्षरश: मोगल पाठीवर ठेवत घोडय़ावरून पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची, भावाची हत्या झाली होती त्या कालावधीत! रणधुमाळी होती. त्यांना ना हे गर्भसंस्कारांचे व्यापारी भेटले ना त्यांनी काही गर्भसंस्कार केले! तरीही शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडले. खुद्द जिजाऊंनी लहान शिवबावर संस्कार केले म्हणून ते घडले; पण हे संस्कार झाले शिवाजी महाराजांची जडणघडण होताना, ते आईच्या पोटात असताना नाही.
ठीक. आपण थोडे वर्तमान काळात येऊ.
भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली? रवींद्रनाथ टागोर,चंद्रशेखर वेंकट रामन, अमर्त्य सेन आदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! किती सुवर्णपदके मिळाली ऑलिम्पिकमध्ये, तीही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच अन् बाहेरच्या जगात जिथे गर्भसंस्काराचे नावसुद्धा माहीत नाही तिथे? शेकडोंनी नोबेल पारितोषिके अन् हजारोंनी ऑलिम्पिक सुवर्णपदके.
बरं आपण महाराष्ट्रात येऊ.
आज गर्भसंस्कार विकत घ्यावे लागतात हजारो रुपये मोजून. ते परवडतात फक्त शहरी सधन वर्गाला. दुसरीकडे असंही एक जग आहे ज्यांच्यासाठी जगणं हीच रोजची लढाई आहे. कविता राऊत अशीच एक ग्रामीण मुलगी. आज दीर्घ पल्लय़ाची यशस्वी धावपटू आहे, पण तिच्या कुटुंबाला गर्भसंस्कार माहीतही नाहीत.
डॉ. प्रकाश व मंदा आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीकडे जाऊयात. तिथे शिकलेला डॉ. कन्ना मडावी हा आमच्यासारखाच स्त्रीरोगतज्ज्ञ! कांदोटी या आजही दुर्गम असलेल्या गावात जन्मलेला, १९७६ साली लोकबिरादरी प्रकल्पात प्राथमिक शाळेत दाखल झाला अन् पुढे स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. अशी तिथली अनेक उदाहरणे आहेत. अर्धनग्न, अर्धपोटी अन् अशिक्षित आईबापांपोटी जन्मलेली ही मुले. प्रकाशाची पहिली तिरीप तिथे पोचली ती १९७३ साली डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या रूपाने आधुनिक वैद्यकाची. अशा परिस्थितीत या मुलांच्या आयांवर गर्भसंस्कार कसे होणार? कन्ना मडावी गर्भसंस्कारांमुळे नाही घडला. तो घडला बाबा, प्रकाश व मंदा आमटेंच्या मदतीच्या हातांनी!
तेव्हा गर्भसंस्काराच्या समर्थनासाठी दिली जाणारी अभिमन्यूच्या कथेसारखी उदाहरणे फोल आहेत. गर्भसंस्कार विकणाऱ्यांकडे फक्त अशा पुरावा नसलेल्या कथा आहेत, त्याविरुद्ध आहेत हजारो नोबेल व ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्यांची वास्तवातली उदाहरणे! गेल्या पाचशे वर्षांत ज्या ज्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आपले आयुष्य बदलले त्यांच्या मातांनी, आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्‍स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? तेव्हा अभिमन्यूच्या या भ्रामक उदाहरणाच्या मोहिनीतून आपण आधी बाहेर पडूयात. हा प्रश्न विचारू या की, गर्भसंस्कारात नेमकं काय घडतं?
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही, किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!
दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. अष्टांग हृदय, (वाग्भटकृत) यात शरीरस्थान या प्रकरणात गर्भावस्थेबद्दल काही मजकूर सापडला. त्यातली काही उदाहरणे अशी, जिला आधुनिक विज्ञानाचा पाया नाही. ती म्हणजे, गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो, मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संबंध राहून मूल राहिले तर नवरा मरतो, मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी संबंध राहून गर्भ राहिला तर ते मूल मरते. (सार्थ भाव प्रकाश, पूर्व खंड श्लोक १३-१६, वैद्य नानल प्रत), मासिक पाळीनंतर समरात्री (४, ६, ८, १०, १२) समागम केला तर मुलगा होतो व विषम रात्री केला तर मुलगी होते. (मासिक पाळीनंतर पहिल्या दहा दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते हे शास्त्रीय सत्य आज शाळांमध्येसुद्धा शिकवले जाते!). काही गर्भादान संस्कार आयुर्वेदात आहेत. त्यातल्या एका संस्कारात, ‘अनवमोलन संस्कारात’ होणाऱ्या गर्भपातापासून बचाव कसा करायचा ते सांगितले आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहबाधा यामुळे होणारा! अर्थातच आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास. वाईट हे आहे की, आजचे तथाकथित व्यापारी बिनधास्तपणे प्रतिष्ठा मिळवायला हे गर्भसंस्कार आयुर्वेदाच्या नावावर खपवत आहेत.
गर्भसंस्कारांच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! दुसऱ्या एके ठिकाणी गर्भवती स्त्रीच्या पोटासमोर देवाचा फोटो धरायला लावतात. गाडीतून प्रवास करणाऱ्या गर्भवती स्त्रीसमोर काही काळ एखादे घाण सिनेमाचे पोस्टर आले तर? गर्भसंस्कार करणारे या गोष्टींवर भर देत असतात की, गर्भसंस्कारांमुळे बाळ तेजस्वी होईल. बाळ तेजस्वी असण्यासाठी याची गरजच काय? खरं तर प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी वाटते! अन् तिच्यासाठी ते असते.
आजचे विज्ञान व समाजशास्त्र गर्भसंस्कारांबद्दल काय सांगते? कारण आज बिनदिक्कतपणे हाही दावा केला जात आहे की, मंत्रांचे गर्भसंस्कार वैज्ञानिक आहेत. आजच्या पुराव्यांनुसार गर्भ चार महिन्यांचा झाला, की तो ऐकू शकतो. म्हणजे त्याला आवाज झालेला कळतो. हे ऐकणे म्हणजे ऐकून समजणे नाही! चौथ्या महिन्याअखेर गर्भाच्या नव्र्हवर (मज्जारज्जूंवर) मायलीनेशन सुरू होते. मायलीनेशन म्हणजे आवरण. हे आल्याशिवाय मज्जारज्जू काम करू शकत नाही. मज्जारज्जूंचे काम संवेदना इकडून तिकडे पोहोचवणे असे असते. जन्मवेळेपर्यंत जेमतेम १२ ते १५ टक्के मज्जारज्जू अशा मायलीनेशनसह असतात. जन्मानंतरही मायलीनेशन होणे सुरू राहाते व वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत पूर्ण होते.
मायलीनेशनने गर्भाची शिक्षणक्षमता ठरते. मंत्रांनी बुद्धी वाढवण्याचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासावा लागतो. ३२ आठवडे पूर्ण होताना अगदी प्राथमिक अशी शिक्षणक्षमता गर्भाकडे येते. ती हॅबिच्युएशन पद्धतीची असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूयात. तो प्रतिसाद नसतो, तर फक्त प्रतिक्रिया असते. अगदी एकपेशीय अमिबासुद्धा त्यावर तीव्र प्रकाशझोत टाकला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने दूर जातो. पोटातला गर्भसुद्धा कानावर पडणाऱ्या आवाजांना- ओरडणे, बोलणे, मंत्रोच्चार, फटाके, हॉरर मुव्हीतले संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व उत्तेजनांना (स्टिम्युलसला) एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतो. तो हलतो. बास! त्याला काहीही समजून तो हलत नाही. तो फक्त आवाजाने दचकून हलतो. गर्भसंस्काराचे प्रणेते नेमके हे त्याचे हलणं? व्यापारासाठी वापरतात. म्हणतात, बघा हा पोटातला हलणारा अभिमन्यू! वास्तविक पाहाता गर्भाशयाच्या बाजूने मोठय़ा रक्तवाहिन्या असतात व त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे प्रचंड आवाज सतत होत असतो, जणू गर्भासाठी सतत एखादी डॉल्बी यंत्रणा वाजत असते. त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. आपण इतिहासात डोकावलो तर अनेक जन्मत: मूकबधिर अशा कर्तृत्ववान व्यक्ती आढळतात. त्यांना तर पोटात काय, बाहेरसुद्धा मंत्र वा बोललेले ऐकू येत नाही! पण यामुळे त्यांचे कर्तृत्व कधी लोपले नाही.
गर्भ पोटात शिकतो या दाव्याचा फोलपणा आता सामाजिक शास्त्रे अजून एका अंगाने उद्ध्वस्त करत आहेत. ऐकलेल्या व बघितल्यापैकी १० टक्के, प्रयोग बघून २० टक्के, प्रत्यक्ष कृती करून ३० टक्के, मनन करून ५० टक्के, शिकलेले ज्ञान वापरून ७५ टक्के व दुसऱ्यांना शिकवून ९० टक्के अशा क्रमाने प्रत्येक व्यक्तीचे शिक्षण घेणे परिपूर्ण होत असते. आपण बघितले त्याप्रमाणे मायलीनेशनच पूर्ण प्रमाणात न झाल्यामुळे आपण ढीग मंत्र शिकवले वा गणितही (शिकवतीलसुद्धा या बाजारात उद्या. अगदी आयआयटीचे सुद्धा भरपूर पैसे घेऊन) तरी गर्भ- वाचन, मनन, प्रयोग अन् ज्ञानाचा उपयोगही करू शकणार नाही. तो शिकूही शकणार नाही! याचा अर्थ असा की, आजचे विज्ञान निर्विवादपणे सांगते की, गर्भसंस्कारांचा जो मूलभूत दावा आहे की, मंत्र बाळाची ‘बुद्धी’ वाढवतात, ती एक अंधश्रद्धा आहे.
मग त्यांचा हा दावा तरी बरोबर आहे का? की आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही.
आता वळू या हातात भरपूर पैसा खेळणाऱ्या सुशिक्षितांकडे, ज्यांना झुकवत या झुकानेवाल्यांचा व्यापार चालला आहे. आज शिक्षणाचा बाजार आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आजचे पालक साहजिकच आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेत असतात! अन् हल्लीच्या इंस्टंट जगात गर्भसंस्कारांचा मोह पडतोच पडतो. काही तोटा तर नाही ना? असा विचार केला जातो. दुर्दैवाने तोटासुद्धा आहे या गर्भसंस्कारांच्या जाळ्यात सापडण्याचा. एक केस तर आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे. अत्यंत श्रद्धेने एका स्त्रीने गर्भसंस्कारांचा मार्ग स्वीकारला, पण ते बाळ आठव्या महिन्यातच पोटात असतानाच दगावले. अत्यंत निराश झालेल्या तिचा सतत प्रश्न होता, ‘मी गर्भसंस्कार करून घेत होते! असं झालंच कसं?’
गर्भसंस्कारांचा स्वीकार असा पैसे टाकून जेव्हा हे होणारे आईबाप करत असतात, कुठे तरी अवास्तव अशा अपेक्षा आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिकेत! भयंकर सापळा आहे हा- भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. त्यांना आपल्या अपेक्षांचा बळी करण्याचा. हा गंभीर तोटा नाही का? आमचे आवाहन आहे की, या जोडप्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारावा की, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून आपण बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
खरं पाहाता पालक म्हणून त्यांना खूप काही करायचंय. जमलं तर सहा महिने निव्वळ स्तनपान द्यायचंय. बाळाचे मायलीनेशन पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होते. हा कालखंड बाळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचं पोषण योग्य रीतीने करायचं आहे. बाळाशी ते जसं प्रतिसाद द्यायला लागेल, तसं भरपूर बोलायचंय, आपला मौल्यवान वेळ त्याला द्यायचाय. कारण गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून त्याला काही फायदा नाही, पण बाळ प्रतिसाद देऊ लागले की, त्याच्याशी भरपूर संवाद करून मात्र बाळाची वाढ छान पद्धतीनं होणार आहे. बाळासाठी स्पर्शाची भाषा हा सर्वात उत्तम संस्कार आहे आणि शेवटी चिरंतन सत्य हेच आहे की, मुलांवर खरे संस्कार फक्त पालकांच्या वागण्यातून/ कृतीतून होत असतात, गर्भसंस्कारांमुळे नाही.
खलील जिब्रानने म्हटल्याप्रमाणे तुमचे बाळ हे तुमच्या हातातून सुटलेला बाण आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तुमची मालमत्ता नाही. गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा तुम्हाला नेमके हेच सत्य विसरावयाला भाग पाडणार आहे. म्हणून विचारी पालक व्हा. गर्भसंस्कारांच्या मोहमयी बाजारापासून सावध राहा. त्यासाठी शुभेच्छा.
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
डॉ. चंद्रकांत संकलेचा -internalos@hotmail.com
डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmailcom
(दोन्ही लेखक एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबुकाका तुमच्या पोस्टी वाचुन मला खरंच मनापासुन हसु येते(उपहासात्मक नाही ).मस्त उदाहरणे देता तुम्ही.. Happy पण त्यांचा डायरेक्ट संबंध नसतो धाग्याच्या विषयासोबत.हेमावैम.
टण्या मस्त पोस्ट Happy

माणूस आशावादी /आनंदी असला की त्याची प्रकृती चांगली रहाते हे सगळ्या वैद्यकशाखांना मान्य असावं.

माझा आधीचाच प्रश्न परत एकदा
* अनुभुती / बाळास मातेस झालेला आनंद व त्यायोगे त्याच्या शारिरिक स्वाथ्यात झालेला बदल ह्या गोष्टी / संकल्पना आधुनिक काळातील विज्ञानास संमत अशा कसोट्यांवर कशा तपासून पाहाव्या

हा मुद्दा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विचारधारांचा (आऊटलूक) गोष्टींकडे बघण्याच्या दृष्टीकोनातील मुलभूत फरकाचा मुद्दा आहे असे वाटत नाही का.

भारतीय राग संगीतात देखिल राग गाण्यासंबंधात ऋतू आणि प्रहरांनुसार कोणते राग कधी गायचे असे संकेत आहेत. आधुनिक मानकांप्रमाणे एखादा संगीतातला राग कोणाला किती आनंद देईल ह्याचे प्रमाणपत्र कसे मिळवावे ते कळेल का?

आणि ते मिळवून मगच आनंद घ्यावा का का तसे मानंकन नसताना शास्त्रीय संगीत ऐकणेच अशास्त्रीय ठरेल का ?

टण्या चांगली पोस्ट

गर्भसंस्कार हे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर (ज्ज्या क्सोटीवर उत्तरल्याशिवाय तू घरातला लाइट बल्बसुद्धा विकत घेत नाहीस) पास झालेले उपचार नाहीत इतकेच दर्शविते आहे. >>> " गर्भसंस्कार" हे प्रकरण केवळ आयुर्वेदाच्या पाठीमागे लपलेले एक थोतांड म्हणुन पाहिले तर ते चुकीचेच ठरेल. त्या साठी मानसशास्त्र, योगाभ्यास, आहारशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी शास्त्रांचा पण समावेश करून मग पडताळणी केली जावी.

>>>> मुळात मॉडर्न मेडिसिन हा एक पाश्चिमात्य राष्ट्रांचा भारताविरुद्ध कट आहे हे डोक्यातून काढ. <<<<
टण्या, तू तुला सोईस्कर घोळ करतो आहेस.

वरील अर्थाचे वा तुझ्या एकंदरीत पोस्टमधुन "आम्हीच आधुनिक विज्ञानाला" विरोध करतो आहोत असे जे चित्र उभे करतो आहेत ते निखालस खोटे आहे.
आम्ही कुठेही विज्ञानाला खोटे ठरवू पहात नाही, नाही आम्ही त्याचे विरोधक.
तरीही, विज्ञानाला अज्ञात असे जे काही असेल, ते नाकारलेच पाहिजे असा काही कायदा आहे का? ते विचारतोय.

आणि प्लिज नोटच, की मी वर "विज्ञानाला अज्ञात" असा शब्दप्रयोग करतो आहे, "विज्ञानाला अमान्य" असा शब्दप्रयोग करीत नाहीये.
खरे तर विज्ञानाला/विज्ञानींना, कोणताच विचार "अज्ञात" वाटला तरी "अमान्य" असू शकत नाही, व ते ते विचार, नष्ट करु न पहाता त्यावर संशोधन करु पहातात, समजुन घेऊ पहातात.
पण इकडे एकंदरित विज्ञानांधनिष्ठ लोक विज्ञानाचा गैरफायदा घेत, पूर्वापार चालिरितींचा अभ्यास करुन संशोधन करण्याऐवजी, त्यांना खोटे ठरविण्यात भुषण मानतात हे अनेकवेळा सामोरे आले आहे.

वर कुठेतरि कुणीतरी एक अशा आशयाचे वाक्य टाकले आहे की, हे संस्कार वगैरे थोतांड असेल, तर ते थोतांड आहे हे देखिल नुस्ते म्हणुन कसे चालेल? ते थोतांड आहे हे सिद्ध नको करायला? का उगाच आरोपांचा धुरळा उडवित वैचारिक झुन्डशाही करायची जशी ती ज्योतिषशास्त्राबाबत केली जाते?
संस्कार होतो वा नाही होत याबाबत प्रयोग करायला कुणाचीच ना नाहीये टाण्यामहाशय. पण इथे व इतरत्र चालते ते म्हणजे, संस्कार होतात हा हजारोवर्षे जुना विचार कुणी बोलला तर लगेच "दाखवा सिद्ध करुन" अशी आव्हाने !
असो.
मी माझ्या मतांवर ठाम आहे.
ज्यांना शक्य आहे (मनःशक्तिवाले वा तत्सम) ते प्रयोग करु पाहात आहेतच. भारतात मात्र या कोणत्याही धर्मशास्त्रीय वा संस्काराधारित विधानांवर अधिक संशोधन करण्याची सोय वा उपलब्धता नाही हे देखिल त्रिवार सत्य, किंबहुना, असे काही असते/असू शकते ही विधाने केल्यास त्या विधानांसच मुळापासून उखडून टाकायची प्रक्रिया बुप्रांकडून/कम्युनिस्टांकडून पार पाडली जाते. तेव्हा याबाबतही मजला "पाश्चिमात्य" संशोधकांवरच अवलंबुन रहावे लागणार हे नक्की.

टण्य़ा, उत्तम पोस्ट.

इथे लोळणफुगडी चालू करण्याआधी हे लक्षात घ्या की काही लोकं आयुर्वेदाच्या नावाखाली काय वाट्टेल ते खपवतात. ज्याचा आयुर्वेदाचा अभ्यास आहे तो असल्या बाजारीकरणाला कधीच मान्यता देणार नाही. गर्भसंस्कारांमुळे तुमचे मूल डॉक्टर इंजीनीअर वगैरे होइल असा दावा कुणी करत असेल तर तो बिनबुडाचाच आहे.
गर्भसंस्कारांच्य अनावाखाली कुणी कसल्यातरी अन-टेस्टेड पुड्या आणि चाटणं देत असेल तर तेही चुकीचं आहेच.

प्रश्न जोवर श्रद्धेचा असतो,, तोपर्यंत कुणालाच प्रॉब्लेम नाही. त्या श्रद्धेला विकण्यासाठी कुणीही दुकान घालून बसत असेल तर तिथे प्रॉब्लेम यायलाच हवा. आणि तोच लेखाचा उद्देश आहे.

Babies who had heard the recordings showed the neural signal for recognizing vowel and pitch changes in the pseudoword, and the signal was strongest for the infants whose mothers played the recording most often. They were also better than the control babies at detecting other differences in the syllables, such as vowel length. "This leads us to believe that the fetus can learn much more detailed information than we previously thought," Partanen says, and that the memory traces are detectable after birth.

"This is a well-respected group and the effects are really convincing," says Patricia Kuhl, a neuroscientist at the University of Washington in Seattle. Combined with previous work, she says, these results suggest "that language learning begins in the womb."

http://news.sciencemag.org/brain-behavior/2013/08/babies-learn-recognize...

उप्स .. हे कितपत विश्वासाहार्य आहे?

>>>>> उप्स .. हे कितपत विशासाहार्य आहे? <<<<
"छे हो... हे देखिल सारे झूठ आहे.... " अशा उत्तराची फार वेळ वाट बघावि नाही लागणार.....
इकडचा प्रत्येक "देशी" कायदेशीर शब्दच्छल करित मुद्दा रेटण्यात एक्स्पर्ट अस्तो...!

पण तुमच्या चिकित्सावृत्तीला दाद देतो.

बाळाची वाढ आरोग्यपुर्ण व चांगली व्हावी यासाठी मातेने आहार विहारांचे चांगले नियोजन करणे म्हण्जे गर्भ संस्कार असे असेल तर कोणाची हरकत नसते. फक्त अवाच्या सव्वा दावे करु नये.

>>>> बाकी तसला कोणताही कायदा नाहीये अस माझ्या मित्राने कळवले आहे <<<< हुश्श्या....... पण येऊ घातलाय, येईलही कदाचित, कुणी सांगावे?

बाकी, वरील लेखातल्या बर्‍याच मतांशी मी सहमत असूनही विरोधी पोस्ट टाकल्या याच्या मागे मूळ कारण आधीही लिहीले आहे, की या बाबींचा लूटारुसारखा धंदा होत असेल तर माझा विरोधच असेल, पण......

अहो साधे घरात बायकोने केलेल्या भाजी आमटीत मीठ चुकून जरा जास्त/दुप्पट झाले, तरी तसे ते बोलताना सांगताना आपण सुसंस्कृत माणसे दहा वेळा विचार करतो व लगोलगी बायकोवर खेकसुन म्हणत नाही की "तुझा स्वैम्पाकच चूक/ धादांत खोटा /अशास्त्रीय - तुला स्वैंपाकच करता येत नाही - अडाणी अवैज्ञानिक अशास्त्रीय कुठची... इतकेही कळत नै तर चिमटीचिमटीने मीठ घालता कशाला.... वजनमापेकाटे नाहीत का वापरायला.... घ्यावे तोळामासा वजनाचे मीठ... स्वतःच्या मीठाच्या चिमटीवरची अंधश्रद्ध कुठची " Proud

तर मुद्दा असा की बायकोच्या हातुन जास्त पडलेले मीठ जास्त झालय हे सांगताना जितका नि जेवढा सुसंस्कृतपणा व बुद्धिनिष्ठ अन प्रॅक्टिकल व्ह्यु आपण ठेवतो त्याच्या एक शतांशानेही समजदारपणा वरील सारखे लेख लिहिताना वापरलाय असे दिसत नाही व सरळ सरळ अति विज्ञाननिष्ठ आंधळेपणाने कोणत्याही पुरातन शास्त्र/विद्येला थोतांड ठरवू पाहिले जाते तेव्हाच वरील सारखे विरोध करावे लागतात.

लिंबुराव, अहो बायकोला मीठ जास्त झालंय असे शांत अथवा सुसंस्कृतपणे सुद्धा सांगु नये. तू मीठ बरोबरच टाकले, मीच भाजी कमी आणली होती असे सांगावे.

मूळ लेख आवडला. कैलासरावांचे आभार. अपेक्षेप्रमाणे अपेक्षित गदारोळ झाला. टण्या ह्यांची पोस्ट आवडली.

चर्चा वाचल्यानंतर खालील गोष्टी मनाशी नोंदवून घेतल्या.

१. गर्भसंस्कारांच्या नावाखाली लुटालूट होईल अश्या पद्धतीने त्यांचा प्रसार करणे हे अयोग्य असून ते शास्त्र्योक्तदृष्ट्या सिद्ध झालेले संस्कार नाहीत.

२. अ‍ॅलोपथीत काही वाममार्ग अवलंबले जाऊ शकत असतात म्हणून हे गर्भसंस्कार समर्थनीय ठरत नाहीत.

३. शास्त्राला आजही समजलेल्या नाहीत अश्या गोष्टी निव्वळ अंधश्रद्धा आहेत असे ठोसपणे म्हणणे बरोबर नाही हे माझे जुने मत येथे पुन्हा काही प्रमाणात सिद्ध झालेले दिसले. ह्याचा अर्थ अंधश्रद्धा असाव्यात किंवा त्या पाळाव्यात असे म्हणायचे नसून 'जे शास्त्राला अजून समजलेले नाही ते सगळे अडाणीपणाच्या लेबलाखाली ढकलले जाऊ नये' इतकेच म्हणायचे आहे.

४. डॉ. रुपाली पानसेंनी 'अ‍ॅलोपथीवाले काय करतात ते बघा की' हा जो सूर लावलेला आहे तो खटकला. पण त्यांचा प्रतिसाद अभ्यासनीयही वाटला.

एक दोन शंका:

१. गरोदरावस्थेत मातेच्या शरीरामार्फत गर्भाला अन्नपुरवठा होतो व त्यातून त्याची योग्य वाढ होते. मातेची जीवनशैली, त्यातील चांगल्या वाईट गोष्टी, तिची व इतरांची मनोवस्था, आहार, ताणतणावांचे प्रमाण कमी / जास्त असणे, पवित्र व शांत वाटू लागेल असे वातावरण निर्माण होण्यासाठी केले जाणारे काही सोपस्कार, ह्या सर्वांचा अल्टिमेटली गर्भाच्या वाढीवर काहीच प्रभाव पडणार नाही असे म्हणता येईल का?

२. जर दुकाने उघडली गेली नसती तर अ‍ॅलोपथीला रुग्णांनी अ‍ॅलोपथिक ट्रीटमेन्ट घेतानाच समांतररीत्या गर्भसंस्कारही अवलंबिले असते तर ते मान्य झाले असते का? थोडक्यात, अ‍ॅलोपथीने उसळून येण्यामागे गर्भसंस्कारांमधील अर्थकारण कारणीभूत आहे की गर्भसंस्कारांमुळे काही धोकेही संभवतात जे अ‍ॅलोपथीमुळे संभवत नाहीत?

धन्यवाद!

मते व शंका अज्ञानदर्शक असल्या तर पास दिला तरी चालेल.

-'बेफिकीर'!

२००

मी डॉ नाही. माझी मते ग्रहणीय नाहीत.मला इथे असलेली गर्भसंस्कार विरोधी तज्ञांची मतं खोडता येणार नाहीत.
पण इथे मोजके गर्भ संस्कार वाले महागात मिस गाईड करतात म्हणून गर्भ संस्कार(हा शब्द बदलून समर्पक शब्दाची गरज आहे.) पूर्णपणे उचलून आपटलेले खटकले.
एक सामान्य स्त्री म्हणूनः
१. गर्भसंस्कार(गर्भावर आधीच संस्कार/गर्भाला पोटातच विद्या शिकवणे इ.इ.) या शब्दातून जो अर्थ इंप्लाय होतो तो सध्याच्या दिवसात मिस गायडिंग आहे.
२. हा शब्द कोण्या एकाने आधी वापरला आणि कॅची झाला, आणि सर्वांनी त्या शब्दाला कॉमन केले. ("झेरॉक्स","कॅडबरी" सारखे.)
३. गर्भ संस्कार किंवा आपण प्रीनेटल काऊन्सेलिंग म्हणू, यात मला "गर्भाला उद्देशून मंत्र म्हणणे" हे (म्हणजे हे पूर्ण कोर्स मध्ये १-२ मिनीटाचा आचरटपणा म्हणून ठेवा हवे तर)सोडून रोज ताजे खा, निगेटिव्ह भावनांना लांब ठेवा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे (मोबाईल आणी मायक्रोवेव्ह सारखी) शक्यतो खूप वेळ संपर्कात ठेवू नका, चांगली गाणी ऐका, चांगली आवडणारी कोणत्याही विषयावरची पुस्तके वाचा, अती बिभत्सरस किंवा भयकथा सोडून("चांगली पुस्तके" यात मी गजानन महाराज किंवा तत्सम पोथ्यांचे वाचन धरत नाहिये, कारण त्या कथा खूप काल्पनीक आहेत आणि फार प्रेरणादायी वाटल्या नाहीत.) हे सर्व मला कोणी सांगितले तर चांगलेच आहे आणि मनशक्तीमध्ये या अपेक्षा पूर्ण झाल्या (तिसरा दिवस सोडून.) फी आठवत नाही पण काहीतरी ७००-८०० रु होती असे आठवते.लंच डिनर नाश्ता धरुन.
४. मागणी तसा पुरवठा आहे. काही ठिकाणी खूप फी वाले आणि नुसतेच गर्भाला उद्देशून मंत्र म्हणणारे आणि जन्मण्याआधी इंजिनीयर डॉक्टर बेबी निर्माण करणारे वर्ग असतीलही, पण पब्लिक पैसे द्यायला तयार आहे. सगळ्यांना परवडणार नाही म्हणून मी एखाद्या श्रीमंताला जाऊन "तू लुई व्हिताँ ची बॅग का विकत घेतोस, ज्यांना घेता येत नाही ते गरिब(यात मीपण आले) डिप्रेस होतात ना!" असे हटकू शकत नाही.
५. गर्भ संस्कारच नाही, तर इतर सर्व वर्गात कॉमन असलेली मनःशक्तीची यज्ञाजवळ संध्याकाळी प्रार्थना खरंच मनाला शांत करणारा प्रकार आहे.आता कोर्सेस संपवल्यावर घरी लोक ती करत नाहीत हा भाग वेगळा, पण तिथे खरंच शांत वाटतं.गर्भाला उद्देशून माता पित्यांनी "तू या जगात ये, आम्ही तुझं स्वागत करतो, तुझी वाट पाहतो" म्हणणं हा मला घोर अपराध वाटत नाही.
६. बुवा बाजी काय, हे वर्ग काय, आर्ट ऑफ लिव्हिंग काय आणि स्वितझरलँडच्या झर्‍याचे जादुई पाणी पिऊन सर्व रोग घालवणे काय, आम जनतेने डोके वापरुन आणि डोळे उघडे ठेवून पैसे गुंतवणे हा पहिला मुद्दा आहे.
(डिसक्लेमरः मनःशक्तीशी मी संबंधित नाही आणि ते मला प्रसार करण्यासाठी पैसे देत नाहीत :):) )

तू मीठ बरोबरच टाकले, मीच भाजी कमी आणली होती असे सांगावे.>>>>>:हाहा: टण्या यान्ची तसेच विकु यान्ची पण पोस्ट येकदम पटली.

अवांतर :

टण्या,

तुमचा इथला संदेश वाचला. रोजच्या आयुष्यातला कम्प्युटर, अनेक विविध प्रकारची विद्युत शक्तीवर चालणारी उपकरणे, दुचाकी/चारचाकी, आगगाडी इत्यादिंचा उपयोग करण्यासाठी श्रद्धेची गरज नसते. याउलट माणूस आजारी असेल तर रोगमोचनार्थ जे तंत्रज्ञान वापरावं लागतं त्याचा माणसावर थेट परिणाम होत असतो. तिथे 'मी बरा होईनच' ही श्रद्धा निश्चितपणे कामास येते.

शिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञान हे वेगवेगळे आहेत. ते एकत्र केल्यास घोळ होतो. तो निस्तरणे हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

मंत्र म्हणजे शब्दाचे बुडबुडे.मंत्रशक्तिने साधा पापड ही तोडता येत नाही.हे गर्भसंस्कार म्हणजे मार्केटिंगचा प्रकार आहे लोकांचि गरज ओळखा नि पुड्या सोडा.करोडो अंधश्रध्दाळु असलेल्या कसल्याही चमत्क्रुतीजन्य कथांवर विश्वास ठेवणार्या देशात हजार एक बकरे मिळाले तरी खुप होतात.

लेख चांगला आहे. 'गर्भसंस्कारा'च्या नावाखाली ठगवणारे आणि त्या संदर्भात बुद्धीची कुवत असतानाही नीट विचार करून निर्णय न घेणारे सारखेच दोषी वाटतात.

खाली दिलेल्या मजकुराविषयी शंका आहे. ह्या विषयातलं समजणार्‍या तज्ञांपैकी कुणी समजवून सांगितलं तर मदत होईलः

आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही

हे वाचून काही शंका डोक्यात आल्या. नुस्ती चार दोन ढोबळ उदारणं देऊन मुद्दा पटवणं अगदीच झेपलं नाही. 'गर्भावर खोल परिणाम' म्हणजे नेमकं काय आणि कसा ते सांगितलेलं नाही.

आईची मनःस्थिती वाईट असण्याचा परिणाम तिच्या बायोकेमिकल प्रोफाइलवर होणार. उदा: डिप्रेस्ड आईच्या cortisol, norepinephrine levels, dopamine and serotonin levels बदलणार नाहीत का? ह्यातले जे घटक प्लासेंटा ओलांडू शकतील त्यांचा बाळावर काहीच परिणाम होणार नाही हे शक्य आहे का? थोडा शोध घेतल्यावर हा रीसर्च पेपर मिळाला. (ह्यात बाळातले बदल तात्पुरते आणि रिव्हर्सिबल असतात का त्याबद्दल काही सपडलं नाही).

Prenatal depression effects on the fetus and the newborn. Infant Behav Dev : http://www.researchgate.net/publication/222670350_Prenatal_depression_ef...

हा पेपर वरच्या परिच्छेदात ठळक केलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात आहे असं वाटलं. इथल्या डॉक्टरांचं काय मत आहे? वेळ मिळाला तर प्लीज लिहा.

सुन्ता हा प्रकार शास्त्रसिद्ध - म्हणजे सुन्ता केल्याने भविष्यात होणारे फायदे - आहे का केवळ अंधश्रद्धा आहे हे कोणी सांगू शकेल काय?

तसेच सुन्ता करणारे हे प्रशिक्षीत पेडीअ‍ॅक्ट्रीक असतात का हकीम?

>>>> उदा: डिप्रेस्ड आईच्या cortisol, norepinephrine levels, dopamine and serotonin levels बदलणार नाहीत का? ह्यातले जे घटक प्लासेंटा ओलांडू शकतील त्यांचा बाळावर काहीच परिणाम होणार नाही हे शक्य आहे का? <<<<
तुम्ही तथ्यकारक मुद्दा मांडत आहात. अर्थातच मजजवळ प्रयोगशाळा नसल्याने वा गर्भवती स्त्री उपलब्ध नसल्याने याबाबत प्रयोग करुन सांगता येणे अवघड आहे. पण या शंकेच्या जवळ जाणारे तर्काधारीत उदाहरण म्हणजे बाळ अंगावर पिते असताना, आईच्या आहारात बदल झाला, जसे की काकडी/केळे /दही/आंबट खाण्यात आले तर बाळास एकदोन दिवसातच सर्दी खोकला कफ दिसून येतो. (अर्थात यावरही प्रतिवाद होईल की खाण्यामुळे असे काही होत नाही, व आईने खाल्ले तर बाळाला काही होत नाही... मी प्रत्यक्षात तसे वावदुक प्रतिवाद अनुभवले आहेत, कारण मुळात आहारातील सात्विक/तामस असे फरकच मान्य नसतात. असो.)
जर आईच्या खाण्यामुळे दुधातील सत्वात्/तत्वात बदल होऊन त्याचा परिणाम बाळावर होतो तर आईच्या गर्भातच असताना, तुम्ही म्हणता तसे नाळे मार्फत वा प्रत्यक्ष काही लहरींमार्फत परिणाम होतच नसेल, वा ते थोतांडच आहे असे हे "शास्त्रीय विचार करणारे उच्चशिक्षित" डायरेक्टली कसे ठरवू शकतात? मानू शकतात? असोच.
तुमचा प्रश्न विचार करण्याजोगा आहे.

लिंबूटिंबू, गर्भवती, बाळंतिणीच्या आहारविहार-आरोग्याची काळजी घ्यायला हवी याबाबत कोणतंही दुमत नाही.

मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या संकेतस्थळावरून :
"प्रत्येक पालकाला, बुद्धिमान आणि सुसंस्कारी मूल हवे असते. सर्व गुण हे संस्कार (म्हणजेच शुद्धिकरण) प्रक्रियेतून व्यक्तीमध्ये येऊ शकतात. आज विज्ञानही म्हणते की पोटातील बाळसुद्धा शिकते व त्यास स्मृती असते; आणि म्हणून, त्यावर जन्मपूर्व संस्कार करता येतात! मनशक्ती केंद्र, १९६१ पासून गर्भसंस्काराचे उपक्रम करीत असून, आज ते आंतर्‌राष्ट्रीय पातळीवर मान्यता पावले आहेत! आपले बाळ तेजस्वी, सुदृढ व सुसंस्कारी निपजवण्यासाठी, मनशक्तीचे पुढील उपक्रम, साहित्य आणि उत्पादने आहेत. "

गर्भावरही संस्कार करता येतात, गर्भावरच संस्कार केल्याने आपले मूल बुद्धिमान, सुसंस्कारी होऊ शकते....हा वादाचा मुद्दा आहे.

विशिष्ट सीडी ऐकल्याने गर्भवतीला छान वाटतं, शांत वाटतं, त्यामुळे तिच्या गर्भाची वाढ छान होते. पण ती सीडी ऐकून जन्माला आलेले बाळ अशी सीडी न ऐकलेल्या बाकीच्या बाळांपेक्षा चार पावले पुढे असेल आणि जन्मभर पुढे राहील का? हा वादाचा/चर्चेचा विषय आहे. (असे मला वाटते)

या विषयावर अन्य देशांत/संस्कृतींतही प्रयोग होतच आहेत आणि तिथेही त्यांच्या मान्यतेवरून वाद होताहेत. तिथे मंत्र नसतील, दुसरं काही असेल.

Pages