जय हेरंब - जय जय जय श्री गणेश - श्री. रघुनंदन पणशीकर

Submitted by संयोजक on 24 August, 2009 - 00:46

गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: श्री. रघुनंदन पणशीकर


सौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)
अधिक माहिती साठी जय हेरंब पहा.
ही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.

विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीत संगीत दोन्ही सुंदर Happy
अशी देणगी फार कमी लोकांना लाभते.

श्री. रघुनंदन पणशीकर यांनी गायल्यं पण सुरेख.

मनोज, मस्तच एकदम. राग वगैरे काही कळत नाही पण ऐकायला गोड वाटतेय. आधी ऐकले होते परत ऐकायला अजुन मस्त वाटले.

संयोजक, अनेकानेक धन्यवाद मनोजची गाणी इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल.

संयोजक, मनोजच्या आयडीची लिंक टाकाल का त्याच्या नावाच्या ठिकाणी?

श्यामली, कराडकर आणि महागुरु ह्यांना २१ मोदक प्रत्येकी

फारच छान गीत आणि संगीत आणि गायलेल ही सही...

आता उद्याचे राहुल देशपांडेच्या आवाजातले गीत ऐकायची खूप उत्सुकता लागून राहिली आहे.

हा राग यमन असावा असं वाटतंय.
बरीचशी चाल....जब दीप जले आना....सारखी वाटतेय

धन्यवाद मंडळी! आशा करतो, पुढची गाणी देखील आपल्याला आवडतील. जे भावलं नसेल तेही कृपया कळवा. (info@jayheramb.com)
अजून एक विनंती. सर्व गाणी ऐकून झाल्यावर 'जय हेरंब' संग्रहातील कुठलं सर्वात जास्तं आवडलं तेही कळवाल का?
धन्यवाद! गणपती बाप्पा मोरया! जय हेरंब!!
-उपासक.

लोकहो, एक आग्रहाची सूचना..
गाण्याचा ताल आणि राग संयोजकांना इ-मेल करून कळवायचा आहे. कृपया, आपली उत्तरे इथे लिहू नकात.
धन्यवाद. Happy