"सालुदा"
साहित्यः
१ कप शेवया;
१ कप स्वीट कॉर्न चे दाणे;
१ कप पालकाची कोवळी पाने;
कोथिंबीर + मिरचीची चटणी;
रोस्टेड रेड कॅप्सिकम तुकडे;
काकडी किसुन;
क्रॅनबेरीज चे थोडे तुकडे;
मीठ, साखर चवी नुसार
स्पायसी पाप्रिका ऑइल:
ऑऑ
पाप्रिका
सजावटी करता:
अक्रोड
कोथिंबीर - पाने;
कृती:
१. गरम पाण्यात मिठ घालुन त्यात शेवया शिजवुन घेतल्या. आणि थंड करायला फ्रिजात ठेवल्या;
२. काकडी सोलुन, किसुन त्याचा रस काढुन घेतला. त्यात चवीला मिठ, साखर घातली आणि फ्रिजात ठेवला;
३. गरम पाण्यात पालकाची पाने धुवुन ब्लांच करुन घेतली. त्यात काकडीचा किस (राहिलेला चोथा) आणि कोथिंबीर + मिरचीची चट्णी घातली आणि मिक्सर मधे बारीक करून घेतले. (त्याला सुटलेले पाणी गाळुन पिऊन टाकले या मिश्रणाच्या छोट्या गोट्या वळल्या आणि फ्रिझर मधे ठेवल्या;
४. कॅप्सिकम ला ऑऑ चोपडुन ओवन मधे रोस्ट करून घेतला. सालं काढुन रोस्टेड कॅप्सिकम चे तुकडे करुन घेतले.
५. ऑऑ मधे अक्रोडाचे तुकडे शॅलो फ्राय करून घेतले. बाजुला ठेऊन दिले.
६. गॅस बंद केला आणि या गरम तेलातच चमचाभर पाप्रिका घातली. बाजुला ठेऊन दिले.
७. आता सगळे जिन्नस फ्रिजातुन बाहेर काढुन आधी एक फोटु काढला
८. एका ग्लासात तळाला कॅप्सिकमचे तुकडे, कोथिंबीरीची पाने आणि कॉर्न चे दाणे घातले. त्यावर काकडी चा रस ओतला. त्यावर शेवयांचा थर घातला. त्यावर टोस्टेड अक्रोड, क्रॅनबेरीज आणि हिरव्या गोट्या ठेवल्या. वरतुन चिली ऑईल ड्रिझल केले...
हेल्दी 'सालुदा' तयार....
____
बदलून वापरलेले पदार्थ -
पर्ल कुसकुस - शेवया;
हरिसा - स्वीट कॉर्न
योगर्ट सॉस - चिली ऑईल
मुळ पाककृतीच्या जास्तीतजास्त स्टेप्स फॉलो करायचा प्रयत्न केला आहे.
____
माहितीचा स्त्रोतः फालुदा चे सलाद वर्जन
अधिक टिपा:
वरती घातलेल्या हिरव्या गोट्या जरा मेल्ट झाल्या की त्या मस्त काकडीच्या रसात मिक्स होतात. फ्लेवर्ड काकडीरस आणखिनच छान लागला.
यात पुदिना पण अॅड करता येईल... एकदम रिफ्रेशिंग चव येईल.
उन्हाळ्यात गारेगार सालुदा मस्त लागेल प्लस कॅलरीज चे टेन्शन नाही
अमेझिंग. सालुदा नाव अगदी
अमेझिंग. सालुदा नाव अगदी क्रियेटीव्ह आहे. मी कोल्ड सूप म्हणून बोळवण केली असती
सालुदा नाव जाम आवडलं. बाकी
सालुदा नाव जाम आवडलं. बाकी तुला काय सुचेल आणि काय कारशील ते ब्रह्मदेवालाही कळणार नाही
म हा न !
म हा न !
मस्त दिसतयं .. खरचं महान आहेस
मस्त दिसतयं .. खरचं महान आहेस तु!! _/\_
बाकी तुला काय सुचेल आणि काय कारशील ते ब्रह्मदेवालाही कळणार नाही >> +१
पार्टीत द्यायला मस्त आहे.
पार्टीत द्यायला मस्त आहे.
मस्तं आहे.
मस्तं आहे.
Superb idea.
Superb idea.
लवली, वेरी इनोवेटिव.
लवली, वेरी इनोवेटिव.
वेड! लाजो, धन्य आहेस तू.
वेड! लाजो, धन्य आहेस तू.
लाजो !!! महा धन्य आहेस
लाजो !!! महा धन्य आहेस तू!!!!
सुपर लाईक !!!!!!!!!!
अरे जबरदस्त!! मस्तच आहे ही
अरे जबरदस्त!! मस्तच आहे ही कल्पना...
पण जल्लां म्हणजे काय? मूळ पाकृ लाजोची नव्हती?
मंजू (दया), और ढूंढो वो शख्स
मंजू (दया), और ढूंढो वो शख्स कौन है!
मृणालिनी साळवी असणार मग! दया
मृणालिनी साळवी असणार मग!
दया मत कहो ना! दया डोंगरे असल्यासारखं वाटतं
दया डोंगरे असल्यासारखं वाटतं
दया डोंगरे असल्यासारखं वाटतं >>>
आधीच मुळ पाककृती भारी ! हे
आधीच मुळ पाककृती भारी !
हे म्हणजे लयच भारी !!
लाजो धन्य आहेस !!!
म्हणजे काय? मूळ पाकृ लाजोची
म्हणजे काय? मूळ पाकृ लाजोची नव्हती? >> मलाही ही पाकृ लाजोचीच वाटली होती.