'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक बदलून Colorful Salad Wrap

Submitted by sonalisl on 26 September, 2015 - 17:40

Colorful Salad Wrap

लागणारा वेळ ३०-४० मिनिटे.

बदललेले घटक :
१ कप पर्ल कुसकुस = २-३ वाटी मैदा
हरिसा पेस्ट किंवा लाल मिरच्यांचा ठेचा = Marinara sauce (तुम्ही कोणताही पास्ता सॉस वापरू शकता)
दही = पनीर

साहित्य :

१) २-३ वाटी मैदा
२) १ कप पालकाची कोवळी पाने
३) कोथिंबीर + मिरचीची चटणी किंवा कोथिंबीर पेस्टो - चवीनुसार
४) Marinara sauce
५) रोस्टेड कॅप्सिकम स्ट्रिप्स - लाल / पिवळ्या किंवा दोन्ही (आवडीनुसार)
६) थोड्या ड्राईड क्रॅनबेरीज किंवा बेदाणे (ऐच्छिक)....... नाही घेतले.
७) काकडीचे पातळ काप
८) १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल (ऑऑ)
९) बारीक कुटलेली मिरी चवीनुसार
१०) मीठ चवीनुसार
११) १ वाटी पनीर (तेलावर परतून घ्यावे)
१२) वाळलेला किंवा ताजा पुदिना
१३) लिंबाचा रस चवीनुसार
१४) बदामाचे काप

कृती :
१) पालकाची पाने, लिंबाचा रस आणि थोडेसे पाणी घेऊन याची पेस्ट करून घ्यावी. मैद्यात हि पेस्ट, मीठ, ऑलिव्ह ऑइल आणि लागेल तेव्हढे पाणी घालून चांगले मळून घ्यावे.

photo new1(1).jpg

२) Wrap बनविण्यासाठी मैद्याचा गोळा थोडासा लाटावा व त्यावर ऑऑ लावून वाळलेला पुदिना भुरभुरावा. असा.......

photo new2(1).jpg

याची घडी करून परत ऑऑ लाऊन पुदिना भुरभुरुन घडीची पोळी करावी आणि शेकून घ्यावी.

३) या पोळीवर सुरुवातीला हिरवी चटणी लावून त्यावर मधोमध अनुक्रमे काकडीचे काप, लाल / पिवळ्या रोस्टेड कॅप्सिकम स्ट्रिप्स, तेलावर परतलेले पनीर, Marinara sauce व बदाम काप ठेवावे. त्यावर मिरपुड आणि हवे असेल तर लिंबाचा रस घालावा.

photonew 3.jpg

आता हे सगळे (न सांडता) गुंडाळावे. त्यानंतर पुन्हा Parchment paper(किंवा Aluminium foil) मध्ये गुंडाळून केचप बरोबर किंवा कोणत्याही आवडत्या सॉस/सलाड ड्रेसिंग बरोबर वाढावे.

photonew 4.jpg

मूळ पाककृती : http://www.maayboli.com/node/55567

ताक : पनीर ऐवजी कटलेट घ्यायची खूप ईच्छा झालेली पण तो अनेक घटकांनी बनलेला एक घटक आहे. मग हि प्रवेशिका बाद झाली असती. आता वाटते कि पनीर ऐवजी खरपूस परतलेला बटाट्याचा किस (hash browns सारखा) सुद्धा मस्त लागेल.

टिप : यात अजून भर घालायची असेल तर कांदा, गाजर, कोबी/ लेट्यूस वापरता येईल.
मैद्याऐवजी कणिक वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users