(आपल्याकडे घराजवळ पब नसतात. जिथे जोरजोरात वाजवल्या जाणाऱ्या संगीताच्या तालावर बिनधास्त नाचता येते. जिथे आवाज एका बंद हॉल मध्ये असल्याने आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकत नाही.
अशी ठिकाणे आम्ही असंस्कृत मानतो. म्हणून अशा ठिकाणी जाणे आम्हास असभ्यपणाचे वाटते.
पण तीच गाणी भर रस्त्यावर चौकात जोरजोरात वाजवून अंगविक्षेप करत नाच करायला मात्र आम्हाला आवडते.
कारण ती आमची थोर संस्कृती आहे. आणि आम्ही सुसंस्कृत आहोत.
म्हणून, इतरांना त्याचा जर त्रास होत असेल तर ते नक्कीच असंस्कृत व धर्मविरोधी असतील. कारण...)
भारत माझा देश आहे |
सारे भारतीय मला बांधील आहेत |
माझ्या देशातल्या सार्वजनिक उत्सवांवर माझे प्रेम आहे |
तिथे वाजणाऱ्या फटाक्यांचा व डॉल्बीवरच्या
कर्कश्श गाण्यांचा मला अभिमान आहे |
त्या गाण्यांवर हिडीस नाच करता येण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन |
तसेच त्याचा त्रास होणाऱ्यांना मी धर्मविरोधी म्हणेन |
मी माझ्या पालकांना, गुरुजनांना आणि
वडीलधाऱ्या माणसांना डॉल्बी ऐकायला भाग पाडेन |
आणि याबाबत प्रत्येकाशी जबरदस्तीने वागेन |
माझ्या आजूबाजूचे वृद्ध, आजारी, त्रासलेले नागरिक वा लहान बाळे
यांची फिकीर न करण्याची मी प्रतिज्ञा करत आहे |
कारण फटाक्यांचा व डॉल्बीचा माझा आसुरी आनंद त्यांच्यावर लादून
त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवण्यातच माझे सौख्य सामावले आहे |
.
(No subject)
अगदी अगदी. कारण कुठलेही असो
अगदी अगदी. कारण कुठलेही असो - लग्नाची मिरवणूक, दहिहंडी, गणपती,नवरात्र..![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
डॉल्बीमुळे खिडक्यांची तावदाने, भिंतीसुद्धा व्हायब्रेट होतात. त्यात घराच्या जवळ कार्यालय असेल तर हाल विचारायलाच नकोत. गरबा, लग्न ,लोकल नेत्यांचे वाढदिवस.. उच्छाद असतो नुसता
खरंय.
खरंय.
अगदी खरयं . दीड दिवसाच्या
अगदी खरयं .![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दीड दिवसाच्या गणपति विसर्जनाच्या वेळी तर हाल झाले .
फक्त डॉल्बी नाही तर त्या ढोल-ताशे वाल्याचं ही प्रस्थ वाढल आहे .
मला स्वतःला ढोल-ताशे ऐकायला आवडतं .
पण यावेळी फारच त्रास झाला.
आता रविवारचा विचार करून भिती वाटतेय
भापो
भापो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आँ ! ते भोंगे उतरले म्हणून
आँ ! ते भोंगे उतरले म्हणून ग्णपतीची डॉल्बी बंद करणार होते ना ? त्याचे काय झाले ?
काल रात्री १० नंतर चार गणपती
काल रात्री १० नंतर चार गणपती लागोपाठ गेले. ढोल-ताशे-डीजे-डॉल्बी..
कान अक्षरशः फुटायला आले. स्वस्ति म्हणतांत तसं रविवारचि भिती वाटु लागली आहे.
त्याचा त्रास होणाऱ्यांना मी धर्मविरोधी म्हणेन. >> हे आणखी दुर्दैवी आहे!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
काल आमच्या सोसायटीमधील ७
काल आमच्या सोसायटीमधील ७ दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. घर सोडून कुटुंबासहित काही तास बाहेर जावे लागले. निर्वासितासारखे मित्राच्या व नातेवाईकांच्या घरी ते तास काढले![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
लेखन आवडले. अगदी ह्याच भावना
लेखन आवडले. अगदी ह्याच भावना मनात आहेत.
दहा-बारा मंडळांची वर्गणी
दहा-बारा मंडळांची वर्गणी (दंड) मी हसत हसत देईन.
अगदी अगदी..!! परवा आमच्या
अगदी अगदी..!!
परवा आमच्या सोसायटीमध्ये साधारण एकाच वेळेस दोन गणपती विसर्जनाकरता बाहेर पडले. एका गणपतीसाठी ढोल-ताशा पथक अर्धा तास आधीच येऊन खाली उभं होतं. त्यांनी जे ढोल बडवायला सुरूवात केली.. तो गणपती कधी एकदा बाहेर पडतो असं झालं. चिडचिड झाली अगदी. कानात अक्षरशः कापसाचे बोळे घालायची वेळ आणली होती या लोकांनी.
तो गणपती विसर्जनाकरता गेला आणि दहाव्या मिनिटाला दुसरा गणपती बाहेर पडला. दहा पंधरा माणसं, प्रत्येकाच्या हातात टाळ आणि मुखात बाप्पाचं नाम. अगदी शांतपणे टाळांच्या तालात बाप्पाचा नामगजर करत, जयजयकार करत ती देखणी मिरवणूक निघाली. पहिला गणपती निघण्याच्या वेळेस झालेली चिडचिड कुठल्याकुठे पळाली होती..
आता अगदी मनोभावे हात जोडले गेले होते आणि डोळ्यात पाणी होते.
अशा आनंद देणार्या गोष्टी सोडून आम्ही का त्या विकृतीच्या आधीन झालो आहोत काही कळायलाच मार्ग नाहिये.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
>> दहा पंधरा माणसं,
>> दहा पंधरा माणसं, प्रत्येकाच्या हातात टाळ आणि मुखात बाप्पाचं नाम. अगदी शांतपणे टाळांच्या तालात बाप्पाचा नामगजर करत, जय्जयकार करत ती देखणी मिरवणूक निघाली.
अशी आदर्श मिरवणूक जगाच्या पाठीवर कुठेतरी अजून अस्तित्वात आहे म्हणायची. नामशेष होऊ पाहणाऱ्या एखाद्या सुंदर पक्षाच्या प्रजाती सारखी. बाकी सगळा कावळ्यांचा गोंगाट.
आता तर दरवर्षी चढत्या क्रमाने
आता तर दरवर्षी चढत्या क्रमाने ढोल पथके वाढत आहेत.![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
ज्याला पहावे तो चालला ढोल बडवायला. अगदी महिला पण आघाडीवर आहेत यात.
पुर्वी लेझिम पथके असायची ती फारशी दिसत नाहीत आजकाल.
त्या पथकांमधे एखाद दुसरा ढोल, एखाद दुसरा ताशा आणि बाकी सारे लेझिमवाले असायचे.
त्याही पुर्वी (बहुतेक स्वातंत्र्याच्या आधी) मेळे असायचे, काठीला घुंगरे बांधून त्या नाचवत फेर धरणे.
हे असले ध्वनी प्रदुषण करणार्या लोकांना आणि वाहतुकीचे नियम मोडणार्या लोकांना कसा आळा घालावा ?
ह्या वर्षी शांताबाईंना कसं
ह्या वर्षी शांताबाईंना कसं शांत करायचं हा मोठाच प्रश्न पडला होता.
त्या ढोल वाजवणार्या
त्या ढोल वाजवणार्या कलाकारांच्या ( ?) कानाचे काय होत असेल ?
अरे हे शांताबाई काय प्रकरण
अरे हे शांताबाई काय प्रकरण आहे ? व्हॉट्सअॅप वर खुप फिरत आहे, एका बिडी ओढणार्या म्हातार्या बाईचा फोटो ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
>>>अगदी महिला पण आघाडीवर आहेत
>>>अगदी महिला पण आघाडीवर आहेत यात.<<<
महेश,
ही टीकास्पद बाब नसून स्तुत्य बाब आहे. ह्यामुळे एकुणात सभ्य वातावरण निर्माण होण्यास हातभार लागतो.
नादब्रह्मची चित्रे व्हॉट्स अॅप वर पाहून खूप बरे वाटले. दारू पिऊन, लालभडक डोळ्यांनी इकडेतिकडे बघत हिडीसपणे नाचणार्यांपेक्षा हे बरेच बरे!
बेफी, नाही मी जे लिहिले ते
बेफी, नाही मी जे लिहिले ते टीकेसाठी नाहीये. एकंदरीतच ढोलांची आणि ते वाजविणार्यांची होत असणारी बेसुमार वाढ ही चिंतेची बाब आहे. पुरूष पण आणि महिला पण.
मुली ढोल वाजवित असल्याचे पहाण्यासाठी जास्तीत जास्त गर्दी होते आणि ती पुर्णपणे सभ्य असेल असे वाटत नाही. पण म्हणुन महिलांनी अशा गोष्टींमधे सहभाग घेऊच नये असे अजिबात नाही.
पुर्वी गम्मत म्हणुन माफक प्रमाण होते ते आता खुप वाढले आहे एवढेच.
अवांतर : माझ्या ओळखीतली एक मुलगी गेले काही वर्षे ढोलपथकात आहे. आता तिचे लग्न ठरले, तर सासरचे (विशेषतः साबा) म्हणत आहेत की आता तिने हे थांबविले पाहिजे, कारण त्याचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
आणि हे म्हणणार्या साबा स्वतः गेले अनेक वर्षे ढोलपथकात आहेत.
मला एकच मुद्दा अधोरेखित करायचा आहे, तो म्हणजे ध्वनीप्रदुषण हे फार म्हणजे फारच वाढत चालले आहे, त्याला आळा घातला गेला पाहिजे. मग ते कोणीही करो पुरूष अथवा महिला आणि कोणत्याही जाती धर्माचे.
>>>मुली ढोल वाजवित असल्याचे
>>>मुली ढोल वाजवित असल्याचे पहाण्यासाठी जास्तीत जास्त गर्दी होते आणि ती पुर्णपणे सभ्य असेल असे वाटत नाही.<<<
अख्ख्या मिरवणूकीत आणि पाहणार्यांमध्ये एकही स्त्री नसली तरीही बहुतांशी गर्दी असभ्यच असते.
>>>पण म्हणुन महिलांनी अशा गोष्टींमधे सहभाग घेऊच नये असे अजिबात नाही.<<<
खरे आहे.
>>>पुर्वी गम्मत म्हणुन माफक प्रमाण होते ते आता खुप वाढले आहे एवढेच.<<<
स्त्रियांच्या आयुष्यात गंमत वाढली आहे हे चांगले लक्षण आहे असे माझे मत आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>अवांतर : माझ्या ओळखीतली एक मुलगी गेले काही वर्षे ढोलपथकात आहे. आता तिचे लग्न ठरले, तर सासरचे (विशेषतः साबा) म्हणत आहेत की आता तिने हे थांबविले पाहिजे, कारण त्याचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. <<<
अच्छा!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>>आणि हे म्हणणार्या साबा स्वतः गेले अनेक वर्षे ढोलपथकात आहेत.<<<
मुले झाल्यावर की होण्याच्या आधी?
ध्वनीप्रदुषण? महेश, लोक ताजी
ध्वनीप्रदुषण?
महेश,
लोक ताजी हवा, नेत्रसुखद दृश्ये, उत्तम सर्व्हिस वगैरेसाठी पर्यटनठिकाणी जातात 'असे तीच लोकं समजतात'!
प्रत्यक्षात ती तेथे शांततेसाठी जात असतात. कसलाही आवाज नाही. हे खूप मोठे सुख असते.
ध्वनीप्रदुषण स्त्री करते की पुरुष हा विषय पूर्णपणे असंबद्ध आहे. दोन वेगळेच विषय मिसळण्यात अर्थ नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इन फॅक्ट, ध्वनीप्रदुषण माणसाला सर्वात अधिक त्रस्त, संत्रस्त करत आहे ह्याची आवश्यक तितकी दखल घेताली जात नाही आहे.
>>>आणि हे म्हणणार्या साबा
>>>आणि हे म्हणणार्या साबा स्वतः गेले अनेक वर्षे ढोलपथकात आहेत.<<<
>>>मुले झाल्यावर की होण्याच्या आधी?
मुले झाल्यावर
>>>प्रत्यक्षात ती तेथे
>>>प्रत्यक्षात ती तेथे शांततेसाठी जात असतात. कसलाही आवाज नाही. हे खूप मोठे सुख असते.
हे पण पुर्णपणे खरे नाहीये. अनेक लोक दारू पिऊन आणि कानठळ्या बसतील एवढे मोठे स्पिकर्स लाऊन नाचायला जातात आणि इतर पर्यटक (जे खरेच पर्यटनासाठी (किंवा तुम्ही म्हणता तशा शांततेसाठी) येतात) त्यांच्यासाठी बेक्कार तापदायक असतात.
हा एका वेगळ्या धाग्याचा विषय आहे, जो अन्यत्र आधीच चर्चिला गेला/जात आहे.
कान किटवणार्या ह्या सणांना
कान किटवणार्या ह्या सणांना आवर घालायला हवा हे मात्र खरे.गणपति गेलेत आता दिवाळी येइल.दिवाळीत मुंबइ सोडुन दरवर्षि ग्रामिण भागात राहिले तर मनाला शांतता लाभते.
गणपति गेलेत आता दिवाळी
गणपति गेलेत आता दिवाळी येइल.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<<
पगारे,
हिंदू धर्माचा अभ्यास वाढवा.
सध्या पितृपक्ष आहे. त्यात डॉल्बी लागत नाही. पण त्यानंतर दिवाळीआधी एक नवरात्र नामक अत्यंत लोकप्रिय उत्सव असतो.
खरेच दिमा नवरात्र विसरलो
खरेच दिमा नवरात्र विसरलो
>> एकंदरीतच ढोलांची आणि ते
>> एकंदरीतच ढोलांची आणि ते वाजविणार्यांची होत असणारी बेसुमार वाढ ही चिंतेची बाब आहे. पुरूष पण आणि महिला पण.
संपूर्ण सहमत. लयबद्ध लेझीम का आउटडेटेड झाले? ढोल वाजवता येणं हे त्यापेक्षा सोपं आहे शिवाय "अटेन्शन सिकिंग" ची भूक लेझीम पेक्षा ढोलाने जास्त भागते. माझ्या एका मित्राने पूर्वी एकदा एक विधान केले होते "ढोल वाजवायची हौस त्यांनाच असते ज्यांना स्वत:कडे लक्ष वेधून घ्यायचे असते". त्याचे हे विधान वादग्रस्त असू शकते. पण या नादात होणारे ध्वनिप्रदूषण संपूर्णपणे दुर्लक्षिले जाते हि बाब अत्यंत दुर्दैवाची.
ढोलवादन वा तत्सम प्रकार हे
ढोलवादन वा तत्सम प्रकार हे नशे मधे मोडतात. त्याच्याकडे केवळ ध्वनीप्रदूषण म्हणुन पाहून चालणार नाही. तो समूह नशेचा प्रकार आहे.मज्जासंस्था बधीर करतात. त्यातुन त्याला आता ग्लॅमर व प्रतिष्ठा लाभली आहे. शिवाय ढोलवादनाच्या तालावर संस्कृतीरक्षणाचा ठेका धरला जातो. पुण्यात तर गेल्या पाच सहा वर्षात एकदम पेव फुटल आहे या ढोलपथकांच.
भविष्यात ढोलवादनाच्या माध्यमातून संमोहन करुन तरुणांकडून गुन्हेगारी कृत्य करुन घेतली जातील असे आमचे भाकीत आहे.- (प्रेरणा व सौजन्य शाम मानव.)
टिव्हीवर बातम्यांमधे ऐकून मला
टिव्हीवर बातम्यांमधे ऐकून मला धक्का बसला. पुण्यात ढोलपथकांची संख्या म्हणे ४०० च्या वर गेली आहे.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
>>"ढोल वाजवायची हौस त्यांनाच असते ज्यांना स्वत:कडे लक्ष वेधून घ्यायचे असते"
होय शक्य असू शकेल, कारण माझ्या ओळखीतली जी लहान लहान मुले / मुली (कॉलेज वयीन) ढोलपथकांमधे आहेत त्यांना काय अगदी कौतुक आहे त्या प्रकरणाचे. मी आता लिडर आहे, इ. इ.
वय आणि वजन पाहिले तर अगदीच किरकोळ, पण सेल्फी काय अन फेसबुकावर सतराशे साठ फोटो काय ? काही विचारू नका.
अर्थात समाजात या अशा फेजेस (आणि क्रेझेस) असतात. कदाचित ही क्रेझ पुढच्या काही वर्षात कमी होऊन नविन काही येईल.
पुण्यात ढोलपथकांची संख्या
पुण्यात ढोलपथकांची संख्या म्हणे ४०० च्या वर गेली आहे. << यामागे अर्थकारणही आहे. मुळशी, पौडा कडील गाव पथकांचा दर तासाला ८ हजार पासुन पुढे आहे.
गणेशोत्सवात ही पथके पुण्यात दाखल होतात तर बहुतांशी मिळालेले पैसे हे गावाच्या विकासकामांवर खर्च केले जातात.
पुण्यामधील काही पथकांनी गावे दत्तक घेतल्याचे मी ऐकले होते.
गेली काही वर्षे आमच्या मंडळाची मिरवणुक बंद केली असल्या मुळे सध्याच्या काळातील मिरवणुकीला येणार्या खर्चाचा अंदाज नाही.
९७-९८ साली आलेला मिरवणुक खर्च (३ तास) साधारण २५ ते ३० हजार होता त्यात पथकाचे १२ हजार, जनरेटर ६ हजार, ट्रॅक्टर, उंट घोडे आणी अन्य किरकोळ खर्च.