रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो

Submitted by मामी on 23 September, 2015 - 09:14

केव्हाची मधुबनी स्टाईलमध्ये एखादं चित्रं रंगवायची इच्छा होती. या गणेशोत्सवातील या उपक्रमामुळे छान संधी मिळाली.

नेटवरून मधुबनी स्टाईलमध्ये एक गणपती सिलेक्ट करून घेतला. ठोबळमानानं तो मनात धरून त्यावरून मी गणपती चितारला. अर्थात ही शुद्ध मधुबनी आर्ट नाहीये कदाचित. हे फ्युजन असेल फारतर.

कागद : अजय पाटील यांच्या जलरंग शाळेकरता आणलेला तसाच पडून होता. हा कागद ३०० GSM चा आहे. आकार - ३७.५ x २७ cms

रंग : पोस्टर कलर्स - Chrome Yellow Deep Hue, Crimson, Poster Green
याशिवाय गणपतीच्या ठळक रेषांसाठी PikPens permanent marker -500, आतील नक्षीसाठी Staedtler triplus fineliner आणि इतर काही ठिकाणी Staedtler Lumocolour permanent markers वापरले आहेत.

या स्टेप्स :

हा रंगवण्यापूर्वीचा गणपती (वरच्या कोलाजमधील शेवटचा) :

आणि हा पूर्ण झाल्यावर :

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम सुंदर झालंय चित्रं!
प्रयत्न बियत्न न वाटता एकदम प्रोफेशनल!

मामी,
झकास झालेत बाप्पा मधुबनी स्टाईल मध्ये !!!!!
अन खरच प्रयत्न न वाटता एकदम प्रो वाटत्येस तू चित्र बघून,

मामी, चित्र खरंच एकदम मस्तच झालंय. फक्त हे मधुबनी स्टाइलमध्ये नाहिये. मधुबनी इन्स्पायर्ड म्हणु शकतो. अर्थात तसं तू लिहिलं आहेच म्हणा.

धन्यवाद मंडळी. Happy

नताशा, हो हो. नक्कीच. किंबहुना मी ज्या चित्रावरून हे काढलं ते ही अस्सल मधुबनी नव्हतंच. शिवाय आजूबाजूची रंगरंगोटी माझ्या मनाचीच आहे.

Apratim.

खूपच छान!
रंगवलेलं चित्र छानच, पण मला त्याहुन जास्त आवडलं ते रंगवायच्या आधीचं चित्र>>> +१
हातावर काढलेली हिरवी मेंदी नी रंगलेली मेंदी सारखं Wink

Pages