तेचबुक- गणेश-साती

Submitted by साती on 18 September, 2015 - 09:13

गणेश-
(गणेशचतुर्थी)
आज मूषकावर बसून मामाच्या गावाला चाललो होतो.
इम्बॅलन्स होऊन गाडी स्कीड झाली.
एक दात अर्धा तुटला.
सोंडेला खरचटलं.
(डी पी- दात तुटलेल्या आणि खरचटलेल्या सोंडेचा सेल्फी)

लाईक्स- १९८७६५४३२
अनलाईक्स- १५

रिध्दी- ओह नो! तरी तुला सांगते गाडी बदल!
लाईक्स-७८६
अनलाईक्स-२- मूषक, शंकर, पार्वती

सिद्धी- आई गं! घरी ये. टी टी इंजेक्शन घ्यायला जाऊ.
लाईक्स- ८९७६

पार्वती- त्यापेक्षा मामींनी दिलेलं कैलासजीवन लाव!
लाईक्स- ऑल मायबोलीकर
अनलाईक्स-सिद्धी.

कार्तिकेयाचा मोर-
पण उंदीरमामा कसे आहेत? त्यांची कुणाला काळजी आहे का?
लाईक्स- ४ - मूषकराज, ऐरावत, सरस्वतीचा मोर, गरूड

चंद्र- फिदी फिदी . असंच पाहिजे ढेरपोट्याला . स्वतःचा आकार बघ! मारतोय मोठा फास्ट गाडी!
मी दररोज पृथ्वी प्रदक्षिणा करतो, कधी पडत नाही ते!
लाईक्स-० अनलाईक्स-९८७६५४३२१

गणेश- (अनफ्रेंडस चंद्र)
याला अनफ्रेंड केलाय. काही सेन्सिटीवीटीच नाही.
रिद्धी /सिद्धी- पाषाण हृदयी कुठचा.
लाईक्स- ९९९९९९९
कमेंट- निळुभाऊ भुजबळ- (एक्स अंतराळवीर) - its true!

चंद्र - शंकरपार्वतीच्या तेचबुकावर-
काका काकू, माझं चुकलं. गणेशाला मला माफ करायला सांगा. आय्याम वेरी वेरी सॉरी.
लाईक्स -८७६९५
अनलाईक्स-३- गणेश, उंदीर, कार्तिकेय

शंकर- प्लीज फरगिव हिम गणेश! तो तुझा लहानपणीचा मित्र आहे.
लाईक्स - ८७६९५ , अनलाईक्स - तेच तीन

गणेश- ओके. पण ऑन वन कंडिशन.
यापुढे मी मामाकडे जाताना याने मला किंवा कुणी याला पहायचे नाही.
लाईक्स- ५५५७८९६
रिद्धी- गुड डिसीजन
सिद्धी- वेल डन गणेश

गणेश- अ‍ॅडस चंद्र इन फ्रेंडलिस्ट.
चंद्र- थँकयु गणेश !
लाईक्स ९८७६५४३२१००००

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!

कार्तिकेयाचा मोर-
पण उंदीरमामा कसे आहेत? त्यांची कुणाला काळजी आहे का?
लाईक्स- ४ - मूषकराज, ऐरावत, सरस्वतीचा मोर, गरूड>>

याला अनफ्रेंड केलाय. काही सेन्सिटीवीटीच नाही.>>

भारी आहे हे. समस्तं वाहन संघटना Happy

मस्त कल्पना.
चंद्राकडे न बघायच्या गोष्टीच नवीनरूप भलतं कन्विन्सिंग. कधी पोराला गोष्ट सांगायची वेळ आली तर हीच सांगणार. Happy

साती, पुढे अंगारिकेचा आणि संकष्टीचा पण संदर्भ हवा होता...

पठ्ठे बापुरावांची एक लावणी आहे यावर

गोरा चंद्र डागला, थट्टेच्या मूळे...
असली थट्टा काय कामाची
लेक नव्हे तूझ्या मामाची
लावणी पठ्ठे बापूरावाची....

असे काहिसे शब्द आहेत.

चंद्राकडे न बघायच्या गोष्टीच नवीनरूप भलतं कन्विन्सिंग. कधी पोराला गोष्ट सांगायची वेळ आली तर हीच सांगणार. >>>> अगदी अगदी +७८६ Happy

Pages