प्रकाशचित्रांचा झब्बू क्र.१ - आवाज कुणाचा?" - समाप्त!

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 14:01

गणपती बाप्पा मोरया!

'ढुम-ढुम, ढम-ढम, धा-धीन-धीन-धा, ओSSओ, छन-छन, छुम-छुम, धत्तड -तत्तड, सट्याक-फट्याक-खळ्ळ्-खट्याक...' अरे अरे, हे आवाज तरी किती प्रकारचे? मानवाने स्वतःच्या मनोरंजनासाठी निर्मिलेल्या वाद्यांतून निघणारे सूर, ताल, आपल्याच तंत्रात चालणार्‍या वेगवेगळ्या यंत्रांचे संवाद-विसंवाद, आवाजाचा जादूगार असणार्‍या त्या निसर्गाच्या पोतडीतून निघणारे कडाडणार्‍या विजेपासून खळाळणार्‍या लाटेपर्यंत अगणित वैविध्य... भारावून जायला होते ना?

जल्लोष हा कोणत्याही उत्सवाचा अविभाज्य भाग. ढोल, ताशे, झांज आणि 'मोरया'चा गजर...गणपतीच्या या दहा दिवसांत सारा आसमंत 'नाद'मय होउन जातो. हाच नाद तुम्हांला बोलावतो आहे मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळण्यासाठी!

'आवाज कुणाचा?'

आवाज करणार्‍या कोणत्याही वस्तूचे / निसर्गाचे तुम्ही पाहिलेले आणि टिपलेले रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचे आहे.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे ध्वनी उमटवणार्‍या कोणत्याही घटकाचे प्रकाशचित्र अपेक्षित आहे. प्रकाशचित्रात ध्वनी उमटण्याच्या क्षणाचा आविष्कार व्हायला हवा. उदा. चोच मिटलेल्या कोंबड्याचे प्रकाशचित्र चालणार नाही, पण तो बांग देणारा कोंबडा असेल तर चालेल. वाद्यांचे फोटो चालतील कारण नाद निर्मिती हेच त्यांचं प्रमुख कार्य आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ :-
Slide3_0.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो गं वर्षू ............हाही आठवेल बहुतेक......:फिदी: आणि वरचा फोटो थायलन्डचा ना?

आणि हे सेन्ट्रल पार्कातल्या "ओवरीत"लं टॅप डान्सिन्ग

आवाज अंतर्मनातला जेव्हा निशब्द, अथांग निसर्ग आपल्याला अंतर्मुख करतो तेव्हा...

इन्ना ती ट्रेन कुठली? मस्त बोगदा आहे...

पोटोमॅक नदीकाठी जमलेले टुरिस्ट या सी गल्स बदकं गीज यांना काहीबाही खायला टाकतात तेव्हाचा कलकलाट.....अर्थातच पक्षांचा

Pages

Back to top