गणपती बाप्पा मोरया!
'ढुम-ढुम, ढम-ढम, धा-धीन-धीन-धा, ओSSओ, छन-छन, छुम-छुम, धत्तड -तत्तड, सट्याक-फट्याक-खळ्ळ्-खट्याक...' अरे अरे, हे आवाज तरी किती प्रकारचे? मानवाने स्वतःच्या मनोरंजनासाठी निर्मिलेल्या वाद्यांतून निघणारे सूर, ताल, आपल्याच तंत्रात चालणार्या वेगवेगळ्या यंत्रांचे संवाद-विसंवाद, आवाजाचा जादूगार असणार्या त्या निसर्गाच्या पोतडीतून निघणारे कडाडणार्या विजेपासून खळाळणार्या लाटेपर्यंत अगणित वैविध्य... भारावून जायला होते ना?
जल्लोष हा कोणत्याही उत्सवाचा अविभाज्य भाग. ढोल, ताशे, झांज आणि 'मोरया'चा गजर...गणपतीच्या या दहा दिवसांत सारा आसमंत 'नाद'मय होउन जातो. हाच नाद तुम्हांला बोलावतो आहे मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळण्यासाठी!
'आवाज कुणाचा?'
आवाज करणार्या कोणत्याही वस्तूचे / निसर्गाचे तुम्ही पाहिलेले आणि टिपलेले रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचे आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे ध्वनी उमटवणार्या कोणत्याही घटकाचे प्रकाशचित्र अपेक्षित आहे. प्रकाशचित्रात ध्वनी उमटण्याच्या क्षणाचा आविष्कार व्हायला हवा. उदा. चोच मिटलेल्या कोंबड्याचे प्रकाशचित्र चालणार नाही, पण तो बांग देणारा कोंबडा असेल तर चालेल. वाद्यांचे फोटो चालतील कारण नाद निर्मिती हेच त्यांचं प्रमुख कार्य आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
श्रीगणेशा
श्रीगणेशा करते...
अतिउत्साहाच्या भरात हाताशी असलेला फोटो टाकला होता. पण तो नियमात बसत नसल्याने काढून टाकत आहे. त्याऐवजी हा घ्या ;
कडकलक्ष्मीच्या आसूडाचा आवाज
अँटिक लुकिंग पण मॉडर्न
अँटिक लुकिंग पण मॉडर्न रेकॉर्ड प्लेअर
आमच्या कडल्या रेकॉर्ड्स मात्र १९५० च्या कलेक्शन मधल्या आहेत
वा, वर्षुताई.
वा, वर्षुताई.
कंटिन्युअस ओरडणारा प्लम हेडेड
कंटिन्युअस ओरडणारा प्लम हेडेड पॅराकीट
वर्षू नील रेकॉर्ड प्लेयर
वर्षू नील रेकॉर्ड प्लेयर मस्त!
धागेतिट गेगेतिट ........
धागेतिट गेगेतिट ........
(No subject)
मीयाँव...............
मीयाँव...............
(No subject)
पक्षिणी प्रभाती चारियासी
पक्षिणी प्रभाती चारियासी जाय
पिलू वाट पाहे उपवासी...................................
वॉव मानुषी.. निगकर्स उपस्थित
वॉव मानुषी.. निगकर्स उपस्थित
हत्तीचा चीत्कार
हत्तीचा चीत्कार
मस्त कल्पना. फोटो सगळे सुंदर!
मस्त कल्पना. फोटो सगळे सुंदर!
(No subject)
मस्त फोटो आणि विषय. आल्बम
मस्त फोटो आणि विषय. आल्बम शोधायला सुरूवात.
शंखध्वनी
शंखध्वनी
अरे मस्त येतायत सगळेच
अरे मस्त येतायत सगळेच फोटो.... मानुषी, दोन्ही फोटो सही आहेत
(No subject)
आला का पुढचा फोटो? मी वाटच
आला का पुढचा फोटो? मी वाटच पहात होते.
झऱ्याची झुळझुळ...
झऱ्याची झुळझुळ...
मी पण वाटच पहात होतो पुढच्या
मी पण वाटच पहात होतो पुढच्या फोटोची
आत्मधून व स्वरूप
आत्मधून व स्वरूप धन्यवाद
मंदिरातल्या झांजा
ढोल कुणाचा वाजतो ????
ढोल कुणाचा वाजतो ????
डफलीवाले...............डफली
डफलीवाले...............डफली बजा
व्हीटी२२० एकावेळी एकच फोटो
व्हीटी२२० एकावेळी एकच फोटो टाका. दुसर्या कुणी फोटो टाकला की मग पुढचा फोटो टाका.
आशुतोष.... मस्त फोटो! छोटा
आशुतोष.... मस्त फोटो!
छोटा डफलीवाला पण भारीये!
अर्रे मस्त आहेत हे सगळे
अर्रे मस्त आहेत हे सगळे फोटो. माझ्याकडे आवाजाचे फोटोच नाहीयेत.
(No subject)
असं कसं असं कसं मामी? असणारच
असं कसं असं कसं मामी? असणारच काही तरी! शोधा म्हणजे सापडेल!
(No subject)
Pages