Submitted by संयोजक on 15 September, 2015 - 23:25
गूळखोबरं, खिरापत, पंचामृत, पेढे, लाडू, मोदक आणि वर तुपाची धार, पंचखाद्य, वेलची घातलेले साखरफुटाणे, नारळाची वडी, केळीच्या पानावर वाढलेला गरमगरम वरणभात, अळूची भाजी, नवीन केलेलं लोणचं, ऋषींची भाजी, गौरींचा नैवेद्य, बाप्पाची शिदोरी आणि निरोप देऊन आल्यावर केलेली वाटली-डाळ किंवा खिचडी. गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा खाण्याचाही नक्कीच शौकीन असला पाहिजे. त्याची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवसांत तुम्ही खाण्याचे कायकाय पदार्थ केले, याची चित्रमय झलक बघायला आम्ही मायबोलीकर उत्सुक आहोत.
नैवेद्याची प्रकाशचित्रं आणि खास आठवणी इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतींच्या धाग्यावरच लिहा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपतीबाप्पा मोरया! लवकर
गणपतीबाप्पा मोरया!
लवकर लवकर प्रसादाचे फोटो येऊ द्यात.
नैवेद्यम समर्पयामि...
नैवेद्यम समर्पयामि...

व्वा! अंजली, सुंदर मोदक! एक
व्वा! अंजली, सुंदर मोदक! एक घेते उचलून हं!
मी पण एक घेतला आहे. छान झाला
मी पण एक घेतला आहे. छान झाला आहे. धन्यवाद.
अंजली.... पान आणि मोदक दोन्ही
अंजली.... पान आणि मोदक दोन्ही सुंदर आणि रेखीव!
बायकोची कलाकुसर लेकीची मदत
बायकोची कलाकुसर

लेकीची मदत
वा अंजली , हितेश दोघांचेही
वा अंजली , हितेश दोघांचेही सुंदर झालेत. अंजली , पान सुरेख आहे. हितेश , लेकीची कलाकुसर खुप गोड.
सुरेख. अंजली, वरून तूप
सुरेख.
अंजली, वरून तूप घातलेले मोदक मस्त दिसताहेत. ते पानही मस्त आहे.
मस्त मोदक अंजली आणि हितेश
मस्त मोदक अंजली आणि हितेश
घरचे पेढे !
घरचे पेढे !
हे घराच्या गणपतीचे. इकडे
हे घराच्या गणपतीचे. इकडे शनिवारी करू.

दिनेश जी, तुमची लिहीताना काही
दिनेश जी, तुमची लिहीताना काही चूक झालेय का? तुम्ही विकत आणलेल्या पेढ्यांना घरचे म्हणताय का? हलके घ्या प्लीज. मस्तच झालेत.
अमितव, मोदकांच ताट सुंदर दिसतंय.
मोदकांचे आणि पेढ्यांचे
मोदकांचे आणि पेढ्यांचे नैवेद्य मस्त झालेत.
फोटो देत नाही परंतू आमच्याकडे मोदकाच्या सारणावर प्रयोग झाले.-१)चणा डाळ भिजवून वाटून फोडणीला परतून 'वाटली डाळ करतो ती भरून मोदक थोडे केले.गोडास पर्याय.२)लाल भोपळाकीस शिजवून नेहमीच्याच नारळाच्या सारणात -खोबरं अधिक गुळ वापरल्याने नारळखोबय्राचे प्रमाण कमी केले.त्याचे मोदक न करता रोल केले.( काजुकतलीचे लोड असतात तसे झाले.मोदकांस गुळाच्या सारणाने खमंगपणा येतो म्हणून गुळ घातला परंतू रोलाचा रंग चांगला नाही आल.साखर घेतली असती तर छान दिसले असते.केशरी -पांढरा दिसला असता.
मोरया!
मोरया!
बाप्रे सगळ्यांचे फोटोज कातिल
बाप्रे सगळ्यांचे फोटोज कातिल आहेत.. अगदी प्रोफेशनल आहेत मोदक्,पेढे.. __/\__
एस आर डी.. हेल्दी पर्याय खूप छान आहेत.. एखादा तरी फोटो डकवायचा ना इथे..
ममो, वर्षू, एसार्डी आज
ममो, वर्षू, एसार्डी
आज ऋषीपंचमीची भाजी !
काल फोटो देता आला नाही
काल फोटो देता आला नाही पण
आजचा नैवेद्य-
हे काजुरोलसारखे दिसणारे मोदक आज पुन्हा केले फक्त सारणात गुळाऐवजी साखर घातल्याने अपेक्षित रंग आला.
साहित्य आणि कृती :-
१ ) लाल भोपळ्याचा कीस,ओलं खोबरं आणि साखर प्रमाणात आणि ( मोदकाची उकड )

२) तिन्ही मिक्सरमध्ये भरडून शिजवल्यावर. फार सुकवायचं नाही.

३) प्लास्टिक पिशवीवर मोदकाची मळलेली उकड लाटून एक चौकोनी आकार कापून वरचे तयार सारण आडवे ठेवून गुंडाळायचे.
४) एक तयार झालेली गुंडाळी. सुरी ओली करून तीन वळकट्या कापल्या.
५) मोदक नेहमी चाळणीवर कापड ठेवून त्यात साध्या वाफेवर उकडतो.इथे हे रोल बंद डब्यात उकडले त्यामुळे फार उफलले नाहीत,घट्ट राहिले.पिस्त्याच्या कापाने सजवून.खाली कोनफळाच्या वेलाची पत्री ठेवली ऋषीपंचमी निमित्त.
Srd, किती सुंदर. आयडिया
Srd, किती सुंदर. आयडिया साॅलिड आहे. मानलं.
सुशी मोदक.. मस्तच.
सुशी मोदक..
मस्तच.
Srd, किती सुंदर. आयडिया
Srd, किती सुंदर. आयडिया साॅलिड आहे. मानलं. >> +१
मस्त दिसतायत रोल्स!
मोदकाचा आकार न जमणार्या
मोदकाचा आकार न जमणार्या मंडळींसाठी सॉलिड आयडिया आहे ही मोदक रोल्स ची.
मोदकाचा आकार न जमणार्या
मोदकाचा आकार न जमणार्या मंडळींसाठी सॉलिड आयडिया आहे ही मोदक रोल्स ची.>>>अगदी अगदी
मोदक रोल्ससाठी वेगळा धागा
मोदक रोल्ससाठी वेगळा धागा काढा. नंतर शोधायला बरं पडेल.
काल विकडे असल्यामुळे आणि मुख्य नारळ संपल्याने फक्त वरण-भात आणि विकतचा लाडू हाच नैवैद्य दाखवला.
मोदक रोल बद्दल ____/\____ .
मोदक रोल बद्दल ____/\____ . लै भारीये ती आयडिया. फोटो अतिशय कातील आलेत मोदक रोल्सचे.
वॉव...एक से एक नैवेद्य ! मोदक
वॉव...एक से एक नैवेद्य !
मोदक रोल आयडीआ जबरदस्तं !!
एसार्डी, मोदक रोल मस्तच
एसार्डी, मोदक रोल मस्तच
(No subject)
(No subject)
मी केलेला डबलडेकर मोदक
मी केलेला डबलडेकर मोदक
आमचा नैवेद्य... आंबा
आमचा नैवेद्य...
आंबा मोदक
चॉकलेट फज मोदक
पातोळ्या
Pages