साहित्य -
१) एक वाटी ओट्स्
२) एक वाटी ओलं खोबरं (खरवडून)
३) एक वाटी दुधी किसून (पाणी पिळून घ्या, नाहीतर सारण होईल)
४) अर्धी वाटी गूळ
५) दोन चहाचे चमचे आवडते ड्रायफ्रुट्स
६) अर्धा चमचा वेलची पूड
७) दोन चहाचे चमचे साजूक तूप
८) एक वाटी पाणी
९) मीठ
१०) तेल
कृती -
मोदकाची पारी - ओट्स् मिक्सरमध्ये फिरवून पीठ करून घ्या. एक वाटी पिठासाठी एक वाटी पाण्यात चवीनुसार मीठ व तेल घालून उकळवत ठेवा. उकळले की त्यात ओट्सचे पीठ घालून, ढवळून, झाकण ठेवून, एक वाफ आणून गॅस बंद करा. ही उकड हाताने मळता येईल एवढी थंड झाली की चांगली मळून घ्यावी.
मोदकाचे सारण - भांड्यात तूप गरम करून त्यावर दुधीचा कीस परता. त्यावर गूळ, खोबरे, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत ठेवा.
मोदकाची कृती - ओट्सच्या पिठाची पारी करून, त्यात सारण भरून मोदक वळावेत. हे मोदक १५ मिनिटे वाफवून घ्यावेत.
बदलायचे पदार्थ :
१) दुधी
२) गूळ
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
माझ्या हातात असतं तर मी मूळात
माझ्या हातात असतं तर मी मूळात इथे दिलेल्या पाकृतच बदल केला असता.
ओटसऐवजी तांदणाच्या कण्या आणि दूधीऐवजी नारळ.
ही वरची डिश वाचायला आणि बघायलाही भितीदायक वाटत आहे.
भितीदायक तर वाटतेच आहे. तरी
भितीदायक तर वाटतेच आहे. तरी नशीब दुधी बदलायची संधी आहे.
अब आयेगा मजा! ह्यात चव बदलता
अब आयेगा मजा! ह्यात चव बदलता येईल! बाकीच्या पदार्थांमध्ये मूळ चव बदलायला फारसा स्कोप नाहीये.
Healthy recipe aahe hi.
Healthy recipe aahe hi.
दुधी - राजगिरा / पोहे रोस्त
दुधी - राजगिरा / पोहे रोस्त करून त्याची कणी
गुळ - मध (मे बी सारणाची इतर प्रक्रिया करून झाल्यावर शेवटी घालायला)
दुधी - गाजर
गुळ - साय/मावा
>> ही वरची डिश वाचायला आणि
>> ही वरची डिश वाचायला आणि बघायलाही भितीदायक वाटत आहे.
>>ही वरची डिश वाचायला आणि
>>ही वरची डिश वाचायला आणि बघायलाही भितीदायक वाटत आहे.>> सहचमत.
दुधी ऐवजी चिकन आणि गुळाऐवजी
दुधी ऐवजी चिकन आणि गुळाऐवजी बारीक किसलेलं आलं किंवा ते जपानी रेस्तराँमध्ये मिळतात तश्या आल्याचे काप ( https://en.wikipedia.org/wiki/Gari_(ginger) ) वापरले की मोदकाचे मोमोच होतील की मस्त!
रेसिपी आवडली नाही म्हणून आज
रेसिपी आवडली नाही म्हणून आज रेसिपी कोणाची ह्याची अजिबातच चर्चा नाही
पाककृती आवडली नाही म्हणायचे
पाककृती आवडली नाही म्हणायचे आणि त्यावर ती कोणाची हे शोधून काढायचे.......एव्हढे दुष्ट नाहीत मायबोलीकर
काहीही हं संयोजक. हिहिहि.
काहीही हं संयोजक. हिहिहि. हिहिहि(तोंडावर हात ठेवून पिंक (ब्लू गाउन आज धुवायला आहे ) गाउन घालून बाहुली).
ह. घ्या.
हा घ्या बदल, ओटस पराठे.
दूधी = मूळा किंवा शेपू
गूळ = भूत ढोल्किया मिरची
तोंडली पराठ्यांनी धक्का दिलेलाच होता , आता हा सुद्धा सहन करू. तोंडली मध्ये इतकी मारामारी आणि घरात असलेले शेंगदाणे ते तीळ पासून डाळ्या. तर इथे ओट्सचे कवर. हेल्दी पणाचा कहर.
काहितरी सुटसुटीत, तब्येतीला झेपेल, चवीला बरं अशी कृती द्या ना. (मला काय सांगायला, आपण जनहिताच्या सोयीसाठी सुचवतोय).
पण दिनेश असावे वाटतय.
( ज्यांनी कोणी बनवलीय त्यांनी वरच्या कमेंटस पर्सन्ली घेवू नका, कोणीही) . मी काय टीपी करतेय.
पण विचार केल्यावर, चवीत बदल करायला हिच रेसीपी बरी आहे. दुसर्या रेसीपींमध्ये चव इतकी नवीन नसणार.
टण्यानी सुचवल्याप्रमाणे ओट्स मोमो .. ह्म्म बर वाटतय. एकायला पण.
अहो टीपी नाही, तुम्हाला आवडली
अहो टीपी नाही, तुम्हाला आवडली नसेल तर उत्तम चान्स आहे. बदला बर, आणि करा ती आवडती.
कोणाचा उत्साह कमी नाही
कोणाचा उत्साह कमी नाही करायचाय पण. तेव्हा नो टीपी हां परत.
प्रमाण बदलायचे नाही नियम आहे
प्रमाण बदलायचे नाही नियम आहे ना?? (थोडे कमी जास्त चालेल पण अर्धी वाटीचे अर्धा चमचा नाय चालत म्हणे ना??)
तेव्हा झंपे, ते अर्धी वाटी भूत ढोलकिया मिरची काय जनहितार्थ काय?? दया कर काही आम्हा गरिबावर, दुसरं काय सुचव.
अहो टीपी नाही, तुम्हाला आवडली
अहो टीपी नाही, तुम्हाला आवडली नसेल तर उत्तम चान्स आहे. बदला बर, आणि करा ती आवडती. >>> हे बेस्ट आहे. याला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्युड. शाब्बास!
मामी तूच काही सांग ह्या
मामी तूच काही सांग ह्या धाग्यावर पॉझिटीव्ह अॅटीट्यूडवर ठासून... इथे अर्धी वाटी आले, अर्धी वाटी मिरची.. काय चाललं काय!! इतके काय मायबोलीकर वाईट नाहीत हो.
ते प्रमाण न बदलण्याचे
ते प्रमाण न बदलण्याचे स्पष्टीकरण कुठे आहे ते शोधतोय. स्पर्धेच्या नियम ४ मध्ये पाणी अपवाद केले आहे तसेच प्रमाणाच्या नियमातही पाणी (आणि मीठ) अपवाद करा गडे.
असल्या रंगीत प्लेटस कुणाकडे
असल्या रंगीत प्लेटस कुणाकडे आहेत ते माहित्येय म्हणून आता ही पाकृ कुणाची ते ही कळलं.
पण जाऊदे , आता पहिलीच उत्स्फूर्त प्रतिक्रीया बदलत नाही.
हे रेसिपी टाकणार्या स्त्रिये, मला माफ कर.
तुला दुखविण्याचा अज्जिबात हेतू नाही.
सीमंतीनी, ढोलकिया हि गंमत
सीमंतीनी, ढोलकिया हि गंमत होती,
जोक्स अपार्ट, पण मी खटपटीचं काही करत नाही पण हिंटा आहेत बर्याच.
उदाहरण,
दूधी =एक वाटी कणीक
अर्धी वाटी गूळ = काकडी किसून/ बीटाचा /गाजराचा कीस
दोन चहाचे चमचे आवडते ड्रायफ्रूट्स मध्ये फक्त बेदाणे ,काजू घालून गोडाची थालीपीठं थापा.
"बदललेला घटक मूळ घटकाऐवजी
"बदललेला घटक मूळ घटकाऐवजी पाककृतीत मुख्य घटक म्हणून आणि सजावटीत वापरू शकता. फक्त सजावटीकरिता वापरता येणार नाही."
आले किंवा भूत ढोलकिया मिरची सजावटीच्या प्रमाणात वापरलेली बरी हो. संयोजक, कृपया खुलासा करा.
संयोजक, हा धागा आणि संयोजन
संयोजक, हा धागा आणि संयोजन गृपमधले इतर सार्वजनिक धागे 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या गृपमध्ये हलवा कृपया.
दुध्याचं सारण वापरून ओटसची
दुध्याचं सारण वापरून ओटसची उकड करून मोदक केले तर गणपतीबाप्पा किती वैतागेल?
प्रमाण न बदलण्याचे स्पष्टीकरण कुठे आहे ते शोधतोय><< मीच कुठ्ंतरी शंका विचारली होती (बहुतेक चणा डाळ वडीवर) तिथं संयोजकांनी उत्तर दिलंय.
हिरव्या प्लेट वरुन जागू या
हिरव्या प्लेट वरुन जागू या आयडीची असावी हा अंदाज येतोय .
हेल्दी रेसिपी आहे तशी. दूधी भोपळाची आयडिया भारी आहे
मला ही जागूची रेसिपी वाटतेय
मला ही जागूची रेसिपी वाटतेय पण तीची डिश चौकोनी होती कि काय बहुतेक...
ही जागूचीच रेसिपी असणार आहे.
ही जागूचीच रेसिपी असणार आहे. पिवळी चौकोनी डिश ऋषिपंचमीच्या भाजीतही वापरली आहे.
जागू तूसुद्धा! बाकी सातींच्या
जागू तूसुद्धा!
बाकी सातींच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत.
ही दिनेशदांची रेसिपी त्यांनी
ही दिनेशदांची रेसिपी त्यांनी जागूतर्फे करवून घेतलेली दिसते
साध्या मोदकाचीच पारी वळायला जमत नाही त्यामुळे ओट्सचे मोदक करणे कठीण आहे पण दुधी-गूळ बदलायचे म्हटल्यावर तिखट डंपलिंग्ज करुन बघायला आवडतील.
ओट्सच्या पारीची आयडिया दिल्याबद्दल धन्यवाद. मोमो / डंपलिंग्जना मैद्याचे कव्हर असते ना ? त्याऐवजी हा हेल्दी बदल मस्तच होईल.