कैवल्य कैवल्य फ्यान क्लब .. (बदाम बदाम बदाम)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 April, 2015 - 14:25

जर आदित्य देसाई नामक मध्यमवर्गीयांच्या हृतिक रोशनचा फ्यानक्लब मायबोलीवर निघू शकतो.....

तर आजघडीचा मराठी मालिकासृष्टीचा आमीर खान, चॉकलेट बॉय, दिल दोस्ती दुनियादारी फेम कैवल्य (उर्फ जे काही त्याचे रीअल लाईफ नाव असेल, नावात काय आहे, आम्ही त्याला कैवल्य म्हणूनच ओळखतो) त्याचा फ्यान क्लब तर हक्काने बनलाच पाहिजे. Happy

दिल दोस्ती दुनियादारी या तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या मालिकेला नेमका कितपत टीआरपी मिळतोय याची अधिकृत आकडेवारी माझ्याकडे तुर्तास उपलब्ध नाही, पण जो काही मिळत असेल त्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो छावा म्हणजे कैवल्य कैवल्य !

मालिकेच्या पोताला साजेशी त्याची बेफिकीर स्टाईल,
बटाट्यासारख्या मोठाल्या डोळ्यांतून खुलणारा त्याचा लूक, (असे डोळे आणखी एका मराठी अभिनेत्रीचे आहेत, पण तिचे नाव इथे नको)
आणि फायनली त्याची सुपर्ब टायमिंग संवादफेक, हा तर मालिकेचा यूएसपी ठरावा.
तर, अल्पावधीतच आपला कैवल्य लक्षवेधक आणि दिलखेचक ठरला यात रत्तीभरही नवल नसावे.

या चार शब्दांसह मी माझ्या कैवल्यपुराणाला ब्रेक देतो आणि इतर कैवल्यप्रेमींना इथे आमंत्रित करतो Happy

kaiv 2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेयला प्रत्यक्ष भेटलेय मिसेस अन्नपुर्णाच्या शुटिंगच्या वेळी... बाईकवर आला होता. शुटिंगच्यावेळी आम्हाला खूप कंफर्टबल केलं होतं. शुध्द शाकाहारी आहे. त्याला वासही आवडत नाही हे नंतर कळलं.. प्रॉन्स केले होते.. चमचा तोंडाजवळ नेला अन छान झाल्याची अ‍ॅक्टींग केली...

निधी, जमला असता की नसता हे ठामपणे नाही सांगता येत.
पण जेव्हा केव्हा आयुष्यात समोरून कोणत्या मुलीने माझ्याकडे बघितलेय (हो बघितलेय काही जणींनी) आणि मी तिच्याबाबत सिरीअस नसेल तेव्हा मनात पहिला विचार हाच यायचा की अफेअर करायला काही हरकत तर नाही, पण उद्या जर ती मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे म्हणाली तर आपल्याला तिला नकार देता येणार नाही एवढे आपण भावनाप्रधान आहोत आणि त्यामुळे मी त्यांचे ते लांबून बघणेच एंजॉय करायचो आणि ते सारे सोकॉल्ड चान्स फुकटच गेले. Happy

एवढा मनाचा मोकळेढाकळेपणा मला एक पुरुष म्हणून खचितच जमला असता.. किंवा काय सांगावे जमलाही असता.. >>

ऋ, या वाक्याबद्दल बोलत होते मी. दोन्हीकडे 'असता' लिहिलयस ना म्हणून. Happy

रिया, एनएसपी म्हणजे काय?

Ho. Eka shakahari mhanun specially olakhalya janarya community madhe pan "Wagh" aadnav aste bar ka.....

कैवल्यचे खर्‍या आयुष्यात लग्न झाले आहे का?
या मालिकेचे युट्युबवर फक्त ४० भाग आहेत, नंतरचे कुठे पहायला मिळतील? आता खुप पुढे गेली असेल.

दिदोदु टीम रॉक्स !
कैवल्य आज रॉकस्टार भासतोय..
त्याच्या आजच्या परफॉर्मन्सनंतर माझ्या आईचेही नाव कैवल्य फॅन क्लबमध्ये टाकू शकता..

Pages