गोव्यामध्ये टोस नावाचा एक गोड पदार्थ करतात. चण्याची डाळ, नारळ आणि साखर असतात त्यात. याच पदार्थात गाजर मिसळून केलेला एक प्रकार.
तर यासाठी लागणारे घटक -
१) ३ कप गाजराचा कीस
२) १ कप चणाडाळ
३) अर्धा कप ओले खोबरे, बारीक वाटून
४) २ टेबलस्पून तूप
५) पाऊण कप साखर (चवीप्रमाणे कमी-जास्त)
६) वासासाठी वेलची / जायफळ / केशर
कृती -
१) प्रेशर कूकरमध्ये थोडे तूप तापवून त्यात गाजराचा कीस परतून घ्या. प्रेशर न लावता २ मिनिटे ठेवा आणि मग शक्य तितका कोरडा करून घ्या.
२) कीस बाहेर काढून त्याच कूकरमध्ये आणखी थोडे तूप घालून चणाडाळ मंद आचेवर परता. कूकर तापलेलाच
असल्याने डाळ लवकर भाजली जाते. अगदी खमंग भाजायची नाही. सोनेरी झाली की बास.
३) मग त्यात दीड ते दोन कप पाणी टाकून झाकण लावा. प्रेशर येऊ द्या. ते आल्यानंतर ५ ते ८ मिनिटे शिजवा.
४) कूकर थंड करून झाकण काढा. (जास्तच पाणी राहिले असेल तर ओतून घ्या, थोडे पाणी राहू द्या) डाळ डावेने ठेचून घ्या. अगदी बारीक करायची नाही. त्यात साखर मिसळा व परत मंद आचेवर ठेवा. सतत हलवत राहा.
५) एक कढ आला की त्यात त्यात खोबरे टाका व मिश्रण नीट मिसळून घ्या.
६) मग त्यात गाजराचा कीस टाका व ढवळत राहा. पाच दहा मिनिटांत मिश्रणाचा गोळा जमू लागेल. तसा जमला की आच बंद करा.
७) त्यात वेलची / जायफळ / केशर मिसळा.
८) तूप लावलेल्या ताटात मिश्रण ओता व सपाट करून घ्या, थर साधारण १ सेमी जाडीचा असू द्या.
या वड्या मऊसर आणि बेताच्या गोड होतील. एक-दोन दिवस टिकतील. जास्त टिकवायच्या असतील तर साखर जास्त घालावी लागेल व मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवावे लागेल. या वड्या नारळाच्या दुधासोबत छान लागतात. नुसत्याही छान लागतात.
पाककृती मधील बदलण्याचे घटक -
१) गाजर
२) चणाडाळ
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
जोरदारे....
जोरदारे....
काय सुरेख पाककृती आहे !
काय सुरेख पाककृती आहे ! अदलाबदल न करता अशीच्या अशी करुन बघावीशी वाटतेय. अशा ओलसर वड्या फार आवडतात. पुरणाच्या वड्या पण साखरेमुळे चव वेगळी लागेल.
कल्पकतेला तर भरपूरच वाव आहे.
ह्या सिरीजमधल्या पाककृती कुणी दिल्यात त्याचे अंदाज बांधायला ( आणि नंतर श्रेयनामावलीत नावं वाचायला ) मजा येईल.
वॉव !!! अगो +१
वॉव !!! अगो +१
संयोजनाला जेमतेम दिवस होते,
संयोजनाला जेमतेम दिवस होते, कोणीतरी असा उपक्रम शोधला, कोणीतरी त्यात ही रेसिपी शोधली आणि करूनच्या करून अशी फोटोसह उतरवून काढली... कमाल आहे
ह्या सिरीजमधल्या पाककृती कुणी
ह्या सिरीजमधल्या पाककृती कुणी दिल्यात त्याचे अंदाज बांधायला ( आणि नंतर श्रेयनामावलीत नावं वाचायला ) मजा येईल.>+ १
संयोजक, आता या पाककृतीमधला (उदाह्रणार्थ) गाजराऐवजी मुळा आणि चणाडाळीऐवजी शेंगदाणे असाच घटकबदल करायचा आहे. त्याव्यतिरीक्त
अर्धा कप ओले खोबरे, बारीक वाटून
४) २ टेबलस्पून तूप
५) पाऊण कप साखर (चवीप्रमाणे कमी-जास्त)
६) वासासाठी वेलची / जायफळ / केशर>> हे साहित्य सेमच राहिलं पाहिजे. यात काहीही बदल होता कामा नये
हे माझे आकलन बरोबर आहे का?
हीच पाककृती इतकी मस्त आहे.
हीच पाककृती इतकी मस्त आहे.
बदल तर किती कल्पक असतील.
करनेवाले पटापटा करो हम वाट बघ रहे है.
नंदिनी +१ इथे बदलायचे घटक,
नंदिनी +१
इथे बदलायचे घटक, चणा डाळ आणि गाजर असल्याने पदार्थ गोडच अपेक्षित आहे ना?
धन्यवाद लोकहो.
धन्यवाद लोकहो. गणेशचतुर्थीपर्यंत अशाच काही निवडक पाककृती प्रकाशित केल्या जातील. तयारीसाठी वेळ थोडाच असल्याने सर्व एकदम प्रकाशित करू शकत नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत.
कारण बदलायच्या घटकात साखर नसल्याने ती घालावीच लागेल, प्रमाण न बदलता.
@नंदिनी, अगदी बरोबर. तसेच करायचे आहे.
@ शुभांगी,चवीवर बंधन नाही. गाजराऐवजी आमसूल वापरून तुम्ही नव्या चवीचा पदार्थ बनवू शकता.
छान आहे कृती. मी पण अशीच करुन
छान आहे कृती. मी पण अशीच करुन बघेन.
@नंदिनी, अगदी बरोबर. तसेच
@नंदिनी, अगदी बरोबर. तसेच करायचे आहे>>> प्रमाण कमी जास्त होऊ शकेल ना?
@नंदिनी, शक्यतो प्रमाण बदलू
@नंदिनी, शक्यतो प्रमाण बदलू नये अशी अपेक्षा आहे.
एक चमच्याचा दोन किंवा अर्धा चमचा करू शकता पण चमच्याचं प्रमाण वाटीत बदलू नका किंवा उलट.
संयोजक, बद्लायच्या घटकांचे
संयोजक, बद्लायच्या घटकांचे प्रमाणही बदलू शकतो ना? की गाजराऐवजी 'क्ष' वापरले तर ते गाजराइतकेच म्हणजे ३ कपच अपेक्षित आहे?
कृती बदलली तर चालेल की मूळ
कृती बदलली तर चालेल की मूळ कृती आहे तीच ठेवायची? उदा कुकरमध्येच डाळ शिजवायची वगैरे?
डाळी ऐवजी काहीही घेतलं तरी चालेल की त्याच गटातला घटक हवा? उदा डाळीच्या जागी केळं चालेल का?
उदा डाळीच्या जागी केळं चालेल
उदा डाळीच्या जागी केळं चालेल का?>>> वेळेला चालायला हवं!!!
संयोजक, नियम फार जाचक आहेत पण मस्त आहेत, अशावेळी क्रीएटीव्हीटीला चॅलेंज मिळतं. मस्त स्पर्धा.
भारी आहे.
भारी आहे.
करनेवाले पटापटा करो हम वाट बघ
करनेवाले पटापटा करो हम वाट बघ रहे है. +१००००००००
मस्तच आहे हे सगळे. आता पुढचे १५ दिवस सतत मायबोली एके मायबोली, मायबोली दुणे मायबोली हेच चालु राहणार आहे.
संयोजक कोण आहेत देव जाणे, पण नमनालाच हा असला देखणा पदार्थ बघितल्यावर एक नाव लाजो आहे की काय हा गोड संशय आला.
सुरेख आहे मूळ पाकृ ! फोटोही
सुरेख आहे मूळ पाकृ ! फोटोही मस्त.
मस्त! विचारचक्र सुरु झाले ...
मस्त! विचारचक्र सुरु झाले ... एक शंका डाळीच्या ऐवजीचा पदार्थ शिजवायलाच हवा का ?
ही पाकृ दिनेशदांची असणार
ही पाकृ दिनेशदांची असणार नक्की.
क्रमांक टाकून घटक पदार्थ देण्याची सवय त्यांचीच, आणि फोटो काढण्याची पद्धतही!
@आशिका, हो प्रमाण शक्यतो
@आशिका, हो प्रमाण शक्यतो तेवढंच हवं.
@मामी, बदलून कोणता पदार्थ घालावा यावर काहीही बंधन नाही. तसेच बदलून घालायचा पदार्थ कच्चा, चिरून, सोलून, वाळवून, कशाही प्रकारे शिजवून, भाजून, उकडून, गार करून कसाही घालू शकता. म्हणूनच पाणी हे अपवादात दिले आहे.
@मंजूताई, असे काही बंधन नाही.
मस्तंय स्पर्धेची कल्पना! आधी
मस्तंय स्पर्धेची कल्पना! आधी केले मग सांगितले असा बाणा दिसतोय! मजा येणारे..गणपती बाप्पा मोरया!
फार सुरेख दिसतायत त्या वड्या!
फार सुरेख दिसतायत त्या वड्या!
धन्यवाद संयोजक मस्त मजा येणार
धन्यवाद संयोजक
मस्त मजा येणार पाककृती करताना.
गणपती बाप्पा मोरया! सुरेखच!
गणपती बाप्पा मोरया!
सुरेखच!
एक शंका.....मूळ घटक- गाजर ईथे
एक शंका.....मूळ घटक- गाजर ईथे परतून घेतला आहे किंवा डाळ शिजवून घेतली आहे. त्याऐवजी जो घटक घेणार तो शिजवायची गरज नसेल तर?.....म्हणजे कुकरमध्ये शिजवणे-परतने या कृती बदली घटकाला लागू होत नसतील तर त्या वगळल्या किंवा बदलल्या तर चालेल का?
दोन्ही बदलायचे घटक कोणतेही
दोन्ही बदलायचे घटक कोणतेही असु शकतात की त्याच वर्गातले हवेत म्हणजे चणाडाळिएवजी कुठलिहि डाळच घ्यायची की दुसर काही चालेल..
काय सुरेख पाककृती आहे !
काय सुरेख पाककृती आहे ! अदलाबदल न करता अशीच्या अशी करुन बघावीशी वाटतेय +११
हीच पाककृती इतकी मस्त आहे.
बदल तर किती कल्पक असतील.<< +१
पाकृ दिनेश ह्यांनीच दिलेली
पाकृ दिनेश ह्यांनीच दिलेली दिसतेय. गोव्याच्या पाकृ ते देतात नाहीतर ममो देतात.
संयोजक,
हे अगदी असच हवे ना? बदलाचे प्रमाण सुद्धा तेच हवे ना?
गाजराएवजी दुसरे सुद्धा कंदमूळच हवे का? आणि ते सुद्धा त्याच प्रमाणाचे ३ कपच हवे? दुसरी कुठलीही डाळच हवी, त्याच प्रमाणाची. असे असेल तर बोरींग आहे मग...
जे बदलाचे घटक आहेत ते दुसरे हवे होते.
करायची पद्धत सुद्धा तीच का? म्हणजे शिजवून, वाटून?
बरोबर का?
@झंपी, बदलून कोणता पदार्थ
@झंपी, बदलून कोणता पदार्थ घालावा यावर काहीही बंधन नाही.
तसेच बदलून घालायचा पदार्थ कच्चा, चिरून, सोलून, वाळवून, कशाही प्रकारे शिजवून, भाजून, उकडून, गार करून कसाही घालू शकता. म्हणूनच पाणी हे अपवादात दिले आहे.
Pages