"परस्पर संबंध ओळखा" स्पर्धा क्रमांक २

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 02:10

स्पर्धेची रूपरेषा :
दर तीन दिवसांनंतर एक ह्या प्रमाणे कोडं दिलं जाईल.
पहिल्या दिवशी एक कोडं दिलं जाईल. स्पर्धकांनी आपले प्रतिसाद तिकडेच नोंदवायचे आहेत. दुसर्‍या दिवशी एक किंवा दोन क्लू दिले जातील. आणि तिसर्‍या दिवशी सकाळी त्या कोड्याचे विजेते जाहीर होतील. त्याच्या दुसर्‍या दिवशी नविन कोडं दिले जाईल.

स्पर्धेचे नियम :
१. दर तीन दिवसांनंतर एक ह्या प्रमाणे कोडं दिलं जाईल.
२. एका आयडीला दिवसभरात कितीही वेळा उत्तर देता येईल.
३. ज्यांनी सर्वांनी बरोबर उत्तर दिली असतील ते सगळे विजेते म्हणून घोषित केले जातील.

--------------------------------------------------------------------------------------
कोडं क्रमांक २ :

ही चारही चित्र कसली आहेत?? त्यात समानता काय?

quiz2_a.gifquiz2_b.jpgquiz2_c.gifquiz2_d.gif

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिले चित्र : Google Chrome च्या चिन्हाशी निगडित
दूसरे चित्र : Google's search technology PigeonRank
तिसरे चित्र : बहूतेक Google Chrome OS
चौथे चित्र : Google Site Logo..

उत्तर : Google आहे का ?

>>सर्व चित्रे Google PigeonRank Search Technology शी निगडीत आहे.

पूर्ण बरोबर नाही.
दुसरं आणि तिसरं चित्रं गुगलने वावड्या उठवल्या होत्या त्यांच आहे. त्यातलं फक्त दुसरं चित्र PigeonRank चं आहे (त्यांनी अशी घोषणा केली होती की ही एक नवीन प्रणाली असून त्यांत शिकाऊ कबुतरं काम करतात), तिसरं Google नेच चांद्रकार्यालय (Lunar Office) काढत असल्याची घोषणा केली होती (आणि नोकरभरती चालू केली) त्याचं.
पहिलं गूगलनेच केलेल्या एका एप्रिल फूलचं आहे (नाव नक्की आठवत नाही, थोडं गुगलावं लागेल :)). आणि शेवटचं मात्र गूगलच्या संकेतस्थळावर दिनविशेषाचं चित्र असावं... त्याचा संबंध कळला नाही.
म्हणजे संबंध गूगल असू शकेल. PigeonRank फक्त दुसर्‍या चित्राशी संबंधित आहे.

सगळी गूगलच्या संकेतस्थळावरची दिनविशेषाची चिन्हे आहेत.
पहिलं १ एप्रिलचं MentalPlex, दुसरं आणि तिसरं वर सांगितल्याप्रमाणे अनुक्रमे PigeonRank आणि Lunar Office. चौथं ४ जुलै किंवा नूतन वर्षाचं असावं .. पण त्यांतला O आणि g स्पष्ट दिसतोय त्यामुळे एका विशिष्ट शैलीत G o o g l e लिहिलेले आहे हे नक्की Happy

मला पहिले गूगल क्रोम चे वाटले... चौथे तर नववर्ष किंवा तत्सम काहितरी सेलिब्रेशन्स संबंधीच Google च्या संकेतस्थळावरती Google चे सुलेखन आहे..
क्ष.. धन्यवाद.. lunar office चा संदर्भ माहित नव्हता..

समानता म्हणजे गूगल
१ एप्रिल २००० = पहिले चित्र मेन्ट्लप्लेक्स
१ एप्रिल २००२ = दुसरे चित्र, क्ष नी सांगितल्याप्रमाणे
१ एप्रिल २००४ = तिसरे चित्र - गूगल कोपर्नीकस सेंटर, परत क्ष नी सांगितल्याप्रमाणे
गूगलनी हे चंद्रावरचे कार्यालय २००७ च्या स्प्रींग मध्ये सुरू करायचा वायदा केला होता, त्यात त्यांनी दुसर्‍या चित्रातील तंत्रज्ञान वापरून स्वर्गाचा शोध घ्यायची सोय केली होती.
१ जानेवारी २००७ - चौथे चित्र, हे चित्र संयोजकांनी कापले आहे. त्यातला G आणि E गायब केलाय

हे मला सगळं गूगलवरच सापडलं ....

वरील सर्व वाचून गूगल वर शोधाशोध केल्यावर वरचीच शन्कासूर, क्ष ह्यांनी लिहिलेली उत्तर मिळाली.
Happy

सलग दुसर्‍या कोड्याचीही हिंट न घेता उत्तर दिलय मायबोलीकरांनी!!! अभिनंदन!!

ट्ण्या आणि क्ष अभिनंदन!! केदार_जपान ह्यांनी सुरवातच बरोबर दिशेने केली.. त्यांचेही अभिनंदन!

कोडं क्रमांक २ चे उत्तर :

गूगल डूडल (doodle). http://www.google.com/holidaylogos.html
दिनविशेषानुसार गूगल त्यांच्या बोधचिन्हात बदल करते, अशा त्या दिवसापुरत्या बदललेल्या बोधचिन्हास गूगल डूडल म्हणतात.

चित्र १ : एप्रिल फूल, २००० चे गूगल डूडल. या दिवशी गूगलने शोधण्यासाठी मेंटलप्लेक्स तंत्रज्ञान आणले. या चित्राकडे बघत आपल्याला जे शोधायचे आहे त्याची कल्पना करायची - http://www.google.com/mentalplex/MP_faq.html
सूचना - http://www.google.com/mentalplex/MP_illustrations.html

चित्र २ : एप्रिल फूल, २००२ चे डूडल. या दिवशी गूगलने त्यांच्या अत्यंत प्रभावी सर्चयंत्रणेमागील तंत्रज्ञान जाहीर केले... पिजनरँक तंत्रज्ञान ! कमी किंमतीची पिजन क्लस्टर्स (PCs) वापरून सर्च वेगवान व अचूक केला जातो. माणसे आणि यंत्रे यापेक्षा कबुतरेच अधिक सक्षम ठरली - http://www.google.com/technology/pigeonrank.html

चित्र ३ : एप्रिल फूल, २००४ चे डूडल. गूगलने चंद्रावर शाखा उघडली आणि तिथे काम करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञांची भरती सुरू केली - http://www.google.com/jobs/lunar_job.html

चित्र ४ : १ जानेवारी, २००७ च्या डूडलचा भाग.