भाग ३२ - http://www.maayboli.com/node/54832
***************************************************
"सागर तसा मनाने वाईट नव्हता. पण थोडासा"
आणि फातिमा पुढे काही बोलण्यापूर्वी रफिक खोलीत आला. आणि फातिमा बोलायची थांबली.
"तू विसरलीस का ह्या खोलीत माईक बसवला आहे आणि इथे जे काही बोलले जाते ते मला सगळे ऐकू येते?" रफिकने फातिमाच्या जवळ जाऊन तिच्या दंडाला पकडले आणि क्रुद्ध आवाजात तो तिच्याबरोबर बोलू लागला. "खबरदार तू काही बोललीस तर. तुलासुद्धा सोडणार नाही मी."
"तुला ऐकू जाते हे मला माहित आहे. पण रफिक तूही हे विसरू नकोस, की तू मला काहीही करू शकत नाहीस. आणि सरीताला होय सरीतालाच सत्य कळणे महत्त्वाचे आहे. भीती वाटते का तुला तिची आणि इतरांची? हे जे काही झाले आहे आज त्याला तो जबाबदार आहेस आणि ह्या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्या हॉस्पिटलची बदनामी होण्यात होतो आहे."
"तुझं हॉस्पिटल? मी तुझ्या पाठीशी उभा रहिलो नसतो तर तू डॉक्टर तरी झाली असतीस का?"
"तुझ्यामुळे मी डॉक्टर झाले हे सत्य मी कधीच विसरणार नाही आणि त्याबद्दल मी तुझे नेहमीच आभार मानले आहेत. पण म्हणून दर वेळी तुझी चुकीची प्रत्येक गोष्ट मी आणि आम्ही सर्वांनी का ऐकावी? तुझ्याबरोबर लग्न करून देताना माझ्या अब्बूंनी माझं शिक्षण थांबवलं. तुलाही कमी शिकलेली बायको नको होती आणि मलाही शिकण्याची इच्छा होती म्हणून तू मला पुढे शिकू दिलस डॉक्टर होऊ दिलस. आणि त्याबदल्यात माझ्या भावांनी त्यांचं हे हॉस्पिटल तुला चालवायला दिलं पण त्यांची अट तू विसरलास की मला कोणत्याही बंधनांशिवाय काम करता यावे. पण तू काय केलेस तुझ्या मनाविरुद्ध काहीही झाले की तू माझे काम करणे बंद करायचास. सरीता इथे आल्यापासून मला हॉस्पिटलमध्ये जायची बंदी केलीस तू. कारण काय तर माझ्याशिवाय घरातले इतर कोणीही तुझे ऐकत नव्हते. कोणालाही सरीता इथे राहायला नको होती. तिच्याऐवजी आपल्या देशातल्या इतर कोणत्याही मुलीशी तू लग्न करावेस असे त्यांचे म्हणणे तू ऐकले नाहीस. आणि आज तुझ्या त्याच हट्टामुळे आपलं आर्थिक नुकसान झालं आणि हॉस्पिटलचं नावही बदनाम झालय. आणि तुझ्यासाठी हे हॉस्पिटल फक्त पैसे कमवायचा एक मार्ग आहे, इतर मार्गांसारखा एक मार्ग. पण माझ्यासाठी ते माझं स्वप्न आहे म्हणून मी ह्याला माझं हॉस्पिटल म्हणते."
"लक्षात ठेव. मी तुला काम करू देतो आहे म्हणून तू काम करू शकते आहेस. मी तुला घराबाहेर पाठवायचेही बंद करू शकतो. त्यामुळे माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोणालाही काहीही सांगायचं नाही. आणि तुला मी हॉस्पिटलमध्ये काम करायला दिलं म्हणजे काय तू सोबतच्या डॉक्टरांबरोबर गप्पा मारत बसशील? तुला सागरबरोबर कामाशिवाय काहीही बोलायचं काय कारण? ह्या वागण्यासाठी तुला मी तलाकसुद्धा देऊ शकतो."
"हो रफिक तू मला तलाक देऊ शकतोस. पण मला माहित आहे की तू मला तलाक देणार नाहीस. कारण तसं केलस तर तुला माहित आहे मी फक्त तलाकशुदा म्हटली जाईन आणि तू तुला मात्र सरीताला इथे अडकवून ठेवल्याबद्दल तुला तुरुंगात जावं लागेल ना. आणि त्याहून जास्त म्हणजे तुझ्याविरुद्ध मी कारस्थान करते किंवा तुझ्या अनुपस्थितीत मी परपुरुषांशी बोलते असा आरोप करून तू मला शिक्षाही करवू शकतोस. पण मी तसं कधी वागलेले नाहीच आहे आणि हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकते. कारण तू अनुपस्थित असलास तरी माझा भाऊ तिथे होताच. त्याच्या पुढ्यात मी सागरबरोबर बोलू शकते. त्यामुळे मी कुठेच अडकत नाही. अजूनही मला तलाक द्यायचा असेल तर चालेल मला."
"तू, तू तू मला धमकी देते आहेस का? तुला माहित नाही का मी काय काय करू शकतो?"
"मी धमकी देत नाही आहे फक्त तुला सत्य परिस्थितीची जाणीव करून देते आहे. आणि मला माहित आहे तू काय काय करू शकतोस. पण मला हेदेखील माहित आहे की तू काही करणार नाहीस. कारण त्यातच आपलं आपल्या व्यवसायचं हित आहे. हो ना?"
आणि फातिमाच्या ह्या शब्दांबरोबर खूप रागाने पण तरीही काही न बोलता रफिक गप्प बसला.
"तर सरीता, सागर मनाने वाईट नव्हता पण खूप साधा. रफिकबद्दल त्याला का माहित नाही पण विश्वास वाटत होता की जरी तू रफिकची मैत्रिण सुनीता हिच्यासारखी दिसत असलीस तरी तो त्याच्या खूप चांगल्या मित्राच्या बायकोकडे म्हणजे तुझ्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही. अर्थात त्यासोबत त्याला भीतीही होतीच की लग्नापूर्वी रफिकने तुझा फोटो पाहिला असता तर भारतात येऊन रफिक तुला पळवून नेईल. त्यामुळे सागरने तुझा फोटो फक्त मला आणि माझ्या भावाला दाखवला होता. पण त्याने मी दिलेल्या इशार्याकडे दुर्लक्ष केलं तो तुला इथे घेऊन आला. आणि रफिकने तुला पाहाताक्षणी ठरवलं की तुला घरी घेऊन यायचं. मी त्याला खूप समजावलं त्याने असं करू नये. शिवाय रफिकची अम्मी आणि अब्बू ह्यांनीही त्याला खूप समजावलं पण रफिक कोणाचच ऐकायला तयार नव्हता. मी त्याला साथ दिली नसती तर माझ्या मदतीशिवाय त्याने तुला पळवलं असतं. मग म्हणून मी त्याला साथ द्यायचं ठरवलं. आणि सागर तुमची जाण्याची तिकीटे काढतो आहे हे समजल्यावर रफिकने लगेचच दुसर्या दिवशी तुम्हाला इथे बोलावून सागरला धमकी देऊन पळवून लावलं."
म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. सागर निर्दोष होता. माझा सागर निर्दोष होता. आणि त्याला भारतात त्रास होऊ नये ह्यासाठी मी पाठवलेले पत्र हाही एक शहाणपणाचा निर्णय होता. मला इथे जरी त्रास होत असला तरी सागरला त्रास होऊ नये हा माझा विचारही योग्य होता.
आता फक्त प्रश्न होता माझा. माझं काय होणार. कोणी मला सोडवणार की रफिकच्याच इच्छेप्रमाणे माझं आयुष्य जाणार.
क्रमशः
पुढील भाग - http://www.maayboli.com/node/55743
वाँ..... नवीन भाग
वाँ..... नवीन भाग
क्रमशः नाही??
क्रमशः नाही??
इतका छोटा
इतका छोटा
इतका छोटा अरेरे >>>> + १११११,
इतका छोटा अरेरे >>>> + १११११, वेल संपली का कथा? तसा हा शेवट नाही वाटत.
आला आला नविन भाग आला
आला आला नविन भाग आला
आता अजुन ६ महिन्यानि नविन भाग
आता अजुन ६ महिन्यानि नविन भाग वाचायला मिलेल.
कुणीतरी गेल्या ३३ भागांचा
कुणीतरी गेल्या ३३ भागांचा सारांश लिहेल का? नक्की काय चालू आहे ते समजण्यापलिकडे गेलेलं आहे. (माझी कमकुवत स्मरणशक्ती) त्या हॉस्पिटलचं काहीतरी सोनोग्राफी मशीन आणि ती जेनी उर्फ हनुमान का कोणतरी त्यांचं काय झालंय? सरिताच्या प्रेग्नन्सी आणि अॅबॉर्शनचं काय झालंय? परत कथा आता रफिकने सरिताला का पळवलं याच अदावर कशी काय आली आहे?
अजून किती भाग शिल्लक आहेत? मागे कुठेतरी वेलताईंनी लिहिलं होतं की कागदांवर कथा लिहून झालेली आहे पण टाईप करायची आहे. कृपया ते कागद मला पाठवाल का? मी टाईप करून देऊ शकेन पण आता संपवा लवकर.
वेल कशा आहात तुम्हि ? हा भाग
वेल कशा आहात तुम्हि ?
हा भाग पन छान, पन खुपच छोटा झाला.
वेल, आपले मनःपूर्वक धन्यवाद!
वेल, आपले मनःपूर्वक धन्यवाद! आपली तब्येत ठीक नसतानाही आपण या कथेवर काम करून वाचकांच्या विनंतीचा मान राखलात!!
वेल.. क्रमशः लिहायचे राहिले
वेल.. क्रमशः लिहायचे राहिले आहे का? मोठा भाग टाका ना.
नंदिनी जेनी उर्फ हनुमान
नंदिनी
जेनी उर्फ हनुमान ???????? नवीन काय आता हे?
कृपया ते कागद मला पाठवाल का? मी टाईप करून देऊ शकेन पण आता संपवा लवकर.............काय सांगु डोळ्यात पाणी आणलत तुम्ही...
आपले मनःपूर्वक धन्यवाद! आपली
आपले मनःपूर्वक धन्यवाद! आपली तब्येत ठीक नसतानाही आपण या कथेवर काम करून वाचकांच्या विनंतीचा मान राखलात!!>> +१
छान आहे हा पण भाग....
वल्लरीताई, मला तो कागद खरच
वल्लरीताई, मला तो कागद खरच पाठवुन द्या माझा ईमेल पत्ता तर प्रोफाईलमध्येच आहे मी अगदी १०-१५ मिनिटात टाईप करुन परत पाठवुन देईन म्हणजे कॉपी पेस्ट करुन तात्काळ कथा टाकता येईल अन सर्वच अगदी मोकळे होतील रागाऊ नका चुकलो असेन तर क्षमस्व..
--
--
मनु ७७१ जेनी ऊर्फ हनुमान हा
मनु ७७१
जेनी ऊर्फ हनुमान हा बहुतेक आधुनिक सितेला मदत करायला आलेली असते. (तेवढे आठवत नाहीये)
"आय अॅम जेनी. देब बासूज गर्लफ्रेंड. आय अॅम हिअर फॉर यु." फातिमाच्या हॉस्पीटलमधील नर्स
डॉ. उज्ज्वला दळवी यांचं
डॉ. उज्ज्वला दळवी यांचं सोन्याच्या धुराचे ठसके हे पुस्तक मी नुकतच थोडे दिवसांपुर्वी वाचलं
ही कथा सौदी वा तत्सम देशात घडत आहे असा अंदाज.. खरतर पहिल्या वाचुन वाचत होते मजा येत होती पण कथा बरेच दिवस रखडल्याने आठवत नाहिये..
तर त्या पुस्तकात लिहिलेल त्या प्रदेशातील वर्णन वाचलं आणि हा लेख वाचला तर खरच खुपच फरक आहे..
तिथले लोक त्यांच्या पद्धती खुप वेगळ्या आहेत..
आपण आपल्या देशात असलेल्या त्या मानाने स्वतंत्र जीवन पद्ध्ती मुळे विचार ही करु शकत नाही की असे कुठे होउ ही शकते ... पण वरच्या कथेतील पात्र ही भारतातील्च असावित पण थोडी बॅकवर्ड भागातील/ जुन्या विचाराची असावित असे वाटते..
आपण चांगल लिहित आहात पण त्या त्या भागाबद्दल पुर्ण माहिती करुन घ्या असे वाटते ..
किंवा प्रदेशाच नाव काल्पनिक द्या आणि कल्पना विस्तार करा..
असो ही माझी स्वतःची मते ..
आपणाला लेखनासाठी शुभेच्छा..
परत वाचलं .. फारच विस्कळित आहे सगळं ..
पण जर खोलीत माईक असेल आणि
पण जर खोलीत माईक असेल आणि फातिमा काय बोलते ते रफिक ऐकू शकत असेल,
तर जेनी काय बोलली ते पण त्याने ऐकलं असेल का??????????
पण जर खोलीत माईक असेल आणि
पण जर खोलीत माईक असेल आणि फातिमा काय बोलते ते रफिक ऐकू शकत असेल,
तर जेनी काय बोलली ते पण त्याने ऐकलं असेल का?????????? >>> माझ्याही मनात अगदी हाच विचार आला पण म्हंटलं जाऊ दे..खूप दिवसांनी नवीन भाग आला आहे...गोड मानून घेतला....
तर जेनी काय बोलली ते पण
तर जेनी काय बोलली ते पण त्याने ऐकलं असेल का?????????? ऐकलं ना आणि जेनीला टपकवलपण म्हणुन तर जेनी गायबलीय ना. ह.घ्या.
@ निल्सन -
@ निल्सन -
पण जर खोलीत माईक असेल आणि
पण जर खोलीत माईक असेल आणि फातिमा काय बोलते ते रफिक ऐकू शकत असेल,
तर जेनी काय बोलली ते पण त्याने ऐकलं असेल का??????????>>> जेनी हॉस्पिटल मधे होती... आता ते घरी आले ना? घरच्या खोलीत माईक आहे...
खरंच मागचे भाग विसरलेय वाटतं मी ...
घरी कुठे ??? >>>> त्या
घरी कुठे ???
>>>> त्या मिटिंगमधून बाहेर आल्यावर मला बाहेर जेनी भेटली. तिने मला पुन्हा एकदा हॉस्पिटलच्याच खोलीत नेले. परंतु ती माझ्याबरोबर काहीच बोलली नाही. खोलीत माझ्या आणि तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. बर्याच वेळाने रफिक आणि फातिमा एकत्र माझ्या खोलीत आले. मला तर रफिकचे तोंड पाहाण्याचीही इच्छा नव्हती. मी फातिमालाच विचारले, "काय झाले?" <<<<<<
अजून हॉस्पिटल मधेच आहे ना??
ह्म्म्म.... मग निल्सनचं बरोबर
ह्म्म्म.... मग निल्सनचं बरोबर
कृपया ते कागद मला पाठवाल का?
कृपया ते कागद मला पाठवाल का? मी टाईप करून देऊ शकेन पण आता संपवा लवकर.............छान
छान झालाय हा भागही.
छान झालाय हा भागही. पु.भा.प्र.
मलाही हा भाग जरा विस्कळित
मलाही हा भाग जरा विस्कळित वाटला....मागचे संदर्भ ह्या भागात सापडत नाहियेत..
मला अंदाज आहे की बर्याच
मला अंदाज आहे की बर्याच काळाने हा भाग आला असल्याने लिंक तुटल्यासारखे झाले आहे. हा भागही क्रमशः आहे.
*************************
जेनीचा रेफरन्स -
http://www.maayboli.com/node/52689
रात्रीच जेवण झालं आणि फातिमा तिथे आली. खूप थकल्यासारखी दिसत होती. खूप टेन्शनमध्येदेखील वाटत होती. तिने जेनीला बाहेर जाण्यास सांगितले. ह्याचाच अर्थ तिला माझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे होते.
वरील वाक्यानंतर जेनीचा कुठेही उल्लेख नाही ह्याचा अर्थ सरळ आहे की तिला त्या खोलीपासून लांब ठेवले आहे.
शिवाय जेनी आणि सरीताचे कोणतेही संभाषण मोठ्या आवाजात नाही जे माईकद्वारे कोणाला ऐकू जाणार नाही.
********************
ही कथा केवळ चार भिंतीत घडते आहे. त्यात सौदी देशाबद्दल तेथील लोकांच्या वागण्याबद्दल कोणतीही माहिती नाही. सौदी ह्या देशात राहणारे काही पुरोगामी लोक चार भिंतींच्या आत पुरोगामी वागण्याचे धाडस दाखवतात. ही त्या देशात राहिलेल्या काही मित्रमंडळींनी दिलेली माहिती.
***********************
आनंदी - मी नक्कीच वाचेन ते पुस्तक आणि त्या पार्श्वभूमीवर माझ्या कथेत कोणते बदल हवे होते त्याचा अभ्यास करेन.
********************
मी ह्या कथेचे कथाबीज आणि प्रत्येक टप्प्यातली कथेची डेव्हलपमेण्ट एवढेच कागदावर लिहिले आहे. कथेतले संवाद पात्रांच्या भावभावना ह्या, कथा मायबोलीवर लिहितानाच लिहिले जातात. कथा रेंगाळत ठेवून वाचकांचा विरस केल्याबद्दल क्षमस्व.
कृपया ते कागद मला पाठवाल का?
कृपया ते कागद मला पाठवाल का? मी टाईप करून देऊ शकेन पण आता संपवा लवकर.............काय सांगु डोळ्यात पाणी आणलत तुम्ही....>>>>>>>>> मी तर ढाय ढाय रडले .....ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी संपव गं आता .
वेल ताई, विनंती आहे की कथा
वेल ताई, विनंती आहे की कथा आता शेवटाकडे आहे तेंव्हा ती लवकर संपवावी अजुन विरस टाळण्यासाठी
विकास दादा... आभारी आहे.
विकास दादा... आभारी आहे.
Pages