घुसमट

Submitted by भागवत on 3 September, 2015 - 01:16

आज परत तीच भूमिका साकारून टीव्ही मालिकेची त्रासदायक कामाची शिफ्ट संपवून नितीन घरी आला. नितीन ही भूमिका बऱ्याच दिवसांपासून निभावतोय. आत्ता नितीन या क्षेत्रात स्थिरावला. त्याला जुने दिवस आठवले. नितीनला कलाकार होण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला. एक छोट्याश्या गावातून तो मुंबईत मोठी होण्याची स्वप्नं घेऊन आला होता. शिरीष या मित्राच्या खोलीत त्याने तात्पुरते बस्तान बसविले. छोटी - छोटी कामे करून तो फिल्म सिटी मधे काम शोधायचा. त्यासाठी त्याला फिल्म प्रोड्यूसर अणि डायरेक्टर कड़े भरपूर चकरा माराव्या लागल्या.

शेवटी त्याला पोलीस इन्स्पेक्टरचा छोटा रोल टीव्ही मालिकेत भेटला. आणि त्याने जीव ओतून अभिनय केला. आता पर्यंत मित्राच्या आणि घरच्या तुटपुंज्या पैशावर पोटापाण्याचे चालले होते. पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी बऱ्यापैकी पैसे भेटले. त्यामुळे खर्चाचा प्रश्न सुटला. त्यानंतर त्याला छोट्या-छोट्या भूमिका मिळत गेल्या. पैसे येत राहिले. आर्थिक गरज भागवण्यासाठी या भूमिका नितीनला कराव्या लागल्या.

नितीनची शरीरयष्टी पोलीस इन्स्पेक्टर या कामासाठी एकदम फिट होती. त्याचा पोलीस इन्स्पेक्टर रोल एकदम हिट झाला. त्याला मग हळूहळू दूसरे रोल भेटत गेले. पण त्याचे दूसरे रोल काही हिट नाही झाले. सगळी कास्टिंग डायरेक्टर त्याला पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी विचारत असत. घरचे आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी त्याला तीच भूमिका करावी लागे. आता हा रोल एकदम व्यवस्थित आणि रूँटीन काम असल्या मुळे एक प्रकारची प्रगल्भता आली होती. सतत एकच काम केल्यामुळे माणूस त्या कामात काही विशेष मेहनती शिवाय प्राविण्य मिळवतो. आता प्रावीण्य असल्यामुळे नितीनला टीव्हीचे बरेच अवॉर्ड सुद्धा मिळाले आणि त्यामुळे लोकांची वाहवा मिळाली. त्याला एका फ़िल्म डायरेक्टर कडून त्याच भूमिकेसाठी ऑफर आली आणि त्याने ती स्वीकारली. आता तर नितीनला भरपूर पैसे आणि प्रसिद्धी सुद्धा लाभली.

योगायोगाने नितीनची एक फिल्म हिट झाल्यावर पार्टी एन्जॉय करत असताना कांचनशी भेट झाली. बघताच क्षणी नितीनला ती आवडली. कांचनला पहिल्या भेटीत नितीनमध्ये काही विशेष वाटले नाही. पण दोघांच्या भेटी वाढल्या तशी कांचन नितीन मध्ये गुंतत गेली. कांचनला नितीनचा दिलखुलास आणि सच्चा स्वभाव आवडला. दोन वर्ष एकत्र फिरल्या नंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. यथावश त्यांचे लग्न झाले. नव्याचे नऊ दिवस संपले. संसार जसा पुढे सरकत होता तशी नितीनवर जबाबदारी वाढत होती.

पण नितीन आता पुरता या चक्रात अडकला. नवीन जबाबदारी, तेच काम, कमी-जास्त पैसे, आणि न संपणाऱ्या घरच्या मागण्या. त्याला या सगळ्याची काही काळजी किंवा फिकीर नव्हती फक्त त्याला मिळणारे एकाच प्रकारचे काम सोडून. नितीनला आता एकसारख्याच भूमिका मिळत असत. त्याला दुसर्‍या मनासारख्या भूमिका अभिनय करण्यासाठी मिळाल्या नाहीत. यामुळे त्याची सारखी घुसमट व्हायला लागली. प्रत्येक कलाकाराला आपल्या अभिनयाने सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायच्या असतात. कलाकाराला फक्त एक भूमिकेत अडकून पडायचे नसते. हे त्याला काही दुसर्‍या समोर सिद्ध करायचे नसते. फक्त नवीन भूमिका त्याला निभावून कलेचा आस्वाद घ्यायचा आणि प्रेक्षकाला द्यायचा असतो.

आता नितीनला एकच भूमिकेचा कंटाळा आला होता. एकच रोल करून त्याचा चिडचिडेपणा वाढला होता. पैसे तर भरपूर मिळतात पण त्याला त्याचा आतला कलाकार ओरडून सांगतोय, की मनाला समाधान देणारी भूमिका कधी करणार? कांचनला नितीनची तगमग समजत होती. तिला माहीत होते, फक्त गल्लाभरु फ़िल्म करून अशा कलाकाराचे पोट भरत नसते. कलाकाराला उत्कट अभिनय करून आणि प्रेक्षकांना अभिनयाच्या भाषेतून त्यांच्याच जाणि‍वा त्यांना पोहचवायच्या असतात. त्यांच्यातच कलाकाराला आनंद भेटतो. नितीनला सुद्धा या भावना त्याचे अंतर्मन ओरडून सांगत होत. कलाकाराला पैसे आणि प्रसिद्धी भेटून आनंद मिळत नसतो तर तो उत्तुंग अभिनय करून त्याला मनाचे समाधान मिळवायचे असते.

शेवटी नितीनला अंतर्मनाने कौल दिला आणि कांचनने साथ दिली. त्याने अभिनय क्षेत्रातून काही काळ 2-3 वर्षासाठी विराम घेतला. काही काळ ब्रेक घेणं अवघड गेलं. पण मनाची तयारी आणि कांचनची साथ असल्यामुळे त्याने हे आर्थिक संकट निभावून नेलं. शिरीष आणि दुसऱ्या मित्राचे मार्गदर्शन आणि नितीनची मेहनत यानी रंगत आणली. एक नवोदित डायरेक्टर रंगभूमी वर नवीन नाटक बसवणार आहे असे नितीनला समजले. नितीनने एक ही पैसा न घेता रोलची मागणी केली. खुपच विनंती केल्या नंतर त्याला भेटण्यासाठी बोलावण्यात आले. त्याने प्रचंड मेहनत केल्या मुळे ऑडिशन चांगली झाली. त्याला नवीन भूमिका मिळाली आणि नितीनने या संधीचे सोने केले. नंतर रंगभूमी वर नितीनने भरपूर वेगवेगळ्या भूमिका केल्या. काही चालल्या, काही भूमिकेला विशेष पुरस्कार नाही भेटला. पण नितीन रंगभूमीच्या प्रेमात पडला. त्याने रंगभूमी गाजवली. मग त्याचे दमदार पुनरागमन झाले चित्रपटाच्या दुनियेमधे! आणि परत त्याला पोलीस इन्स्पेक्टर रोल करायची गरज पडली नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम कथाबीज आहे. असे आटोपते न घेता ते व्यवस्थीत फुलवा.+१०
काही व्याकरणाच्या चुका आहेत त्या कृपया सुधारा. कथेत क्रमश: असेल असं वाटत होतं सुरुवातीला.
पुलेशु.

धन्यवाद् मुग्धा केदार!!!
व्याकरणाच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.