एका माणसाचे डोके केव्हढे मोठे सांगू काय ? सांगू काय ? सांगू काय ? सांगू काय ?
एव्हढे मोठे ? तेव्हढे मोठे ? केव्हढे मोठे ? असेल मोठे.. पण त्याचा इथे संबंध काय ?
तेच तर आम्ही तुम्हाला सांगतोय, परस्पर संबंध ओळखा. कोणा कोणातला परस्पर संबंध म्हणता ? इथे बघा आणि डोक्याला कल्हई सुरु करा !!!
--------------------------------------------------------------------------------------
स्पर्धेची रूपरेषा :
दर तीन दिवसांनंतर एक ह्याप्रमाणे कोडं दिलं जाईल.
पहिल्या दिवशी एक कोडं दिलं जाईल. स्पर्धकांनी आपले प्रतिसाद तिकडेच नोंदवायचे आहेत. दुसर्या दिवशी एक किंवा दोन क्लू दिले जातील. आणि तिसर्या दिवशी सकाळी त्या कोड्याचे विजेते जाहीर होतील. त्याच्या दुसर्या दिवशी नविन कोडं दिले जाईल.
स्पर्धेचे नियम :
१. दर तीन दिवसांनंतर एक ह्या प्रमाणे कोडं दिलं जाईल.
२. एका आयडीला दिवसभरात कितीही वेळा उत्तर देता येईल.
३. ज्यांनी सर्वांनी बरोबर उत्तर दिली असतील ते सगळे विजेते म्हणून घोषित केले जातील.
--------------------------------------------------------------------------------------
कोडं क्रमांक १ :
ह्या तीनही चित्रांमधे समान धागा काय?
पंचमहाभूतं... वारा?
पंचमहाभूतं... वारा?
तिनही खूणा आहेत (साईन्स) व
तिनही खूणा आहेत (साईन्स) व त्या "सुनिश्चित कृती सन्दर्भात जसे की खेळासन्दर्भातल्या" आहेत
अन यातली एकही खूण भारतात तयार झालेली नाही
अन यातली एकही खूण मी वापरलेली वा आधी पाहिलेली नाही
याशिवाय, वरील पन्चमहाभुतान्चे चित्रण हे उत्तर देखिल बरोबर वाटते आहे
"मनुष्य आणि पन्चमहाभुते"
माझ्या मते हे तिनही ग्रिस
माझ्या मते हे तिनही ग्रिस वगैरे देशातील खेळाच्या संदर्भातील चिन्ह आहेत. तिन्ही चित्रांमधे तो युवक (किंवा युवती, मध्य्म वयीन पुरुष किंवा स्त्री सुद्धा असेल....) हात पसरून उभा आहे.
ही २०१० मध्ये होणार्या
ही २०१० मध्ये होणार्या वेगवेगळ्या ऑलिम्पिक खेळांची चिन्हे आहेत. पहिले सिंगापूरचे यूथ ऑलिम्पिक, दुसरे व्हॅनकूवरचे विन्टर ऑलिम्पिक आणि तिसरे व्हॅनकूवरच्याच पॅरालिम्पिकचे चिन्ह आहे.
क्ष ला अनुमोदन !
क्ष ला अनुमोदन !
क्ष, अगदी बरोबर उत्तर!!! आणि
क्ष, अगदी बरोबर उत्तर!!! आणि ते पण क्लू शिवाय!!
हार्दिक अभिनंदन!
महागुरू ह्यांचे ही अभिनंदन!
तर लोकहो, ही घ्या कोड्याच्या उत्तराविषयी माहिती :
उत्तर : ऑलिंपिक स्पर्धा / ऑलिंपिक स्पर्धांची बोधचिन्हे
चित्र १ - सिंगापूरला २०१० मध्ये होणार्या पहिल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेचे बोधचिन्ह.
चित्र २ - व्हँकूव्हरला २०१० मध्ये होणार्या हिवाळी ऑलिंपिकचे बोधचिन्ह ज्यावरून घेतले आहे तो इलानाक (ilanaaq) (= मित्र, इनुक्टिटुट भाषेत) नावाचा इनंग्वाक (inunnguaq) ( = इन्युइट वगैरे आर्क्टिक भागातील लोकांनी उभारलेली मानवी आकाराची दगडी रचना. या रचना कॅनडा, अलास्का वगैरे भागांत आढळतात.)
चित्र ३ - व्हँकूव्हरला २०१० मध्ये होणार्या अपंग ऑलिंपिकचे बोधचिन्ह.
आता पुढचे कोडे उद्या देण्यात येइल.