नांदा सौख्य भरे

Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34

२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही Sad
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

hqdefault.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिर्विणीचे बाबा मनोहर पर्रीकरांसारखे दिसतात, अरे वा. केसांमुळे असेल. चेहेरा नाही वाटत. पण काम चांगलं केलं असणार त्यांनी.

त्या टायटल साँगचा भन्नाट डान्स पाहून मला ती बया साऊथ इंडीयन आणि तो बाप्या मराठी असा बीबीशीआयला जीआयपीचा डबा जोडला असावा अशी भलतीच शंका आली.

आणखीन एक अगम्य छळवाद सुरु झालाय. घरचे विशेषतः साबा भक्तीभावाने बघतात Sad

नायिकेचे बाबा मनोहर पर्रीकरांसारखे दिसतात > हो, अगदी सेम दिसतात.
पण ती हिरॉईनची काकू घरातले सगळे व्यवस्थित बोलत असतानाही एवढे हातवारे करून का बोलते?
त्या हिरोचे बाबा, त्यांच कॅरॅक्टर बिलकूलच नाही आवडलं.. किती इरिटेटिंग आहे ही सीरियल, मी एकच एपिसोड पाहिलाय थोडा थोडा, पण आता परत त्या गावाला नाही जाणार बाबा.. आधीच लाईफमध्ये काय कमी टेन्शन्स असतात?:राग:

मला एक कळत नाही आहे, मुलगा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम होण्या आधीच लग्न ठरल्यात जमा असल्यसारखे का वागतात ? ईथे ही आणि त्या होसुमीत्याघ मधे सुद्धा. 'यादि पे शादी' सारखा प्रकार करायचा आहे का? संपदाच एक ठिक आहे, प्रेम विवाह ठरवुन करत आहेत. पण स्वानंदीचं काय? मारे ती त्या हिरोला म्हणाली असेल कि 'मी न बघताच होकार देणार आहे बघायला येणार्या मुलाला' पण म्हनुन काय फोटो बघावासा वाटणार नाही? :रागः

बाकि त्या हिरोच्या आई बद्दल तर न बोललेलंच बर.

नायिकेचे बाबा मनोहर पर्रीकरांसारखे >>> योगेश सोमण आहे ना तो? थिएटर वाला माणूस आहे. बाकी 'दिल्या घरी तू सुखी रहा' नावाच्या मलिकेत पण होता की! Happy

हो rmd योगेश सोमण. थिएटरमध्ये खूप काम आहे त्याचं. उत्तम एकांकिका, नाटकं लिहिली आहेत त्यांनी.

अभिनय पण चांगला करतात, काही चांगली नाटकं पण दिग्दर्शित केली आहेत. त्यांना फार सिरीयल करायला नाही आवडत सो अधूनमधून करतात. मला हे सर्व माहितेय कारण ते माझे भाचे-जावई आहेत Happy .

अन्जू, येस Happy मला फिरोदिया/पुरूषोत्तम साठी एकांकिका करायचा तो तेव्हापासून माहिती आहे. एकच शहर! Happy शिवाय कथाकथी मधे माझा एक मित्र काम करायचा त्याच्याबरोबर. असो. आता धाग्याचा मूळ विषय बाजूला नको पडायला म्हणून इथेच थांबते.

पार्किंगमध्ये माणसाला उभा करायचाच होता, तर मग पे अ‍ॅण्ड पार्क मध्ये कशाला? सरळ रस्त्यावर माणूस गाडीबाजूला असेल तर गाडी टो करत नाहीत. Proud कोणी बघतंय का ही मालिका?

श्री,आदित्य, जयपेक्षा मला इंद्रनील जास्त आवडला. मी पंखा आहे त्याची.>>>
मला पण . जाम क्यूट आहे तो !

श्री,आदित्य, जयपेक्षा मला इंद्रनील जास्त आवडला. मी पंखा आहे त्याची.>>>
>>
आदित्यला काढा रे या लिस्ट मधून.
बिचारा खरच हॅण्डसम अणि गोड आहे

श्री,आदित्य, जयपेक्षा मला इंद्रनील जास्त आवडला. मी पंखा आहे त्याची.>>>
>>
आदित्यला काढा रे या लिस्ट मधून.
बिचारा खरच हॅण्डसम अणि गोड आहे >>>>>>

श्री आणि जयपेक्षा मला इंद्रनील जास्त आवडला. मी पंखा आहे त्याची . घे काढला .
पण खरं आहे रीया.पुण्याला गेल्यापासून जरा जास्तच आवडायला लागलाय तो Wink

हिरवीण एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशाच्या बहीणीच्या रोल मधे होती...
हिरवीनी पेक्शा बाकीचे characters dominant वाटत आहेत...

स्वानंदीची काकू असे हातवारे/खाणाखुणा करून का बोलते? उदा: फोन आला होता सांगताना हाताने फोनची खूण किंवा चेहर्‍यावरचा रंग म्हणताना एकदम ते कथक का भरतनाट्यममधे करतात तसा हात गोल फिरवते चेहर्‍यावरून.

पण मला वर्षा दान्दळेचे ( वच्छी आत्या) काम नेहेमीच फार आवडते. अगदी सहज अभिनय करते ती. कुठेही फिट होते. सुहास परान्जपे तर आधीपासुनच आवडती आहे.

मला पण वच्छी आत्या फार आवडते .
अगोदर राग यायचा तिचा , पण आता ललितावर सूड उगवण्यासाठी ती जे जे काही करते ते पटतं.
मागे कधीतरी एक्दा म्हणते ही , की मी माझ्या स्वार्थासाठी ललितेवर सूड उगवण्यासाठी हे लग्न लावून देतेय , पण नील आणि स्वान्न्दी प्रेमात पडलेय , त्याना एकत्र आणल्यामुळे माझे थोडे पाप कमी होतय .
रच्याकने , वत्सला नाव आहे तिच सिरेलमध्ये .

Dhurt, rajkarani, kawebaj Aai, Khota dhanda karnare Vadil & Bhau, Shrimanti cha khota badejav, Aai la prachand ghabarnari Bhavjay, kawadi kimmat nasleli thorali Kaku ya asha vatavarnat rahato na Nil? Tyala aaj var ekahi goshti baddal sugava lagne soda, sadha sanshay pan aala nahiye? Vishwas thevayala thode kathin vatatey.......

rmd
तुमची कॉमेंट वाचल्यावर ऋग्वेदी बाईंचा अभिनय (?) नीट बघितला.
बहुतेक वाक्यांची सुरवात...........'नाही म्हणजे......
दोन वाजले.......म्हणताना बोटानी २ ची खूण
'जेवतानाही लक्ष नव्हतं तुमचं ' म्हणताना परत एकदा जेवायची अ‍ॅक्शन....
फोनवर नमस्कार करताना पुन्हा एकदा मनोभावे नमस्कार
'तुम्ही येतायना यादी घेऊन .........की लगेच येण्याची आणि यादी लिहीण्याची खूण.......
एवढच नाही तर ललिताबाईंचा ताप दाखवायला गळ्याशी हात.......
कोणत्या अभिनय शाळेत शिकली म्हणे ही..........
या व्यक्तीरेखेसाठी खास लकब म्हणून करत असेल तर ठीक आहे.

या व्यक्तीरेखेसाठी खास लकब म्हणून करत असेल तर ठीक आहे.>>
हो तसेच आहे ते. नाहीतर इतर सिरियल्समध्ये असे हातवारे नाही करत ती. छान करते अॅक्टींग.

हो तिला तसंच करायला सांगितलं आहे. परवा चला हवा येऊद्या मधे सांगितलं तिने, तिला निलेशने एक वाक्य नॉर्मल म्हण आणि तेच भुमिकेत शिरुन म्हणायला सांगितलं. तिने करुन दाखवलं.

Pages