Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34
२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रुग्वेदी हिरवीणेची आई आहे का
रुग्वेदी हिरवीणेची आई आहे का ? का हिरवीणीच्या त्या २ काकू आहेत आणि तिची आई नाहीये ? मग स्टोरी जरा शुभंकरोती सारखी होईल.
अजुन तरी नीटसा अंदाज येत
अजुन तरी नीटसा अंदाज येत नाही. पण सर्वांना निरूत्तर करणारी हुशार नायिका.
कधी खोटं बोलत नसल्याचा चुणूकपणा दाखवला पहिल्याच भागात.
आई उमा गोखले आहे आणि काकु
आई उमा गोखले आहे आणि काकु ऋग्वेदी आहे.
कुलवधू + शुभम करोति ( तेच ते
कुलवधू + शुभम करोति ( तेच ते एकत्र कुटुंब, भाबडी, प्रेमळ, तर्हेवाईक, फटकळ सर्वांचे एकेक प्रतिनिधी जावा-जावा - चुलत भावांमधे प्रेम, विनोदासाठी एक आजी ), अशाच कुटुम्बाला शोभणारं घर! काही नाविन्य नाही .
काका आहे विजय पटवर्धन.
काका आहे विजय पटवर्धन. नेहेमीप्रमाणे नायिका सगळ्यान्चे मन जिन्कणारी, हुश्शार, सासर-माहेर दोन्ही आघाडीन्वर यशस्वी. थोडक्यात काय तर ही नायिका तशी सोशिक असेल तर घरात साबा आणी साबुन्चे टोमणे-टुचके, शालजोडीतले ऐकायला सज्ज व्हा. हो आणी तुमची बरोबरी पण तिच्याबरोबर होऊ शकते हे ध्येनात ठेवा.
ह्म्म उमा गोखले बर्याचं
ह्म्म उमा गोखले बर्याचं दिवसांनी दिसल्या, त्यांची एक सिरियल आठवत्ये कोणाला - सुनील बर्वे होता, कुलवधूची नायिका होती - रिमझिम किंवा असचं नाव होतं - शामली नाव असतं एका मुलीचं -
(धागा चुकलायं खरतरं)
रश्मी, माझ्याकडे नाही होणार
रश्मी, माझ्याकडे नाही होणार हे सगळं.
कारण मी ही तश्शीच सगळ्यान्चे मन जिन्कणारी, हुश्शार, सासर-माहेर दोन्ही आघाडीन्वर यशस्वी आणि सोशिक आहे असं नाही.
पण साबु साबां ना पटत नाही हे सगळं. म्हणजे हे इतकं कुणी हे नसतं इतकी जाणीव आहे त्यांनाही. तरी भक्तीभावे बघतात. नावं ठेवत ठेवत. 
समित यु आर सो लक्की. आणी असच
समित यु आर सो लक्की.:स्मित: आणी असच असू दे.
२० जुलै पासून म्हणजे काल
२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे<<< बापरे !!!
प्राजक्ता_शिरीन > हो . मृणाल
प्राजक्ता_शिरीन > हो . मृणाल कुलकर्णी , श्रीरंग गोडबोले पण होते त्यात. रिमझिम असच नाव होतं बहुतेक त्याच.
उमा गोखले बर्याचं दिवसांनी दिसल्या > एका लग्नाची तिसरी गोष्ट मधे होत्या ना .
अतिउत्साही+सदाहसमुख्+खोटं
अतिउत्साही+सदाहसमुख्+खोटं कधीही न बोलणारी+सगळ्या कामात तत्पर्+सोशिक्+कुणी डोक्यात दगड घातली तरीही उ सुध्धा करणार नाहीअशी+नेहमी सजधजके टशन मे+ सगळ्याच्या त्रासाचा दु:खाचा प्रॉब्लेम्सचा भार आपलाच आहे असं मनोमन वाटणारी+ते प्रॉब्लेम सोडवणारी ईईईईईई = झी ची नायिका
तरी अजुन काहीतरी नक्कीच राहिलं असेल.
एलतिगो मी नाही बघितलं , मॄणाल
एलतिगो मी नाही बघितलं , मॄणाल पण होती आणि पूर्वा गोखलेचा भाऊ तुषार दळवी होता का ? ती त्याला घाबरत असते असं काहीतरी होतं.
सॉरी दक्षिणा तुझ्या धाग्यावर वेगळीचं चर्चा करतोयं.
थोड अवांतर, पण 'हिरवीण'
थोड अवांतर, पण 'हिरवीण' म्हणजे?
हिरॉईन
हिरॉईन
ओह्ह
ओह्ह
प्रशु, तुम्हाला काय अर्थ
प्रशु, तुम्हाला काय अर्थ लागला होता?
लोल, आय थॉट प्रेग्नंट लेडी
लोल,
आय थॉट प्रेग्नंट लेडी
प्रशु
प्रशु
किती वैताग आहे , पहिला भाग
किती वैताग आहे , पहिला भाग पाहिला .
अति गुणी मुलगी - मोठ्या बहिणीचीही काम करून देणारी .
पहले आप - पहले आप वाल्या २ जावा , विनोद निर्मितीचा प्रयत्न करणारे काका , आजीच पात्र वाया आहे .
ती हिरवीणीची मोठी बहिण आवडली
ती हिरवीणीची मोठी बहिण आवडली मला! छान आहे.
प्रशू..
ती हिरवीणीची मोठी बहिण आवडली
ती हिरवीणीची मोठी बहिण आवडली मला! छान आहे.>>> मलाही . कोण आहे ती???
ती हिरवणीची मोठी बहीण आपल्या
ती हिरवणीची मोठी बहीण आपल्या श्री करीता पहील्यांदा बघीतली होती त्याच्या घरच्यांनी. पण श्री का दिल आया गधी( जानी) पे तो परी क्या चीज है.
ती हिरवणीची मोठी बहीण आपल्या
ती हिरवणीची मोठी बहीण आपल्या श्री करीता पहील्यांदा बघीतली होती त्याच्या घरच्यांनी. >> भगवती, नाही ही ती नाही!
सगळ्या पात्रांचे स्वभावरंग
सगळ्या पात्रांचे स्वभावरंग अगदी ठाशीवपणे मांडण्याचा अट्टाहास नडतो आहे या मराठी मालिकाना . प्रत्येक पात्र आपले एखादा गुण पकडून बसते . सोशिक ती अगदी पराकोटीची सोशिक . निगेटिव्ह तो अगदी निगेटिव्ह ....असं कुठे नसतं ....प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या वाइटाचे मिश्रण असते ,कोणीही असा ठोकळेबाज नसतो ...हे या झी वाल्यांच्या बाळबोध बुद्धीला कधी समजणार देव जाणे .....
Suhas Paranjape aawadte.
Suhas Paranjape aawadte. Ticha role changla lihila asel na, tar negative role madhe pan mast dhamaal aanu shakel ti.
नाही नाही, ती मोठी बहीण लगोरी
नाही नाही, ती मोठी बहीण लगोरी नावाच्या मालिकेत होती प्रवाहवर, रेश्मा शिंदे खरं नावं
आज 'चंगो'नीं फार कौतुक केलंय
आज 'चंगो'नीं फार कौतुक केलंय या सिरियलच फेसबुक वर..!!
करणारच, बेटर हाफ आहे ना
करणारच, बेटर हाफ आहे ना त्यांची त्यात.
ती मोठी बहिण लगोरी, चारचौघी
ती मोठी बहिण लगोरी, चारचौघी आणि ई च्या एका शिरेलीत व्हिलन होती. इथे पण व्हिलन असेल बहुतेक.
लगोरी आणि चारचौघीत व्हिलन नव्हती. पण ती एकटीच मला लगोरीत आवडली नाही, बाकीच्या आवडल्या.
उमा गोखले इथे नवऱ्यापेक्षा
उमा गोखले इथे नवऱ्यापेक्षा मोठ्या दिसतात.
Pages