'पंचवीस-सव्वीस वर्षांच्या सनीचे सख्खे वडील आलोकनाथ यांना अजून एक लहान आठदहा वर्षांचा मुलगा असतो. उतारवयात झालेला असल्याने तो शेंडेफळ आणि सनी जुर्राटला नडल्यामुळे नेमकं त्याचंच अपहरण करून अजगर जुर्राट त्याला मारून टाकतो. याच कारणामुळे आलोकनाथ सनीला घराबाहेर काढतात आणि हा पहाडासारखा माणूस पहाडात राहायला जातो. भारतात काळे धंदे, खून, मारामारी इत्यादी करणारे जुर्राट कुटुंबीय केनयात मात्र इज्जतदार शेहेरी असतात. अजगर जुर्राट, नागदंश जुर्राट अशी नावं असूनही! सोनिया अशा निरुपद्रवी नावाची मुलगीही असते अजगराची. तिचं लग्न ठरलेलं असतं तपस्वी गुंजाल नावाच्या माणसाशी. त्याअगोदर भ्रष्ट कमिशनरने सनी आणि चंकीला अजगराच्या पुढ्यात सोडायला म्हणून केनयात पाठवलेलं असतं. शिवाय सोनमही तिथं आलेली असते. तिथे सनीचंकीवर लक्ष ठेवायला नसीरुद्दीन शाहची नेमणूक होते....
सिनेम्यांच्या गोष्टी ऐकायला आणि सांगायला सर्वांनाच आवडतात. सिनेम्यातली पात्रं आपल्या जिवाभावाची असल्याप्रमाणं आपण अगदी तल्लीन होऊन ब्याकग्राऊंड म्यूझिक आणि साऊंडइफेक्टांसह आपल्या मित्रांना, कुटुंबियांना पाहिलेल्या चित्रपटाची गोष्ट सांगतो. किंवा पोस्टर बघून न पाहिलेल्या त्या सिनेम्याची गोष्ट ओळखण्याचा प्रयत्न करतो.
२८ ऑगस्ट, २०१५ रोजी 'हायवे' हा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित व गिरीश कुलकर्णी लिखित चित्रपट प्रदर्शित होत आहे.
या निमिताने आम्ही सादर करत आहोत एक स्पर्धा.
ही स्पर्धा आहे चित्रपटाची कथा सांगण्याची, किंबहुना कथा ओळखण्याची, कारण 'हायवे' अजून प्रदर्शित व्हायचा आहे.
खाली 'हायवे' या चित्रपटाची सहा पोस्टरं आहेत.
तुम्हांला ही पोस्टरं बघून 'हायवे'मधल्या या पात्रांची आणि चित्रपटाची कथा ओळखायची आहे आणि ती या बाफवर लिहायची आहे. सोबतच या पात्रांचा एकमेकांशी संबंध काय, हे ओळखल्यास उत्तम.
कथा लिहिण्यासाठी शब्दमर्यादा नाही.
![Highwayposter1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4614/Highwayposter1.jpg)
![Highwayposter2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4614/Highwayposter2.jpg)
![Highwayposter3.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4614/Highwayposter3.jpg)
सर्वोत्तम प्रवेशिकांची निवड ’हायवे’चे निर्माते करतील. विजेत्या प्रवेशिकांची संख्याही निर्माते ठरवतील.
विजेत्यांना मिळेल २७ / २८ ऑगस्ट, २०१५ रोजी मुंबई / पुणे इथे होणार्या 'हायवे' या बहुचर्चित चित्रपटाच्या शुभारंभाच्या खेळाचं प्रत्येकी एक तिकिट.
या स्पर्धेची मुदत २४ ऑगस्ट, २०१५, भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे.
२५ तारखेला विजेत्यांची नावं याच बाफवर घोषित केली जातील.
महत्त्वाची सूचना - शुभारंभाच्या खेळाची तिकिटं चित्रपटनिर्मात्यांकडून देण्यात येतात. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल झाल्यास तसं विजेत्यांना कळवण्यात येईल.
![Highway-28.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u36412/Highway-28.jpg)
ओह गलतीसे मिश्टेक. तिला सौ.
ओह गलतीसे मिश्टेक. तिला सौ. कशीबशी गोडबोले करून "व्हाय हिंदी हायवे नॉट सेल्फी आरपार, व्हाय मराठी हायवे सेल्फी आरपार?" असे भोळे प्रश्न देवू म्हणायला.
"इटस ऑल अबाऊट हायवे बायवे, अफलातून झालंय खणून" असे गाणे ही वाजवू तिच्या डायलॉग नंतर.
क्रमश: आहे ना भाऊ! थांबा जरा.
क्रमश: आहे ना भाऊ! थांबा जरा.
पण माझे गाणे नको काटूस प्लीज.
लागलीया मोठी क्यू क्यू क्यू
हायवे झालाया न्यू न्यू न्यू
कुत्रा सोडायला यू यू यू
ओम्नी चाल्वू झू झू झू
धीमे धीमे स्लोली स्लोली
लागला ट्रॅफिक महातूफां
अफलातून
झालं खणून
मॉर्निंग नून
अफलातून
इटस ऑल अबाउट हायवे बाय वे...
सी! टाकते थांब तुझंही गाणं.
सी!
टाकते थांब तुझंही गाणं.
आता बाफ स्पीड घेइल. चिक्की
आता बाफ स्पीड घेइल.
चिक्की चिक्की....
महान धमाल झालंय, आशूडी
महान धमाल झालंय, आशूडी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाफ भरकटू नये म्हणून इथली
बाफ भरकटू नये म्हणून इथली गंमतhttp://www.maayboli.com/node/55230 इथे हलवली आहे.
सी काय गं हे
सी![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काय गं हे
भारी लिवलय आशुडे
भारी लिवलय आशुडे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
प्रथम अशा प्रकारची स्पर्धा
प्रथम अशा प्रकारची स्पर्धा घेणार्यांची कमाल...
आणि त्या स्पर्धेत भाग घेवून, धपाधप काल्पनीक कथानक लिहीणार्यांची तर त्याहूनही कमाल...
म्हणजे, स्पर्धेचे नियम वाचून मलाही काही सुचतंय का पोस्टर बघून? असा विचार मी करत होते, आणि विचार करण्याआधी नेमक्या तुम्ही सगळ्यांनी लिहीलेल्या स्टोर्या आणि तुमची स्क्रिप्टं वाचल्यामुळे, माझा मेंदू विचार करण्याच्या अगदीच पलीकडे गेला. (अगदी, एक सेल्फी आरपार, प्रमाणे एक मेंदू आरपार म्हणू शकता)
काय हसले मी...
तेव्हा, स्पर्धा घेणार्यांच्या कल्पनेचे आणि त्यात भाग घेणार्या एक से एक स्पर्धकांचे, अशा रितीने हास्य क्लब निर्माण केल्याबद्दल आभार.
सगळ्यांना ऑल द बेस्ट !
लगे रहो.
अमा, आशुडी एक नंबर!
अमा, आशुडी एक नंबर!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आशूडी, क ह र !
आशूडी, क ह र !![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हे पोस्टर्स आणि प्रोमोज पाहून
हे पोस्टर्स आणि प्रोमोज पाहून जे काही जाणवतेय ते असं असावं. :स्मितः
गिरिश कुलकर्णी परदेशातून विमानतळावर बायकोबरोबर (रेणुका शहाणे) उतरतो. गिरिश कुलकर्णी किरकिर्या आणि चिकित्सक मनोवृत्तीचा माणूस आहे. तितकाच तो चिकटचिंगू आहे. रेणुका शहाणे अत्यंत साधी सोज्वळ बाई आहे. पैसे वाचवण्याकरता गिरिश स्वतंत्र गाडी हायर न करता एक टॅक्सी पकडतो ज्यात इतरही पॅसेंजर्स बसतील ड्रायव्हर भरेल ते.
टिस्का चोप्राचा मुलगा पुण्यात शिकतोय... ती त्याला भेटायला म्हणून टॅक्सीने पुण्याला निघालिये. आता मुलगा आणि त्याचं भविष्य हेच तिचे आयुष्य आहे.
मुक्ता बर्वे आणि भारती आचरेकर सासू सुन आहेत. मुक्ता बर्वे प्रेगनंट आहे. आणि ती आपल्या माहेरी चाललिये. सासू सोडायला जातेय. नवरा मुंबईत कामावर आहे.
हुमा कुरेशी एक अॅक्टरेस आहे जिला लोणावळ्यात शूटिंग लोकेशनवर पोचायचे आहे. गाडी बिघडल्याने ती टॅक्सीने लोणावल्याला पोचायला टॅक्सी पकडते. त्याच टॅक्सीत एक माणूस आहे जो जमिनिचे व्यवहार करणारा एजंट आहे :स्मितः तो गप्पांतून तिच्याशी जवळिक वाढवायचा प्रयत्न करतोय.
सुनील बर्वे एक सेल्स ईंजिनीर आहे जो नोकरीतल्या प्रेशरला टारगेट्सना कंटाळलाय आणि शिवाय आर्थिक स्थैर्य नसल्याने बायकोबरोबर त्याचे खटके उडतायत... प्रकरण डिवोर्सपर्यंत पोचलेय. एकंदरच आयुष्याला वैतागलेला पिचलेला माणूस आहे.
किशोर कदम हा लोणावळ्यात हुमा कुरेशी उतरल्यावर गाडीत चढतो. तो कर्जबाजारी शेतकरी आहे.
मजल दरमजल करीत एक एक प्रवाशी घेत आणि त्यांच्या लोकेशन्सना ड्रॉप करत प्रवास सुरू आहे. प्रवासात एकमेकांच्या सुखदु:खाच्या कथा ऐकत प्रत्येकाला आपापले दु:ख्ह छोटी वाटत राहतात आणि एकंदर आपापल्या अयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा सकारात्मक होत जातो.
ही "हायवे" ची कथा आहे
साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
किशोर कदमची काय स्टोरी असेल
किशोर कदमची काय स्टोरी असेल काही अंदाज येत नाही.
बायकोबरोबर त्याचं आर्थिक
बायकोबरोबर त्याचं आर्थिक स्थैर्य नसल्याने >>
काये हे!!
लक्षात आलेलं पण बदलायचा
लक्षात आलेलं पण बदलायचा कंटाळा केलेला ....
पण "डी गँगच्या" म्होरक्याने बरोबर पकडलेच
आशूडी ![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
केलाय बदल.
अजून एक कल्पना सुचली
अजून एक कल्पना सुचली लिहिताना.... की गिरिश कुलकर्णी पुण्याहून मुंबईला (विमानतळावर) आणि तिथून परदेशात जायला निघाला. एकंदर कौटुंबिक आणि इथल्या सामाजिक परिस्थितीला कंटाळून तो नोकरीच्या नावाखाली परदेशी जातोय आणि रस्त्यात इतरांचे सर्व किस्से ऐकून तो निर्णय बदलतो आणि परदेशी जातच नाही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ईमॅजिनेशनला जोडा....... ईमॅजिनेशनला जोडा
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
भुंग्या मला वाटलं तू मुद्दामच
भुंग्या मला वाटलं तू मुद्दामच तसं लिहीलंयस म्हणून मी फक्त दाद दिली. एकदम वैश्विक सत्य लिहून गेलास तू.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कथा चांगली जमली आहे, आणखी लिही.
छ्या , खरा सिनेमा एकदम सपक
छ्या , खरा सिनेमा एकदम सपक वाटणार का काय आता![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
गिरिश हा अनिवासी भारतीय
गिरिश हा अनिवासी भारतीय त्याचे लग्नाचे वय उलटून जात आहे. तो मुलगी बघुन लग्न जुळवण्यासाठी जातोय. तो नुकताच विमानतळावरून पुण्याला चाललाय. नुकत्याच एका हॉटेल मध्ये नाष्टा करताना त्याने मुक्ताला पाहिलंय. रेणुका ही गृहिणी सुट्या एन्जॉय करण्यासाठी मुंबईला प्रवास करतेय. या सगळ्याचा ससेमिरा तिच्या पाठीमागे नकळत लागलाय.
टिस्का ही कॉर्पोरेट क्षेत्रामधील मोठी उद्योजिका आहे. ती तिच्या कंपनीचा प्रोजेक्ट लाँच करण्यासाठी पुण्याला जात आहे. मुक्ता आणि भारती – या दोघी सहप्रवाशी आहेत. भारती आपल्या जवळच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात आहे. मुक्ता डोळ्यात स्वप्नं साठवून नवीन नौकरी ठिकाणी रुजू होण्यास जात आहे. मुक्ता ज्या नवीन कंपनी जाणार आहे ती कंपनी टिस्काची आहे. टिस्काने तिच्या कडे कंपनीची काही गुप्त कागदपत्रे दिली आहेत.
हुमा ही नवीन हेरॉईन असून ती लोणावळा मार्गे शुटिंगसाठी जात आहे. तिला जाताजाता एक महत्त्वाचे काम उरकायचे आहे. आणि ती एका घाटात काम करण्यासाठी थांबते. सुनीलला टिस्का बद्दल माहीत आहे. पण कंपनीसाठी काम करण्याऱ्या दुसऱ्या व्यक्तिला तो शोधतोय. तो गुप्तेहर असून या सगळ्यावर पाळत ठेऊन माहिती किशोरला सतत पुरवत आहे. किशोर यांचे पात्र, हा थंड डोक्याचा, पाताळयंत्री, घातकी, कारस्थानी असून तो हायवे वर घाटात सापळा रचुन टिस्का ची वाट बघतोय.
सगळी जण एकमेका समोर येतात जेव्हा ते घाटात अडकतात......
मला यातले सुनिल बर्वे, भारती
मला यातले सुनिल बर्वे, भारती आचरेकर आणि रेणुका शहाणे सोडल्यास कोणाचे नाव काय तेच ठाऊक नाही.
कथा काय लिहिणार कपाळ!
वैश्विक सत्य
वैश्विक सत्य![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अमा,शेवटच्या पर पर्यंत मी
अमा,शेवटच्या पर पर्यंत मी अगदी सिरीअसली वाचली तुमची गोष्ट . पुनर्जन्म वगैरे अतीच केलंत . तुम्ही सगळ्यांच्या गोष्टी वाचायची माझी उत्सुकता वाढवली .
अगदी, एक सेल्फी आरपार,
अगदी, एक सेल्फी आरपार, प्रमाणे एक मेंदू आरपार म्हणू शकता >>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
त्या निमित्ताने बाकीच्यांची
त्या निमित्ताने बाकीच्यांची नवा तरी कळली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्पर्धेत भाग घेतलेल्या,
स्पर्धेत भाग घेतलेल्या, प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आशूडी, भुंगा, अमा, आत्मधून, अतरंगी, भागवत व सामी यांना 'हायवे'च्या निर्मात्यांतर्फे स्पर्धेचे विजेते घोषित करून प्रीमियरची तिकिटं देण्यात येत आहेत.
या सर्व मायबोलीकरांचं अभिनंदन.
आत्मधून, अतरंगी, भागवत व
आत्मधून, अतरंगी, भागवत व सामी,
कृपया आपले फोननंबर chinmay@maayboli.com या पत्त्यावर पाठवाल का?
धन्यवाद.
विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा! धन्यवाद मा प्रा.
वा वा! धन्यवाद मा प्रा.
अरे वा !!! धन्यवाद माध्यम
अरे वा !!! धन्यवाद माध्यम प्रायोजक.
विजेत्यांचे अभिनंदन
Pages