'पंचवीस-सव्वीस वर्षांच्या सनीचे सख्खे वडील आलोकनाथ यांना अजून एक लहान आठदहा वर्षांचा मुलगा असतो. उतारवयात झालेला असल्याने तो शेंडेफळ आणि सनी जुर्राटला नडल्यामुळे नेमकं त्याचंच अपहरण करून अजगर जुर्राट त्याला मारून टाकतो. याच कारणामुळे आलोकनाथ सनीला घराबाहेर काढतात आणि हा पहाडासारखा माणूस पहाडात राहायला जातो. भारतात काळे धंदे, खून, मारामारी इत्यादी करणारे जुर्राट कुटुंबीय केनयात मात्र इज्जतदार शेहेरी असतात. अजगर जुर्राट, नागदंश जुर्राट अशी नावं असूनही! सोनिया अशा निरुपद्रवी नावाची मुलगीही असते अजगराची. तिचं लग्न ठरलेलं असतं तपस्वी गुंजाल नावाच्या माणसाशी. त्याअगोदर भ्रष्ट कमिशनरने सनी आणि चंकीला अजगराच्या पुढ्यात सोडायला म्हणून केनयात पाठवलेलं असतं. शिवाय सोनमही तिथं आलेली असते. तिथे सनीचंकीवर लक्ष ठेवायला नसीरुद्दीन शाहची नेमणूक होते....
सिनेम्यांच्या गोष्टी ऐकायला आणि सांगायला सर्वांनाच आवडतात. सिनेम्यातली पात्रं आपल्या जिवाभावाची असल्याप्रमाणं आपण अगदी तल्लीन होऊन ब्याकग्राऊंड म्यूझिक आणि साऊंडइफेक्टांसह आपल्या मित्रांना, कुटुंबियांना पाहिलेल्या चित्रपटाची गोष्ट सांगतो. किंवा पोस्टर बघून न पाहिलेल्या त्या सिनेम्याची गोष्ट ओळखण्याचा प्रयत्न करतो.
२८ ऑगस्ट, २०१५ रोजी 'हायवे' हा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित व गिरीश कुलकर्णी लिखित चित्रपट प्रदर्शित होत आहे.
या निमिताने आम्ही सादर करत आहोत एक स्पर्धा.
ही स्पर्धा आहे चित्रपटाची कथा सांगण्याची, किंबहुना कथा ओळखण्याची, कारण 'हायवे' अजून प्रदर्शित व्हायचा आहे.
खाली 'हायवे' या चित्रपटाची सहा पोस्टरं आहेत.
तुम्हांला ही पोस्टरं बघून 'हायवे'मधल्या या पात्रांची आणि चित्रपटाची कथा ओळखायची आहे आणि ती या बाफवर लिहायची आहे. सोबतच या पात्रांचा एकमेकांशी संबंध काय, हे ओळखल्यास उत्तम.
कथा लिहिण्यासाठी शब्दमर्यादा नाही.



सर्वोत्तम प्रवेशिकांची निवड ’हायवे’चे निर्माते करतील. विजेत्या प्रवेशिकांची संख्याही निर्माते ठरवतील.
विजेत्यांना मिळेल २७ / २८ ऑगस्ट, २०१५ रोजी मुंबई / पुणे इथे होणार्या 'हायवे' या बहुचर्चित चित्रपटाच्या शुभारंभाच्या खेळाचं प्रत्येकी एक तिकिट.
या स्पर्धेची मुदत २४ ऑगस्ट, २०१५, भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे.
२५ तारखेला विजेत्यांची नावं याच बाफवर घोषित केली जातील.
महत्त्वाची सूचना - शुभारंभाच्या खेळाची तिकिटं चित्रपटनिर्मात्यांकडून देण्यात येतात. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल झाल्यास तसं विजेत्यांना कळवण्यात येईल.

सिनेमाची गोष्ट नाही ओळखता
सिनेमाची गोष्ट नाही ओळखता येणार पण शेवट कदाचित जमेल - सगळेजण शेवटी एकत्र येतात आणि खेळकर पण भावूक मूड मध्ये म्हणजे आयुष्याचे "तत्त्वग्यान" कटरिना कडून समजवून समजवून समजल्यागत (जिंदगी ना मिलेगी दोबारा शेवटचा टाईप्स फोटो) मध्ये एक सेल्फी घेतात.
(पुढच्या सिनेमांना फुकट स्क्रिप्ट मिळेल इतक छान काही मायबोलीकर लिहीतात आणि त्यांना बक्षीस म्हणून एक फुकट तिकीटावर कटवता!! निर्माते कुठल्या गावचे??
)
सिनेमाला शुभेच्छा!
उसगावातल्या कोणाला बक्षीस
उसगावातल्या कोणाला बक्षीस लागलं तर त्या तिकीटाचा काय उपयोग?
सिनेमा आणि स्पर्धा, दोन्हीला शुभेच्छा!
rmd, तुम्ही ते तिकीट तुमच्या
rmd,
तुम्ही ते तिकीट तुमच्या भारतातल्या नातलगांना / मित्रमैत्रिणीला देऊ शकता.
अरे! रिस्पॉन्सबद्दल धन्यवाद,
अरे! रिस्पॉन्सबद्दल धन्यवाद, माप्रा!
सहा पुरुष आहेत. त्यांची नावे
सहा पुरुष आहेत. त्यांची नावे वेंकट, इद्रिस, राहुल, लॉरेन्स, कर्तार सिंग, क्वांग ली अशी आहेत.
तीन मिशीवाले व तीन बिन मिशीवाले आहेत. हे सर्व एका छुपया गँगचे सदस्य आहत्यां चिकीचिकी हा त्यांचा कोड वर्ड आहे. त्यांचे हेड ऑफिस ड्यूक्स नोज इथे आहे. व शाखा ( पक्षी ब्रांच) एडिसन
नयुजर्सी इथे आहे.
ओला उबर मेरू( हे प्रॉडक्ट प्लेसमेंट आहे. ) ह्यांना हे हायवेवर ठहरू देत नाहीत.
( ही गँग सेल्फी घेते व त्यातील बायकांना मारून टाकते. सेल्फी आर पार असे पोस्टर वर लिहीलेच आहे. हे लोक टॅक्सीत बसून हायवे वर फिरतात व लेडीज पसिंजर घेतात. एकदा दोन लेडीज येतात. मग राहूल गोंधळतो. व त्यांना घेउन दत्त मध्ये वडा पाव खायला नेतो. तिथून बाहेर पडल्यावर काही वेळातच दरड कोसळते बायका राधेमाच्या आशिर्वादाने जगतात व राहूल धब धब्यात पडून मरतो. सेल्फी गँगचा पर्दा फाश.
कथा एक्स्प्रेस हायवे वर. ( जगात एकच आहे तो मुंबईहून पुण्याला नेतो. ) घडते.
राहुलचा पुनर्जन्म होउन तो मिकेश ठक्कर नावाने जन्माला येतो. व कामोठे इथे शेअर ब्रोकरेज करतो.
तिथे परत त्याच दोन बाया येतात. तो त्यांना डी फॅट अकाउंट उघडून देतो व मॅगीचे शेअर्स घ्यायला उद्युक्त करतो. मग उद्या मॅगी बॅन होते व त्यांचे पैसे डुबतात. व राहुलचा एम पूर्ण होतो.
अमा
अमा
अमांनी अगदी भौगोलिक आणि
अमांनी अगदी भौगोलिक आणि धार्मिक एकात्मताच साधून टाकली.
अरारारारा ..... अमा.
अरारारारा ..... अमा.
शेवटचा फोटो पाहून वाटतंय की
शेवटचा फोटो पाहून वाटतंय की त्यांची गाडी त्या पॉइंटाला उलटली, प्यासिंजर मंडळी मेली आणि मग भूत होऊन त्या भिंतीवर येऊन बसली. तिथे त्यांनी त्यांच्या आरपार बॉडीजमधून सेल्फी काढून घेण्याचा एक बिन्नेस सुरू केला.
हायवे म्हटल्यावरच नजरेत येतात
हायवे म्हटल्यावरच नजरेत येतात रस्त्याच्या दोन्हीकडून सुळ्ळकन वाहणारे गाडयांचे प्रवाह, त्या प्रत्येक गाडीमध्ये असणारं एक वेगळं विश्व. एकाचवेळी शांत, हूरहूर लावणारं, वाट पहाणारं, लाजणारं, मजेशीर, बोलकं, चिडणारं, भयानक, बीभत्स असं प्रत्येकाचं समांतर विश्व.. आणि कधीकधी त्या विश्वांचं एकमेकांना छेदून जाणं!!
पण या सगळ्या प्रक्रियेतून त्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तिला स्वतःबद्दल होणार्या नव्या जाणीवा, नेणीवा आणि त्या प्रवासानंतर त्यांच्यात झालेले चांगलेवाईट बदल म्हणजेच एक सेल्फी आरपार!
कुणीतरी म्हटलेलंच आहे स्टेशनवर थांबलेले तुम्ही आणि ट्रेनमधून उतरणारे तुम्ही कधीच सारखे नसता..
(इथे हायवे च्या सुरुवातीला आणि हायवे संपताना तुम्ही कधीच सारखे नसता)
अमा, मामी अर्र्र्रर्र
अमा, मामी अर्र्र्रर्र

अमांना तिकीट बक्षिस!!
अमांना तिकीट बक्षिस!!
डी फॅट अकाऊंट
डी फॅट अकाऊंट
हायवे ही एकच कथा नसून हायवे
हायवे ही एकच कथा नसून हायवे वर आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांचा प्रवास आहे असे वाटते.
एका टॅक्सी ड्रायवर ला दिवसभरच्या प्रवासात, वेगवेगळ्या सामाजिक/आर्थिक/भावनीक स्तरांमधली माणसांचा जो अनुभव येतो, त्या अनुभवांची कहाणी म्हणजेच हायवे असे या सिनेमाचे प्रोमोझ बघून वाटले. माणूस प्रत्यक्षात आणि प्रवासात वेगवेगळा असू शकतो. प्रवासात माणसांचे खरे रूप जे ड्रायवर ला दिसते ते म्हणजेच 'एक सेल्फी आरपार', थोडक्यात समाजाचा आरसा.
आत्मधून , तुझी पोस्ट एक
आत्मधून , तुझी पोस्ट एक स्वतंत्र पोस्ट म्हणून आवडली . छान लिहिले आहेस
अमा, इथं काय करताय?
अमा, इथं काय करताय? स्क्रीनप्ले लिहायला घ्या. अतिशय भारी लिहाल.
अमा
अमा
हाय वे वरचा प्रवास..... त्या
हाय वे वरचा प्रवास..... त्या निमित्ताने व्यक्तिचरित्रे आणि मनुष्याच्या स्वभावाचे कंगोरे दाखविणे.
हाय वे वरचा प्रवास, काहींना कधीतरी करावा लागणारा तर काहींना कधीतरी घडणारा.
असाच हाय वे वरचा रोजचा एक दिवस. असंख्य प्रवासी. असंख्य मानवी नमुने. काही नेहमीचे, काही कधीतरी कामानिमित्त प्रवास करणारे तर काही पहिल्यांदा आलेले. त्यातली प्रातिनिधिक उदाहरणे. समाजाच्या विविध थरामधली, वेगवेगळ्या विचारसरणीची. प्रत्येकाची जडणघडण वेगळी, संस्कार वेगळे, जगाकडे बघण्याची दृष्टी वेगळी.
त्यातूनच काही एकमेकांना समांतर तर काही एकमेकांना छेदून जाणारी कथानके. त्यांच्या आयुष्यात असलेल्या समस्या, त्यांचे स्वभाव. आपण पण यातलेच एक असतो. काही घटना, विचार करायला लावणार्या आपल्या स्वता:कडे स्वतामधून बाहेर येउन एक त्रयस्थ म्हणुन बघायला लावणार्या. आपण जे जग कायम आपल्या दृष्टीने बघत असतो. आपल्याला कायम आपली बाजू बरोबर वाटते. आपल्याला नाण्याची दूसरी बाजू दाखाविणारे कथानक. आपल्या चाकोरीच्या बाहेरचे जग दाखविणारे. ते जग जे रोजच्या जगण्यात आपण अनुल्लेखाने मारुन जगतो. जास्तीत जास्त आपल्या कोषामधे राहून त्याला चार हात लांब तरी ठेवतो नाहीतर समोर जरी आले तरी बघून न बघितल्या सारखे करुन विसरुन जातो. तेच जग परत आपल्यासमोर आपल्या चाकोरीबाहेरच्या लोकांच्या नजरेने आपल्याला दाखाविणे.
अमा रॉक्स,..
अमा रॉक्स,..
अमा अमा, सांगितले म्हणून
अमा
अमा, सांगितले म्हणून समजले नायतर माझा समज होता डावीकडचे फोटो 'बिफोर' आणि उजवीकडचे 'आफ्टर' म्हणजे (बस्के, हे खास तुझ्यासाठी बरं!) इतका ट्रॅफिक जॅम झाला हायवे वर इतका जॅम झाला इतका जॅम झाला की बाहेर पडे पडे तो पुरूषांची मिशी (आणि बायांची वजन) वाढली.
सीमंतिनी! काय निरीक्षण
सीमंतिनी!

काय निरीक्षण आहे.
सही आहे.
Arrabaap simantini kaay
Arrabaap simantini kaay bekkar logic lavlay.. Before after aani traffic jam
. hsun hsun melo mi....
.
.
हायला, हे कसं काय मिसलं? मस्त
हायला, हे कसं काय मिसलं? मस्त आहे स्पर्धा!
ह ते उदाहरण मात्र आहेत .. मला
ह ते उदाहरण मात्र आहेत ..
मला आत्ता अर्थ लागला.. धन्यवाद ..
सुधारुन टाकतो जमल तर
सनी / जुर्राट वगैरे उदाहरण
सनी / जुर्राट वगैरे उदाहरण मात्रम आहे ना? का ती पात्रे घेउन लिहायचे आहे.
चिक्की चिक्की......
हायवे एक सेल्फी आरपार. ही कथा
हायवे एक सेल्फी आरपार.
ही कथा आहे सहा जोडप्यांची. वर पोस्टरमधे पाहिलंत तर ही सहा जोडपी तुम्हाला सहजच दिसतील. यातल्या प्रत्येक पुरूषाच्या नजरेत एक स्त्री भरलेली आहे. तीच त्याची वास्तवातली (सिनेमाच्या) जोडीदारीण आहे की स्वप्नातली हे जाणून घ्यायला तुम्हाला सिनेमाच पाहावा लागेल. तर गंमत अशी आहे, की जशी पुरूषांची नजर स्त्री वर आहे त्यामानाने स्त्रिया स्वत:च्याच नादात आहेत. कुणी भांडतंय,.कुणी हसतंय,.कुणी चिडलंय तर कुणी 'आके सीधी लगी दिल पे तिरछी नजरिया' मोड मधे.
एक शहर आणि एक वुड बी शहर आणि त्यांना जोडणारा रस्ता इथे ही कथा घडते. उदा. पुणे आणि लोणावळा व त्यांना जोडणारा एक्सप्रेस हायवे. वीकेंड आणि मान्सूनचा मुहूर्त साधून हे सगळे लोक पुण्याहून लोणावळ्याला कूच करतात. पैकी जान्हवी (मुक्ता बर्वे) ही बगनलाल चिक्की समूहाची सीएफओ आहे. अतिशय गोड हसत ती संपूर्ण चित्रपट आपले डोळे चिक्कीसारखे स्क्रिनवर चिकटवून ठेवते. मेघना(रेणुका शहाणे) ही अखिल सदाशिव पेठ हास्यक्लब चालवते. तिचा रोज सकाळचा एक तास लोकांचे मख्ख चेहरे किंचित स्मितहास्याकडे झुकवण्यात जातो. अमोल(गिरीश कुलकर्णी) हा एनाराय असून सध्या तो परतोनी पाहे ची पारायणे करतो आहे. त्याला आपली पत्नी मेघनाच्या सतत हसतमुख हसण्याने एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. सुनील (बर्वे) आणि किशोर (कदम) हे कॉलेजपासूनचे जानी दोस्त. इतके की हसल्यावर त्यांचे दिसणारे दात आणि चिडल्यावर कपाळावरच्या आठ्या कुणी मोजून पाहील तर एकच आकडा मिळेल. तर हे सगळे लोणावळ्याला भुशी डेमवर जातात आणि त्यांना कोणता विषण्ण करणारा अनुभव येतो हे पडद्यावरच पाहणे इष्ट ठरेल. या अनुभवाचा वेग, थरार इतका विलक्षण आहे की प्रेक्षकाला आपण थिएटरमधे आहोत की कात्रजच्या बोगद्यात हेच पटकन ध्यानी येत नाही. किशोरला तिथे अचानक कवित्व प्राप्त होऊन तो हायवेवरच बोलायला लागतो - ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं... तितक्यात सुनीलला गतजन्मीची खूण पटावी तसं काहीसं वाटून तो गाडीतून उतरतो आणि हायवेवरच शारूखच्या कल हो ना हो स्टाईल हात पसरतो. एसटीतून हे प्रकार पाहणारी जान्हवी (मुक्ता) जोरात "काहीही हां नी!" असं किंचाळते. सुनील चपापतो. भानावर येतो. तो कपाळावर पावणेदोन आठ्या घालून जान्हवीला 'बर्वे?' विचारतो. ती बाष्पगगदगद होऊन मान आत दुमडते.आणि जानी- सुनीच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांच्या आई वडलांना आलेल्या अशाच विषण्ण करणार्या अनुभवात या भावा बहिणीची ताटातूट झालेली असते.
-क्रमश:
किशोरला तिथे अचानक कवित्व
किशोरला तिथे अचानक कवित्व प्राप्त होऊन तो हायवेवरच बोलायला लागतो - ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं...
आशूडी सुसाट चालल्येय स्टोरी..
एसटीतून हे प्रकार पाहणारी
एसटीतून हे प्रकार पाहणारी जान्हवी (मुक्ता) जोरात "काहीही हां नी!" असं किंचाळते. >> ह्याच्या आधी - हुमा कुरेशी कुमारी कुसुम सांगवान सारखी धावत येवून " के कर राहा था बाया फैला के, यो जगा से शारूख खान बननेकी?" म्हणून गाडीतून लाँग जंप मारते स्वप्नील वर - हे राहिले.
(आशूडी, हिंदीतून कलाकार आणायचा तर रोल नको का द्यायला तिला? तुफान गोष्ट आहे तुझी
)
सी, तरी टीस्का चोप्रा राहीलीच
सी, तरी टीस्का चोप्रा राहीलीच आहे ना?
Pages