१ वाटी डाळीचे पीठ, १ वाटी नारळाचा चव, १ वाटी लसुण, १ वाटी गोडेतेल, १ वाटी तिखट (होsssय १ वाटीच), २ वाट्या पाणी, १ वाटी कोथींबीर बारीक चिरुन, मीठ चवीप्रमाणे.
लसुण, तेलाशिवाय वरील सर्व साहित्य एकत्र करुन घ्यावे. तेलात हिंग-मोहोरीची फोडणी करावी. त्यात लसुण चांगला लाल होईतो परतुन घ्यावा. मग वरील मिश्रण घालावे. नीट हलवुन झाकण घालुन शिजवावे. अगदी वड्या पडण्या सारखे नाही पण जरा घट्टसर पिठले होते.
ही मला माहिती असलेली रावण पिठल्याची कृती. हा कोल्हापुरी प्रकार आहे असे ऐकुन आहे. इथे लय कोल्हापुरी बाया-बापे हायेत. त्यांनी कृपया डोळ्यांखालुन घालावी. मी काही सुगरण नाही. त्यात नवर्याने पिठले कायम मेसमधे खाल्लेले. त्यामुळे मी लग्नानंतर पहिल्यांदाच हे पिठले केले तर त्याने स्वतःसाठी चिकन मागवले. चवीसाठी म्हणुन एक घास खाल्ला आणि चिकन बाजुला ठेवुन पिठल्यावरच ताव मारला
ते इतकाले निंबू रोजच खाते का
ते इतकाले निंबू रोजच खाते का व माय?>>> नाय नाय ते दुसरे अर्धे लिंबू दाखवायला असेल.
पदार्थाचा फोटू दाखविला तर.....आजु-बाजूला काय काय यावरपण चर्चा होतेच
देवकी.. लिंबु लय्यच आवडते मले
देवकी..
लिंबु लय्यच आवडते मले म्हणुन..
अन नेमका तुमाले नैविद्य दाखवाचा राहिला का ताटात असतेच असते..यकलीच जेवते अन रुमी लिंबु खात नाई..मले फेकाच येते जीवावर म्हणुन अर्धा जेवणासोबत आणि अर्धा जेवण झाल्यावर सिद्दा तोंडात टाकतो पिळून म्या
अन्जू, खोबर मी पन नै टाकल ग
ती एक अख्खी फाक सरत नै एकटिच्यान अन फ्रिज नसल्यामुळे वाया जाते जे आवडत नै
मला वर दिलेल्या कृतीनंच करून
मला वर दिलेल्या कृतीनंच करून पाहायचंय. एक एक वाटी सगळं घेऊन. कुणी केलंय का? तिखट व्हायचा प्रश्न नाही पण...
अर्धा जेवण झाल्यावर सिद्दा
अर्धा जेवण झाल्यावर सिद्दा तोंडात टाकतो पिळून म्या>>>>बापरे....आंबट्ट!!!
सोनाली, माझी आईसुद्धा असं
सोनाली, माझी आईसुद्धा असं अर्धं लिंबू मीठ लावून सगळंच खाते, सालासकट. (हो, सालही खायचं) फार मस्त लागतं म्हणते!
योकु , अरे तृप्तीनं केलच आहे
योकु , अरे तृप्तीनं केलच आहे ना..
मी जेवढ बेसन घेतल तेवढच तिखट घेतल पन तेल नै..
बायडीची परमिसन घेऊन ही पाकृ
बायडीची परमिसन घेऊन ही पाकृ करण्यात येइल लवकरच...
मी खायचे लहानपणी .....वाटीत
मी खायचे लहानपणी .....वाटीत लिंबू पिळायचे आणि त्यात मीठ घालायचे. मग ते बोटाने चाटत संपवायचे
नुसती साल नाही खाल्ली कधी. पण लोणच्यातली, भेंडीच्या भाजीतली खाते मी.
अवांतर: भरपूर लिंबू खाल्ले
अवांतर: भरपूर लिंबू खाल्ले की तिखट मसालेदार बाधत नाही असं आमचे पिताश्री म्हणतात. पंजाबी जेवणानंतर ते नेहमी लिंबूपाणी पितात.
अर्धा जेवण झाल्यावर सिद्दा
अर्धा जेवण झाल्यावर सिद्दा तोंडात टाकतो पिळून म्या>>> बाबौ!
योकु, मी केलं होतं रावण पिठलं
योकु, मी केलं होतं रावण पिठलं बेसन, तेल, तिखट इत्यादी एक वाटीच्या प्रमाणात घेऊन... पण ते महाजहाल तिखट लागलं आम्हाला तरी ट्रायल बेसिसवर केल्यामुळे नैवेद्याची वाटी घेतली होती, पण तरीही नंतर त्या उरलेल्या रावण पिठल्यात अजून दोनेक वाट्या बेसन, थोडं तांदुळाचं पीठ, मीठ, ओवा, कोथिंबीर वगैरे काय काय घालून पाटवड्या केल्या
आज केलं होतं या रेसेपीने
आज केलं होतं या रेसेपीने पिठलं निम्म्या प्रमाणात. अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी तिखट, पाव वाटी तेल आणि लसुण सोलायचा कंटाळा आल्याने एक मिडियम गड्डी लसणाची (पाव वाटी पेक्षा कमीच होता लसुण), पाणी बहूतेक कमी घेतलं गेलं..त्यामूळे पिठलं जरा घट्ट झालं होतं. आणि ओला नारळ किंवा खोबरं आणि पिठलं हे कॉम्बिनेशन काही केल्या पटत नव्हतं म्हणून त्याऐवजी चमचाभर दाण्याचं कुट घातलं होतं.
मस्त, भन्नाट चव होती. गर्द लालजर्द रंग आला होता. वरून थोडंसं कच्च तेल घेतलं होतं. सोबत ज्वारीच्या भाकर्या, खरडा आणि कांदा.
मी पण काल करून पाहिलं. तिखट
मी पण काल करून पाहिलं. तिखट आख्खी वाटी न घेता अर्धी वाटी घेतलं सिंडीप्रमाणे. तरी मस्त झणझणीत आणि टेस्टी झालं. खाताना विदर्भ स्टाइल तेल घेतलं वरून.
नाह, मी वाटीभर तिखट घेऊनच
नाह, मी वाटीभर तिखट घेऊनच करीन आता.
योकु, हो वाटीभर घेवूनच कर. मी
योकु, हो वाटीभर घेवूनच कर. मी अर्धी वाटी बेसनाला खरंतर अर्ध्या वाटीपेक्षा किंचीतसं जास्तच घेतलं होतं तिखट पण जेवताना अजिब्बात पाणी प्यायची गरज लागली नाही किंवा नाका-डोळ्यातूनही पाणी आलं नाही.
वरून विदर्भ-मराठवाडा स्टाइलनी कच्चं तेल मात्र घे, आणि शक्यतो शेंगदाण्याचं घे.
एक वाटी बेसन ला एक वाटी तिखट
एक वाटी बेसन ला एक वाटी तिखट कस शक्य आहे?
बेडगी मिर्ची का?
आमच्याकडे तरी घरंच आईनी
आमच्याकडे तरी घरंच आईनी पाठवलेलं भाजीमध्ये चिमुटभरच घालावं लागणारं तिखट आहे. भरपूर तेल, लसूण, खोबरं किंवा दाण्याचं कुट यामूळे तिखटाचा तिखटपणा जाणवत नाही.
आमच्याकडे तसंही, पिठंल असेल
आमच्याकडे तसंही, पिठंल असेल तर वरून लहान चमचाभरून तेल, आणि बरोबर कच्चा कांदा असेल तर खोबरं + लसूण चटणी घेतातच.
मी आता वर दिलेल्या प्रमाणात करीन. मे बी नेक्स्ट वीकला. इथे कळवतोच काय झालं ते...
आमच्या ताईंनी केलंत हे
आमच्या ताईंनी केलंत हे पिठलं.१ वाटी बेसनाला अर्धी वाटी तिखट घेतलं आणि तेल १ मोठा चमचा घेतले.खोबरे घालायचं विसरल्या.हायहुय करत खाल्लं.परत नाय बा एवढालं तिखट घालणार.
वरुन कच्च तेल घेतल कि नाय
वरुन कच्च तेल घेतल कि नाय लागत एवढ तिखट..घाबरु नका उगाच..मी करताना जे तिखट घेतल ते बेसनाच्या समप्रमाणातच होत..लिहिताना जो चमचा लिहिला होता तो तसाच होता
आता तुमी म्हंतासा तर करन
आता तुमी म्हंतासा तर करन पुढच्या येळेला.
भन्नाट प्रकरण आहे. रातच्यान
भन्नाट प्रकरण आहे. रातच्यान करतु.
>इथे कळवतोच काय झालं ते... >>
>इथे कळवतोच काय झालं ते... >> काय ते पिठल्याबद्दलच कळव रे. बाकी काही डिटेल्स नकोत.
पाककॄती साठी आभार. मंजूडी -
पाककॄती साठी आभार.
मंजूडी - नैवेद्याच्या वाटीच्या आयडियेसाठी मनःपूर्वक आभार. ती वापरुन करुन पाहिलं.
समप्रमाणात न घालता, अर्ध्या प्रमाणात तिखट घातलं. पण लसूणही त्याच प्रमाणात कमी करायला हवा होता, ते विसरले. फोटो चिकटत नाहीये इथे.
वाटिभर तिखत घ्यायच फ्कत
वाटिभर तिखत घ्यायच फ्कत बेसनाची वाटि आनी तिखटाची वाटि येग्येगली घ्यायचि, हाकानिका
बेसनाची वाटि मोठ्ठी तिखटाची
बेसनाची वाटि मोठ्ठी तिखटाची वाटि छोटी असे पण लिहा की.
मी शुक्रवारी केलं हे
मी शुक्रवारी केलं हे पिठलं.
एक वाटी बेसन, खोबरं, कोथिंबीर, तीन लहान चमचे तिखट - शीग लावून, अर्धी वाटी तेल , अर्धी वाटी लसूण.
तरी अति जहाल झालं होतं. तिखट खाण्याचा अभिमान बाळगणार्यांनी पण पाणी पीत पीत खाल्लं.
तेलाचा तवंग काही आला नाही मात्र.
पुढच्या वेळेस कांदा घालणार अन तिखट अजून कमी करणार - मग त्याला भलेही बिभीषण पिठले म्हटले तरी चालेल
बिभिषण पिठले
बिभिषण पिठले
nice.
nice.
मेधा, अजुन तिखट कमी केले आणि
मेधा, अजुन तिखट कमी केले आणि तेव्ह्ड्या प्रमाणात जायफळ टाकले तर तर कुंभकर्ण पिठलं का?
Pages