
१ वाटी डाळीचे पीठ, १ वाटी नारळाचा चव, १ वाटी लसुण, १ वाटी गोडेतेल, १ वाटी तिखट (होsssय १ वाटीच), २ वाट्या पाणी, १ वाटी कोथींबीर बारीक चिरुन, मीठ चवीप्रमाणे.
लसुण, तेलाशिवाय वरील सर्व साहित्य एकत्र करुन घ्यावे. तेलात हिंग-मोहोरीची फोडणी करावी. त्यात लसुण चांगला लाल होईतो परतुन घ्यावा. मग वरील मिश्रण घालावे. नीट हलवुन झाकण घालुन शिजवावे. अगदी वड्या पडण्या सारखे नाही पण जरा घट्टसर पिठले होते.
ही मला माहिती असलेली रावण पिठल्याची कृती. हा कोल्हापुरी प्रकार आहे असे ऐकुन आहे. इथे लय कोल्हापुरी बाया-बापे हायेत. त्यांनी कृपया डोळ्यांखालुन घालावी. मी काही सुगरण नाही. त्यात नवर्याने पिठले कायम मेसमधे खाल्लेले. त्यामुळे मी लग्नानंतर पहिल्यांदाच हे पिठले केले तर त्याने स्वतःसाठी चिकन मागवले. चवीसाठी म्हणुन एक घास खाल्ला आणि चिकन बाजुला ठेवुन पिठल्यावरच ताव मारला
काल केले होते. फक्त तिखट आणी
काल केले होते. फक्त तिखट आणी तेल १/४ वाटी टाकले. अहाहाहा मस्त झालेले. भरपुर केले होते. उरलेले आज आणलेय डब्यात
ह्म्म्म्म्!!स्लर्प!! मीपण
ह्म्म्म्म्!!स्लर्प!! मीपण करते हे पिठलं..अगदी भरपूर तिखट घालून.. पण नारळ,दाण्याचा कूट वजा करून.. कालवलेल्या पिठात जिरं घालते त्या ऐवजी.. बाकी फोडणी सेमच!! गाकर करते बरोबर.. कारण भाकरीचं पीठ मिळत नाही इकडे..
काल मी केलं होतं रावण पिठलं.
काल मी केलं होतं रावण पिठलं. पण तो झुणका झाला होता. चवीला ब्येश झालं. अर्थात तिखट १ वाटी वै नाही घातलं.
धन्यवाद सिंडी.
वाहवा, शिलिंडरेला, मस्तच हाय
वाहवा, शिलिंडरेला, मस्तच हाय की!!!
रावण पिठले >>> म्हंजी रावणाने
रावण पिठले >>> म्हंजी रावणाने केलेल पिठलं का ?
मी काही सुगरण नाही.......आणि चिकन बाजुला ठेवुन पिठल्यावरच ताव मारला >>> ह्यातल नक्की कुठल वाक्य खरं आहे ?
बाजिंदा, याचा अर्थ असा घेतला
बाजिंदा, याचा अर्थ असा घेतला तर चालेल मला वाटतं. सुगरण नसतानाही नवर्याने ताव मारून खाल्लं म्हणजे झक्कास झालं होतं. कोणालाही जमेल करायला, अगदी तुम्हांलाही.
झुणका पण मस्तच लागला असेल.
झुणका पण मस्तच लागला असेल.
मस्त पारंपारिक रेसीपी ! मी
मस्त पारंपारिक रेसीपी !
मी रावण पिठले अगदी पहिल्यांदा नगरला काकांकडे खाल्लेलं. पण तिकडे ओल्या नारळाऐवजी सुक्या खोबर्याचा कीस घालतात, थोडा ओवा ही घालतात. एक वाटी तिखट घातलेलं असलं, तरी जास्त तोंड भाजत नाही किंवा काही त्रास ही होत नाही, कारण बरोबरीने १ वाटी तेल ही असतं ना..!
रावण पिठलं + भाकरी + पातीचा कांदा + गाजर + कच्ची मेथी पाने (हे सगळं काश्या च्या थाळीत) = स्वर्गीय खाद्य !
रच्याकने : रावण पिठल्याची
रच्याकने : रावण पिठल्याची जन्मभूमी विदर्भ किंवा कोल्हापूर नसून नगर-बार्शी-सोलापूर हा भाग आहे. त्या भागात घरोघरी रोज रा.पि. खाल्लं जातं
माझ्या माहितीत तरी हा
माझ्या माहितीत तरी हा विदर्भातलाच प्रकार आहे. नगर तर नक्कीच नाही.
सिंडे मस्त पाककृती!!! आजच
सिंडे मस्त पाककृती!!!
आजच करुन पाहिलं.भीत भीत पाव वाटी तिखट टाकले.पण बाकी माल मसाला वरीलप्रमाणेच घेतला.अतिशय बेस्ट झालं रावण पिठलं.सोबत वालाचं बिरडं,पोळी,ताक आणि भात...
खरंच रावण पिठलं असंच का बरं
खरंच रावण पिठलं असंच का बरं नाव द्यावं ?
तिखट असणार खूप..
हे आहे नागपुरातलच. पण रावण
हे आहे नागपुरातलच. पण रावण झुणका अस म्हणतात. पाणी न घालताही ह्याची रेसिपी आहे. तो झुणका जास्त टिकतो असे म्हणतात.
अहाहा .... गावच्या आठवणी
अहाहा .... गावच्या आठवणी जाग्या झाला !!
सातार्यात ...कासला जाताना एक " प्रकृती हेल्थ रेसोर्ट " नावाचे हॉटेल लागते .... तिथे रावणपिठले असले भन्नाट मिळते .....अहाहा ......तोंपासु .
बेस्ट झालं होतं मी थोडी
बेस्ट झालं होतं
मी थोडी कांदा पात घातली होती गॅस बंद केल्यावर!
ओहो..भारीच.. करावी लागेल आता
ओहो..भारीच..
)
करावी लागेल आता पाकृ..
(सापडलीच शेवटी तृप्ती
ओके..... हे पण
ओके.....
हे पण बघा
http://www.maayboli.com/node/55113
रावणपिठल्याबरोबरचे तोंडीलावणे !
मस्त आहे. एकदा टीव्हीवर
मस्त आहे.
एकदा टीव्हीवर दाखवलं होतं त्यात खोबरे, कोथिंबीर नव्हतं घातलेलं. बाकी कृती सेम. मी तसं करते.
आता खोबरं आणि कोथिंबीर टाकून बघेन.
पाकृ विदर्भातलीच आहे, असं सांगितलं होतं टीव्हीवर.
झकास! आज करून बघतो पिठलं अन
झकास! आज करून बघतो
पिठलं अन तोंडीलावणपण 
वैद्यसाहेब, खाल्यानंतर पदार्थ
वैद्यसाहेब, खाल्यानंतर पदार्थ आणि तोंडीलावण्याची चव कशी होती ते आवर्जून नमुद करा.
पाणी पिण्याआधी नमुद करा हे लिहायला विसरलो.:P
व्हय जी!! तसा काय प्राब्लेम
व्हय जी!! तसा काय प्राब्लेम नको व्हायला
सापडलीच शेवटी तृप्ती >>>>
सापडलीच शेवटी तृप्ती >>>> बुटं हर्वित्यात तशा आयडी हर्वित्यात व्हय?
आज मी केले.. तेल कमी टाकले
आज मी केले..
तेल कमी टाकले मी..
बेसन तेल पकडून ठेवत नै ना..सोडून देत बाजुला म्हणुन
टीनाबाय किती उत्साही तू, इथे
टीनाबाय किती उत्साही तू, इथे बघितलं कि लगेच करतेस. छान आहे.
माझं जरा कोरडं होतं ह्याच्यापेक्षा. तेल खूप सुटेपर्यंत मी परतते. पाणी जरा कमी घालते.
करून बघणं आलं आता! टीना, मस्त
करून बघणं आलं आता! टीना, मस्त रंग आलाय तुझ्या पिठल्याला, तेल सोडले तर बाकी मस्त वाटतेय !!
पण कमी म्हणजे तरी किती तेल घातलेस तू एकटीच्या पिठल्याला ? कुतुहल वाटत आहे
भन्नाट! मस्त दिसतंय पिठलं
भन्नाट! मस्त दिसतंय पिठलं पोळीचं ताट.
काय काय किती किती घेतलंय ते लिहिणार का?
भारी दिसतंय पिठलं. मी पण केलं
भारी दिसतंय पिठलं. मी पण केलं नाहीये बर्याच दिवसांत. आता करणं आलं
अन्जू, बेसन कच्च्ट लागेल अस
अन्जू, बेसन कच्च्ट लागेल अस वाटल गं म्हणुन जरा जास्त घातल पाणी..
maitreyee , या अश्या दोन वाट्या झाल बेसन..म्हणजे बघ अर्धी वाटी बेसन घेतल होत त्यात छोटे दोन चमचे तेल घातल..अर्धी वाटी टाकायची हिम्मत नै झाली माझी..माहिती होत ना बेसनात तेल सुटत म्हणुन..
योकु , अतलिस्ट तु तरी बेसन म्हण..मला पिठल हा शब्दच बोलायला कसतरी वाटतो. पिठल म्हटल कि हळदिच बेसन अस समोर येत..म्हणुन या प्रकाराला म्हणजे बेसनापासुन बनवलेल्या अश्या प्रकारांना घरी आम्ही बेसनच म्हणतो..
२ चमचे तेल घेतल..
त्यात हिंग जिरं मोहरीची फोडणी दिली..लसणाच्या १० १२ पाकळ्या अद्रक किसनीवर किसुन घेतल्या आणि तेलात टाकल्या..लालसर झाल्यावर अर्धी पेक्षा जरा कमी वाटी बेसन + त्यापेक्षा थोड जास्त पाणी + मुठभर बारिक चिरलेला सांभार + पाव चमचा हळद + दोन मोठ्ठे चम्मच तिखट + चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण त्यात ओतल.. कालवकुलव करुन जरा वेळ झाकुन ठेवल
टाडा..झाल तय्यार..
टीना, मस्त दिसून राहिलं
टीना,
मस्त दिसून राहिलं पिठलं.डिट्टेलमधे लिहून काढ जो.
ते इतकाले निंबू रोजच खाते का व माय?
ओके टीना, कौतुक आहे तुझं. काल
ओके टीना, कौतुक आहे तुझं. काल रस्सम, आज रावण पिठलं. मी खूप परतते आणि कोरडं झालं की झाकण ठेऊन gas बंद करते. ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून ह्या पद्धतीने करायचंय. बघूया मुहूर्त कधी लागतो ;).
Pages