रावण पिठले

Submitted by तृप्ती आवटी on 21 July, 2008 - 13:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी डाळीचे पीठ, १ वाटी नारळाचा चव, १ वाटी लसुण, १ वाटी गोडेतेल, १ वाटी तिखट (होsssय १ वाटीच), २ वाट्या पाणी, १ वाटी कोथींबीर बारीक चिरुन, मीठ चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

लसुण, तेलाशिवाय वरील सर्व साहित्य एकत्र करुन घ्यावे. तेलात हिंग-मोहोरीची फोडणी करावी. त्यात लसुण चांगला लाल होईतो परतुन घ्यावा. मग वरील मिश्रण घालावे. नीट हलवुन झाकण घालुन शिजवावे. अगदी वड्या पडण्या सारखे नाही पण जरा घट्टसर पिठले होते.

वाढणी/प्रमाण: 
२ साधारण खाणारी मोठी माणसे (बहुतेक)
अधिक टिपा: 

ही मला माहिती असलेली रावण पिठल्याची कृती. हा कोल्हापुरी प्रकार आहे असे ऐकुन आहे. इथे लय कोल्हापुरी बाया-बापे हायेत. त्यांनी कृपया डोळ्यांखालुन घालावी. मी काही सुगरण नाही. त्यात नवर्‍याने पिठले कायम मेसमधे खाल्लेले. त्यामुळे मी लग्नानंतर पहिल्यांदाच हे पिठले केले तर त्याने स्वतःसाठी चिकन मागवले. चवीसाठी म्हणुन एक घास खाल्ला आणि चिकन बाजुला ठेवुन पिठल्यावरच ताव मारला Happy

माहितीचा स्रोत: 
माझे बाबा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण करते हे पिठले, अर्थातच १ वाटी तिखट घालण्याची हिम्मत नाहीय आपली बाबा...

खायला अतिशय सुरेख लागते.
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

मी त्यात इतका लसुण टाकत नाही बाकी क्रुती तशीच. अफलातुन मस्त लागते...

माझेही बाबा करायचे हे पिठले पूर्वी. आता तिखट खाता येत नाही एवढे.. पण तरी कमी तिखट घालून मी करून देईन त्यांना!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है

मला वाटते या पिठल्याचा उगम कोल्हापूरातला नसावा. बहूतेक विदर्भातला असावा हा प्रकार.
माझ्या माहितीप्रमाणे यात सुके खोबरे घालतात. कोल्हापूर काय कि नागपूर काय, ओले खोबरे सहसा वापरत नाहीत.
मी काहि हे पिठले खायची हिम्मत करत नाही. कोल्हापूरचे आजोळ असूनही.

हो रावण पीठले हे विर्भातलेच Happy
भरपुर तेलामुळे इतके तिखतजाळ लागत नाही.

बरोबर आहे. बाबा पण म्हणाले हे विदर्भातलेच. category बदलली आहे.
.
मी पण एक पुर्ण वाटी तिखट घालत नाही. अर्धी वाटी घालते. बाकी जिन्नस- नारळ, तेळ भरपुर असल्याने चवीला तेव्हढे तिखट लागत नाही.
.
दिनेशदा, सुक्या खोबर्‍याचे पण बरोबर. मला नारळ आवडते म्हणुन मी नारळ घालते. काही लोक खोबर्‍या ऐवजी दाण्याचा कुट पण घालतात.

पण सुके खोबरे जर पिठल्यात घालायचे झाले तर कसे आणि केंव्हा घालायचे?

सुके खोबरे भाजुन बारीक करुन घ्यायचे आनी मग बेसन (ह.डा. पी) शिजत आल्या नंतर टाकायचे. ह्या पीठल्यामधे नाही टाकले तरी चालते फक्त थोड तिखट होते.
सुके खोबर-याचा तुकडा तसच गॅस वर भाजला तर चव जास्त छान लागते. फक्त रंग किंचित काळपट होतो. त्या ऐवजी खोबरे किसुन भाजुन टाकले तरी चालते. रंग काळपट होत नाही.

माझ्या एका तेलुगू कलीगने आज एक टिप दिली मला. ती इथेच लिहितो आहे.

पत्ताकोबीची भाजी होत आली की त्यात ओली उडदाची डाळ वाटून टाकावी त्यामुळे भाजीला छान चव येते आणि शिवाय भाजीतले पाणी देखील कमी होते. आपण पिठ पेरून पत्ताकोबी करतो त्याऐवजी वाटलेली डाळ घालायची. पण खूप नाही फक्त स्वाद येण्यापुरती. आज मी ही भाजी खाल्ली. एकदम छान चव होती.

नेमस्तक ही टिप कुठे टाकू असा विचार करता करता इथेच लिहीली.

आणि चिकन बाजुला ठेवुन <<< ते कोणी खाल्ले मग ? Happy

मस्त रेसिपी आहे. मी खूप वेळा करते हे पिठलं. अर्थात समप्रमाणात तिखट घालायची हिंमत होत नाही.
आज लसणीच्या पातीची चटणी, भाकरी आणि हे पिठलं केलं होतं.

pithale.jpg

मी दर सोमवारी करते रावण पिठले. Happy
फक्त मी त्यात आलं लसुण पेस्ट घालते आणि खोबरं कोथिंबीर घालत नाही. बाकी हेच प्रमाण...जेवढ्यास तेवढे फक्त तेल जर कमी घालते नाहीतर नवर्‍याच्या डब्यातुन ते तेल सगळीकडे वहायला लागतं

आधीही तूच लिहीलेली रेसिपी वाचली होती कुठेतरी, बहुतेक जुन्या माबोवर. करुन पाहीन एकदा, पाव वाटी तिखट घालून Happy

पत्ताकोबीच्या भाजीत उडदा ऐवजी भिजलेली हरभर्‍याची डाळ टाकतात. मला स्वतःला हरभर्‍याची नि तुरीची डाळ यातला फरक कळत नाही, पण बहुधा हरभर्‍याचीच असावी.

एक वाटी तिखट?!!!! बाबो! दशमुखी मुखी रावणा ऐवेजी एखाद्या "दशबुडी" राक्षसाचे नाव द्यायला हवं होतं. त्यांनाच ते खाणे आणि खाऊन, पचवुन जिवंत राहणे शक्य आहे! Proud

एकदा "थ्रील" म्हणुन बनवून (आणि खाऊन) बघायला पाहिजे. Happy

थ्रिल म्हणून बनवा पण तिखट कमी घाला. त्यात खोबरे, तेल पण असतेच ना बरोबरीने. त्याने तिखटाचा इफेक्ट कमी होतो.

झक्की, गल्ली चुकलं काय ?

ज्ञाती, मग नव्या मायबोलीतलेच आठवत असेल तुला Happy

बी | 24 July, 2008 - 14:19

माझ्या एका तेलुगू कलीगने आज एक टिप दिली मला. ती इथेच लिहितो आहे.

पत्ताकोबीची भाजी होत आली की त्यात ओली उडदाची डाळ वाटून टाकावी त्यामुळे भाजीला छान चव येते आणि शिवाय भाजीतले पाणी देखील कमी होते. आपण पिठ पेरून पत्ताकोबी करतो त्याऐवजी वाटलेली डाळ घालायची. पण खूप नाही फक्त स्वाद येण्यापुरती. आज मी ही भाजी खाल्ली. एकदम छान चव होती.

नेमस्तक ही टिप कुठे टाकू असा विचार करता करता इथेच लिहीली.

>>>>>>>> मला वाटतं झक्कींची पोस्ट 'बी'च्या या पोस्टला उद्देशून आहे. Happy

काल करुन पाहिले (कमी तिखट घालुन ) आवडले, खूप वर्षांनी इतक्या चवीने पिठले खाल्ले गेले Happy
धन्यवाद सिंडरेला.

Pages