सीएनएन वर ही फन क्विझ बघितली आणि नव्वदच्या दशकातील अहगहनिअहतह आठवणींना ऊजाळा मिळाला.
http://www.cnn.com/2015/06/30/entertainment/ultimate-back-to-the-future-...
मी आजवर बघितलेल्या द विटिएस्ट, फनिएस्ट, मोस्ट एंटरटेनिंग यट एज्युकेशनल अश्या एकमेवाद्वितीय ट्रिलॉजीच्या म्हणजेच 'बॅक टू द फ्युचर' च्या सिनेमांच्या आठवणींनी एवढे मस्तं वाटले की लागलीच संग्रहातून काढून ह्या एवरग्रीन ट्रिलॉजी दोन पारायणे करून टाकली. एवढ्या वर्षांनंतर बघितल्यानंतर डोक्यात एकच विचार आला..
ग्रेट स्कॉट!! धिस ईज हेवी.
सगळ्यात जास्तं मज्जा आली ते १९८५ मध्ये २०१५ साल कसे असेल हे चित्रित केलेले आहे ते २०१५ मध्ये बघणे.
मायकल जे फॉक्स, क्रिस लॉईड, ली थॉमसन आणि थॉमस विल्सन ह्यांनी ८० च्या दशकात (८५ ते ९०) मध्ये जो काय धुमाकूळ घातला तो पाहून केवळ सायन्सच्या फॉलोअर्सनीच नव्हे तर जगभरातल्या कुठल्याही प्रकारच्या सिनेमाच्या चाहत्यांनी त्यांना एवढे डोक्यावर घेतले की आपण 'कल्ट फॉलोअर्स' कधी झालो हे त्यांना कळालेही नसेल.
मनोरंजनाचा हा अप्रतिम खजिना, ही काळाची सफर घडवून आणल्याबद्दल झेमेकिस आणि गेल ह्यांना अगदी लवून कुर्निसात वगैरे करावासा वाटतो.
हॅरी पॉटर पुस्तक/सिनेमांसारखंच ह्या सिनेमात दाखवलेल्या प्रत्येक मिनिटाबद्दल खूप काही लिहिण्यासारखं आहे पण नमनालाच घडाभर तेल ओतण्याआधी ह्या सिनेमांचे ईथे कोणी पंखे आहेत का ते बघावं असं वाटलं
मी आहे भौ लै मोठा पंखा! अशक्य
मी आहे भौ लै मोठा पंखा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशक्य मजा आणली होती ह्या सिनेमानी जेव्हा पाहिला तेव्हा. खरय, प्रत्येक शॉट्/प्रसंगाबद्दल चवीने चर्चा होऊ शकते. मला तो अलटरनेट फ्युचर मध्ये जातो ते, बिफ बरोबरचा अॅलमनअॅक वाला प्रसंग आणि अर्थातच शेवटचा वीज चमकते तो प्रसंग खुप आवडतात. आता मी पण बघायला घेतो परत एकदा!
I bought this trilogy for my
I bought this trilogy for my kids at Christmas time, but they didn't watch the movies until March. My sone was hooked about 15 minutes into the first one. He has watched all three at least 4or five times since then. He once told me that he is sad, he couldn't watch the movies in 1985![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो बुवा तो अॅलमनॅक वाला
हो बुवा तो अॅलमनॅक वाला प्रसंग प्रचंड डोकं लावून एग्झिक्युट केला आहे. डॉक नेहमीच टाईम कंटिन्युअम बद्दल आणि त्यात ढवळा ढवळ न करण्याबद्दल किती कळकळीनें बोलत असतो. बिफ ज्यावेळी २०१५ मधून १९५५ मध्ये जाऊन अॅलमनॅक देतो त्यावेळी आपल्याला वाटते ठीक आहे (मार्टी ला पन सेमच वाटते) पुन्हा फ्युचर मध्ये जावून आपण बिफ ला डेलोरिअन चोरण्यापासून रोखू आणि १९८५ पुन्हा पहिल्यासारखे होईल![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो मेधा, त्या सिनेमाने १९८५ मधल्या लाखो अमेरिकन टीन्सना 'मायकल जे फॉक्स' सारखा टीन हीरो, हवर बोर्ड (जो आता अस्तित्वात आहे), २०१५ कसं असेल ह्याचं थ्रिल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायन्स फिक्शन विषयातून मनोरंजनाची कमाल दाखवली. ते मुवी खरोखरंच ग्रिपिंग आहेत.
सध्याचे टीन्स बिचारे एडवर्ड-बेला-जेकब मध्ये अडकले.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
स्टॅनले क्युब्रिकचा २००१: अ स्पेस ओडीसी ..असाच एक माईलस्टोन मुवी...पण त्यबद्दल पुन्हा कधी तरी.
सध्या फक्त डॉक आणि मार्टी विषयी बोलू.
रविवारी च लागला होता कोणत्या
रविवारी च लागला होता कोणत्या तरी channel वर. मी पण fan आहे या ३ movie ची. एकदा यातले कलाकार आता कसे दिसतात ते पाहिले पाहिजे. म्हणजे कळेल त्यांनी २०१५ साठी जसा makeup केला आहे तो किती बरोबर आहे.
Just love it!
Just love it!
तरल क्रिस लॉईड (डॉक ब्राऊन),
तरल
क्रिस लॉईड (डॉक ब्राऊन), थॉमस विल्सन (बिफ) आणि ली थॉमसन (लॉरेन) अजूनही सिनेमात अॅक्टिव आहेत.
पण मायकेल जे फॉक्स मात्र पार्किन्सन्स ने त्रस्त आहे, अगदी ईंटर्व्यू मध्ये वगैरे सुद्धा बघवत नाही त्याला.
मी यातले दोन चित्रपट तेव्हा
मी यातले दोन चित्रपट तेव्हा थ्येटरात जाऊन पाहिले होते. अगदी गुंग होऊन. लैच्च मज्जा आली होती. मध्यंतरी यूट्यूबवरही पाहिले. खूप गंमत वाटली तेव्हा आताचा काळ कसा चित्रित केलाय हे बघून. मग असेच विरंगुळा म्हणून टाईम ट्रॅव्हलचे त्या व आजूबाजूच्या काळात निर्मिले गेलेले बरेच इंग्रजी चित्रपट एकामागोमाग एक धपाधप पाहिले. या सर्व चित्रपटांमध्ये आता एक प्रकारचा इनोसन्स (!) जाणवतो. नक्की काय ते सांगता येत नाही. पण कदाचित त्या काळाशी मी जास्त 'रिलेट' होत असेन म्हणूनही असेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरं आहे! एकदम 'फील गूड' की
खरं आहे! एकदम 'फील गूड' की काय तसं वाटतं हे मुवी बघून.
आजची एवढी प्रगत टेक्नॉलॉजी आणि बाकी सायफाय बघून कदाचित 'बॅक टू द फ्युचर' मागास वाटतील की काय अशी धारणा होवू शकते पण पहिल्या अर्ध्या तासातंच आपण काहीतरी अप्र्तिम बघत आहोत असे वाटल्या वाचून राहणार नाही.
विशेष म्हणजे काहीशा विचित्र
विशेष म्हणजे काहीशा विचित्र योगायोगाने दि. ११ ऑगस्ट २०१५ रोजी "पार्किन्सन्स" त्रासामुळे आपल्या ह्या लाडक्या मायकेल जे. फॉक्सचे निधन झाल्याच्या वार्ता नेटवर पसरल्यावर त्याच्या अगणित चाहत्यांना साहजिकच धक्का बसला. आज ५४ वर्षाचा असलेला हा अगदी सदैव "इनोसन्ट" दिसणारा वागणारा कलाकार आजारी असला तरी जिवंत असून त्याने आणि त्याच्या हितचिंतकानी त्या 'फेक न्यूज' ला लागलीच ट्विटरवरून खुलासेवजा उत्तर दिले. देव याला उदंड आयुष्य देवो.
आज त्या व्याधीमुळे चित्रपटसंदर्भातील त्याची कामे बंद असली तरी त्याला "बॅक टु द फ्यूचर" मुळे कुणी विसरेल असे कधीच वाटत नाही. पहिल्या भागातील "मागील काळात" गेल्याबद्दल त्याला वाटणारे कमालीचे आश्चर्य आणि आजुबाजूला घडत असलेल्या घटना पाहताना त्याच्याकडून होणारा मजेशीर गोंधळ आजही मनासमोर आला या आठवणीमुळे.....विशेषतः हा पोरगा आपला पंचविशीतील डॅडी विशीतील मम्मीवर "लाईन" मारण्यासाठी झाडावर चढत असल्याचे दृश्य पाहून ह्या "मुलाच्या" मनाची होणारी घालमेल पाहून प्रेक्षकवर्गात धमाल उडते. फार मजेशीर आहे ते सारे.
हा हा अशोक!! अमेझिंग आहे तो
हा हा अशोक!! अमेझिंग आहे तो सीन.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला नाही वाटत पहिल्याने सिनेमा बघणार्या कुणालाही (मार्टी सहित) झाडावरून पडलेल्या जॉर्जला मार्टी वाचवतो त्याचे नेमके परिणाम काय होणार आहेत त्याची पुसटशी सुद्धा कल्पना आलेली असते.
बिफ बरोबरच लॉरेनचेही तीनही सिनेमांमध्ये वेगळे रोल्स आहेत, आणि तिने कमाल केली आहे तीनही रोल्स मध्ये.
एका ईंटर्व्यू मध्ये बॉब गेल म्हणाला
My wife and I went to see Knocked Up. There’s that scene where they’re talking about what they’d do if they had the DeLorean, and the girl had never seen the movie. I turned to my wife and said, ‘Well, this isn’t realistic. How can somebody not have seen Back To The Future?’"
फॉक्स बद्दल प्रचंड अनुमोदन.
मला २००२ मध्ये पहिल्याने लॉर्ड ऑफ द रिंग्जच्या फ्रोडोला बघून का कुणास ठाऊक मायकल जे फॉक्स आठवला. आणि सरप्राईजिंगली ईलायजा वूड १९८९ च्या बॅक टू द फ्युचर २ मध्ये पहिल्याने फॉक्स बरोबर पडद्यावर आला होता. वूड आणि फॉक्स मध्ये काही तरी साम्य आहे मला ते नेहमी एकमेकांची आठवण करून देतात.
फॉक्स ला एवढ्या लहान वयात पार्किस्नन्स होणे हे खरंच खूप दुर्दैवी आहे.
बाय द वे आज २१ ऑक्टोबर २०१५
बाय द वे
आज २१ ऑक्टोबर २०१५ आहे....हीच ती तारीख 'बॅक टू द फ्यूचर २' मध्ये मार्टी मॅकफ्लाय' आणि डॉक ब्राऊन १९८५ मधून टाईम ट्रॅवल करून आले होते. 'बॅक टू द फ्यूचर २' च्या पंख्यांसाठी मोठी पर्वणीच आहे आज.