याकूब आणी फाशी.

Submitted by vijaykulkarni on 21 July, 2015 - 20:43

सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.

१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.

२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.

३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.

४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.

५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.

६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?

७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?

८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्‍यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्‍याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या शशी थरुर व त्यांच्या नालायक कॉंग्रेज पक्षाला फाशी विरोधात बोलायचा, नैतिक आधार तरी आहे का?

याकुबच्या फाशीत न्यायालयीन प्रक्रीया सुरु असताना डेथ वॉंरट इश्यु करणे ही चुक वगळता, सर्व प्रक्रिया जेल मॅन्युअला धरुनच झाली. मात्र अफजल गुरुच्या फाशीच्या वेळी, *"पुढील निवडणुकांत मतांची बेगमी करायला" माननिय सर्वोच्च न्यायालयाचे सर्व आदेश धाब्यावर बसवुन रातोरात अचानक पणे त्याला फासावर चढवले. आणि आता शशी थरुर आणि दिग्विजय सिंग सारखे कॉंग्रेजचे वाचाळ नेते, न्यायव्यवस्थेने दिलेल्या याकुबच्या फाशीवर आणि सध्याच्या सरकारवर टिका करत आहेत.

नैतिक अधिकार फक्त नालायक भाजपाच्या शत्रुघ्न सिन्हा राम जेठमलानी यांना दिलेला आहे. ते ही लिखित स्वरुपात Rofl
अरे हो साबिर अली ज्याला दाउदचा जावई असे म्हणणारे नक्वी आता देशभक्त साबिर अली म्हणू लागले का? Rofl

अरेरे ! का त्या बिचार्‍या शत्र. सीन्हाला दोष देताय ?

त्याची मुलगी षिनिमावाली. दाउअदचं पाय चाटलं नाही तर बिचारीच्या षिनिमाच्या करियरचं काय होइइल ?

अफजल गुरु आणि अजमल कसाब यांना गुपचूप फाशी देण्यावरुन गदारोळ झाल्यानंतर सुप्रिम कोर्टाने फाशीची अंमलबजावणी करण्याचे प्रोटोकॉल निर्धारीत केलेले आहेत. या प्रोटोकॉलनुसार फाशी देण्याची तारीख जाहीर करुन मग त्या दिवशी फाशी देण्यात यावं असं स्पष्ट केलेलं आहे. याच कारणामुळे याकूबच्या फाशीची तारीख आधी जाहीर करण्यात आली होती असं वाचलं आहे. बाकी मिडीयाने जो काही तमाशा केला त्या बद्दल न बोलणंच श्रेयस्कर!

लोकहो,

राममंदिर दंगलींचा बदला घ्यायचा म्हणून मुंबईत बॉम्बस्फोट करण्यात आले असा एक समज आहे. मात्र तो तितकासा खरा नसावा.

अवघ्या तीन महिन्यांत एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटांची तयारी करता येत नसते. स्फोटकं साधीसुधी नव्हती. त्यांची पहिली जुळणी तत्ज्ञामार्फत केली गेली होती. नंतर ती हस्तांतरणार्थ विलग करून परत घटनास्थळी (मेमनच्या घरी) एकत्र सांधली होती. यासाठी बरंच आधीपासून नियोजन आणि प्रशिक्षण होत असणार.

याकूब मेमनचा भाऊ शासकीय कचेरीत कारकून म्हणून कामाला होता. स्फोटांच्या दोनतीन दिवस आधी त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यासठी अर्ज वर्षभर आधी करावा लागतो. स्फोटांच्या बरोबर एक वर्ष आधी त्याने अर्ज टाकला होता. बॉम्बस्फोट वाटतात तेव्हढे सरळ नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

Proud

मंदिर व स्फोट यांचा संबंध आहे हे मान्य केले तर भाजपीही फासावर लटकतील.

Proud

मंदिर वही बनायेंगे या घोषणाही प्रत्यक्ष पाडापाडीच्या कितीतरी आधीपासून सुरु होत्या.

मंदिरासाठी गोळा केलेले चौदाशे कोटी कुठे गेले ? हिंदू माहासभा म्हणते विश्व हिंदू परिषदेने चौदाशे कोटी खाल्ले .

http://indianexpress.com/article/cities/lucknow/ram-temple-in-ayodhyahin...

चौदा वर्स वनवास भोगलेल्या देवाच्या नावाने चौदाशे कोटी हडप केले ! भगवी उपरणी , शाली घालून उगाच ओरडत होते ? मंदिर वही बनाय्वंगे ! Proud

Proud

बाबरी मस्जिद ६ डिसे. ला पाडली गेली होती.

बाँब्स्फोटाचे सर्व मटेरियल, आरडीएक्स वगैरे ऑक्टोबर मधेच शेखाडी आणी ईतर ठिकाणी ऊतरवण्यात आलेले होते ऑलरेडी यावर काय म्हणणं आहे समर्थन करणार्यांच?

याकूबच्या अंत्ययात्रेत लोक आले म्हणून भीती वाटणा-या द्वेषभक्तांचं हसू येतं. फोटो शॉप्ड मेसेजेस फिरत असताना, , पाकिस्तानातले फोटो भारतातले म्हणूपाकिस्तानातले, अशाच फेसबुक वरून पेटलेल्या दंगलीत पुण्यात एका सॉफ्टवेयर इंजिनियरचा त्याने दाढी ठेवली होती म्हणून खून झाला तेव्हां अशी भीती त्यांना वाटली नाही याचं विशेष आश्चर्य वाटलं नाही.

त्यांचे इंटरेस्ट वेगळे आहेत का ?

एखादी विधानसभा अतिरेक्यला फाशी देऊ नये म्हणून ठराव करते तेव्हा भिती वाटत नाही ?
<<
छे छे! ते अतिरेकी नव्हेत. फक्त खूनी आहेत.

m.timesofindia.com/india/Tripura-governor-labels-Memons-mourners-potential-terrorists/articleshow/48302615.cms

असे मानसिक अतिरेकी माबोवरपण दिसू लागले आहेत हल्ली.

आजकाल आपण आपला पर्स्पेक्टिव्ह, (निकोप) दृष्टीकोण, घालवून बसत आहोत असं फार वेळा जाणवतं अन उद्विग्न व्हायला होतं. हा धागा सुरू झाला तेव्हा पासून आतापर्यंतची "चर्चा" पाहिली तर एक उन्माद, जो खरंतर बॅकग्राउंडला अन पुसटसा असायला हवा, तोच मुख्य विचारधारा झाल्यासारखा पुढे येऊ लागलाय असं प्रकर्षाने जाणवू लागतं.

हे का होतंय याचा थोडा विचार करून पाहिला, तेच लिहितो आहे.

आजकाल दिसतंय असं, की आपण संदर्भ, संयम हरपून, कुणी थोडाही विरोधी आवाज काढला, की 'हा देशद्रोही', हा 'भावी अतिरेकी' असली लेबलं चिकटवून मोकळे होऊ लागलो आहोत. भरीस भर म्हणजे निराधार, अभ्यासहीन सोशल-मेडिया-फॉर्वर्ड्स वाचून आपण आपली मते बनवू लागलो आहोत. मुळापासून अभ्यास, वाचन, त्या-त्या काळातल्या लोकांनी त्या-त्या काळाच्या, समाजाच्या संदर्भांनुसार वागणूक कशी केली याचा पर्स्पेक्टिव्ह कुठेतरी हरवून जातो.

का होतंय असं? WHY?

Are we, as a People feeling threatened by something or someone? Is there, in fact, ANY REAL threat to us as a People? To integrity of our Nation? And if there is, what is the exact nature of that threat?

आपल्याला कुणापासून तरी धोका आहे. कुणीतरी आपला देश, धर्म, बुडवून टाकू पाहतो आहे असा भयगंड येतोय का? कुठून येतोय? अशी परिस्थिती खरेच आहे काय? या भयगंडामुळे नक्की काय होतंय?

अन मुळात, आपला "धर्म" म्हणजेच भारत देश आहे काय?

अशा भयगंड पसरवणार्‍या बातांना शांत करण्यासाठी खरे तर 'विचारवंत' नामक जमात कामाची असते. गे लोकांचा प्रश्न असो, कुठल्याश्या पुस्तकात काय लिहिलंय त्याबद्दलची चर्चा असो, की 'इर्रिवर्सिबल' म्हणून फाशीची शिक्षा द्यावी की न द्यावी, अशी अ‍ॅबस्ट्रॅक्ट चर्चा असो.

'श्रद्धा' अन विश्वासावर काम करणार्‍या आपल्या मानसिकतेस, त्या विचारवंतांनी 'विचार' केलाच असेल, हे गृहितक आजवर मान्य होते. त्यामुळेच त्यांची मतप्रदर्शने, प्रथमदर्शनी अवास्तव, अतिशयोक्त वाटत असलीत, तरी आपण सगळे तटस्थतेने पाहत होतो. त्यांच्या चर्चा, वादविवादांतून काही निष्पन्न होईपर्यंत वाट पाहत होतो. अन बहुतांश वेळा, चांगलेच निष्पन्न होत आहे, असे दिसूनही येत होते.

कुणातरी बहुचर्चित फाशीच्या शिक्षेने चर्चा ट्रिगर होते. 'इंतेलिजेन्सिआ' उर्फ 'विचारवंत' काही भूमीका मांडतात. काही जेश्चर्स करतात. अनेकदा अशा भूमीका मुद्दाम मांडल्या जातात. कारण, उदा. समजा, माझ्यावर किंवा कुणा क्ष व्यक्तीवर, खुनाचा आळ आला, अन काही कारणांनी तो कोर्टात खोडून काढता आला नाही. मला फाशी झाली. मला फासावर लटकवलेही. अन त्यानंतर काही दिवसांनी वेगळा पुरावा कोर्टासमोर आला. आता, त्यानुसार जर मी निर्दोष सिद्ध झालो, तर माझी फाशी रद्दबातल कशी होणार? ही थिअरॉटिकल भूमीका घेऊन कुणितरी फाशीचा विरोध करतो. यावर चर्चा घडून यावी अशीच त्यापाठी इच्छा असते.

दुसरे उदाहरण, श्रीशांतला मॅचफिक्सिंगमधून दोषमुक्त केले. पण, त्याची करपलेली कारकीर्द, हुकलेल्या मॅचेस, गेलेला फॉर्म अन काळ, कोण व कसा भरून देणार?

त्या अ‍ॅबस्ट्रॅक्ट मुद्यांवर चर्वितचर्वण सुरू होण्याच्या आतच, टेलेमेडिया अन सोशल मेडियाच्या मनोवेगे प्रसार करण्याच्या क्षमतेमुळे, त्या चर्चेला वेगळे वळण लागते.

मी दिलेल्या उदाहरणांत याकूब अन श्रीसंतची तुलना कशी काय करता, जिहादी ते जिहादीच, वगैरे भडक पोस्टी, प्रत्युत्तरे ताबडतोब येतील. मुद्दा पर्स्पेक्टिव्ह घालवून बसण्याचा आहे.

इथे फाशीबद्दलची चर्चा मांडणार्‍या कुणीही याकूब दोषी नाही, असे म्हटलेले नाही. पण केवळ त्याच्या फाशीबद्दल बोलणे सुरु केले, तेही सध्याच्या सरकारी भूमीकेशी सुसंगत नसलेले, म्हणजे झालंच. हा नक्कीच देशद्रोही अशा गप्पा इथे सुरू झाल्या आहेत.

का होतंय हे असं? आपला उदारमतवाद. आपला 'सेक्युलरिझम'. कुठे गेले हे सगळे?

संत, संस्कृती यांचा उदोउदो करताना, जातींनुसार संत वाटून घेताता, त्यांनी समोरचा माणूस देवच आहे. त्याची जात/धर्म पाहू नका, हे सांगितलं, तो उदारमतवाद आम्ही विसरतो. अन सेक्युलरिझम म्हणजे राजसत्तेच्या कामात धर्माची ढवळाढवळ नको, ही व्याख्याही विसरतो. राजसत्तेसमोर सगळे सारखे. कुणाला झुकते माप नको, अन कुणाला फक्त त्या आधारेच गुन्हेगार ठरवणेही नको. [उदा. फासेपारध्यांना गुन्हेगार जमातीचा (ब्रिटिशकालीन) दर्जा. ]

कुठेतरी विचारवंतांना विचारजंत ठरवणे सुरू झाले. कुठेतरी सेक्युलरिझमचा अर्थच बदलून 'सर्वधर्मसमभाव' असे ठरवत, त्यालाच लांगूलचालन म्हणत, त्या विचाराच्या व्यक्तींचेही चारित्र्यहनन सुरू झाले. कुठेतरी आपल्याच आपल्यावरच्या विश्वासाला तडा देण्याची प्रक्रिया सुरू झाली.

हे का, अन कसं झालं? कुणी हेतुपुरस्सर तर नाही ना केलेलं?

मेमनच्या अंत्ययात्रेत 'दिसलेल्या' गर्दीबद्दल इथे वाचलेल्या प्रतिसादातलं हे आवर्जून डकवावंसं वाटलं.

  • मेमन कुटुंब माहिमला राहतं. आधी बॉडी तिथे आणली गेली.
  • बडा कब्रस्तान चर्नी रोड - मरिन लाइन्सला आहे. (माहिमपासून अंतर - सुमारे १२-१४ किमी)
  • पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता आणि अ‍ॅम्ब्युलन्समधून बॉडी नेली (म्हणजे 'जनाजा' खरं तर निघालाच नाही.)
  • चार वाजता अ‍ॅम्ब्युलन्स माहिमहून निघाली आणि साडेचारच्या आत कब्रस्तानला पोचलीदेखील.
  • १५,००० लोकांचा जमाव जर १२-१४ किमी गेला असता तर वेळ जास्त लागला असता.
  • थोडक्यात, माहिम आणि कब्रस्तान ह्या दोन्ही ठिकाणी बघ्यांची गर्दी जमलेली होती, पण अंत्ययात्रेत सामील होणं त्यांना शक्यच नव्हतं, कारण अंतर खूप होतं, पोलीस बंदोबस्त होता आणि अंत्ययात्रा निघालीच नाही.

आपल्या देशात बघ्यांची कमी नाही. काही खुट्ट झालं की गर्दी गोळा होऊन गम्मत पाहते. अगदी आपल्या गल्लीतून अनोळख्याची अंत्ययात्रा निघाली तरी बघे जमतातच. ते सगळे शोकाकुल अन त्या मृताचे सगेसंबंधी नसतात हो!

अन इथे जर तसे लेबल लावून आपणच 'आपले' अन 'त्यांचे' असे करायला लागलो, तर अशा वागण्याने आपणच आपले शत्रू निर्माण करीत असतो, नाही का?

इथेच मनात दुसरा प्रश्न येतो, तो मागच्या फाशी दिल्या, त्यावेळी 'चोरासारख्या' गुपचूप दिल्या गेल्या. मृतदेहाची विल्हेवाट सरकारनेच लावली. 'त्या' मेलेल्यांना 'मार्टियर' 'हुतात्मे' व्हायची, त्यांच्या कबरी बनवायची संधी दिलीच गेली नाही. जशी अमेरिकेने ओसामाची कबर बांधू दिली नाही. (*संपादन: बांधायचा चान्सच निर्माण होऊ दिला नाही.) कारण जिहादी लोकांना तिथे 'वारी करण्यासाठी' सिंबॉल मिळू नये.

मग यावेळी हे असं का घडलं?

आता हा प्रश्न माझ्या मनात आला म्हणजे मला लेबल मिळणार का?
*

कालच मला सांगण्यात आलं, की तुम्ही फाशीच्या विरोधार्थ हातभर पोस्टी लिहिता, अन नंतरच्या १५००० बद्दल फिलॉसॉफिकल प्रश्न विचारता, असं का? तेव्हापासून अन त्याही आधीपासूनचं डोक्यातलं चक्र सुरू आहे म्हणून हा हातभर टंकन प्रपंच.

अन हो,
मी फाशीच्या विरोधात लिहिलेली एकही पोस्ट माझ्या कुण्या हितचिंतकांनी इथे डकवाच. Happy

विकुंनी शेवटचा प्रश्न विचारला आहे त्यामुळे बरंच काही डोक्यात आलेलं. पण आवरलं.

राजीव गांधींच्या मारेक-यांना मिळणा-या पाठिंब्यामुळे , तिथलं सरकार दबून मारेक-यांना सोडून देतं याला लोकप्रिय राजकारण म्हणत असावेत. या घटनांमुळे द्वेषभक्तांना भीती वाटत नाही असं का ? एकतर ते "आपल्याला" धोकादायक आहेत असं वाटत नाही.

किंवा त्यांच्याबद्दल अशी चर्चा करून हवं ते पोलरायझेशन होणार नाही. यातलं एखादं कारण खरं असेल. द्वेषभक्तांचा चष्मा चढवला तर तिकडून सगळं बरोबर दिसेलच.

कधी कधी आपण द्वेषद्रोही आहोत याचा अभिमान वाटतो.

"तिथे" बरीच सेन्सीबल चर्चा झालेली आहे. विशेष म्हणजे प्रमाणपत्रं देणा-यांना फेकून दिलेलं आहे चर्चेच्या बाहेर.

दीमा - चांगली पोस्ट. फक्त 'सेक्युलर' चा उल्लेख सोडून. तो भारत सरकारनेच तसा अर्थ केलेला आहे. अगदी पूर्वी 'आकाशवाणी' वर सरकारतर्फे प्रसारित केलेल्या जाहिरातीतून सुद्धा तसाच संदेश दिला गेलेला आहे.

राजीव गांधींच्या मारेक-यांना मिळणा-या पाठिंब्यामुळे , तिथलं सरकार दबून मारेक-यांना सोडून देतं याला लोकप्रिय राजकारण म्हणत असावेत. या घटनांमुळे द्वेषभक्तांना भीती वाटत नाही असं का ? एकतर ते "आपल्याला" धोकादायक आहेत असं वाटत नाही. >>> हे निरीक्षण खरे असावे. पण त्याचे कारण असेही असेल की असे केल्याने तमिळ लोक भारताविरूद्ध काही षडयंत्र रचत आहेत, किंवा यापुढे तमिळ लोकांच्या निष्ठा देशाबाहेर आहेत्/निर्माण होतात अशी भीती या गटाला वाटत नाही. ते का ते सहज समजू शकते. येथे मुस्लिमांच्या घाउकरीत्या तशा आहेत असे मला सुचवायचे नाही, किंबहुना त्या तशा नाहीत असेच माझे मत आहे. मी तुम्ही जो गट डोक्यात धरला आहे त्याबद्दल बोलतोय.

दुसरे म्हणजे सोशल नेटवर्क्स वर (सर्वांच्या नव्हे, पण) बहुतेकांच्या बाबतीत एक 'पेट' धर्म, जात व नेते असतात. त्यांच्यावरच्या टीके विरूद्ध ते जास्त पेटून उठतात - तितके इतर धर्म, जात व नेत्यांबद्दल पेटून उठत नाहीत. उलट स्वतःच्या आवडत्या नेत्यावर जराही टीका सहन न होणारे अनेक लोक तशीच किंवा त्याहीपेक्षा वाईट शब्दांतील टीका दुसर्‍या नेत्यांवर सहज करतात. इथे वरच्या उदाहरणात अनेकांना मुस्लिमांच्या संघटित होण्याची जी भीती (म्हणजे कन्सर्न या अर्थाने) वाटते तेवढी तमिळ वा इतरांबद्दल वाटत नाही.

अनेकांना मुस्लिमांच्या संघटित होण्याची जी भीती (म्हणजे कन्सर्न या अर्थाने) वाटते तेवढी तमिळ वा इतरांबद्दल वाटत नाही. >>

तो ही दहशतवाद आहे,संघटीत आहे. पण या दोन गटात दंगली झालेल्या नाहीत.
बाबरी पाडली तेव्हां रेल्वेत मुस्लिम दिसला की त्याला पाहून शेरेबाजी सुरू व्हायची, त्याने उत्तर दिलंच की हाणामारी व्हायची. इटारसीच्या पुढे मी पाहीलेलं आहे. भीती वाटली होती. फेसबुक वर अशाच प्रकारच्या पोस्ट्स ( फोटोशॉप्ड) कराचीमधली पोस्ट भारतातल्या हैद्राबाद बद्दल वगैरे, तेव्हां ही भीती वाटत नाही का असा प्रश्न होता तो. की अशी भीती निर्माण व्हावी आपल्याच बांधवांमधे) असा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो का हा प्रश्न आहे.

असे प्रयत्न इतर कोणताही समाज, नेता करत असेल तर माहीत नाही. पण मुख्य राजकीय पक्ष अपवाद नाहीत. इंदिरा गांधींनी भिंद्रानवालेंना मारण्यासाठी आदेश दिले, पण भिंद्रानवालेंना कुणी बनवलं याचं उत्तरही दिलं गेलं पाहीजे,

आपलं स्वार्थी राजकारण चालू रहावं यासाठी विविध समाजगटांना एकमेकांशी झुंजवत ठेवण्याचं राजकारण हे आता अत्यंत खतरनाक मार्गाकडे वळत आहे. जस जसं लोकांना यातले एकेक किस्से कळताहेत, ते त्यांच्या आकलना प्रमाणे अर्थ लावून प्रतिक्रिया देत आहेत. त्याचं स्पष्टीकरण करायला संबंधितांकडे तोंड नाही.

दी.मा. , अतिशय सुंदर पोस्ट.
विवेकाचा आणि विरोधी मताचा आवाज दडपून टाकण्याचा हा प्रकार उद्वेगजनक आहे. एकीकडे आणीबाणीतल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीचा तीव्र निषेध करताना(तो योग्यच आहे) दुसरीकडे विचारवंतांकडून एकही विरोधी शब्द आला की गदारोळ करायचा, त्यांना देशद्रोही म्हणायचे, इतकेच नव्हे तर सामूहिक टिंगलटवाळीद्वारे त्यांची अभिरुचिहीन थट्टा करायची हे कोणते अभिव्यक्तिस्वातंत्र्य? सव्वाशे वर्षांपूर्वी आगरकरांनी 'विचारकलहाला का भिता?' असा प्रश्न उपस्थित केला होता तो आजही तितकाच सुसंगत वाटतो.

तो भारत सरकारनेच तसा अर्थ केलेला आहे. अगदी पूर्वी 'आकाशवाणी' वर सरकारतर्फे प्रसारित केलेल्या जाहिरातीतून सुद्धा तसाच संदेश दिला गेलेला आहे.
<<
म्हणून मूळ शब्दाचा अर्थ बदलतो का? बदलावा का? Happy

Pages