सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.
१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.
२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.
३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.
४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.
५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.
६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?
७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?
८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?
याबद्दल दोन्ही बाजूने बरेच
याबद्दल दोन्ही बाजूने बरेच वाचले गेल्या एक दोन दिवसात. एक मला समजत नाही की सुप्रीम कोर्टाचा निर्णय राजकीय कसा असेल? पार्डन नाकारायचा निर्णय राजकीय असू शकतो, पण सुप्रीम कोर्टाने फाशी ठरवली ती पुरावे असल्याशिवाय कशी असेल?
दुसरे म्हणजे तुम्ही येथे एक पॅटर्न दाखवत आहात - ज्यात भारत सरकार मुस्लिम आरोपींना सबळ पुराव्याअभावी फाशी देत आहे असे ध्वनित होत आहे. पण याचबरोबर याच खटल्यात इतर अनेक मुस्लिम आरोपींची पुराव्याअभावी सुटकाही झालेली आहे ना?
१.फक्त आणि फक्त परिस्थितीजन्य
१.फक्त आणि फक्त परिस्थितीजन्य पुरावाच असेल तर तसा युक्तिवाद केला नाही का?
२. इतरांना पार्डन केले, त्या केसाचा संदर्भ देऊन युक्तीवाद केला नाही का?
३. शरणागती पत्करताना काय टर्म्सवर झालेली माहित नाही पण या मुद्द्याशी काही प्रमाणात सहमत.
४. राज्यांच्या विधानसभांनी पाठीशी घालणे हा चुकीचा पायंडा पडतोय असं वाटत नाही का? आणि जर ते चूक असेल तर ते मोडलं जातंय यात काही वाईट नाही.
५. या फाशीने इतरांना जरब नाही बसणार का? फाशीची शिक्षाच नसावी याच्याशी सहमत.
६. निरपराध आजोबा/ मुलगा/ नातू यांना मारणे आणि मेमनला फाशी याची तुम्हाला खरंच तुलना करावीशी वाटतेय?
७. न्यायालयाने घेतलेला निर्णय राजकीय कसा जरा आणखी स्पष्ट करून सांगाल का? बाकी रातोरात फाशी अयोग्य हे तत्वत: मान्य, पण परत त्या राज्याच्या विधानसभेने नाक खुपसलं असतं आणि कायदा आणि सुव्यवस्था इ. बागुलबुवा केला असता असं वाटत राहतं. हे समर्थन असू शकत नाही, ही परिस्थिती शरण सबबच आहे.
हाही विडंबन धागा आहे का? मला
हाही विडंबन धागा आहे का? मला तरी तसा वाटला.
तसा नसला तर मग खुप चांगला धागा आहे. मानवतावादी दृष्टिकोण बाळगुन आधी न्यायालय बरखास्त करावी.
मॅडमना सांगा पाव सेकंदात
मॅडमना सांगा पाव सेकंदात सुप्रीम कोर्टाला निर्णय बदलायला भाग पाडतील.
अरे व्वा बहूमत असून ही अजून
अरे व्वा बहूमत असून ही अजून पण माडमचे ऐकले जाते?
ऐकून धन्य झालो
१ भारतीय न्यायसंस्थेवर,
१ भारतीय न्यायसंस्थेवर, न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेवा.
२ याबाबत कल्पना नाहि, उदाहरण ध्या.
३ शरण आला म्हणुन गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाहि.
५ टेररीस्टना सामान्य गुन्हेगारांच्या तराजुत बसवु नका; त्याच्यासाठी वेगळे कायदे आहेत.
६ कायच्याकाय कल्पनाविलास.
तुमच्या लाॅजीकने ओसामाला हि टपकवायला नको होतं. बरोबर?
५ शिक्षा देताना इतरांना जरब
५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.>>> सहमत.
या आधि ही बर्याच जणांना फाशी दिली आहे म्हणुन अतिरेकी कारवाया बंद झाल्या का?
जिथे सायनाईड च्या गोळ्या गळ्यात बांधुन अतिरेकी आत्मदाह करतात ते फाशिला घाबरनार आहेत का?
अफजल गुरू आणि याकूब मेमन हे
अफजल गुरू आणि याकूब मेमन हे बळीचे बकरे बनवले जात आहेत अशी राहून राहून शंका येते. न्याय हा पूर्ण तटस्थपणे कधीच दिला जात नाही असे वाटते. निर्विवाद गुन्हा सिद्ध होण्यापेक्षा भावी गुन्हेगारांना जरब बसावी ह्या उद्देशाने काहीशा कलुषित दृष्टीने फाशीची शिक्षा दिली जात असेल. कदाचित तसे करणे समाजाकरता जास्त हिताचे असेल अशी आशा.
>>
भारतीय न्यायसंस्थेवर, न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेवा.
<<
का म्हणून? ऊर्वरित भारत हा भ्रष्टाचारात बरबटलेला असताना न्यायसंस्था मात्र धुतल्या तांदळासारखी वा नुकत्याच पडलेल्या बर्फासारखी स्वच्छ आणि पवित्र असेल अशी भाबडी अंधश्रद्धा का बरे बाळगायची? न्यायव्यवस्था चालवणारे काय आकाशातून पडले आहेत का?
>>
१९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?
<<
थोडा फरक आहे. मेमनने बाँबकरता प्रशिक्षण वगैरे करता मदत केली होती असा संशय यायला तरी जागा आहे. गोडसे आडनाव असणे हा जास्त बादरायण संबंध आहे.
>>
देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?
<<
दुसरी बाजूही लक्षात घ्या, ज्या धर्माने आपल्याला हिंदू नीट वागवणार नाहीत म्हणून भांडून, रक्त सांडून मूळ देश तोडून वेगळा देश बनवला ती आठवण सहजासहजी नष्ट होईल का? हा रक्तरंजित इतिहास ताजा असेल तर मुसलमानांबद्दल, त्यांच्या देशप्रेमाबद्दल कायमच संशय येत रहाणार आणि असे निर्णय हे ह्या संशयी वृत्तीचाच आविष्कार असावेत
या याकुब मेमनच्या आधी, या
या याकुब मेमनच्या आधी, या असल्या अतिरेकी आणि आतंकवाद्या बद्दल साहनभुती ठेवणार्या लोकांना सर्वात आधी फासावर चढवायला हवे, त्या ओसामाला मारले तेंव्हाही ह्या लोकांना असाच सहानभुतीचा पाझर फुटला होता.
सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचा व १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोटात मारल्या गेलेल्या लोकांचा अपमान करणार्या या धाग्याचा व धागा लेखकाचा निषेध!
१ याच्या विरुद्धचा पुरावा
१ याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे. >>>. आणि तरीही कोर्ट फाशी देतेय. बहुदा भारतीय न्यायव्यवस्था अतिशय नालायक आहे.
२केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे. >> करेक्ट कारण तो मेमन आहे. (संदर्भ तुमचा एक मुद्दा)
३. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत. >> हा मुद्दा थोडा मान्य आहे. पण मेमनच्या बाबतीत त्याचा गुन्हा फार मोठा होता. फाशी देण्याऐवजी त्याला आजन्म कारावास देता आला असता.
४.केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे >>. भाजपा आल्यापासून कोर्टाच्या निर्णयात पण राजकीय ताकद आणली जात आहे असे म्हणता का? ओ ओके ओके.
५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही. >> आरोपीला सुधारायची संधी देणे हे मान्य आहे. पण असे दिसते की तुमच्या "आरोपी"च्या व्याखेत "जिहादी / टेररिस्ट " पण आहे. थँक गॉड ओबामाने हा विचार करून ओसामाला जिंवत नाही सोडले.
पश्चातापात दग्ध होऊन मेमन, दाउद, ओसामा, तालिबान, इसिस ( अरे हो आणि तुम्हाला हवीअसेल तर एखादी हिंदू संघटनाही टाका, कारण ह्या लिस्ट मध्ये नाहीये) शरण येतील तो सुदिनच ठरेल. तुम्ही टेररिस्ट बाबतीत खूप आशावादी आहात. विच इज गुड. पण ती खूप भाबडी आशा आहे.
६. केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? >>
यु नेव्हर सरप्राईज्ड एनिबडी. ह्यात नावाचा काय संबंध आहे कुळकर्णी? मेमन असो की कुळकर्णी जर दहशतवादी कारवाई केली आणि कोर्टाला ( तुम्हाला नाही) ते मान्य असेल (त्यांनी केली असे) तर आडनाव बघून फाशी देणार का? मग कोर्ट कोर्ट कशाला खेळायचे आणि माझ्या पैश्यांचा (कारण मी भारतात टॅक्स भरतो) अपव्यय का?
७ हा निर्णय राजकीय आहे. >>. वर एका मुद्द्यात मी प्रतिवाद केला आहे.
७.इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये >> खरंय अफझल निष्पाप होता हे सिद्धच झाले. भारतीय कोर्टला काहीच कळत नाही, असे आत्तापर्यंत निदान चारदा वेगवेगळ्या मुद्द्यांतून तुम्ही लिहिले आहे. मे बी खूपदा असे लिहिले की ते खरेच वाटते. आता तर मलाही अफझल हा "पाक" होता असा संदेह आहे.
८ मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?
>>
हा मुद्दा परत तुमच्या "आडनावा" संबंधी आहे हे कुणाच्याही लक्षात लगेच येईल. पण जर चुकीने तुरुंगात राहिले तर त्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यायला हवी आणि ती पण योग्य हे माझे मत आहे. ( परत आडनाव काहीही असले तरी) आणि जर सरकारने चूक झाली हे मान्य केल्यावर देशावर प्रेम करावे चा काय संबंध? मग काय लगेच तुम्ही बॉम्ब घेऊन हल्ले करत सुटणार का? मग "आरोपीला संधी द्या" हे जसे म्हणता, तसे सरकार / जनतेलाही एकदा संधी द्या असे का नाही म्हणत? की जर कुळकर्णी असेल तर त्याने सरकार / कोर्ट / जनतेला एकदा संधी द्यायलाच हवी आणि मेमन असेल तर लगेच " प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार " असे काही?
--
१. तुमचे काही मुद्दे हे परस्परविरोधी आहेत.
२. तुम्हाला मुळात फाशी कुणाला देणे मान्य नाही हे मला माहिती आहे आणि मी त्याचा आदरही करतो, पण त्यावरून आरोपीला ( अश्या गुन्ह्यातील) संधी देणे हे मला मान्य नाही, ह्या मताचा तुम्ही आदर केला नाही तरी चालेल. पण आहे हे असेच आहे.
३. तुम्ही मुळात क्षमाशिल आणि चांगल्या वर्तनूकीचे आहात. आणि अश्या अश्या आरोपींकडूनही तशी अपेक्षा ठेवता, जी चुकीची आणि भाबडी आहे. तुम्ही जसे कुणाला कधीही जिवानिशी मारणार नाहीत, तसे हे अतिरेकी( जे जास्त मेमन आहेत, कुळकर्णी नाहीत, कुणाला जिंवत सोडत नाही. मग तो मरणारा मेमन असो की कुळकर्णी.
४. तुमची ऑलमोस्ट सर्व मत आणि पोस्टी ह्या बायस्ड असतात. ( उदासाठी अगदी कालचा आंबेडकरांचा बाफ ज्यात तुम्ही इस्लाम म्हणले की लगेच हिंदू आणले. ) हा बायस जर थोडा कमी केला आणि कुळकर्णी असो की मेमन - माझ्या देशाविरुद्ध जो कारवाई करेल त्याला मी सोडणार नाही असा स्टॅन्ड घेतला तर माझे उत्तर देखील थोड सरकॅस्टिक न येता बॅलन्स येईल.
बायदवे तुम्ही असा स्टॅन्ड का घेत नाहीत?
-
मेमनला केवळ शरण आल्यामूळे. फाशी ऐवजी आजन्म कारावास योग्य होता. हा तुमचा मुद्दा मला पटतो हे मी परत एकदा लिहितो. जस्ट इन केस. समटाईम्स यु निड टू लुक अॅट बिगर पिक्चर. असे अतिरेकी जिंवत फक्त खटला चालू असे पर्यंत ठेवावेत. जर ते दोषी असले तर फाशी द्यावी आणि नसतील तर भरपाईसकट सोडून द्यावे.
@केदार +१०० अगदि योग्य
@केदार
+१००
अगदि योग्य पोस्ट.
अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते.
<<
<<
अरेरे, कॉंग्रेज मतांसाठी इतकी लाचार होईल असे कधी वाटले नव्हते.
आपण हे सर्व विचार मांडण्याआधी
आपण हे सर्व विचार मांडण्याआधी मृत्युमुखी पडलेल्यांचे नातेवाईक, जखमी होऊन कायमचे अपंगत्व आलेले लोक, घरातील कमावती व्यक्ती बळी पडून ससेहोलपट झालेले कुटुंब या सर्वांचेही मनोगत माहिती करून घेतले असेल, अशी आशा करतो!
अन्यथा विशिष्ट समुदायाच्या लांगुलचालनाचा पुढील अध्याय एव्हढंच महत्व उरत, या विचारांसाठी!
२२ वर्षानंतरही इथे न्याय झालाच कुठे आहे! ज्यांनी दाउद आणि मंडळीना आपल्या मांडीवर घेऊन पोसलय ते तर जाणते राजे म्हणून उजळ माथ्याने फिरतायत.
विकु ,सध्या दिग्विजय सिन्ग
विकु ,सध्या दिग्विजय सिन्ग यानी मौन धारण केल्याने तुम्हाला त्यानी ती ऑथोरिटी दिलीय का?:अओ:
याकुबभाई मेमन हे फक्त
याकुबभाई मेमन हे फक्त मुस्लिम असल्याने त्यांना भाजप फाशी देत आहे,अश्या क्रूर पद्धतीने सूड घेण्याचा मी निषेध करतो.त्यांच्या फाशीचे रुपांतर साध्या कैदेत झाले पाहिजे.
खरे तर याकुबभाईंएवजी त्या कर्नल पुरोहीत व साध्वि प्रज्ञा सिंगला आधि फाशी दिले पाहिजे ,ज्यांनी निष्पाप मुस्लिम बांधवांचे बळी घेतले,परतू भाजपप्रणीत केंद्र सरकार अतिरेक्यांमध्ये हिंदू व मुस्लिम असा भेद्भाव करते,जे योग्य नाही.
मेमनला केवळ शरण आल्यामूळे.
मेमनला केवळ शरण आल्यामूळे. फाशी ऐवजी आजन्म कारावास योग्य होता. हा तुमचा एकच मुद्दा मला पटतो .
निळा राजकुमार त्याला भाजप
निळा राजकुमार
त्याला भाजप सरकारने नाही, न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे.
>> त्या कर्नल पुरोहीत व
>> त्या कर्नल पुरोहीत व साध्वि प्रज्ञा सिंगला आधि फाशी दिले पाहिजे
असहमत. त्या दोघांवरही अन्यायच झालेला आहे.
निळा राजकुमार>> निळ्या
निळा राजकुमार>> निळ्या रक्ताचा आहे तो.
मेमनला केवळ शरण आल्यामूळे. फाशी ऐवजी आजन्म कारावास योग्य होता. हा तुमचा एकच मुद्दा मला पटतो .> +१
>> त्या कर्नल पुरोहीत व साध्वि प्रज्ञा सिंगला आधि फाशी दिले पाहिजे >असहमत. त्या दोघांवरही अन्यायच झालेला आहे. >> +१
http://m.rediff.com/news/spec
http://m.rediff.com/news/special/from-rediff-archives-the-strange-case-o...
http://m.rediff.com/news/2007/aug/08sheela.htm
http://m.rediff.com/news/report/why-its-wrong-to-hang-yakub-memon/201507...
ही तीनही आर्टिकल्स वाचा.
याकुब मेमन शरण नाही आला. काल
याकुब मेमन शरण नाही आला. काल उज्वल निकम यांनी टिव्हीवरील चर्चेत ही माहिती दिली.
१९९३ साली झालेले बाँबस्फोट स्वतंत्र भारतामध्ये झालेले पहिले साखळी स्फोट होते. २७५ ठार आणि १००० जख्मी झाले. त्या निरपराध लोकांना न्याय मिळाला पाहिजे असे तुम्हाला का वाटत नाही विकु?
काल उज्वल निकम यांनी
काल उज्वल निकम यांनी टिव्हीवरील चर्चेत ही माहिती दिली. कसाबच्या बिर्याणीच्या माहिती प्रमाणे?
विकु, कोर्टात ह्या मुद्दावर
विकु, कोर्टात ह्या मुद्दावर युक्तीवाद होऊन हा मुद्दा सिध्द झाला आहे.
माझ्या मुळ प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाही.
कायदेशीर प्रक्रिया योग्य
कायदेशीर प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण करून मग फाशी द्यावे. घिसाडघाई करून नाही.
गुरूला फाशी दिली तेव्हा कलेक्टिव्ह कॉन्शस वगैरे तारे तोडावे लागले होते. हे तथाकथित कलेक्टिव्ह कॉन्शन्स व लिंचिंग मॉब्ज मधे फारसा फरक नाही.
तेव्हा,
भारतीय न्यायप्रक्रिया पारदर्शी व योग्य तर्हेनेच चालते हे आश्वासक कन्फर्मेशन सर्वच लोकांना मिळणे हे एका(सिंगल) अतिरेक्याला फाशी देण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे, ह्या परिप्रेक्ष्यातून विकु यांचेशी सहमत.
केदार छान पोस्ट -
केदार छान पोस्ट - सहमत.
सर्वोच्च न्यायालयाने पुढे आलेले पुरावे बघुनच निर्णय घेतला असेल ना ? शम्भर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये या न्यायाच्या तत्वाला अनुसरुनच निर्णय झाला असेल असा विश्वास आहे.
शिक्ष योग्य आहे
शिक्ष योग्य आहे
शम्भर अपराधी सुटले तरी चालतील
शम्भर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये या न्यायाच्या तत्वाला अनुसरुनच निर्णय झाला असेल असा विश्वास आहे.
<<
माझाही आहे.
पण फाशीची शिक्षा सुनवल्यानंतरही, शेवटचा दयेचा अर्ज करता येत असतो. त्याआधी वेग-वेगळ्या याचिकाही असतात.
ALL I am saying is,
Let it be proven that the accused was allowed to explore ALL the avenues available under Indian Law, to prove his innocence and claim leniency in the punishment.
I dont have any doubts about his guilt as it was proved in our courts, NOR am I against capital punishment.
पुरेश्या बातम्या व्यवस्थित न
पुरेश्या बातम्या व्यवस्थित न वाचता, एका विशिष्ठ समाजाचे लांगुलचालन करण्याच्या हेतुने, अक्कल गहाण टाकून इथे पोष्ट टाकणार्या लोकांची किव वाटते.
२२ वर्ष जेल मध्ये घालायला
२२ वर्ष जेल मध्ये घालायला लाऊन मग फाशीवर चढवणे … एक अप्रत्यक्ष जन्मठेप भोगलीय, आणि नंतर फाशी.
मलातरी क्रौर्यच वाटते.
१ हे कसं ठरवलतं? मिडीया
१ हे कसं ठरवलतं? मिडीया मधल्या बातम्या वाचुन की कोर्ट प्रोसीडींगज वाचुन? सगळ्या साक्षी आणि पुराव्यांची नोंद होत असते. ते सर्व विचारात घेवुनच न्यायालय निर्णय घेते.
२ ती कायम का आहे, ह्याची कारणे तपासुन पहा. 'क्ष' व्यक्तीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे म्हणुन 'य' व्यक्तीचीपण करा, ह्या आर्गुमेंटला न्यायलय कसे व का बधेल? त्याला साक्षी व पुराव्यांची जोड हवी. दोन्ही केसेसच्या मध्ये सर्व बाजुने समानता आहे, हे न्यायालयापुढे सिध्द करावे लागते. याकुब मेमन आणि त्याच्या वकीलाने असे केले होते की नव्हते, ते तपासल्या शिवाय ह्या वाक्याला काही अर्थ नाही. ते केले नसेल असे वाटत नाही. उलट यातुन असा अर्थ निघतो आहे की याकुब गरीब बिचारा आहे आणि न्यायालय त्याच्याशी सुड बुध्दीने वागत आहे. जे अगदी चुकीचे आहे. याकुब सुशिक्षीत आहे. त्याने त्याच्या केसचा उत्तम अभ्यास केला होता, असे मिडीयातपण आले आहे.
३ ह्या मुद्यावर सरकारी वकील पर्यायाने सरकारची भुमीका काय आहे, ते तपासुन पहायला हवे. न्यायलय असा विचार करत नसते. तो त्याच्या अधिकारकक्षे बाहेर आहे. पण जर सरकार अशी मागणी करत असेल, तर न्यायालय त्यावर नक्कीच सहानभुतीपुर्वक विचार करते, असे अनेक दाखले आहेत. सरकारीपक्षाने फाशीच्या शिक्षेचीच मागणी केली होती. न्यायालय स्वतः असा निर्णय घेत नाही.
४ इथे वर मांडलेला मुद्दा लागु होतो. सरकारी वकीलाने इथे सरकारची बाजु मांडायची असते.
५ हे फार व्ह्याग्यु स्टेटमेंट झाले. त्याचा ह्या केसशी काहिही सबंध नाही. फाशीची शिक्षा घटनेत आहे, ही फॅक्ट आहे. न्यायालयाला ती विचारात घ्यावीच लागेल. न्यायालयला घटना बदलाचे अधिकार नाहीत.
६ मेननला त्याच्या आडनावाकडे पाहुन शिक्षा झाली आहे आणि साक्षी, पुराव्या आधारे नाही, असा अर्थ यातुन ध्वनीत होतो आहे. ह्याला तुमच्याकडे काही पुरावा नसेल तर तुम्ही न्यायालयावर आरोप करीत आहात, जी अतीशय गंभीर बाब आहे. न्यायलयाचा अपमान ह्या कॅटेगरीत मोडन्याचे पोटेंशीयल त्यात आहे. तेंव्हा कमेंट एडीट करा, ही विनंती. अन्यथा जर कोणी तक्रार केली, तर आपण गोत्यात येण्याची शक्यता अधिक आहे. 'गोडसे' प्रकरणाशी संबंध जोडुन अजुन मोठी चुक करत आहात. माझ्यामते, वरती केदार यांनी अतीशय योग्य प्रतीवाद केला आहे.
७ तुम्ही म्हणताय 'हा निर्णय राजकीय आहे'. न्यायालय राजकीय निर्णय घेत नसते. साक्षी, पुराव्या आधारे जी तथ्य समोर येतात, त्या आधारे निर्णय घेत असते. <या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता>. हा ही पुन्हा बादरायण संबंध आहे. दोन्ही केसेस वेगवेगळ्या आहेत. वरील स्टेटमेंट इथेही लागु होते.
८ यासगळ्याचा ह्या केसशी काहीही संबंध नाही आहे. कोणीही गुन्हा सिध्द होइपर्यंत गुन्हेगार नसतोच. खटले लांबतात, त्याला कारण अपुरी न्यायालय हे तर आहेच पण अनेकदा पक्षकारपण एक स्ट्रॅटेजी म्हणुन खटला लांबवत असतात.
या व्यतीरिक्त, वरच्या दी.मा. व केदार यांच्या पोस्टमधल्या आशयाशी सहमत. एकुणात तुम्ही स्वतः फक्त मिडीयातल्या सिलेक्टीव्ह बातम्या वाचुन लिहीले आहे, हे जाणवते, हे मा.वै.म.
फाशीची शिक्षा हे क्रौर्य आहे
फाशीची शिक्षा हे क्रौर्य आहे हे पटते. पण याकूबला फाशी देणे हे क्रौर्य नाही वाटत. त्यामुळे धागा अजब वाटला.
फाशीची अगदी तारीख ठरवून ती गुन्हेगाराला सांगणे वगैरे तर अतीच क्रौर्य आहे. त्याला मृत्यूदंड जाहीर झाला की खरे तर त्याला काही समजायच्या आत गोळ्या घालून मारून टाकण्याचा कायदा निघावा. शिवाय फाशी ही इर्रिव्हर्सिबल शिक्षाही आहे, त्यामुळे ती एरवी रद्द व्हावी.
पण शेवटी देशभावना, मेलेले निरपराध आणि त्यांच्या मागे राहिलेल्यांनी सोसलेले जन्म हे पाहून देशाच्या शत्रूला मृत्यूदंड देणे हे गैर नाही वाटत. बाकी भारतीय कायद्यातील सर्व तरतुदींचा लाभ त्याला घेऊ देणे हेसुद्धा एक प्रकारे माणूसकीचेच लक्षण म्हणावे लागेल.
एकुणात, 'याकूब मेमन'च्या बाबतीत फाशीच व्हावी ह्या निर्णयाच्या बाजूने!
बावीस वर्शांचा हिशोब होऊ नये असे वाटते कारण ह्या कालावधीत त्याने शिक्षा कमी होण्यासाठी प्रयत्नही केले, इतकी वर्षे तो जगलाही (कदाचित मेलाही असता नैसर्गीकरीत्या) आणि ज्यांना त्याने मारले (किंवा मरणास कारणीभूत झाला) त्यांचे वारस दु:खात जगत असताना तो तुलनेने सरकारी पैश्यांवर बरा जगू शकला.
Pages