एकदा माझी तामिळ मैत्रीण तावातावाने मला सुनवत होती होती...'यू नॉर्थ इंडियन पीपल'...हो, ती अशी हमरीतुमरी वर आली की मला नेहमी यू नॉर्थ इंडीयन्स वगैरे म्हणते न चुकता. आपल्याला कसं कमीतकमी चार दिशा माहीत असतात नं, तशा माझ्या या मैत्रिणीला दोनच दिशा माहिती आहेत. उत्तर आणि दक्षिण. तामीळनाडू, केरळ पासून वरती साधारणपणे हैदराबाद पर्यंत साऊथ इंडिया आणि हैदराबाद च्या वरती सगळा नॉर्थ इंडिया. बाकी महाराष्ट्र, गुजरात तिकडे बंगाल हे असले कॉंप्लिकेशन्स नकोच आपल्याला.
असो. पण तिचा मुद्दा असा होता की आपल्या हिंदी चित्रपटांमधे दक्षिण भारतीय पात्रांना फारच विनोदी दाखवतात. विनोदी म्हणजे छान नाही पण काहीतरी विचित्र. ओढून ताणून यम, यन, वो, पी असे इंग्रजी बोलणारे, बायका कायम कान्जिवरम मधे. केसांमधे भलामोठा गजरा आणि वाक्यावाक्याला अय्ययो असे उद्गार. तिचं म्हणणं एकच की असे का? एखादा तमिळ माणूस नॉर्मल हिंदी बोलतांना का नाही दाखवू शकत तुम्ही लोक ? आमच्या लकबींवर, भाषेवर तुमची विनोद निर्मिती का?
नंतर मी विचार केला तेव्हा जाणवलं की हे अगदी खरंय. म्हणजे मोजके सन्माननीय अपवाद सोडले तर तिचं म्हणणं खरंय. आपल्या हिंदी चित्रपटांमधे आणि हिंदी मालिकांमधे पात्रांचं, प्रसंगांचं फारच स्टिरियो टायपिंग, एक अती सरसकटीकरण होतं.
आता हे बघा, उदाहरणार्थ मराठी बाई ही एकतर कामवाली नाहीतर भाजीवाली नाहीतर कोळीण. ती कशी बोलणार? ' मै बोलती तेरेकू, मेरेको ईतना पैसा मंगता म्हणजे मंगता' अरे....काय...? आणि मराठी पुरूष म्हटला की तो एकतर पोलिस पण तोही कमिशनर नाही - हवालदार. दुसरं म्हणजे एखादा भ्रष्ठ नेता- अमका तमका भाऊ आणि तिसरा प्रकार म्हणजे गॅंग्स्टर. हा तिसरा प्रकार जरा नवीन आहे. थोडाफार राम गोपाल वर्मा च्या सत्या पासून याची बहुतेक सुरूवात झाली असावी.
आता पंजाबी खानदान. या समाजाला प्रचंड ग्लॅमर द्यायचं काम आधी चोप्रा आणि नंतर करण जोहर या मंडळींनी केलं. पण तिथेही अतिशयोक्ती. या लोकांच्या रीतीभाती, खाणं-पिणं, बोलणं याचं अती सिंप्लिफाइड चित्रण. एखादा सरदारजी मिनिटा मिनिटाला मित्राच्या पाठीवर दणादण बुक्के घालणार, गडगडाटी हसणार. मग हा स्वभावाने भयंकर विनोदी, मदतीला तत्पर आणि डोक्याने गरम अशा टाइप चा असणार. त्याची बायको पण तेव्हडीच विनोदी. कानात झुमके, वेणीला जरीचा गोन्डा आणि अधून मधून ' छड्डोजी 'वगैरे म्हणणे मस्ट आहे. हे पब्लिक एरवी घरात व्यवस्थित हिंदी बोलत असते पण मधेच यारा तुस्सी, गड्डी चला रहा हू, चल ओये असे शब्द सटासट वापरणे त्यांच्यासाठी फार आवश्यक गोष्ट आहे.
या घरातली आजी म्हणजे 'बीजी' हे पात्र. या बीजी एकीकडे खानदान की इज़्ज़त का काय ते सांभाळत असतातच पण साइड बाय साइड आपली 'कूल' इमेज सिद्ध करण्याच्या दृष्टीने जरा डान्स फ्लोर वर नाचून बिचून पण घेतात. मग लाडका नात किवा नातू येऊन तिला माय सेक्सी दादी वगैरे म्हणतो. मग बीजी पण त्याला लाडाने ओये खोत्या (का खोते?) म्हणत त्याचा कान पीरगाळतात. हा सीन फक्त चित्रपटात नाही तर आजकाल टीवी वर सुद्धा अगदी कॉमन झालाय.
तिसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे गोवेकर मंडळी. हा तिसरा प्रकार सत्तर, ऐंशी च्या दशकामधे भलताच फॉर्मात होता. चर्चातले शांत वातावरण. मग तिथे छान स्वच्छ इस्रीचा पोशाख केलेले आणि सात्विक हावभाव तोंडावर असलेले धर्मगुरू असतात. ते नेहमी माय चाइल्ड, माय चाइल्ड असे म्हणतात आणि दारात कोणीतरी टाकलेल्या बाळाला नियमीतपणे आसरा देत असतात. आता येते नायिका. ही फार सुंदर आहे. पण त्याचबरोबर गूढ रम्य, उदासरम्य आणि भाविक अशी मल्टिटेलेंटेड सुद्धा आहे. ती कॅण्डल घेऊन चर्च मधे गंभीरपणे बसलेली आहे. तिचा तो भावीक, प्रकाशात उजळलेला चेहरा पाहून हीरो तिच्या अजुन प्रेमात पडतोय ( आठवा--दिलवाले दुल्हनिया, मुझसे दोस्ती करोगे, खामोशी-मनीषा कोइरालाचा).
आणखी एक छानपैकी ' वॉट मॅन ' किंवा 'यू नॉटी बॉय' असे वारंवार म्हणणारी मिसेस डिसूझा असते. ही बाई हमखास आपल्या चित्रपटाच्या हीरोची घरमालकीण असते आणि अधून मधून आठवणीने आपल्या हीरोला घरातून बाहेर काढण्याची धमकी देत असते. ही तोंडाने खूप फटकळ जरी असली तरी मनाने बाय डीफॉल्ट प्रेमळ. काटेरी फणस, नारळासारखी टणक, वरुन कडक आतून मायेचा झरा, वरुन काटे आत पिकलेला गर वगैरे, वगैरे.
हिंदी चित्रपट आणि मालीकांमधे ब्रेकफास्ट हा पण टिपिकल प्रकार. जूस म्हणून ठेवलेले पण शेंदरी रसना नी भरलेले ग्लास, प्लेट मधे असलेली ब्रेड स्लाइसस ची थप्पी आणि बटर. ' चलो बेटा नाश्ता करलो' म्हणताच तो बेटा बसणार आणि ब्रेड बटर खाणार. सोप्पं काम. बरेच वेळा बेटा किवा बेटीला नाश्ता करायला वेळच नाहीये. मग आई बिचारी सो कोल्ड जूस चा ग्लास घेऊन मागे धावणार..'बेटा जूस तो पिलो'.....अगं बाई...रिकाम्यापोटी ऑरेंज जूस? अॅसिडिटी नाही का होणार?
दुसरं म्हणजे अल्लड कॉलेज कन्यका येणार आणि ब्रेकफास्ट न करता टेबलवरचं एक सफरचंद घेऊन खात खात पळणार. इथे सफरचंद हे फळ फारच डिमांड मधे आहे. कधीही चिकू, पेरू अशी फळं नाहीच ओन्ली सफरचंद.
अर्थात सरसकट सगळ्याच हिंदी चित्रपटांमधे हे असे स्टिरियोटाइप असतात अस नाहीये. काही अपवाद आहेतच. पण असे अपवाद दुर्दैवाने खूप कमी असतात हे सत्य आहे. हे कबूल आहे की या वरच्या सगळ्या उदाहरणात थोडेफार तथ्य असतेच. नाही असे नाही. पण म्हणून काय आपण त्या इतक्याश्या चौकटीतच राहून विचार करायचा? बरेच गुणी दिग्दर्शक हे स्टिरियो टाइप्स टाळण्याचा प्रयत्न करतात. हे आशादायी आहेच पण आजकाल तर मला असही वाटतं की चित्रपटांच्या पेक्षा जास्तं हा प्रकार हिंदी मालिकांमधून होतो. खरंतर एखादे अस्खलित हिंदी बोलणारे सुब्रमण्यम स्वामी , एखादे पाटील, देशमुख किंवा देशपांडे आडनावाचे बडे उद्योगपती (मला वाटतं अशी एक हिंदी मालिका आहे सध्या) किंवा मग चष्मा लावणारे एखादे डॉ.कर्तारसिंग नावाचे सरदारजी अशी पात्रं दाखवायला काय हरकत आहे?
(No subject)
साऊथ इंडीयन्सच्या
साऊथ इंडीयन्सच्या स्टिरीओटायपिंग ला इतर लोक कसे जबाबदार ?
खालच्या लिंक मधे चिरंजीवी ट्रकखालून घोडा स्लाईड करतो ते पहा.
https://www.youtube.com/watch?v=vBlFCH0d3o4
आणि हे तर महान आहे
https://www.youtube.com/watch?v=8Cc7jYVFLqc
हे असलं काही इतरांनी पाहीलं तर कोण जबाबदार त्याला ?
https://www.youtube.com/watch?v=SL3kgs14rtY
संगणक निर्मितीचं प्राचीन शास्त्र
https://www.youtube.com/watch?v=MUbPZEmi3wo
एखादा तमिळ माणूस नॉर्मल हिंदी
एखादा तमिळ माणूस नॉर्मल हिंदी बोलतांना का नाही दाखवू शकत तुम्ही लोक ? >> एक काय दोन दाखवते - हम है राही मधे वैजयंती (जूही) आणि २ स्टेट्स मध्ये अनन्या (आलिया).
हर फिल्म "चक दे इंडिया" नही होती की आनेवाला हर कॅरॅक्टर इंडिया करके चिल्लाए... भाई, स्क्रिप्ट की डिमांड भी कोई चीज है.
लेख मजेदार आहे मात्र, आवडला!!
लेख मस्त आहे. चेन्नई
लेख मस्त आहे. चेन्नई एक्स्प्रेस पाहिल्यावर माझी शेजारीण म्हणे "एवरी तमिळ कॅरेक्टर (इन्क्लुडिंग तंगबली) कॅन स्पीक हिंदी, बट युअर हीरो अजुम्स दे कॅननॉट!"
हेराफेरीमध्ये बाबुराव "आपटे" जे काय हिंदी बोलतो ते ऐकून ओळखीतले एक "बापट" बरेच तापट झाले होते.
शेंदरी रसना >> बाकी लेख
शेंदरी रसना >>

बाकी लेख मजेदार
छान मस्त खुसखुशीत
छान मस्त खुसखुशीत लेख..
गुज्जूमारवाडीसिंधी यांचेही सेम..
आणि सीन सुद्धा कित्येक सांगता येतील असे..
कॅरेक्टर आणि प्रसंग उभे करायला जास्त मेहनत नको म्हणून हे सोपे शॉर्टकट मारले जातात.
पण यात गैर काही नाही. अडीज तीन तास मनोरंजन करायचेय तर नको त्या गोष्टींवर चित्रपट खर्च का करा. चित्रपटातील एखादे दुय्यम पात्र जर लोभी, कंजूष, व्यवहारी वा मुर्ख वगैरे दाखवायचे असेल तर ते अमुकतमुक जातीचे वा प्रांताचे दाखवणे सोपे तर पडतेच पण सर्वसामान्य प्रेक्षकांच्या डोक्यातही सहज शिरते.
राज सिंघानिया, राज मल्होत्रा, अशी नावे घेतली की ती व्यक्ती एक मोठी हस्ती आहे हे ती पडद्यावर अवतरायच्या आधीच क्लीअर होऊन जाते. पण तेच ईथे एक मराठी आडनाव टाका. त्या आडनावाची व्यक्ती एक मोठी बिजनेसमन आहे हे विश्वासार्ह वाटायला किती प्रसंग आणि पैसा खर्च करावा लागेल. आणि तसे नाही केले तर फार तर लोणची पापड विकणारे वाटतील प्रेक्षकांना.
शेवटी काय, तर पडद्यावरच्या इमेजला प्रत्यक्षातील इमेजच जबाबदार राहते, आणि प्रत्यक्षातील ईमेजला त्या त्या जातीप्रांतातील लोक खुद्द.
मुसलमान धर्माचे लोक सुद्धा
मुसलमान धर्माचे लोक सुद्धा चित्रपटात मरताना काहीतरी उर्दू श्लोक बोलूनच मरतात. ते चुकून नाही म्हटले तर तो खरेच मेलाय की चित्रपटाच्या पुढच्या भागात परत येईन अशी लोकांना शंका वाटावी.
मलाही आवडला लेख. ते जुने
मलाही आवडला लेख.
ते जुने ७०-८० च्या दशकातील सिनेमे पाहून माझा ग्रहच झाला होता की द्यायळू असणारे दोनच धर्म - मुसलमान चाचा किंवा ख्रिश्चन फादर !
पद्मावती, लेख आवडला बरं
पद्मावती, लेख आवडला बरं का...
अगदी चौफेर विचार केला आहात तुम्ही.
निरीक्षण खुपच छान आहे तुमचे आणि ते मांडलंय पण मस्त !
पण खरंय, साउथ कडचे स्वत: सिनेमा काढतात तेव्हा किती अतिशयोक्ती असते. एकतर भडकपणा असतोच आणि दुसरे
म्हणजे अगदी काहीही बघायची तयारी ठेवून सिनेमा बघायला गेलो तरी, मेंदूला झेपतच नाही त्यांचे प्रेझेंटटेशन.
म्हणजे डोक्याचा वापर करतच नाहीत ती लोकं, कि नॉर्मली बुद्धीमान असणार्या, किंवा सामान्य विचारसरणीच्या माणसापेक्षा जरा जास्तच करतात कोण जाणे?
आणि खरंय, खानदानी श्रीमंती आणि सांस्कृतीक रितीरिवाज यांचा मक्ता काय फक्त नॉर्थवाल्यांनीच का घेतलाय कोण जाणे...
बरोबर आहे, सिनेमा काढणारे दिग्गज पंजाबी असावेत म्हणून.
असो,
मला तर लेख खुपच आवडला बुवा..
ऋन्मेष....हा हा हा...भारी निरीक्षण
Chhaan jamalaay
Chhaan jamalaay
लेख आवडला. यात पारसी आणि
लेख आवडला.
यात पारसी आणि गुजराती कॅरॅक्टर चे स्टिरिओटाइपिंग पण टाकता येईल.
छान लेख
छान लेख
सर्व प्रतिसाद देणार्यांचे
सर्व प्रतिसाद देणार्यांचे मन:पूर्वक आभार.
कौतुकाचे शब्द तर कधी चुकांवर बोट दोन्हीचे स्वागत, अगदी मनापासून.
मस्तय आवडला . कुथेतरी
मस्तय आवडला .
कुथेतरी वाचलेलं की ऐकलेल ,
सेक्रेटरी असली की तिचे नाव रीटा किन्वा जेनी असले पाहिजे . मिनी टाईट स्कर्ट आणि कुरळे केस .
वाचताना हसली खुप..टिपीकल
वाचताना हसली खुप..टिपीकल शिनमे आठोले आपल्याकडले
मस्त आहे लेख. आठवतील तशी आणखी
मस्त आहे लेख. आठवतील तशी आणखी भर घाला.
स्वतःचे काही व्यक्तीमत्व
स्वतःचे काही व्यक्तीमत्व असणार्या मराठी नायिका ( म्हणजे चित्रपटातील मराठी नायिका ) किती कमी आहेत,
फागुन ( वहिदा रेहमान ) सुबह ( स्मिता पाटील ) भुमिका ( स्मिता पाटील ) बावरे नैन ( गीता बाली ) हु तू तू ( तब्बू / सुहासिनी ) सारांश ( रोहिणी हत्तंगडी ) वास्तव ( रीमा आणि नम्रता ) अग्निपथ ( प्रियांका चोप्रा ), मर्दानी ( राणी मुखर्जी ) ... आणखीही असतील.. पण एरवी मराठी स्त्री असली तर ती "बाई"च दाखवलेली असते.
मस्त जमलाय्. आवडलाच.
मस्त जमलाय्. आवडलाच.
मस्त लिहिलय. दिनेश, थ्री
मस्त लिहिलय.
दिनेश, थ्री इडीयट्समध्ये अख्ख 'सहस्रबुद्धे' खानदान दाखवलय की स्वतंत्र च्यक्तिमत्त्व आणि विचारांचं..
लेख मजेशीर. कमेंटसमधली
लेख मजेशीर. कमेंटसमधली उदाहरणे अॅड केली तर अजून मजेशीर होईल.
केदार
थ्री इडीयट्समध्ये अख्ख 'सहस्रबुद्धे' खानदान दाखवलय की स्वतंत्र च्यक्तिमत्त्व आणि विचारांचं. << ते त्यांनी घेतलेलं आडनाव असावं असंच वाटत राहतं सारखं.
खलनायकाचे वाईटपण अधोरेखित
खलनायकाचे वाईटपण अधोरेखित करण्याकरता सिनेमाच्या सुरवातीच्या भागात योग्य त्या व्यवसायाचा अत्यंत फाटका, दाढीचे खुंट वाढलेले, दीनवाणा, जुने पुराणे कपडे घातलेला रामूकाका असले काही नाव असणारा इसम. मग तो "सरदार, इस साल फसल बिलकूल नही आई" असे अश्रूखेचक डायलॉग मारणार आणि मग खलनायक त्याला "हरामखोर! कामचोर! हमसे झूठ? तुझे बरबाद कर दूंगा" वगैरे जळजळीत प्रत्युत्तर देणार. मग दीनवाणा माणूस "माफ करना माईबाप" वगैरे आणखी हृदयद्रावक बोलणार. इथे दोन पर्याय असतात. एक म्हणजे हीरोची एन्ट्री, म्हणजे खलनायकाचे खलनायकत्त्व आणि हिरोचे नायकत्व हे दोन्ही एकाच सीनने अधोरेखित होणार. पण सिनेमाची सुरवात असल्यामुळे खलनायकाचा नि:पात होत नाही. जरा जास्त जहाल सिनेमा असेल तर त्या दीनवाण्याला मारपीट करून थोडी गंमत आणली जाते. बहुधा हे दीनवाणे वागणारे लोक ही स्पेशालिस्ट असतात. कायम तेच लोक हे काम करायला येतात.
जुन्या काळात नायिका वा हिरोची बहिण गर्भवती असली तर ते समजायचा एक अजब प्रकार होता. हमखास त्या बाईला चक्कर येणार. मग एप्रन घातलेला डॉक्टर नाडी पाहून "इस हालत मे ऐसाही होता है." "मतलब?", "ये मा बननेवाली है" असे संवाद. मग ती स्त्री विवाहित आहे की नाही त्याप्रमाणे आनंदोत्सव वा "ये दिन दिखानेकी बजाय पैदा होतेही मर क्यू नही जनमजली?" असे वाक्तडन असे ठरलेले प्रसंग असत. नाडीपरीक्षा करुन हे कसे कळते ते देव जाणे! आणि हे जनमजली काय असते बरे?
मराठी व्यक्तेरेखांमध्ये
मराठी व्यक्तेरेखांमध्ये कमीनेमधली स्वीटी भोपे राहीली वरच्या लिस्टमध्ये.
इतर आठवलेले अर्जुन जोगलेकर (ज जहन्नमधल. आणि ळ गायब) लक्ष्यमधला सुनिल दामले (त्याला तर पथेटिक मराठी संवाद पण दिलाय)
दिनेशदा, आणि इंग्लिश
दिनेशदा, आणि इंग्लिश विन्ग्लीश मधली शशी गोडबोले (श्रीदेवी) पण आहेच की!
मस्त झालाय लेख..एकदम खुसखुशीत!
लेख उत्तम आणि कुसखुशीत जमलाय.
लेख उत्तम आणि कुसखुशीत जमलाय. महत्वाच्या मराठी कॅरॅक्टरमध्ये 'शशी कपूरच्या 'विजेता मध्ये त्याची बायको रेखा चक्क महाराष्ट्रियन तर आहेच पण पुण्याची पण आहे. शिवाय 'अकलका ठेका तो सब तुम पूनावालोनेही ले रख्खा हौ'असा खवचट डायलॉगही शशी कपूरच्या तोंडी आहे::फिदी:
राम गोपालच्या सत्या अगोदरच
राम गोपालच्या सत्या अगोदरच एन.चंद्राने व्हायलंट मराठी माणूस पडद्यावर आणला होता - नाना, अनिल कपूर इ इ
अंकुश...
अंकुश...
सत्या ,बॉडीगार्ड आणि हेट
सत्या ,बॉडीगार्ड आणि हेट स्टोरी २ मध्ये म्हात्रे नावाचे नायक / खलनायक आहेत - हे माझ्या म्हात्रे नामक मित्राने अभिमानाने सांगितले ...
ज्यावेळी hollywood मध्ये मराठी लोक badass villan म्हणून दाखवतील तो सुदिन.
Then we can say Marathi people have really arrived on global scene.
अर्जुन जोगलेकर ?? कोठला
अर्जुन जोगलेकर ?? कोठला चित्रपट ?
अर्जुन जोगलेकर ?? कोठला
अर्जुन जोगलेकर ?? कोठला चित्रपट ?>> आठवा!!!!!!
अर्जुन जोगलेकर ?? कोठला
अर्जुन जोगलेकर ?? कोठला चित्रपट ?>> आठवा!!!!!!
>>>>
मै खिलाडी तू अनाडी मध्ये तो अक्षय कुमार होता जोगलेकर..
(ज जहन्नमधल. आणि ळ गायब) >>> सहमत.. उगाच मराठी लोकांच्या डोक्यालाच शॉट लागतो याने
Pages