सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.
१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.
२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.
३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.
४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.
५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.
६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?
७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?
८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?
या निमित्ताने देशातल्या
या निमित्ताने देशातल्या उन्मादी वातावरणनिर्मितीत आपण स्वतःही कसे वाहवत जातो याचा धडा मिळाला.
दुसरी एक गोष्ट अशी की जर याकूबला आत्मसमर्पण केलं म्हणून सोडलं असतं तर का सोडलं म्हणून जो गदारोळ झाला असता त्यात हेच (स्वतःला धरून ) सामील झाले असते यातही शंका नाही.
अमेरीकेची पोस्ट आवडली. पण ते
अमेरीकेची पोस्ट आवडली. पण ते युद्ध गुन्हेगारांच्या बाबतीत आहे ना ?
आपली तुलना अमेरीकेशी याच बाबतीत करायची झाल्यास पाकि स्तानात जाऊन दाऊद आणि टायगर मेमनच्या मुसक्या बांधायची हिंमत आहे का आपल्यात ? तिथे जाऊन तिथले सरकार उलथवून गुन्हेगारांना ठार केले किंवा फाशी दिले तर तुलना ठीक होती. नाही का ? लोकसत्ता वाले वेगळं काय म्हणताहेत ?
याकूब नेपाळला कशाला आला होता हे अनुत्तरीतच आहे आणि त्याची फॅमिली आपल्या वकिलातीच्या मदतीने तयार केलेल्या खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने भारतात आली हे ही अनुत्तरीत आहे.
अमेरीकेची तुलनाच करायची झाल्यास देशांतर्गत न्यायव्यवस्था कशी आहे याबद्दलही लिहा की जरा. वाचायला आवडेल. किमान इथल्या चर्चेतून काहीतरी फलित तरी निघेल.
>>इतकी चर्चा (इथली नाही) आणि
>>इतकी चर्चा (इथली नाही) आणि हाईप करून बिनकामाचा हिरो बनवलं त्याला<<
कधी नव्हे ते मिर्चीताईंशी सहमत. याकुबच्या फाशीला विरोध करुन काहिंचा हिरो बनण्याचा प्रयत्न चालला आहे, असं वाटुन गेलं...
द्वेषभक्तांच्या चष्म्यातून
द्वेषभक्तांच्या चष्म्यातून पाहीलं तर त्यांचं म्हणणंही पटायला लागतं.
>>अपराध्याला शासन झाले म्हणुन
>>अपराध्याला शासन झाले म्हणुन मला आनन्द वगैरे काही झाला नाही... ,<<
आमची किती प्रगती झालेली आहे ते पहा.
एक अतिरेकी, भारताच्या सार्वभौमतेला चुना लावतो, न्यायप्रक्रिया पुर्ण होउन त्याला फाशी दिली जाते, आणि अपराध्याला शासन झालं याचं समाधान आम्हाला होत नाहि. जय हो!
फाशी दिली (असावी). याकुब मेला
फाशी दिली (असावी). याकुब मेला (असावा). धागा बंद करावा.
२२ वर्षानी परत भेटुया अशाच धाग्यावर!
बजरंगी व कोदलानी बाईच्या
बजरंगी व कोदलानी बाईच्या फाशीचा धागा कधी येणार ?
जामोप्या तुम्ही काढा
जामोप्या तुम्ही काढा त्यांच्यावर धागा.
इथे धागा काढल्याने म्हणे फाशीची प्रक्रीया जलद होते, तेंव्हा तुम्ही घ्या पुढाकार.
राज +1 ( दोन्ही पोस्टीकरता)
राज +1 ( दोन्ही पोस्टीकरता)
नंदिनीची भारताचा काय फायदा?
नंदिनीची भारताचा काय फायदा? वाली पोस्ट पटली.
काल अपरात्री न्यायालय चालवून शेवटच्या क्वेरीला ही न्याय मिळाला, न्यायालयाचे दरवाजे सदैव उघडे आहेत, प्रत्येक पातळीवर न्याय मागण्यासाठी सर्वतोपरी मुभा दिली जाते हे सर्व ठसवणे आवडले. 'आणखी १४ दिवस का नाही?' चा युक्तिवाद (कायद्याचं ज्ञान नसूनही) माझ्या ले मन लॉजीकला पटला.
मुरारी देशपांडे Via
मुरारी देशपांडे Via -Facebook
सर्वोच्च न्यायालयापेक्षा माध्यमे मोठी नाहीत असे माझे आजवर मिळवलेले ज्ञान मला सांगते .
माध्यमांचे अलीकडच्या काळातील वागणे देशहिताला बाधक ठरू शकेल कि काय असे वाटावे
इतके दर्जाहीन आणि बेजबाबदार होत चालले आहे . त्यांना सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी
जबाबदारीचे भान वेळीच न आल्यास लोक त्यांना नजीकच्या काळात भानावर आणतील
असे मला खात्रीने वाटते . ती वेळ येऊ न देणे माध्यमांच्याच हातात आहे .
------------------------------------------------------------------------------
न्यायसंस्थेवर प्रगाढ विश्वास असणारा भारतीय नागरिक ----------मुरारी
गाढ विश्वास असणार्यांनी जुना
गाढ विश्वास असणार्यांनी जुना "सलमान धागा" उघडून आपापली मते पुन्हा एकदा नजरेखालून घालावी
शशी थरूर यांचा
शशी थरूर यांचा लेख
http://www.ndtv.com/opinion/hanging-yakub-memon-makes-us-murderers-too-1...
<<<>>अपराध्याला शासन झाले
<<<>>अपराध्याला शासन झाले म्हणुन मला आनन्द वगैरे काही झाला नाही... ,<<
आमची किती प्रगती झालेली आहे ते पहा.
एक अतिरेकी, भारताच्या सार्वभौमतेला चुना लावतो, न्यायप्रक्रिया पुर्ण होउन त्याला फाशी दिली जाते, आणि अपराध्याला शासन झालं याचं समाधान आम्हाला होत नाहि. जय हो!>>>
------- थोडे स्पष्टीकरणः माझ्या साठी २५०+ (आणि त्या नन्तर झालेल्या प्रत्येक साल साखळी - स्फोटातले) लोकान्चे हकनाक प्राण गेले, ते दु:ख मोठे आहे, त्या जखमा अजुनही ताज्या आहेत.
याकुब हा माझ्या खिजगणतीतही नाही... तो आहे काय आणि नाही काय - फरक नाही पडत. न्यायालयिन प्रक्रिया आवर्जुन बघत होतो पण एव्हढी मोठी सर्कस चालवण्या एव्हढा हा मोठा मासाही नव्हता... मोठे मासे अजुनही बाहेर आहेत, आणि त्यान्च्या पर्यन्त कायदा पोहोचेल आणि त्यान्ना शासन होईल तेव्हा जरुर आनन्द व्यक्त करेन.
शान सिनेमामध्ये सुनिल
शान सिनेमामध्ये सुनिल दत्तच्या मृत्यूविषयी अमिताभ आणि शशी कपूर या त्याच्या दोन भावांशी बोलताना अब्दुल (मजहर खान म्हणतो),
"तुम्हारा भाई मरा ना, अपून को लगा, अपना कोई सगेवाला मरा है!"
शशी थरुर, दिग्वीजय, ओवेसी आणि याकूबच्या फाशीला आकांती विरोध करणार्यांची अशीच भावना झाली असावी बहुधा.
फाशीला विरोध करणे हे याकुबचे
फाशीला विरोध करणे हे याकुबचे समर्थन करणे असे बिंबवण्यात काही संघटना प्रयत्न करत आहे. आणि इथले काहीजण त्यांची री खेचत आहे
शशी थरूर यांची लिंक वाचलीत
शशी थरूर यांची लिंक वाचलीत तरी का? त्यांनी फाशी या शिक्षेबद्दल ती नसावी आणि का नसावी या बद्दल लिहिलंय. याकुब बद्दल नाही.
कोपरमाईन यांचा गैरसमज फार
कोपरमाईन यांचा गैरसमज फार आधीपासून होत आहे किंवा ते करून घेत आहे
(No subject)
कोपरमाईन यांचा गैरसमज फार
कोपरमाईन यांचा गैरसमज फार आधीपासून होत आहे किंवा ते करून घेत आहे >>>>>
देहान्त शासनाची शिक्षा नसावी
देहान्त शासनाची शिक्षा नसावी हा मुद्दाच माझ्यामते मुळात चुकीचा आहे. का नसावी जो त्या पातळीचा घृणास्पद गुन्हा करतो त्याला तीच शिक्षा असावी.
जर एखाद्या माणसाला घृणास्पद गुन्हा करताना काहीही वाटले नाही तर आपल्याला शिक्षा देताना करुणा का वाटावी.
आणि ज्यांच्या मनात अतीव करुणा आहे असा ज्यांचा स्वतःबद्दल समज आहे ते स्वतः बाबा आमटे मदर तेरेसा ह्यांच्या पावलावर पाऊल टाकून का नाही चालत.
बोलणार्यांनी विचार करा तुमचा तुमच्या मुला/मुलीचा हातपाय तुटून कायमचे अपंगत्त्व आले असते, तुमच्या घरातली कमावणारी एकमेव व्यक्ती अशा बाँबस्फोटात मरण पावली असती तर असेच म्हणाला असतात का तुम्ही?
आणि मग सहिष्णुच राहायचे तर सैन्य तरी कशाला बाळगायचे पोलिस तरी कशाला हवेत. कायदे तरी कशाला हवेत. कुणीही यावे आमच्या देशातली साधन संपत्ती शेतीवाडी बायकापोरे लुटून न्यावेत. कारण आम्ही सहिष्णु आहोत. आमच्यात माणुसकी आहे. आम्ही कोण्णाकोण्णाला म्हणून मारत नाही.
अहो मग तुम्ही स्वतः बाऊन्सर्स, झेड, झेड प्लस अशा सुरक्षा कवचात कशाला राहाता. स्वतःची घरे उघडी करा सर्वांना. कोणीही यावे काहीही घेऊन जावे. तुम्ही प्रतिकार केलात तर तुम्हाला तुमच्या घरच्यांना मारूनही जावे आणि हो तुम्ही त्यांना माफ करावे.
याकूबच्या फाशीला विरोध करणारे
याकूबच्या फाशीला विरोध करणारे विरोधी पक्ष मतीमंद आहेत!
- भाजप
टाळ्या
एक दोन मतिमंद ज्यांनी नुसता
एक दोन मतिमंद ज्यांनी नुसता विरोधच नाही तर स्वाक्षरी करून लिखित विरोध केला आहे ते स्वतःच्या पक्षात आहे हे विसरून गेले
अरे वा! धगधत्या चुलीत स्वागत
अरे वा! धगधत्या चुलीत स्वागत आहे. जी विझू न देण्यामुळे बरेच फायदे होतात. वटपौर्णिमेला बायका मला सात जन्म हाच नवरा पाहिजे म्हणतात. बहुधा येथील उदार धोरणे 'मला असंख्य जन्म हेच आय डी मिळत राहावेत' असे म्हणत असावीत.
सगळ्या "उदार धोरणांचे" जनक कम
सगळ्या "उदार धोरणांचे" जनक कम गुरु खुद्द असे म्हणत आहे बघून डोळ्यातून पाणी आले.
बाकी खर दाखवल्यावर करपली वाटते. आता टाळ्या वाजत नाही का?
बाकी याकूबला कव्हरेज देऊन
बाकी याकूबला कव्हरेज देऊन मिडियाने स्वतःची उरलीसुरली पतही घालवली.
आत्मघातकी पथके तयार करण्याचा
आत्मघातकी पथके तयार करण्याचा कारखाना कुठे आहे हे काल सगळ्यांना समजलेले आहे. बाकी मस्तपैकी अनुल्लेख!
मुबईत याकुब साठी नमाज अदा
मुबईत याकुब साठी नमाज अदा करायला १०,००० जमाव होता. शेवटचे दर्शन नाही म्हणता येणार कारण पोलिसान्नी तशी परवानगी दिली नव्हती.
१०,००० एव्हढा मोठा जमाव, चहाते कशामुळे आले ? कशाने हे पब्लिक motivate झाले होते ? माझ्या साठी हे धृवीकरण धोक्याची पुर्व सुचना आहे.
आत्मघाती पथकचा कारखाना उदय ते
आत्मघाती पथकचा कारखाना
उदय ते आवाहन बहुदा ओवेसीने केले होते. टिव्हीवर मुलाखत देताना बोललेले आठवते
>>>माझ्या साठी हे धृवीकरण
>>>माझ्या साठी हे धृवीकरण धोक्याची पुर्व सुचना आहे.<<<
अच्छा अच्छा!
Pages