सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.
१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.
२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.
३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.
४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.
५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.
६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?
७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?
८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?
राष्ट्रपतींनी याकूब मेमनची
राष्ट्रपतींनी याकूब मेमनची याचिका फेटाळली.
------- राष्ट्रपतीन्नी याचिका फेटाळली आहे. पण सर्वोच्च न्यायालयात अजुन अर्ज दाखल केला आहे, पहाटे २:३० ला सुनावणी (सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश जस्टिस मिश्रा यान्च्या निवासस्थानी आहे). रात्री फाशीच्या शिक्षेविरुद्ध याचिका दाखल केली आहे.
http://news.rediff.com/commentary/2015/jul/30/liveupdates.htm
निकालाची वाट पाहात आहे.
निकालाची वाट पाहात आहे.
आपवाला प्रशांत भूषण देखील याकुब तर्फे १४ दिवसांची मुदत मागाय्ला गेला आहे.
अरे बापरे.. हा एक वेगळाच
अरे बापरे.. हा एक वेगळाच ट्वीस्ट. करतोय फॉलो.
ही सुनावणी कशाची आहे? १४ दिवस वाढवून मिळावे म्हणून का आणि काही?
राष्टपतीन्नी दयेचा अर्ज
राष्टपतीन्नी दयेचा अर्ज फेटाळल्या नन्तर किमान १४ दिवसान्ची मुदत (शिक्षेचा अम्मल) द्यावी लागते असे कायदा सान्गतो.
याआधी पण दयेचा अर्ज राष्ट्रपतीन्नी फेटाळला होता पण तो याकुब च्या भावाने दाखल केला होता. हा फ्रेश अर्ज त्याने स्वत: दाखल केला आहे....
भर मध्यरात्री भारताचे सर्वोच्च न्यायालय सुरु आहे.... असे या आधी कधी झाले आहे ? इतिहासात नोन्द घ्यावी असे दुर्मिळ चित्र आहे.
शिक्षेचा अम्मल करणार्यान्च्या डोक्यावर किती टेन्शन आले असेल ?
याकूबचा स्वत:चा अर्ज आता केला
याकूबचा स्वत:चा अर्ज आता केला या युक्तिवादाला निदान माझ्या मते तरी काहीच अर्थ नाही. हे केवळ वेळकाढूपणाचे धंदे सुरु आहेत.
जस्टीस दीपक मिश्रांचा एकंदर
जस्टीस दीपक मिश्रांचा एकंदर सूर पाहता याकूब जाणार असं वाटत आहे.
चेकमेट! नेक अॅन्ड
चेकमेट! नेक अॅन्ड क्रॉप!
मेमनची फाशी कायम.
फाशी दिल्याची बातमी चॅनल्स वर
फाशी दिल्याची बातमी चॅनल्स वर दाखवत आहेत!!!
इतक्या सर्व किचकट न्यायप्रक्रियांमधून गेल्याबद्दल आणि तरीही आरोपीला बचावाची प्रत्येक संधी दिल्याबद्दल भारतीय न्यायसंस्थेचा प्रचंड अभिमान वाटतो आहे.
आता या विषयावर पण बॉलीवुड
आता या विषयावर पण बॉलीवुड सिनेमा काढणार का?
निर्ल्लज्ज बॉलीवूडवाल्यांचं
निर्ल्लज्ज बॉलीवूडवाल्यांचं काही सांगता येत नाही वत्सलाताई.
याकूबची भूमिका सलमान करेल आणि बेअक्कल फॅन्स तो सिनेमाही सुपरहीट करतील.
फाशी झाली हे उत्तम झाले.पण
फाशी झाली हे उत्तम झाले.पण देशद्रोह्याला शिक्षा देताना २२ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागला हे खेदजनक आहे.
सर्वोच्च न्यायालयानं रात्री
सर्वोच्च न्यायालयानं रात्री आणखी एक सुनावणी घेतली ते चांगलंच. पण चकव्यात सापडल्यासारख्या वाद-प्रतिवादातून खरा मुद्दा उचलला गेलाच नाही की काय, असं वाटतं. हे जरूर वाचा: http://www.loksatta.com/sampadkiya-news/death-penalty-to-yakub-memon-112...
आता फाशी झालेली आहे तेव्हां
आता फाशी झालेली आहे तेव्हां फाशी टाळण्यासाठी "देशद्रोही" लोक मुद्दे उचलताहेत अस्सा तरी आरोप होणार नाही.
भेटूयात नंतर..
कौवा तुम्ही दिलेला लोकसत्तेचा
कौवा तुम्ही दिलेला लोकसत्तेचा अग्रलेख उत्तम आहे. बाँबस्फोटाच्या कटाशी याकूबचा संबंध नव्हता हे लिहिण्याचे धाडस लोकसत्तने केले.
>>इतक्या सर्व किचकट
>>इतक्या सर्व किचकट न्यायप्रक्रियांमधून गेल्याबद्दल आणि तरीही आरोपीला बचावाची प्रत्येक संधी दिल्याबद्दल भारतीय न्यायसंस्थेचा प्रचंड अभिमान वाटतो आहे.<<
++१
जस्टिस डिलेड, बट डिलिवर्ड...
Being a true muslim i feel
Being a true muslim i feel Yakub Memon got what he deserved !! I stand by the supreme court's judgement !!
-- एक मित्र!!
लिहायचे धाडस दिसते तुम्हाला
लिहायचे धाडस दिसते तुम्हाला यामधे .?

भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान नाही दिसत .? व्वाह!
असो,
आज 'हसाव की रडाव तेच कळत नाही' म्हणतात त्याचा शब्दशः अनुभव आपला देश घेतोय अस वाटत..
एकीकडे फाशीचा आनंद आहे, तर दुसरीकडे डॉ. कलाम या पितृतुल्य व्यक्तिमत्वाला गमवल्याचा शोक आहे ..
बाँबस्फोटाच्या कटाशी याकूबचा
बाँबस्फोटाच्या कटाशी याकूबचा संबंध नव्हता हे लिहिण्याचे धाडस लोकसत्तने केले. >> एकीकडे बी रमन ह्यांच्या लेखाचे दाखले द्यायचे आणि दुसरीकडे त्यांनीच नि:संदिग्ध शब्दांत "There is not an iota of doubt about the involvement of Yakub and other members of the family in the conspiracy and their cooperation with the ISI till July 1994." हे लिहिलेले मात्र सोयीस्कर रीत्या नजरेआड करायचे ह्यालाच बुद्धीभेद म्हणतात का हो?
अफजल गुरुचा अर्ज
अफजल गुरुचा अर्ज राष्ट्रपतींकडे पोचलाच नाही अजून असे वर्षानुवर्ष ऐकत होतो. या केसमधे फारच लवकर पोचल अर्ज.
कौवा, तो लेख अज्जिबात पटला
कौवा, तो लेख अज्जिबात पटला नाही.
याकूब कसा निर्दोष हे ठरवून मग त्यावर फॉर्मुलेट केल्यासारखा वाटतोय.
एका सी ए ला बाँबस्फोटासारख्या कामांना पैसा पुरवताना हे काय आणि कशाबद्दल चाललंय हे माहिती नसणं हे कुणालाही पटण्यासारखं नाही. जर त्याला काही माहित नव्हतं तर मग तो पाकिस्तानात आणि नेपाळात लपला का होता?
त्याला काही माहित नव्हतं तर मूळात पाकिस्तानच्या इन्वॉल्वमेंटबद्दल कुठली माहिती देणार होता तो?
त्याला माफीचा साक्षीदार करून भारताने काही माहिती मिळवली म्हणे. कसली माहिती मिळाली? काय उपयोग केला तिचा पुढ?
याहूनही जास्तं वाईट असंवाटतंय की तो लेख न्याय मिळाला याचा आनंद वाटणे या गोष्टीला उन्माद ठरवतोय.
देशभक्ती ही काहितरी चुकीची किंवा दूषणास्पद गोष्टं असल्याचं ठसवतोय.
यांना याकूबसारख्यांची दया येतेय आणि जे हकनाक मेले त्यांची नाही.
तो लेख केवळ राजकीय हेतूंनी त्यांनी लिहिणे आणि इतरांनी तो अॅप्रेशिएट करणे हेच दुर्दैवी आहे.
हाईट आहे तो लेख … सुपर्ब
हाईट आहे तो लेख …
सुपर्ब तारे तोडलेत 
साती +१
साती +१
>>इतक्या सर्व किचकट
>>इतक्या सर्व किचकट न्यायप्रक्रियांमधून गेल्याबद्दल आणि तरीही आरोपीला बचावाची प्रत्येक संधी दिल्याबद्दल भारतीय न्यायसंस्थेचा प्रचंड अभिमान वाटतो आहे.<<
------ सहमत...
साती - छान पोस्ट... सहमत.
अपराध्याला शासन झाले म्हणुन मला आनन्द वगैरे काही झाला नाही... ,
मला आजही १९९३ चे साखळी बॉम्बस्फोट आणि त्यात हकनाक प्राण गमावलेले २५०+ निरपराध्यान्ची आठवण येते.
मेमन, दाऊद इब्राहिम हे केवळ निमीत्त आहेत. आज एक मेमन गेला, उद्या अजुन चार मेमन बॉम्ब ठेवायला मिळतील.... दोन समाजामधे वैमनस्याची भावना पसरवणारे खरे दोषी आहेत. समाजाने, नागरिकान्नी या विखारी प्रचारा पासुन सावध रहावे. (द्वेष भावनेने अन्ध झालेला) समाज रस्त्यावर लढत रहातो, जाळ पोळ, तोडफोड करत फिरतो आणि विष पसरवणारे आरामात Z+, Y+ मधे सुरक्षित रहातात.
तुम्हाला आणि मला या २२ वर्षान्च्या कडवट अनुभवातुन काही तरी शिकायला मिळावे यासाठी शुभेच्छा...
लोकसत्तेच्या संपादकांचं डोकं
लोकसत्तेच्या संपादकांचं डोकं ठिकाणावर आहे ना?
आमचा याकूबबाळ कित्ती गुणाचा होता. दाऊद आणि टायगर बाँब-बाँब खेळत होते तेव्हा बिचारा दुबईला फिरायाला गेला होता आणि परत आल्यावर सरकारने त्यालाच फसवलं हो यात. कित्ती दुष्टं माणसं ही ब्वॉ! आमी नाही जा!
असा एकूण लेखाचा सूर आहे! काय तारे तोडलेत! वा!
-----------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय न्यायव्यवस्थेने न्यायाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडून, त्यासाठी मध्यरात्री सुप्रिम कोर्ट भरवून बचावाची संधी दिली होती. कायद्यानुसार तो गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला आणि त्याला त्याप्रमाणे शिक्षा देण्यात आली. भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होण्यासारखी ही पूर्ण निर्णयप्रक्रिया राबवली गेली आहे.
साती उत्तम पोस्ट. एकदा काय
साती उत्तम पोस्ट.
एकदा काय ते नक्की ठरवा, याकूब माफीचा साक्षीदार होता, त्यानं कटाची माहिती दिली म्हनून त्याला फाशी द्यायला नको हवी होती की एका सी ए माणसाला आपल्या घरात काहीही धंदे चालल्ल्याची अजिबात माहिती नव्हती, तरीपण तो स्फोटाच्या आदल्या दिवशी भारत सोडून पळाला तरी तो इनोसंटच होता, त्याचा कटात काहीही संबंध नव्हता म्हणून त्याला फाशी द्यायला नको हवी होती!! दोन्हीपैकी नक्की काय ते एकदाचं ठरवून टाका पाहू.
साती, पोस्ट आवडली.
साती, पोस्ट आवडली.
'याकूब निरपराध नाही', असं
'याकूब निरपराध नाही', असं लेखात स्पष्ट म्हटलंय की. ही भूमिका बी.रामन यांच्या भूमिकेहून निराळी वाटत नाही. मुद्दा हा होता/आहे की फाशीयोग्य होता की नव्हता? संपूर्ण यंत्रणेला तो तसा वाटला, त्याप्रमाणे अंमलबजावणीही झाली.
पण त्यापेक्षा वेगळं मत अनेकांचं (अजूनही) आहे. त्यात कायद्याचे जाणकारही आहेत. त्या लोकांनी तसं मत मांडणं दुर्दैवी नाही, कायद्याच्या राज्यातली आवश्यक गोष्ट आहे.
"अपराध्याला शासन झाले म्हणुन
"अपराध्याला शासन झाले म्हणुन मला आनन्द वगैरे काही झाला नाही" >>> +१
त्यांनी तसं मत मांडणं
त्यांनी तसं मत मांडणं दुर्दैवी नसेल एकवेळ पण हे मत ज्यांना पटत नाही त्यांच्या राष्ट्रभक्तीला देशप्रेमाचा उन्माद म्हणणे नक्कीच दुर्दैवी आहे.
मूळात कायद्याच्या जाणकारांच्या लोकांसमोरच्या भूमिका या न्यायापेक्षा इतर अनेक कारणांना बांधिल असतात याचा अनुभव आहे.
मुद्दा हा होता/आहे की
मुद्दा हा होता/आहे की फाशीयोग्य होता की नव्हता? संपूर्ण यंत्रणेला तो तसा वाटला, त्याप्रमाणे अंमलबजावणीही झाली.
पण त्यापेक्षा वेगळं मत अनेकांचं (अजूनही) आहे. त्यात कायद्याचे जाणकारही आहेत. त्या लोकांनी तसं मत मांडणं दुर्दैवी नाही, कायद्याच्या राज्यातली आवश्यक गोष्ट आहे.<<< इतरांचं जाऊ दे, प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. आता तुमचे स्वतःचे मत काय आहे?
(१) याकूबला फाशी नको की (२) फाशीची शिक्षाच नको?
१. याकूबला फाशी नको तर का नको? त्याला फाशी देणर्या यंत्रणेने काही चुका केलया तर त्या कुठल्या? आज जर याकूबला फाशी दिली तशीच उद्या साध्वी प्रज्ञासिंगला फाशीची शिक्षा जाहीर झाली तर तुमचे मत काय असेल? त्याहीवेली तुम्ही यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करणर आहात का? की तेव्हा तो न्यायसंस्थेचा विजय असेल?
याकूब केसमध्ये तुम्हतितरांनी लिहिलेले लेख (जे अर्थात ओपिनियनेटेड असताइत) कोर्टाचे निकाल वाचले आहेत का? त्यात तुम्हाला कुठे संदिग्धता आढळत्कात का?
याकूबला व्यवस्थित लीगल सल्ला मिळाला नाही असे तुम्हाला वाटते का? त्याला अधिक योग्य वकिल मिळायला हवा होता का?
(२) फाशीची शिक्षाच नको असे म्हणणे असेल तर उद्या तुम्ही निठारी हत्याकांड निर्भया, खैरलांजी हत्याकांड यासारखा नराधम खुन्यांनाही हाच न्याय लवणार आहात का? कैद्यांचे पुनर्वसन करायचे झाले तर त्या पुनर्वसनामध्ये तुम्ही अॅक्टीव्ह सहभाग घेणार आहात का? (उदा. एखाद्या खुन्याला तुम्ही घरकामासाठी गडी ठेवणे) लोकांनी कायद्य्याची भिती बसण्यासाठी नक्की कशाप्रकारे शिक्षा द्यायल्या हव्यात असे तुम्हाला वाट्ते?
(कृपया इतरांच्या लेखांच्या लिंक्स नको. तुमची स्वतःची मते (बरोबर चूक वगैरे बाजूला ठेवू) लिहिणार का?
Pages