वर्‍हाडी ठेचा

Submitted by टीना on 28 July, 2015 - 08:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

* ओल्या लाल मिरच्या - अर्धा पाव ( म्या लाल झालेल्या मिरच्या घेतल्या.. हिरव्या असताना आणलेल्या मिरच्या समद्या वापरण्यात न आल्यानं लाल व्हाले लागल्या व्हत्या म्हणुन त्याच रपातपा केल्या..म्हणजे कामी आणल्या)
* लसणाच्या पाकळ्या - १० १२ ( १५ बी चालतीन.. तिखट किती झेलु शकता त्यावर हाय. )
* अद्रक - चित्रात दिसन तेवढा घ्या..
* जिरं - अर्धा चमचा
* मिठ - चवीनुसार घेता येत नसन त काही अर्थ नै तुमच्या सयपाकाले ..
* १ अख्ख्या लिंबाचा रस
* मिक्सर आणि मिक्सरच लहानवाल भांड.. ( कोणचाई यक प्रकार असुन जमत नै )
* मिरच्या जराश्या भाजासाठी तवा नै त कढई अन चालु जीवंत असणारी गॅस शेगडी..( सिलेंडर मदि गॅस भरुन असावा हे वेगळ सांगणार नाय.. इतकुशी गोष्ट बी सांगाची वेळ पडत असन त उद्या तुमी घास तोंडात कसा टाकाचा, कसा चावाचा कसा गिटकाचा ते बी पुसान..कोन सांगितल )

क्रमवार पाककृती: 

तर...

१. पहिले मिरचिच्या ठुश्या काढुन तिल जराशी मदुन मोडून तापलेल्या तव्यावर ( इथ वरच ) किंवा कढईत ( इथ कढईतच .. खाली वर कुठच नै ) भाजुन घ्या.

२. थंड झाल्यावर त्या मिरच्या + लसुण + अद्रकाचा तुकडा + लिंबाचा रस + मिठ + जिरं मिक्सरच्या छोट्या भांड्यात फिरवुन घ्या.

ज्याले जस वाटनं तस खा.. पोईसंग, भाकरीसंग मस्त लागते.. वरुन कच्च तेल घ्याच घ्या.. पोटाले जपुन बर..
एकापाठोपाठ दार वाजवाव लागले तर आपल्यावर नाव नाई..

हे कच्च सामान :
DSC06192-001.JPG

हे पिकल वाल Biggrin .. फाईनल रिजल्ट
DSC06201.JPG

ह्यापेक्षा डाऊन रंग आला त करताना नक्की मिरच्याच टाकल्या का नै ते बघुन घ्या..

वाढणी/प्रमाण: 
आता म्या पामरानं थे कसं सांगाव..पाहा कस जमते थे..
अधिक टिपा: 

सर्वात महत्वाचं म्हणजे..
१. भाजताना मिरच्या तोडून घ्या..अपनेआप फुटून बी ( मिरचिची ) डोयात गेली त कानाले खडा.. आपल्यावरवर नाव नाई..

२. मिरच्या धु का ? कोरड्या करु का ? लिंबाच्या बिया काढू का ? तेलात हिंग, गोडलिंबाचा पत्ता अन कहर म्हणजे साखर किंवा गुळ टाकु का अस विचारल त शप्पथ Angry

३. किती दिवस टिकन म्हंता ? आता का सांगु राजेहो..खाण्यावर हाय समद.. चार लोकाच्या घरात यवढा ठेचा दोन टायमाले खातो म्हणल त चार दिस टिकाले पाहिजेन.. कच्चा लसुण अद्रक हाय म्हणल्यावर फ्रिजमंदी ठेवसान.. आणान आफत नाई त..

४. फोटूत वरचा सांबार निर्रा दाखवालेच ठेवला बर..टाकान नाई त..
आन पहिल्या फोटूतली वाटी, लसणाचे फोतर हाय त्यात..ते पण होती तिथ म्हणुन फोटूत आली..थे कचरा टा़कू नका रे बा..

माहितीचा स्रोत: 
काइ आठवत नाई बा..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचुन नाकातोंडातून धुर आला.........

पण आपला आवडता पदार्थ ब्वाॅ.. पचनाची ताकद कमी असते त्यांच्या साठी इशारा.... लिहायंच आवरतोय त्यात काय ते समजावे.

पुरेसा लालभडक रंग का दिसत नाही? कदाचित हिरव्या मिरच्या लाल व्हायला आल्या म्हणून त्या वापरल्या म्हणून खूप लाल दिसत नाहीत का? मग वाळलेल्या लाल भडक का घेऊ नयेत?

वाळलेल्या लालभडक घ्यायच्या असतील तर पाण्यात ठेऊन मऊ करून घ्यायलालागतील नाहीतर मिरच्यांची पूड होईल, ठेच्याचे टेक्स्चर येणार नाही.

रॉबीनहूड, त्या पुर्ण वाळलेल्या पन नव्हत्या आणि पुर्ण ओल्या सुद्धा नव्हत्या म्हणुन तसा रंग दिसतोय. तसा छान रंग दिसतो..लाल एकदम Happy

घातला मॅडम तुमी आमचा जीव दुचक्यात!! आता गृहलक्ष्मी च्या नाई तर ऑर्डरली च्या पाया पड़ने पड़ीन मले तर मावल्या ताटाटनी टेसा पड़न!!!

अवांतर

मिरच्या धु का ? कोरड्या करु का ? लिंबाच्या बिया काढू का ? तेलात हिंग, गोडलिंबाचा पत्ता अन कहर म्हणजे साखर किंवा गुळ टाकु का अस विचारल त शप्पथ

आम्ही जेव्हा पुण्यात होतो तेव्हा कुठल्याही पुणेरी मित्र मैत्रिणी ने जेवायला बोलवले तर चेष्टा म्हणुन त्याला/तिला "तुझ्याघरी साखरेच्या डब्यातला चमचा तिखटात टाक अन तिखटातला साखरेत मग जेवायला येतो" असे म्हणत असु

र्‍हायला र्‍हायला दिसून र्‍हायला. लसनाशेजारच्या वाटीत काय्ये ते? लसनाच्या साली वाटून र्‍हायल्या मले.

टिने... Biggrin आल्या आल्या कामाला लागलीस ना? आणि आम्हालाही कामाला लावलंस.
आता इतकं टेष्टी काहीतरी लिवलंस कराया पाहिजेच की ...न्हाय का?

रेसिपी भारी आहे आणि लिहिण्याची पद्धत सुद्धा .

अवांतर - नै हे क्रियापद 'नाही 'ला समानार्थी म्हणून विदर्भात वापरतात का टीना ? तुमच्या जवळपास प्रत्येक पोस्टित वाचलेल आहे

करा करा..
मज्जा करा.. केल्यावर सांगा कसा लागतु ते..
तिखट . अस म्हणान त तुमी हाय अन मी हाय.. ठेचा व्हय तो..थे बी मिरचिचा.. तिकट नाई त का ग्वाड असणारे.. चव कशी लागते वरुन तेल घेतल्यावर थे सांगा म्हणल.. संबाळुन पन.. सगळिकड झोंबु शकतो थो..मंग म्हणाच नाई..

यालेच खान्देशात रंजका म्हंतेत नई का? कयन्याच्या भाकरीसंगे लै खल्लास लागते.

गर्रम तेल मोहोरीची फोडणी घालायची वर्तून कड्डक, सोबत एक कांदा बुक्कीने फोडून आन गरम गरम कळण्याची भाकर! आहाहा!!

शक्यतो झाडावर पिकलेल्या लाल मिर्च्या घ्या. मग रॉहूंना हवा तसा वर्जिनल लालभडक रंग येतो. चवही थोडी वेगळी अन झक्कास लागेल. तैंनी वर फ्रिजात पिकवलेल्या हिरव्या मिरच्या 'रफादफा' केल्यात Wink

नै हे क्रियापद 'नाही 'ला समानार्थी म्हणून विदर्भात वापरतात का टीना ?
<<
विदर्भ, खानदेश हे मप्र ला लागून असलेले भाग आहेत. नै = नई = नहीं असा अपभ्रंश आहे तो.

Pages