* ओल्या लाल मिरच्या - अर्धा पाव ( म्या लाल झालेल्या मिरच्या घेतल्या.. हिरव्या असताना आणलेल्या मिरच्या समद्या वापरण्यात न आल्यानं लाल व्हाले लागल्या व्हत्या म्हणुन त्याच रपातपा केल्या..म्हणजे कामी आणल्या)
* लसणाच्या पाकळ्या - १० १२ ( १५ बी चालतीन.. तिखट किती झेलु शकता त्यावर हाय. )
* अद्रक - चित्रात दिसन तेवढा घ्या..
* जिरं - अर्धा चमचा
* मिठ - चवीनुसार घेता येत नसन त काही अर्थ नै तुमच्या सयपाकाले ..
* १ अख्ख्या लिंबाचा रस
* मिक्सर आणि मिक्सरच लहानवाल भांड.. ( कोणचाई यक प्रकार असुन जमत नै )
* मिरच्या जराश्या भाजासाठी तवा नै त कढई अन चालु जीवंत असणारी गॅस शेगडी..( सिलेंडर मदि गॅस भरुन असावा हे वेगळ सांगणार नाय.. इतकुशी गोष्ट बी सांगाची वेळ पडत असन त उद्या तुमी घास तोंडात कसा टाकाचा, कसा चावाचा कसा गिटकाचा ते बी पुसान..कोन सांगितल )
तर...
१. पहिले मिरचिच्या ठुश्या काढुन तिल जराशी मदुन मोडून तापलेल्या तव्यावर ( इथ वरच ) किंवा कढईत ( इथ कढईतच .. खाली वर कुठच नै ) भाजुन घ्या.
२. थंड झाल्यावर त्या मिरच्या + लसुण + अद्रकाचा तुकडा + लिंबाचा रस + मिठ + जिरं मिक्सरच्या छोट्या भांड्यात फिरवुन घ्या.
ज्याले जस वाटनं तस खा.. पोईसंग, भाकरीसंग मस्त लागते.. वरुन कच्च तेल घ्याच घ्या.. पोटाले जपुन बर..
एकापाठोपाठ दार वाजवाव लागले तर आपल्यावर नाव नाई..
हे कच्च सामान :
हे पिकल वाल .. फाईनल रिजल्ट
ह्यापेक्षा डाऊन रंग आला त करताना नक्की मिरच्याच टाकल्या का नै ते बघुन घ्या..
सर्वात महत्वाचं म्हणजे..
१. भाजताना मिरच्या तोडून घ्या..अपनेआप फुटून बी ( मिरचिची ) डोयात गेली त कानाले खडा.. आपल्यावरवर नाव नाई..
२. मिरच्या धु का ? कोरड्या करु का ? लिंबाच्या बिया काढू का ? तेलात हिंग, गोडलिंबाचा पत्ता अन कहर म्हणजे साखर किंवा गुळ टाकु का अस विचारल त शप्पथ
३. किती दिवस टिकन म्हंता ? आता का सांगु राजेहो..खाण्यावर हाय समद.. चार लोकाच्या घरात यवढा ठेचा दोन टायमाले खातो म्हणल त चार दिस टिकाले पाहिजेन.. कच्चा लसुण अद्रक हाय म्हणल्यावर फ्रिजमंदी ठेवसान.. आणान आफत नाई त..
४. फोटूत वरचा सांबार निर्रा दाखवालेच ठेवला बर..टाकान नाई त..
आन पहिल्या फोटूतली वाटी, लसणाचे फोतर हाय त्यात..ते पण होती तिथ म्हणुन फोटूत आली..थे कचरा टा़कू नका रे बा..
लय भारी!
लय भारी!
कोरड्या लाल मिरच्या नाही का
कोरड्या लाल मिरच्या नाही का चालणार?
कोरड्या लाल मिरच्या नाही का
कोरड्या लाल मिरच्या नाही का चालणार? इथे ओल्या मिळणं कठीण वाटतयं
नाना, त्या पाण्यात भिजत घालून
नाना,
त्या पाण्यात भिजत घालून ओल्या करून घ्या. वर एकदा ही माहिती येउन गेली आहे.
टीना, पाककृती छान लिहीली आहे.
टीना, पाककृती छान लिहीली आहे. मजा आली वाचताना.
रेसीपी छान लिहिलीये. पण खर
रेसीपी छान लिहिलीये.
पण खर सांगू का मिरच्या खूपच वाळक्या दिसताहेत ठेच्यासाठी. ठेच्याला मिरच्या लालभडक, रसरशीत हव्यात. आम्ही घरी रंजका किंवा थेचा करतो तेव्हा जितक्या ताज्या मिरच्या घेता येतील तेवढ्या घेतो.
दीड मायबोलीकर.....धन्स!!
दीड मायबोलीकर.....धन्स!!
नाना..निभुन जाईल काम दि मा
नाना..निभुन जाईल काम दि मा करांनी सांगितल्याप्रमाणे.. बस जास्त दिवस टिकेन कठिण आहे पाण्यामुळे.. फ्रिज मदे ठेवा
सीमा, अग तेच सांगतेय ना आणि पाकृ मधे पन तर लिहिलय कि ओल्या लाल मिरच्या घ्या म्हणुन आणि मी असलेल्या रपातपा केल्या ते..
परत एकदा नविन प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद
नाना, पाण्यात घालण्यापूर्वी
नाना, पाण्यात घालण्यापूर्वी सुक्या मिर्च्यांचे तुकडे करून गरम तव्यावर मिनिटभर भाजून घ्या. नंतर तुकडे जेमतेम बुडतील इतपत कोमट पाण्यात तासभर बुडवा. वाटण्यापूर्वी कोरडे करून घ्या. जास्त चांगला स्वाद येतो. पाणीपण बरंच तिखट होतं. फेकून न देता भाज्या आमट्यांत वापरता येतं.
झणझणित लागत असणार!
झणझणित लागत असणार!
लाटे मध्ये वर्हाडी ठेचा तग
लाटे मध्ये वर्हाडी ठेचा तग धरुन आहे.
अभिनंदन.
प्राजक्ता, किती तिखट मिरच्या
प्राजक्ता, किती तिखट मिरच्या आहे त्यावर ठरत.. लिंबुमुळे दाह कमी होतो पन..
निसर्गचक्र ,
मामाकडे एक लाल मिरच्याच वाण
मामाकडे एक लाल मिरच्याच वाण होत तशा ओल्या लाल मिरच्या,लसुण्,नावाला शेन्गदाणे अस एकत्र पाट्यावर वाटुन ठेचा केला जाई, हाताची सुधा आग होत असे १-२ दिवस..बाकी खाल्ल्यावर काय होत असेल ते खाणारेच जाणोत... हा ठेचा बहुधा तरी घरी कापणी करायला आलेल्या मजुरासाठी भाजि-भाकरीबरोबर केला जाई, घरचेही पट्टिचे तिखट खाणारे खात असत... गेले ते दिन!
भल्ली गुनाची बाय टीने तू! यात
भल्ली गुनाची बाय टीने तू!
यात थ्वाडा पुदीना पर टाकून बघ..
लय भारी लागतय..
आज सकाळी केल्ता.. लै झाक
आज सकाळी केल्ता.. लै झाक झालता...
हा घ्या झब्बु...
आहा..सायली..लय बेस.. करवंद
आहा..सायली..लय बेस..
करवंद केव्हा येतील यार..मला चटणी टाकायची आहे त्याचीपन..
आलीत की करवंद..
आलीत की करवंद..
इकड नै न दिसली मला
इकड नै न दिसली मला अजुन..
शोधते आता परत..
लय भारी..वऱ्हाडी ठेचा आणि
लय भारी..वऱ्हाडी ठेचा आणि लिहिण्याची स्टाइल..
झणझणीत लिखाण आणि रेसिपी
झणझणीत लिखाण आणि रेसिपी तोपासु.
लाटे मध्ये वर्हाडी ठेचा तग
लाटे मध्ये वर्हाडी ठेचा तग धरुन आहे.
अभिनंदन.>>>>>>+१११११
भावदिप, जागू, धन्यवाद नाना
भावदिप, जागू, धन्यवाद
नाना
अरे वा झणझणीत रेसिपी.
अरे वा झणझणीत रेसिपी.
आँ ! आता जुलै संपून वॉगस्ट
आँ ! आता जुलै संपून वॉगस्ट आला... आता करवंदं मिळतात ?
Pages