नारळाची मिठाई

Submitted by पूनम on 22 July, 2009 - 04:13
naralachi mithaee
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

एक नारळ, २०० ग्रॅम खवा, २०० ग्रॅम साखर, सुकामेवा- काजू, बदामाचे काप, बेदाणे, २ चमचे तूप

क्रमवार पाककृती: 

१. नारळ खवून घ्या.
२. खवा जाड बुडाच्या भांड्यात २ चमचे तूपावर भाजा, पण रंग बदलू देऊ नका किंवा खाली लागू देऊ नका.
३. नारळ आणि साखर एकत्र करून गॅसवर ठेवा, सतत ढवळा.
४. साखर विरघळून मिश्रण थोडे घट्ट्सर झाले, की खवा मिसळा.
५. खवा मिसळला की मिश्रण पातळ होईल. ते घट्ट होईपर्यंत आळवत रहा.
६. कोमट झाले की हव्या त्या आकाराची मिठाई करा/ लाडू वळा.
७. वरून सुकामेवा लावा.

वाढणी/प्रमाण: 
साधारण २० लाडू
अधिक टिपा: 

१. ओला नारळ नसेल, तर डेसिकेटेड चालेल.
२. खायचे रंग, ईसेन्स घालून रंगीबेरंगी मिठाई करू शकाल.
३. ओला नारळ आणि खवा असल्याने, जास्त टिकणार नाही.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्रात आलेली पाककृती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे... नारळीपौर्णिमेसाठी एकदम बेस्ट..

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

खव्याएवजि जर मिल्क्-मावा पावडर (दिप ब्रन्डची उसगावात मिळते) टाकुन नेहमिप्रमाणे ओल्या खोबर्‍याच्या वड्या कराव्या.. छान लागते ति बर्फी आणी टिकतेसुद्धा जास्त.( मिल्क मावा पावडर नसेल तर मिल्क पावडर सुद्धा चालेल)

बाजारी सुक्या खोबर्‍याचा किस थोड्या कोमट दूधात भिजवून वापरला तर ताज्या खोबर्‍यासारखी चव येते.

हं करून बघता येईल.

मला वाटतं की शीत कपाटात ठेवल तर जास्तीत जास्त दोन दिवस टिकेल ना?

पूनम, खवा भाजायला तूप हवंच का? कारण मावा बर्फी करताना मी खवा नुसतात थोडा परतते तर त्याला थोडे तूप सुटते. तसेच रिझल्ट्स्च्या सिझन मधे किंवा प्रमोशन्स्च्या सिझनमधे आपल्याजवळ वेगवेगळ्याप्रकारचे पेढे, बर्फी, काजूकतली जमा होते. खव्याच्या ऐवजी हे पदार्थ कुस्करुन थोडे भाजून टाकले तर चालेल का?

***************
ॐ नमश्चण्डिकायै |

खवा खाली लागू नये आणि खमंग वास यावा, म्हणून तूप (२ चमचेच)
जास्तीच्या पेढे-बर्फीची आयडीया खास.. नक्कीच वापरता येईल.

पुढल्या आठवड्यात करणार आहे, जमलं तर फोटो टाकेन.
---------------------------------------------
नेकी कर और पानीमें डाल.

सही आहेस तू मिनोती! Happy

वर लिहिलेली मिठाई राखीपौर्णिमेला केली होती! सही होते.. एकदम उच्च!

भावाने अजून एक सजेशन दिलंय- साखरेचा पाक करून, त्यात हलका रोझ ईसेन्स घालून, या वरच्या मिठाईचे गोळे रसमलाईसारखे त्यात सोडायचे!!!! अतिप्रचंड गोड होईल ते प्रकरण.. कोणाला करायचे असल्यास करा Happy मी टीप दिलिये.

पुनम कसल्या सही वड्या, लाडु बनवतेस ग! तुझी अंजिर वडी रेसीपी पण सोप्पी वाटते आहे. पण माझ्या वड्या अती मउ तरी होतात नाहीतर कोरडी भुकटी तरी होते. . हे असल प्रकरण करायचा धीरच होत नाही. मी पोर्णिमेला नारळाच्या वड्या करायला गेले तर नुसत कोरड कोरड मिश्रण तयार झाल. काही कळलच नाही नक्की कशामुळे झाल ते. काही टीप्स असतील तर दे ना.

रचना! किती दिवसांनी! काय पत्ता? Happy
अंजीर बर्फी मऊच होते बरंका Happy
कोरड्या वड्या- साखर जास्त घालतेस का? किंवा खूप जास्त आटवतेस का? थोडे दूध शिंपडून बघ, त्याने मऊ होते वडी.
जितका नारळ तितकीच साखर हे प्रमाण आणि मिश्रण कडेने सुटून त्याचा गोळा होऊ लागला की उतरवणे ही स्टँडर्ड प्रोसेस. खुटखुटीत वडी नाही पडली, तरी फ्रीजेमध्ये ठेवल्यानंतर होते व्यवस्थित नंतर- ही टिप Wink

अग ते घट्टच होईना म्हणून बराच वेळ आटवत बसले होते. आणि मग ते कोरडच झाल. मधली गोळा होण्याची स्टेप झालीच नाही. बर मी परत एकदा करून बघते. Happy धन्यवाद ग Happy
नमस्कार आर एच. कसे आहात?

हे मधे इंग्रजी मधे कस लिहायच? पुर्वी कस <> मधे लिहिल की ईंग्रजी मधे लिहील जायच.

मी केली ही बर्फी. जरा सॉफ्टच झाली पण मस्त.
फोटो नाय बुवा काढले. विसरलेच Sad
त्यातुन नवर्‍याला धाडला पेढे आणायला तर त्याने पिवळे वाले आणले. खोबरा बर्फी पिवळी झालीये Uhoh मग मी त्यावर बदामाच्या काप लावुन पांढरी करायचा प्रयत्न केला. Happy चव मस्तये Happy

मी काल रात्री केली. ओल्या खोबर्‍याऐवजी डेसिकेटेड कोकोनट वापरलं फक्त, बाकी प्रमाण आणि कृती अशीच्या अशीच वापरली. मिश्रण थापायला झाल्यावर १/४ भागात केशर सिरप घालून जरा दुरंगी बर्फी वगैरे करायचा प्रयोग केलाय Happy

naral burfi.jpg

नारळीपौर्णीमेच्या शुभेच्छा! Happy