गेल्या दहा वर्षातील प्रधानमंत्र्यांची फोटोशॉप्ड चित्रं ही काही खूप जुनी गोष्ट झालेली नाही. प्रधानमंत्र्यांबद्दल मौनीबाबा, उठ म्हटलं की उठतो अशा एकेरी उल्लेख असलेल्या कमेण्ट्स सुद्धा जुन्या नाहीत.
टाईम मासिकाचे रिपोर्ट्स घेऊन नेटवर झालेला उन्माद नवा नाही. कुठल्याही वर्तमानपत्राचं पोर्टल असू द्या, सोशल मीडीया असू द्या, भाषिक पोर्टल्स असु द्या किंवा याहू ग्रुप्स असू द्यात. एका विशिष्ट शिवराळ शैलीत फिरणा-या झुंडींच्या झुंडींनी आपल्याला नको असणा-या व्यक्तींच्या समर्थनार्थ असणा-या व्यक्ती, लेख, मतं या सर्वांची अश्लाघ्य भाषेत संभावना केलेली आहे. तर आपल्या त्या ह्यांच्या , म्हणजे दैवताच्या, विरोधात कुणी गेलं तर लायकी काढण्यापासून ते अशी व्यक्ती देशद्रोही आहे इथपासून ते त्यांना आणि तो ज्या समाजाचा, पक्षाचा, विचारसरणीचा आहे त्यांना देशात राहण्य़ाचा हक्क कसा नाही याबद्दलची "मतं" व्यक्त होत आहेत.
सोप्या भाषेत यांना ट्रोल्स म्हणतात. या लोकांना कसलेही विधीनिषेध नसतात. फेक आयडीजपासून ते सोयीस्करपणे आणि निर्लज्जपणे भूमिका बदलताना त्यांना कसलीही चाड वगैरे नसते. अशांना पायबंद घालण्य़ासाठी उपाययोजना करण्याचे सूतोवाच केले गेले की यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणे सुरू होते. मुळात यांना इतरांच्या अ. स्वा. बद्दल कधीही आदर असल्याचं दिसून येत नाही. विरोधात लिहीणा-यांचे प्रोफाईल्स डिलीट करण्य़ासाठी सोशल साईट्सच्या नियंत्रकांकडे हजारोंनी रिपोर्ट्स पाठवणे, आयपी अॅड्रेस शोधून धमक्या देणे, मेसेजेसमधून शिवीगाळ करणे हे नित्याचे आहे. फेसबुक वर ख-या नावाने लिहीणा-या अनेकांचे प्रोफाईल्स ट्रोल्समुळे डिलीट झाल्याची उदाहरणे आहेत. इतरही ठिकाणी असे अनुभव आहेत.
ट्रोल्सचेही अनेक प्रकार असतात. यातले निनावी बहुसंख्य असतात. काही सावध पवित्रा वाले असतात. सत्तापालट झाल्यापासून सरकारच्या विरोधात टीका होऊ लागली की सावध पवित्रा वाले ट्रोल्स, ज्यांना गेल्या दहा वर्षात कसल्याही टीकेचा कुठलाही त्रास झालेला नाही, ते अशा टीकांनी व्यथित झाल्याच्या मानभावी चर्चा घडवून आणताना दिसतात. मुळात त्यांचा झुकाव हा कुठल्या बाजूने आहे हे लपत नसतंच. या झुकावाच्या विरोधात चर्चा सुरू झाल्या की सावध पवित्रावाले म्हणजे पुण्याई शिल्लक राखून असणारे ट्रोल्स अशा चर्चांमुळे चांगले विषय कसे मागे पडतात या बद्दल गळे काढू लागतात.
अशा ट्रोल्सबद्दल एक चांगला लेख आहे. त्यात चांगलाच आढावा घेतला गेला आहे.
http://blogs.timesofindia.indiatimes.com/point-and-shoot/has-arvind-kejr...
अन्य संबंधित लिंक्स..
१. http://indiatoday.intoday.in/story/social-media-internet-cyber-hindu-twi...
२. http://www.desidime.com/forums/dost-and-dimes/topics/india-politics-expo...
आमच्या यांची कीर्ती जगात
आमच्या यांची कीर्ती जगात दुमदुमणारी. टीका करणारे पोटशूळ उठल्याने टीका करतात.
http://teekhimirchi.in/2014/11/10-hilarious-photoshopped-bjp-publicity-p...
खरे आहे.
खरे आहे.
मस्त आहे! यालाच विकास म्हणतात
मस्त आहे! यालाच विकास म्हणतात बहुतेक.
खडीसाखर चांगला लेख आणी खरे
खडीसाखर चांगला लेख आणी खरे आहे.
तिखी मिर्ची साईटवर आताच सर्व
तिखी मिर्ची साईटवर आताच सर्व सचित्र कथा वाचली... प्रत्येक फोटो बेमालुम पणे तयार केलेला आहे... before and after असे दोन्ही फोटो समोर ठेवल्याने गैरसमज होत नाही. जवळुन बघितल्यास ओबामा यान्च्या फोटो मधे हात जोडल्याचे दिसते.
प्रकार दुर्दैवी आहे... विश्वास कुणावर ठेवायचा... ?
खरय! इथे मायबोलीवर देखिल असेच
खरय!
इथे मायबोलीवर देखिल असेच काही ट्रोल्स आयडी, सतत उच्छाद मांडत असतात. मागच्या सफाई मोहिमेच्या दरम्यान प्रशासकांनी अनेक ट्रोलर्सं आयडीना मायबोलीवरुन हाकलून लावले होते. तरिही निर्लज्जासारखे नविन आयडी घेऊन त्यातले बरेचशे आणखी डुआय ट्रोल्स घेऊन परतुन आलेत, आणि सध्या इथे उच्छाद मांडत आहेत.
तुम्ही जर आमच्या ह्यांना
तुम्ही जर आमच्या ह्यांना आवडून घेत नसाल तर... >> तुमचे हाल श्रुतीसेठ नेहा धुपिया यांच्यासारखे होईल .
खडीसाखर चारेक दिवसात उत्तम
खडीसाखर चारेक दिवसात उत्तम लिखाण करू लागलात. छान. आहे मात्र इंटरेस्टिंग !
अमर्त्य सेन, कविता कृष्णन,
अमर्त्य सेन, कविता कृष्णन, अरुंधती राय .., अनंतमूर्ती
धन्यवाद हो रॉबीनहूड. आयडी
धन्यवाद हो रॉबीनहूड. आयडी अॅप्रूव्ह झाल्याचे उशिरा कळाले नाहीतर लगेचच केलं. असतं. ट्रोल्सची इतर लक्षणे नंतर.. एक ब्रेक के बाद. कारनामे पाहणे पण रंजक होईल नै ?
ट्रोल्सची इतर लक्षणे कशी
ट्रोल्सची इतर लक्षणे कशी असतात याचा अभ्यास करण्याकरता तुम्हाला या धाग्याची चांगली मदत होऊ शकते. कारण त्या धाग्यावर ट्रोलर्सचे येणे जाणे दर आठवडे दोन आठवड्याने सतत चालुच असते.
इथे दिलीत की लक्षणं..
इथे दिलीत की लक्षणं.. उदाहरणासहीत. सिद्धता सुद्धा आहे.
https://twitter.com/kavita_krishnan/status/617381060175724544
खडीसाखर, मनमोहन हे कर्तबगार
खडीसाखर, मनमोहन हे कर्तबगार प्रधानमंत्रि होते हे नक्की.मात्र त्यांच्यात नि कोन्ग्रेसचे जे प्रधानमंत्री झाले त्यांच्यात एक मोठा दोष होता हे एक एतेहासिक सत्य आहे.
मला माहीत नाही
मला माहीत नाही पगारेजी
एव्हढंच माहीत आहे की त्या वेळी प्रधानमंत्र्यांना एखाद्या जनावरासारख्या शिव्या कुणीही नेटकर देउ शकत होता कसलेही अश्लील छायाचित्र पोस्ट करू शकत होता,
पण आता प्रधानमंत्र्यांबद्दल कसं बोलायचं याचे नियम (शेलक्या शब्दात) रुग्णांकडून जनहितार्थ जारी केले जात आहेत. बहुतेक कायदे बदलले असावेत.
तो दोष म्हणजे हे सारे
तो दोष म्हणजे हे सारे प्रधानमंत्री हिंदुत्ववादी नव्हते.ते जर हिंदुत्ववादी असते तर त्यांना सारे गुन्हे माफ असते.
नोबेल विजेते अमर्त्य सेन,
नोबेल विजेते अमर्त्य सेन, गोपाल अदुरकृष्णदु, अनंतमूर्ती यांच्यापेक्षा गजेंद्र चौहान , स्मृती इराणी हे योग्यच आहेत यावर ट्रोल्सचा विश्वास असतो. एरव्ही सामान्य माणसाला अमर्त्य सेन पेक्षा मल्होत्रा आदी लोक श्रेष्ठ आहेत असं म्हनायला जीभ धजावत नाही, पण ट्रोल्स (या केसमधे नमोरुग्ण) बिनधास्त अशी वक्तव्ये करू शकतात. इतकंच नाही या प्रमेयाला छेद देऊ शकणारी सिद्धता, सिद्धांत यावर ते एका विशिष्ट भाषेत तुटून पडतात.
ट्रोल्सचं स्त्रीदाक्षण्य त्यांच्या "यांच्याशी" सहमत नसणा-या स्त्रियांच्या ट्विटर, फेसबुक अकाउंटवर ओसंडून वाहत असतं. या भाषेत साधारणपणे कुणी पुरूषांचा ही उद्धार करत नाहीत. ट्रोल्सची ही विशिष्ट भाषा आहे.
विशिष्ट फोरम्समधे ख-या नावाने ट्रोल्स जेव्हां वावरतात तेव्हां मात्र या भाषेचा प्रयोग करण्यास त्यांना परवानगी नसावी.
काकोडकर राहिले
काकोडकर राहिले
ओह, असं आहे का सचिनजी !
ओह, असं आहे का सचिनजी !
ट्रोल्स म्हणजे भकरटवणारे , पण नमोरुग्णांनी नवनवीन वैशिष्ट्ये ट्रोल्सना बहाल केली आहेत, ती स्वतःच्या उदाहरणांतून.
बालीश युक्तीवाद, वैयक्तिक हल्ले याबद्दल बोलतच नाहीये.
काकोडकर वेल क्वालिफाईड नव्हते
काकोडकर वेल क्वालिफाईड नव्हते असं मंत्र्यांना आढळलं.
चुकीच्या विद्यापीठात शिकले म्हणे.. असं प्रतिक्रियांवरून समजलं.
नमुना प्रतिसाद
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=FEDKQ
काकोडकर हे कुठल्या प्रखर
काकोडकर हे कुठल्या प्रखर राष्ट्रवादी संघटनेशी संलग्न नव्हते मग ते वेल क्वालिफाइड कसे असु शकतात
प्रकार दुर्दैवी आहे... अरेरे
प्रकार दुर्दैवी आहे... अरेरे विश्वास कुणावर ठेवायचा... ?>>>>>>>> +१
आगे आगे देखीये होता है क्या
आगे आगे देखीये होता है क्या
ट्रोल्सपैकी जातीवंत अनपेड
ट्रोल्सपैकी जातीवंत अनपेड भक्त असतो त्याची लक्षणे म्हणजे त्याच्या कार्यालयीन वेळेनंतर तो नेटवर फिरकत नाही. सुट्टीच्या दिवशी खरंतर फोरम्स मधे फुल्ल ट्रॅफीक असायला पाहीजे पण ते सोमवार ते शुक्रवार असतं.
फुकट ते पौष्टिक
फुकट ते पौष्टिक
ट्रोलचे अजुन एक लक्षणे
ट्रोलचे अजुन एक लक्षणे म्हणजे तो " आमच्या ह्यांच्या विरुद्धच्या " धाग्यावर एखादी पिंक टाकुन पळ काढतो आणी "त्यांच्या" धाग्यावर पिंका टाकत पडिक असतो.
फक्त शेअर केलंय. कवितेत
फक्त शेअर केलंय. कवितेत व्यक्त झालेल्या मतांशी आम्ही सहमत असूच असं नाही.
अजून त्रास होतो, गळतात चार ओळी
बोटारियाचा रुग्ण, हसतेय त्यास आळी
कट्ट्यावरी बसुनी, गळकेच बोट दावे
जरी दाबले तरीही, प्रसवते हो चारोळी
इस्पितळी मिळेना, इलाज रामबाण
वैदू रस्त्याकडेचा, मिळाली जंगली गोळी
गोळीने झाला घात, बोटाचा झारा झाला
दिसले तयात सारे, हमदर्द ऐशा वेळी
कंट्रोलुनी गळबोट, दाबजोर झाली भेट
प्रसवावी सामूहीक, आरोळी निरनिराळी
ऐकावी भक्तजनहो, रुग्णाची ही कहाणी
शेयरावी कानीकपाळी, फेसबुकी तिन्हीत्रिकाळी
- यमकेश ओक्साबोक्षी
नेपाळच्या भुकंपाची बातमी
नेपाळच्या भुकंपाची बातमी सर्वप्रथम जगाला देणारा आज पंजाबहल्ल्यावर मुग गिळून बसला आहे
15 जण शहीद झाली आता 150 पाकींची मारण्याची वाट बघतो
ट्रोल्सचा आणखी एक प्रकार आहे.
ट्रोल्सचा आणखी एक प्रकार आहे.
हा जरा समजण्यास अवघड आहे. कारण ट्रोल्स अजिबात इमोशनल नसतात. हा प्रकार भावनिक या प्रकारात मोडतो. हे कल्पनाविलासात रमतात आणि त्याप्रमाणेच जग चालावं यात मश्गुल असतात. अशा माणसाचं ट्रान्सफॉर्मेशन कुठल्या तरी विचारांचा वाहक म्हणून झालं की मग त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नसतो. कारण आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी आक्रस्ताळेपणा, इरीटेटींग मेगाबायटी पोष्टी, बालीश विपर्यास आणि या सर्वांमधून उघडा पडणारा मूर्खपणा झाकण्यासाठी समर्थनासाठी सोबत घेतलेले ट्रोलभैरव यामुळे प्रतिस्पर्धी आणि आमचे परीकथानायक यांच्यात युद्ध झडत असतात.
खडीसाखर काय निरीक्षन आहे अगदी
खडीसाखर काय निरीक्षन आहे अगदी मनातल बोललात.
कसचं कसचं, लाजवताय अगदी सप
कसचं कसचं, लाजवताय अगदी सप तुम्ही
संपादन : (ज) राहीला होता
Pages