सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.
१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.
२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.
३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.
४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.
५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.
६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?
७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?
८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?
फाशीबद्दल चर्चा?
फाशीबद्दल चर्चा?
ह्म्म्म.............
माझे तर म्हणणे आहे कोर्ट नको चौकशा नकोत अन केसिस नकोत. सरळ सगळ्या हरामखोर देशद्रोही अतिरेकी आणि त्याना समर्थन देणार्या महा-हरामखोर लोकाना रान्गेत उभे करा आणि गोळ्या घाला ....
" वेन्स्डे" चित्रपट विसरला का विजयभौ?
कसले धागे काढताय राव ? तुमच्याकडून असली अपेक्षा नव्हती ....
{कृपया वैयक्तिक घेवु नये, ही विनन्ती )
<<माझे तर म्हणणे आहे कोर्ट
<<माझे तर म्हणणे आहे कोर्ट नको चौकशा नकोत अन केसिस नकोत. सरळ सगळ्या हरामखोर देशद्रोही अतिरेकी आणि त्याना समर्थन देणार्या महा-हरामखोर लोकाना रान्गेत उभे करा आणि गोळ्या घाला .... >>
----- असे करणे अयोग्य, अन्यायकारक ठरेल आणि ते करणे अशक्य पण आहे.... त्यान्च्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला ?
असे हिन्सक विचार बाळगणे समाजाच्या मानसिक आरोग्यास हानीकारक आहेत. सुड आणि सर्व न्यायालयिन प्रक्रिया पार पाडुन मिळालेली शिक्षा यात मोठा फरक आहे.
<<कसले धागे काढताय राव ? तुमच्याकडून असली अपेक्षा नव्हती ....>>
------ धागा काढ्यण्यात काही गैर नाही. विषय महत्वाचा आहे. धर्म, राष्ट्र, मानवतावाद, न्याय असे अत्यन्त महत्वाचे धागे या धाग्यात गुरफटले आहेत. विजय यान्नी हा धागा सुरु करुन चर्चा घडवुन आणल्याबद्दल आपण त्यान्चे आभारच मानले पाहिजे.
माझे तर म्हणणे आहे कोर्ट नको
माझे तर म्हणणे आहे कोर्ट नको चौकशा नकोत अन केसिस नकोत. सरळ सगळ्या हरामखोर देशद्रोही अतिरेकी आणि त्याना समर्थन देणार्या महा-हरामखोर लोकाना रान्गेत उभे करा आणि गोळ्या घाला .... >>> आम्हाला न्याय मिळत नाही असं म्हणणारे अनेक जण आहेत देशात.
नाही उदय, याकूब अपघाताने
नाही उदय, याकूब अपघाताने पकडला गेला नव्हता. त्याला कराचीतून भारतात येण्यास राजी करण्यामागे रॉचे फार मोठे प्लॅनिंग होते. त्याचे कराचीतून नेपाळमध्ये आगमन करवण्यात आले. त्याने तिथल्या एका पोलिसाकडे शरणागती मागितल्याचे दाखवण्यात आले. मग तिथून एका खास विमानाने त्याला दिल्लीत आणण्यात आले. हे सर्व आधी ठरवल्याप्रमाणे रॉच्या देखरेखीखाली झाले. त्याला पळवून आणण्यात आले नाही. या सगळ्याची कल्पना टाय्गर मेमन आदींना होती. याकूबने येताना सूटकेसभरून डॉक्युमेंट्स आणले होते असा उल्लेख कै. बी. रामन(रॉचे तत्कालीन प्रमुख आणि या ऑपरेशनचे इन-चार्ज) यांच्या संबंधीच्या आजच्या टाइम्स ऑव्ह इंडियातील लेखात आहे.
ही माहिती नवी नाही. याकूबच्या शिक्षेच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने ती वर आली इतकेच. शिक्षा २००७ साली ठोठावली गेली होती. त्यावर अपील वगैरे झाले.
हीरा- वरिल माहिती खरी असेल तर
हीरा- वरिल माहिती खरी असेल तर तसे कोर्टात पुढे का नाही आले?
विशालदेव, >> आणि राहिले सॉफ्ट
विशालदेव,
>> आणि राहिले सॉफ्ट स्टेट तर आधीच्या सरकारमधे २ जणांना फाशी दिली होती विसरु नये.
>> नुसते फाशी दिली की राष्ट्र कणखर होत नाही.
दहशतवाद्याला फाशी दिल्याने राष्ट्र कणखर आहे असा संदेश जातो. ज्या दोघांना फाशी दिल्याचा उल्लेख तुम्ही केलाय ते अफजल गुरु आणि भेकडकसाबआहेत. याकूबचा गुन्हा या दोघांच्याही आधी घडला होता. तो बराच आधी पकडलाही गेला होता. त्याची शिक्षा दीर्घकाळ प्रलंबित ठेवल्याने भारत नरमदिल राष्ट्र आहे असा चुकीचा संदेश गेला होता. तुमच्याकडे पैसे असतील तर तुमची शिक्षा लांबवता किंवा टाळता येऊ शकते असा संदेश नरमदिल राष्ट्रातच मिळतो.
आ.न.,
-गा.पै.
दहशतवाद्याला फाशी दिल्याने
दहशतवाद्याला फाशी दिल्याने राष्ट्र कणखर आहे असा संदेश जातो >>>>
http://zeenews.india.com/news/nation/isi-funded-rss-leaders-pandeys-conf...
गामा पैलवान, कसाब आणि अफजल
गामा पैलवान,
कसाब आणि अफजल गुरुला फाशी देण्याचं कारण भाजपला मिळणारी हिंदू मतदारांची किमान काही मतं आपल्याला मिळतील अशी काँग्रेसची अपेक्षा होती. प्रत्यक्षात, अफजल गुरुला फासावर चढवण्यास झालेल्या दिरंगाईचा परिणाम असा झाला की काँग्रेसला त्याचा काहीच फायदा झाला नाही.
आणि राष्ट्राच्या कणखरपणाचं म्हणाल, तर जास्तं चपखल उदाहरण जपानचं आहे. जगभराला भेडसावणारी 'शांतताप्रिय' धर्मियांची समस्या जपानमध्ये नावालाही नाही कारण जपान त्यांना व्हिसाच देत नाही!
जगभराला भेडसावणारी
जगभराला भेडसावणारी 'शांतताप्रिय' धर्मियांची समस्या जपानमध्ये नावालाही नाही कारण जपान त्यांना व्हिसाच देत नाही! >>> शांतताप्रिय धर्म तर त्यांचा बहुसंख्यंकांचा धर्म आहे. तुम्हाला इस्लाम म्हणायचंय का ? मग हे बघा.
http://www.truthorfiction.com/japan-muslim/
खडी साखर, तुम्ही जपानमध्ये
खडी साखर,
तुम्ही जपानमध्ये गेला आहात?
मी ५ वर्ष राहून अनुभव घेतला आहे जपानी आणि त्यांच्या धोरणांचा.
तुमचे स्वतःचे अनुभव लिहा.
तुमचे स्वतःचे अनुभव लिहा.
https://en.m.wikipedia.org/wi
https://en.m.wikipedia.org/wiki/Islam_in_Japan
जाहिद बैठकर पिने दे मस्जिद में शराब,
वरना ऐसी जगह बता, जहाँ खुदा न हो ------ ग़ालिब
http://www.turning-japanese.info/2013/10/can-muslims-acquire-japanese.ht...
तुम्ही जपानमध्ये गेला
तुम्ही जपानमध्ये गेला आहात?
मी ५ वर्ष राहून अनुभव घेतला आहे जपानी आणि त्यांच्या धोरणांचा. >>>>
अशक्य विनोदी लोक आहेत इथे!
हेच लोजिक लावायचे झाले तर मोदीना १९५ x ५ = ९७५ वर्षे विविध देशात घालवल्यावरच पंतप्रधान होण्याचा अधिकार मिळतो.
जपानचे अनुभव वाचायला आवडतिल
जपानचे अनुभव वाचायला आवडतिल ....
तो देश एवढा शांतताप्रिय, शिस्तप्रिय का आहे? तिथे कुठल्या धर्माचे पालन करतात.त्या धर्मामुळे त्यांची प्रगती झाली का?
(No subject)
याकुब मेमन सारख्या एका
याकुब मेमन सारख्या एका निर्दोष व्यक्तिला फाशीवर चढवायच्या ऐवजी त्याचा भाऊ टायगर मेमनला पकडुन फासावर चढवा. :- फिल्म अभिनेता, सलमान खान.
निर्दोष व्यक्तिला >> हा शब्द
निर्दोष व्यक्तिला >> हा शब्द वापरायला नको होता. याकुब निर्दोष अजिबात नाही
त्यांनी माझं ऐकेपर्यंत
त्यांनी माझं ऐकेपर्यंत (बजरंगी भाईजान पाहण्यासाठी आश्वासन मिळण्याबाबत) मी वारंवार ट्वीट करत राहणार असं सलमान एक दिवसापूर्वीच म्हणाला होता, हेच का ते ?
हा सलमान खान स्वत: अनेक
हा सलमान खान स्वत: अनेक गुन्हांत आरोपी आहे, आणि कोर्टाच्या दयेवर बाहेर राजरोस हिंडतोय.
स्वत: अनेक लोकांना याने दारुच्या नशेत कार खाली चिरडुन ठार मारले, आणि आता एका दहशतवाद्याला निर्दोष म्हणुन संपुर्ण न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करतोय.
जपान म्हंजे तेच ना ? १९४२ की
जपान म्हंजे तेच ना ? १९४२ की ४५ ला अंदमान जिंकून सेल्युलर जेलचा काही भाग पाडुन टाकला त्यानी , तेच ना ?
हा सलमान खान स्वत: अनेक
हा सलमान खान स्वत: अनेक गुन्हांत आरोपी आहे, आणि कोर्टाच्या दयेवर बाहेर राजरोस हिंडतोय.
स्वत: अनेक लोकांना याने दारुच्या नशेत कार खाली चिरडुन ठार मारले, आणि आता एका दहशतवाद्याला निर्दोष म्हणुन संपुर्ण न्यायव्यवस्थेवर .>>>>>
ज्या सलमानला एक दिवसात बेल मिळाल्यामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले तो सलमान न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करतोय असे तुमचे वाक्य वाचुन खरच हसायला आले.
जेव्हा सलमानला एक दिवसात बेल मिळाली तेव्हा न्यायव्यवस्था भ्रष्ट झाली आहे असे मानणार्या लोकांना आज अचानक न्यायववस्थेचे पावित्य्र जाणवलेले पाहुन गम्मत वाटली.
चला, याकूब मेमनच्या फाशीच्या
चला, याकूब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने कोण दाऊदच्या गोटातला आहे ते कळलं.
बाकी, दाऊद हे बुडतं जहाज असल्याने बॉलीवूडी उंदरांनी केव्हाच कलटी मारली आहे. सल्लूमियां मात्र खाल्ल्या मिठाला जागताहेत वाट्टं!
-गा.पै.
इंग्लंडात टाटा नमक मिळते का ?
इंग्लंडात टाटा नमक मिळते का ?
सर्वोच्च न्यायलायाचे निवृत्त
सर्वोच्च न्यायलायाचे निवृत्त न्यायाधीश एच एस बेदी, मार्कंडेय काटजू, एच सुरेश, पी बी सावंत, वकील प्रशांत भूषण, वृंदा कारत, रॉ चे निवृत्त अध्यक्ष आणी याकूबला परत आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे बी रमन हेही दाऊदच्या गोटातले आहेत का?
बी रमण यांच्या लेखाची सुओ मोटो दखल घेऊन सुप्रीम कोर्टाने फाशी रद्द करावी असे एच एस बेदी यांचे मत आहे.
वरचं सॉफ्ट स्टेट चं झेपलं नाही. याकूबला फाशी देताच भारत सोफ्ट स्टेट नाही असा संदेश जाईल व चीन / पाकिस्तान घाबरून जातील ?
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/india/india-others/how-to-rectify-injus...
सलमान खान हा आता नक्कीच ४८+
सलमान खान हा आता नक्कीच ४८+ असेल. त्याचं काय काय नादान म्हणून माफ करायचं ?
याकूबला फाशी ही केव्हांच सुनावली गेली आहे. तारीख निश्चितीसाठी जे टायमिंग साधलं गेलं आहे त्यामुळे संसद अधिवेशनात सरकारवर होणारे आरोप, व्यापम मधील हत्या यावरून फोकस अन्यत्र जाण्याची शक्यता दाट आहे. शिवाय या प्रकरणाला हिंदू मुस्लीम वळण लागावे अशी कुणाची तरी सुप्त इच्छा असणारच. एबीपी न्यूज याकूबच्या पूर्ण कुटुंबाची मुलाखत घेण्याचं प्रयोजन काय होतं ? त्यात सर्वांनी छातीठोकपणे तो शरण आला आहे, सीबीआयला त्याने पुरावे दिले असं सांगितलेलं आहे. या मुलाखती पाहून अल्पसंख्य समाजाची प्रतिक्रिया काय होईल ? (याकूबज वाईफ असा सर्च देऊन पहा). त्याची फाशी रद्द होणार नाही याची शक्यता सर्वाधिक आहे.
त्यात सलमान सारख्या सेलेब्रेटीने उडी घेतल्याने आणि त्याची पार्श्वभूमी वादग्रस्त असल्याने ताबडतोब कालपासून त्याची हिस्टरी चघळली जातेय. बिहारच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलंय. नारळ फोडला गेलाय.
बिहारच्या निवडणुकांचं रणशिंग
बिहारच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलंय. नारळ फोडला गेलाय. >>>
you said it.
शिवाय या प्रकरणाला हिंदू
शिवाय या प्रकरणाला हिंदू मुस्लीम वळण लागावे अशी कुणाची तरी सुप्त इच्छा असणारच.> बिहार राज्यात निवडणुका आहे. दिल्ली सारखे होउ नये म्हणून ट्रंपकार्ड नको का खेळायला
या चर्चांवरून फोकस हटवण्याचा
या चर्चांवरून फोकस हटवण्याचा प्रयत्न
मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत.
https://www.youtube.com/watch?v=4h6e8p9S-lU
आसाराम केस मधील साक्षीदारांच्या हत्या
https://www.youtube.com/watch?v=HJi8Ye9xTfY
व्यापम घोटाळा हत्या: रवीशकुमार
https://www.youtube.com/watch?v=bReLo47PCVg
vijaykulkarni, >> सर्वोच्च
vijaykulkarni,
>> सर्वोच्च न्यायलायाचे निवृत्त न्यायाधीश एच एस बेदी, मार्कंडेय काटजू, एच सुरेश, पी बी सावंत,
>> वकील प्रशांत भूषण, वृंदा कारत, रॉ चे निवृत्त अध्यक्ष आणी याकूबला परत आणण्यात महत्वाची भूमिका
>> बजावणारे बी रमन हेही दाऊदच्या गोटातले आहेत का?
सर्वोच्च न्यायलायाचे निवृत्त न्यायाधीश एच एस बेदी, मार्कंडेय काटजू, एच सुरेश, पी बी सावंत, वकील प्रशांत भूषण, वृंदा कारत, रॉ चे निवृत्त अध्यक्ष आणी याकूबला परत आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे बी रमन हेही बॉलीवूडाप्रमाणे दाऊदच्या पैशावर इंडस्ट्री चालवतात का? नाही ना? मग त्यांची तुलना बॉलीवूडी उंदरांशी का बरे करताय?
आ.न.,
-गा.पै.
Pages