नुकताच एक 1930 साली बनलेला पहिल्या महायुद्धावरील चित्रपट All Quiet on the Western Front पाहिला . युद्ध सुरू असताना तरुणांना देशभक्तीने प्रेरित करून लष्करात भरती करण्यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील असते. अशाच एका प्रोफेसरच्या देशभक्तीपर प्रेरणादायक भाषणाने भारावून गेलेले काही कॉलेज-युवकांची एक बॅच सैन्यात भरती होते , परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास होतो कारण प्रत्यक्षात युद्धभूमीवर चित्र निराळे असते . अपुरे अन्नपाणी व तुटपुंजा शस्त्रपुरवठा आणि खडतर प्रवास .त्यात शत्रू अधिक बलवान आणि शस्त्रसंपन्न. त्यामुळे या बॅच मधील बहुतेक जण मृत्यूमुखी पडतात . शेवटी पॉल नावाचा एक सैनिक सुट्टी घेवून घरी येतो ,पण घरीदेखील आशादायक परिस्थिती नसते ! अन्नतुटवडा आणि इतर अडचणी शहरात देखील असतात .पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थितीची जरादेखील कल्पना नसलेले नागरिक आता जर्मनी फ्रान्सचा लवकरच पराभव करून पॅरिस वर जर्मन झेंडा फडकावील आशा भ्रमात असतात . नाइलाजाने पॉल सुट्टी लवकर संपवून युद्धभूमीवर परत जातो आणि शेवटी शहीद होतो ! देशभक्ती व इतर गोष्टी या कागदावरच्या गप्पा ठरतात ,प्रत्यक्षात फक्त मृत्यू हा एकच त्या अभागी सैनिकांच्या सुटकेचा उपाय बनून राहतो ...अशी काहीशी कथा आहे .....
चित्रपट पाहिल्यावर् मनात काही विचार आले, एक तर ही 100 वर्षापूर्वीची कथा आहे. आज परिस्थिती फार निराळी आहे. आज प्रत्येक देशाकडे किंबहूना भारताकडे समर्थ व पुरेशा संख्याबलाचे सैन्य आहे. पण न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील? आज भौतिक सुख-साधने व ऐशोआराम यात गुंग झालेल्या म्हणा अथवा रोजगाराची अधिक साधने उपलब्ध झाल्याने म्हणा ,वैयक्तिक स्वार्थाला अधिक प्रेफरन्स देण्याची वृत्ती वाढीस लागल्याचे जाणवते. अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ? यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !
Mandar Katre, >> देशावर संकट
Mandar Katre,
>> देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला
>> तयार होतील ?
उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी लढाईत मरण येणं अतिशय अभिमानाचं समजलं जातं. महाराष्ट्रातही सातारा-कोल्हापूर पट्ट्यात (उदा. : मिलिटरी अपशिंगे) सैन्यात भरती होणं अभिमानाचं आहे. अशांवरच भारतीय सैन्याची भिस्त आहे.
आ.न.,
-गा.पै.
१. माझ्या अल्प माहितीनुसार
१. माझ्या अल्प माहितीनुसार स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश किंवा इतर सगळ्याच परकीय राजवटींविरुद्ध झालेले बरेचसे अंतर्गत उठाव हे बर्यापैकी स्थानिक स्वरुपाचे व मर्यादीत होते. देशव्यापी असण्याची शक्यता मुळातच नव्हती कारण आत्ताच्या देशाची संकल्पना तेव्हा अस्तित्त्वात नव्हती. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या निर्मीतीनंतर झालेल्या युद्धांबाबत आणि ह्यापुढील काळातील संभाव्य युद्धांबाबतच बोलता येईल.
२. भारताने आपली प्रतिमा 'युद्ध नको असणारा देश, युद्ध टाळू पाहणारा, शांतताप्रिय देश' अशी केली व त्यात महात्मा गांधींच्या प्रभावाचा मोठा हात असावा. तरीही युद्धे झालीच व निर्णायकही झाली. अनेकदा आपल्या सैनिकांनी अपयशी झुंज देऊन हौतात्म्यही स्वीकारले. पण एकुणातच आपण काही देशप्रेमाने पेटून उठून सहजपणे युद्धास उभे ठाकणारे राष्ट्रच नाही आहोत. त्यामुळे नागरिकांकडून काही अपेक्षा करण्याअगोदर आपण राष्ट्र म्हणूनच जरासे गुळमुळीत आहोत असे मत मांडतो, कितींना ते पटते ते माहीत नाही.
३. गामा म्हणतात त्याप्रमाणे 'वतनके लिये' ही पॅशन बरीचशी पंजाब व आसपासच्या इलाक्यात अधिक व इतरत्र कमी कमी होत जाणारी आहे. तेव्हा इतर प्रदेशातील तरुण, विशेषतः युद्धाची झळ कोणाला किती बसते आहे ह्याचा अनुभवही नसताना, युद्धात जाण्यास तयार होणे अवघड आहे.
४. एकीकडे गांधींची तत्त्वे, एकीकडे तंत्रज्ञानाने लहानसे झालेले जग, एकीकडे पाकिस्तान, चीनसारखे शेजार आणि त्यांना होणारी महासत्तेची किंवा इतरांची मदत आणि एकीकडे अंतर्गत भ्रष्टाचार, ढिल्ले प्रशासन अवगैरे! अश्या दुरावस्थेत आपल्याला हेही समजत नाही आहे की मुळात आत्ताच आपल्यावर अनेक प्रकारची युद्धे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून लादली गेलेली आहेत. पाण्याचा नाश करणारी पीके भारताला घ्यायला लावणे, आपली नवी पिढी हतोत्साहीत किंवा कर्तृत्वशून्य बनेल अशी आकर्षणे येथे निर्माण करणे, बाद झालेली औषधे किंवा इतर गोष्टी येथे सर्रास चालतील अशी समीकरणे निर्माण करणे अशी अनेक प्रकारची युद्धे आपण मुळातच अनुभवत आहोत. त्यात आणखीन एखादे प्रत्यक्ष युद्ध झाले तर 'वतनही सबकुछ है' म्हणणारे तुरळकही तरुण उभे राहणार नाहीत कारण आमच्या आधीच्या पिढीने आमची आणि आम्ही आमच्या पुढची पिढी सुखासीन बनवलेली आहे. सुखद झालर इतकीच की प्रत्यक्ष युद्ध करणे तूर्त कोणालाच झेपू शकणार नसल्याने अशी अग्नीपरिक्षा द्यायची वेळच येणार नाही असे वाटते.
चू भू द्या घ्या
मंदार कात्रे यानी विचारार्थ
मंदार कात्रे यानी विचारार्थ मांडलेल्या मुद्द्याला गामा पैलवान यानी दिलेले आशादायक उत्तर खूप आवडले. अशा सार्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर येथील ग्रामीण भागातील मुले देतील याची मला खात्री आहे. आता सायंकाळी सहा वाजता मी किंवा तुम्ही एखाद्या युवकाला सैन्यात भरतीबद्दल विचारले तर तो द्विधा मनःस्थिती दर्शवून आपले उत्तर देईल कदाचित....पण प्रत्यक्ष ज्यावेळी तशी परिस्थिती आलीच भरतीसाठी तर महाराष्ट्रीयनच नव्हेत तर देशातील अनेक युवक तो विकल्प स्वीकारायला मागेपुढे पाहाणार नाहीत असे माझे मन सांगते. निदान आपल्या आईवडिलांनी खायाला घातलेल्या मीठामध्ये देशाविषयीचा तो गुण तरी नक्कीच असेल......आशा तरी करू या.
बाकी या निमित्ताने तुम्ही १९३० च्या "ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट" ह्या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा केलेला रास्त उल्लेख खूप आदर्शवत असाच आहे. राक्षसी महायुद्धाची हिंसा, रक्तपात, मृत्यू, देहांची हेटाळणी, अविश्वसनीय वाटावे असे क्रौर्य यांचं डोकं भणाणून जावं असे दर्शन...इतके असूनही हा चित्रपट केवळ महायुद्धाची कथा सांगत नसून युद्धकाळात चालणारी अरेरावी, नफेगिरी आणि अधिकार्यांचे उन्मत्त वर्तन, नव्याने भरती झालेल्या कॉलेजच्या पोरांचा होणारा भ्रमनिरास....सारे काही युद्धाविरोधीच नाही तर प्रत्यक्ष शासन युद्ध नेमके कशासाठी लढत असून पिढीच्या पिढी त्यात बर्बाद करून टाकत आहे अशा प्रश्नांना अजिबात उत्तर देत नाही.
सिनेमाचा इतका प्रभाव पडला होता १९३० च्या त्या दशकात की नंतर लष्करी क्षमतेवरील लोकांचा विश्वास उडेल या भीतीपोटी दुसर्या महायुद्द्याच्या दरम्यान चक्क अमेरिका आणि युरोपमधील कित्येक राष्ट्रांनी वितरणावर बंदीच घातली...युद्धाचा फोलपणा दाखविणारा असा परिणामकारक बनला होता हा चित्रपट.
विषय- देशभक्ती आणि
विषय- देशभक्ती आणि स्वार्थत्याग
लेखक- स्वार्थभक्तीसाठी देशत्याग करणारा.
अशोक, आता मासिक उत्पन्नाचे
अशोक,
आता मासिक उत्पन्नाचे ईतके वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्याने सैन्यात जाण्याचा पर्याय हा बराच मागे पडलेला आहे. त्यामुळेच आता भारतीय नौदल, वायुदल आणी मिलिटरीला सैन्य भरतीसाठी वारंवार जाहीरात द्यावी लागत आहे.
जर देशासमोर युद्धाच आव्हान आल तर देशभक्तीमुळे सैन्यात जाणारी तरुण मुले सोडली तर आताची परिस्थीती
खुप आशादायक नाही.
जर देशासमोर अस आव्हान आल तरी अननुभवी तरुण मुल खडतर प्रशिक्षणाशिवाय आताच्या हायटेक युद्धात सहभागी होऊ शकतील ?
ह्याला पर्याय म्हणजे कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग आणी कंपल्सरी मिलिटरी सेवा, ती सेवा अगदी २ ते ३ वर्षां ईतकी लहानही असु शकेल.
चक्रम | 19 July, 2015 - 17:56
चक्रम | 19 July, 2015 - 17:56 नवीन
विषय- देशभक्ती आणि स्वार्थत्याग
लेखक- स्वार्थभक्तीसाठी देशत्याग करणारा.
डोळा मारा
<<<
प्रतिसाद आवडला नाही.
(No subject)
एकीकडे गांधींची
एकीकडे गांधींची तत्त्वे,
<<
नक्की कोणती?
*
चक्रम सुंदर मुद्दा
*
आता मासिक उत्पन्नाचे ईतके वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्याने सैन्यात जाण्याचा पर्याय हा बराच मागे पडलेला आहे. त्यामुळेच आता भारतीय नौदल, वायुदल आणी मिलिटरीला सैन्य भरतीसाठी वारंवार जाहीरात द्यावी लागत आहे.
<<
उचलली जीभ अन लावली टाळ्याला.
कोणत्याही गावा खेड्यातून सैन्य, निमलष्करी दले, लष्कर, पोलीस, व तत्सम फोर्सेसमधील भरतीसाठी उपलब्ध पदांच्या किती पट जास्तीनी तरूण मुले जमा होतात, ते तुम्हाला माहीती असण्याची सुतराम शक्यता नाही. (तुमच्या गोटातून दुसरे काही येण्याची शक्यताही नाही. छाती बडवून- आय मीन ठोकून - खोटे कसे बोलतात त्याचे हे (एक) लख्ख उदाहरण होय.) ही सगळी भरती 'जवान' या क्लास ४ - प्रत्यक्ष लढणारे सैनिक- साठी असते.
मध्यंतरी पॅरामिलिटरी फोर्समधील प्रवेश व तिथल्या (ऑफिसर) ट्रेनिंगबद्दलची सत्य लेखमाला माबोवर प्रसिद्ध झाली. तिथे प्रवेशासाठी किती स्पर्धा असते, व कडक परिक्षा द्याव्या लागतात त्याचं वर्णन त्यात होतं. ऑफिसर केडरसाठीही कपॅसिटीपेक्षा जास्त लोक अर्ज करीतच असतात.
आता मासिक उत्पन्नाचे ईतके
आता मासिक उत्पन्नाचे ईतके वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्याने सैन्यात जाण्याचा पर्याय हा बराच मागे पडलेला आहे. >> हे फक्त आणि फक्त गुजरात मधेच होते बाकी सर्व भारतातून सैन्यात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात जवान जातात. गुजरात मधून सैन्यात जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचबरोबर इतर खेळात जाण्याचे प्रमाण देखील कमी आहे.
चक्रम पटेश
बेफि सैन्य भरति साठि मोठ्या
बेफि सैन्य भरति साठि मोठ्या प्रमाणावर मुले येतात.तुमचि महिति खरच चुकिचि आहे.
>>> सचिन पगारे | 19 July,
>>> सचिन पगारे | 19 July, 2015 - 20:33 नवीन
बेफि सैन्य भरति साठि मोठ्या प्रमाणावर मुले येतात.तुमचि महिति खरच चुकिचि आहे.
<<<
माझी माहिती चुकीची असली तर बरोबर माहिती कोणती हे समजून घ्यायला आवडेलच.
प्रश्न सैन्य भरतीसाठी किती मुले येतात हा नाही आहे. मूळ लेखातील प्रश्न असा आहे की युद्ध जाहीर झाले तर आहे नाही तो व्यवसाय सोडून कितीजण भारतभूमीसाठी युद्धात उडी घेतील. (त्यासाठी एका चित्रपटाचे उदाहरणही दिलेले आहे).
चर्चा आपल्याला अभिप्रेत असलेल्या विषयाकडे वळवण्यापेक्षा मूळ विषयावर चालू ठेवूनही मुद्देसूदपणे करता येते का हे प्रत्येकाने तपासून पाहावे असे मला वाटते.
सैन्यभरतीसाठी येणारे देशभक्तीने पेटलेले असतात हा गैरसमज असावा. त्यांना नोकरी हवी असते आणि फिजिकल क्वॉलिटीज सोडून इतर (जसे शैक्षणिक) क्वॉलिटीज अपुर्या असल्याने सैन्यभरतीसाठी प्रवेशाचा प्रयत्न करणे त्यांना अधिक बरे पडते.
मी सैन्यभरतीचे प्रशिक्षण केंद्र व तेथील प्रक्रिया नुकतीच डिस्कळपासून जवळच असणार्या एका ठिकाणी जवळून पाहिली आहे. आपली निवड होईल का हा प्रश्न बहुतांशी चेहर्यांवर तरळत असतो.
मला एक मौल्यवान शंका
मला एक मौल्यवान शंका आहे.
सैन्यभरती हा आजचाच इशू नाही. पूर्वीही राजे महाराजे सुल्तान छत्रपती सैन्यभरती करायचे व त्यात सैनिक मरायचे.
महाराजांचे आजचे वारस अतीश्रीमंत , जमीनदार व पतदार आहेत.
पण त्यांच्यासाठी लढलेले व मेलेले जे लोक होते , त्यांचे वारस आज काय्करतात ?
इतिहासात शहीद झालेल्यांचे आजचे वारस यावर एखादा धागा काढून माहिती गोळा होऊ शकेल का ?
संकटे व संपत्ती यांचे विभाजन इतिहासात अतीविषम प्रमाणात झाले आहे का ?
बेफि मुद्दा समजला.जेव्हा
बेफि मुद्दा समजला.जेव्हा युद्धाचि वेळ देशावर् येइल तेव्हा माझ्यामते व्यवसाय सोडुन युद्धात येणार्यान्चे प्रमाण हे अत्यन्त कमि असेल्.
>>> सचिन पगारे | 19 July,
>>> सचिन पगारे | 19 July, 2015 - 20:55 नवीन
बेफि मुद्दा समजला.जेव्हा युद्धाचि वेळ देशावर् येइल तेव्हा माझ्यामते व्यवसाय सोडुन युद्धात येणार्यान्चे प्रमाण हे अत्यन्त कमि असेल्.
<<<
धन्यवाद. नगण्य असेल.
लतिश राजे महाराजान्नि फक्त्
लतिश राजे महाराजान्नि फक्त् स्वताच्या तिजोर्या भरल्या तुरळक अपवाद आहेत.
>>>सचिन पगारे | 19 July, 2015
>>>सचिन पगारे | 19 July, 2015 - 20:58 नवीन
लतिश राजे महाराजान्नि फक्त् स्वताच्या तिजोर्या भरल्या तुरळक अपवाद आहेत.<<<
त्यांना वेगळा धागा अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या धाग्यावर त्यावर चर्चा करणे हे काही खास बरोबर नाही. मर्जी ज्याची त्याची!
युद्धाच्या वेळेत व्यवसाय
युद्धाच्या वेळेत व्यवसाय सोडून युद्धात उतरून काय दिवे लावतील लोक? लाठ्याकाठ्या दगडधोंडे घेऊन पाकड्यांवर तुटून पडतील की काय?
सैनिकी सेवा म्हणजेच सर्व काही नसते. आजकालच्या हायटेक वॉरफेअरमधे मोठ्या प्रमाणावर ट्रेनिंग दिलेल्या (Highly Trained) लोकांची गरज भासते. मनुष्यविरहीत हत्यारे आंतरखंडीय अंतरांवर मारा करू शकतात.
देशभक्ती म्हणजे काय याबद्द्लची मी म्हणतो तीच व्याख्या बरोबर असे नसते. घरदार सोडून युद्धभूमीवर जायचे म्हण्जे नक्की कुठे जायचे? अन या बाजारबुणग्यांना खाऊपिऊ कुणी घालाय्चे?
बेफिकिरभौ , इथे मुद्दा डिस्कस
बेफिकिरभौ , इथे मुद्दा डिस्कस केला तरी चालेल... व्यक्तींच्या वंशावळी व आजची स्थिती हे दुसर्या धाग्यावर करता येइइल.
>>> lalitshinde | 19 July,
>>> lalitshinde | 19 July, 2015 - 21:05 नवीन
बेफिकिरभौ , इथे मुद्दा डिस्कस केला तरी चालेल... व्यक्तींच्या वंशावळी व आजची स्थिती हे दुसर्या धाग्यावर करता येइइल.
<<<
जामोप्या,
मुद्दा इथे का चर्चिला जावा ही तुमची इच्छा मला समजते. त्यामुळेच म्हणत आहे की विषयांतर नको. पुढे जाऊन आपण अडकू असे वाटले की तुम्ही मस्त मुद्दे काढता ह्या तुमच्या क्षमतेचे मनःपूर्वक अभिनंदन!
सैन्यातील एका उच्चपदस्थ
सैन्यातील एका उच्चपदस्थ अधिकार्याच्या सेमीनारमध्ये ऐकले होते,
सीमेवरती हाडं गोठवणार्या थंडीत १२-१५ हजार या अल्प वेतनावर जे लोक देशाची सुरक्षा करत असतात त्यांना काय मोटीवेट करत असेल तर ते देशप्रेम नाही, तर पलटन की इज्जत !
संबंधित अधिकारी सैन्यात सैनिकांना मोटीवेट करणे यासाठीच नियुक्त होते.
नाव-संदर्भ आता आठवत नाही.
हे इथे लिहावेसे वाटले कारण, इट्स नॉट ऑल अबाऊट देशभक्ती ओनली .
>>आज प्रत्येक देशाकडे
>>आज प्रत्येक देशाकडे किंबहूना भारताकडे समर्थ व पुरेशा संख्याबलाचे सैन्य आहे. पण न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील?<<
अमेरिकेततरी अशी उदाहरणं आहेत.
https://en.m.wikipedia.org/wiki/Pat_Tillman
सैन्यात जायचे तर फिजिकल
सैन्यात जायचे तर फिजिकल फिटनेस हवा.
काँबॅट ट्रेनिंग हवे
शस्त्रास्त्रे हाताळायची हातोटी हवी.
इथे २ किलोमीटर सोडा, कोपर्यावरच्या टपरीवर जाऊन सिग्रेट ओढायला लिफ्ट अन पुढे टूव्हीलर लागते.
रस्त्यावर भांडण करायची वेळ आली तर पाय लटलट कापतात.
यात्रेतल्या फुगेवाल्याची बंदूक धड हाती धरता येत नाही
असले लोक सैन्यात जमवण्यापेक्षा सध्या करताहेत तीच कामे करून सैन्यासाठी ट्याक्स दिला तरी पुरे. फारच उतू जात असेल, तर डोक्यावर अणुबाँब पडल्यावर सिव्हिल्यन कॅज्युल्टी म्हणून गप परिनिर्वाण साधावे, भारतमाता की जय! किंवा वंदे मातरम वगैरे म्हणत.
भारतातिल बहुसंख्य लोक हे
भारतातिल बहुसंख्य लोक हे लष्करी पेशासाठी योग्य नाहित हे वास्तव आहे.जगात ह्दयरोग,रक्तदाब,मधुमेह ह्या आजारांची भारत हा राजधानी आहे.निरनिराळे उपवास, व्यसन ह्यामुळे व्याधिग्रस्तहि बरेच आहेत.अध्यात्मावर गाढा विश्वास असल्याने प्रत्यक्श लढण्यापेक्शा यज्ञ, पुजा केल्याने शत्रु हरेल असा विश्वास ठेवनारे तर करोडो असतिल.
प्रत्यक्श लढण्यापेक्शा यज्ञ,
प्रत्यक्श लढण्यापेक्शा यज्ञ, पुजा केल्याने शत्रु हरेल असा विश्वास ठेवनारे तर करोडो असतिल.
<<
सोरटी सोमनाथाची स्टोरी आठवली. देऊळ लुटणारा मोहम्मद, अन समोर दूरवर उभेराहून शापवाणी उच्चरवाने उच्चारणारे पुजारीवॄंद!
>>> सचिन पगारे | 19 July,
>>> सचिन पगारे | 19 July, 2015 - 21:33 नवीन
भारतातिल बहुसंख्य लोक हे लष्करी पेशासाठी योग्य नाहित हे वास्तव आहे.जगात ह्दयरोग,रक्तदाब,मधुमेह ह्या आजारांची भारत हा राजधानी आहे.निरनिराळे उपवास, व्यसन ह्यामुळे व्याधिग्रस्तहि बरेच आहेत.अध्यात्मावर गाढा विश्वास असल्याने प्रत्यक्श लढण्यापेक्शा यज्ञ, पुजा केल्याने शत्रु हरेल असा विश्वास ठेवनारे तर करोडो असतिल.
<<<
हे तुमचे मूळ धाग्यातील प्रश्नाला फायनल उत्तर आहे काय?
>>अध्यात्मावर गाढा विश्वास
>>अध्यात्मावर गाढा विश्वास असल्याने प्रत्यक्श लढण्यापेक्शा यज्ञ, पुजा केल्याने शत्रु हरेल असा विश्वास ठेवनारे तर करोडो असतिल.<<
हे मात्र सॉलिड आहे, पगारे...
अध्यात्मावर गाढा विश्वास
अध्यात्मावर गाढा विश्वास असल्याने प्रत्यक्श लढण्यापेक्शा यज्ञ, पुजा केल्याने शत्रु हरेल असा विश्वास ठेवनारे तर करोडो असतिल.>>>>> हा हा, क्रिकेट सामन्यांसाठी देखील यज्ञ होतात आपल्याकडे.. तरी बरेय तो मूळ खेळ ब्रिटीशांचा आहे, त्यामुळे पुराणातले संदर्भ नाहीत की अमुक तमुक यज्ञाने कोणता राजा कशी क्रिकेटची मॅच जिंकला होता
बाकी गुजराती लोक सैन्यात आणि खेळात गेले नाहीत तरी उद्योगधंद्यात देशाला तेच पुढे नेतात.. याउलत मराठी माणूस साधे आपल्या समाजाला पुढे नेऊ शकत नाही.. असे म्हणतात!
चुकत असेल तर कर्रेक्टा !
ऋन्मेष, तुमचे म्हणणे
ऋन्मेष,
तुमचे म्हणणे बहुतेकवेळा बरोबरच असते असे माझे वैयक्तीक मत आहे.
बाकी गुजराती लोक सैन्यात आणि
बाकी गुजराती लोक सैन्यात आणि खेळात गेले नाहीत तरी उद्योगधंद्यात देशाला तेच पुढे नेतात..
<<
देशाचं सोडा. गुज्जूभाऊंनी कुणा नॉणगुज्जूला कशातही सोबत धरून 'पुढे' नेल्याची चार-दोन उदाहरणे हातासरशी टंकून टाका की, ऋन्मेऽऽषभाऊ?
ऋन्मेश मराठी माणुस हा गुजराति
ऋन्मेश मराठी माणुस हा गुजराति लोकांच्या तुलनेत कला,साहित्य, खेळ व लष्करी क्षेत्र,हाणामार्या,समाजप्रबोधन हया बाबतित आघाडीवर असेल.उद्योगधंद्याबाबतित मात्र आनंद आहे.
Pages