देशभक्ती आणि स्वार्थत्याग

Submitted by Mandar Katre on 19 July, 2015 - 00:23

नुकताच एक 1930 साली बनलेला पहिल्या महायुद्धावरील चित्रपट All Quiet on the Western Front पाहिला . युद्ध सुरू असताना तरुणांना देशभक्तीने प्रेरित करून लष्करात भरती करण्यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील असते. अशाच एका प्रोफेसरच्या देशभक्तीपर प्रेरणादायक भाषणाने भारावून गेलेले काही कॉलेज-युवकांची एक बॅच सैन्यात भरती होते , परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास होतो कारण प्रत्यक्षात युद्धभूमीवर चित्र निराळे असते . अपुरे अन्नपाणी व तुटपुंजा शस्त्रपुरवठा आणि खडतर प्रवास .त्यात शत्रू अधिक बलवान आणि शस्त्रसंपन्न. त्यामुळे या बॅच मधील बहुतेक जण मृत्यूमुखी पडतात . शेवटी पॉल नावाचा एक सैनिक सुट्टी घेवून घरी येतो ,पण घरीदेखील आशादायक परिस्थिती नसते ! अन्नतुटवडा आणि इतर अडचणी शहरात देखील असतात .पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थितीची जरादेखील कल्पना नसलेले नागरिक आता जर्मनी फ्रान्सचा लवकरच पराभव करून पॅरिस वर जर्मन झेंडा फडकावील आशा भ्रमात असतात . नाइलाजाने पॉल सुट्टी लवकर संपवून युद्धभूमीवर परत जातो आणि शेवटी शहीद होतो ! देशभक्ती व इतर गोष्टी या कागदावरच्या गप्पा ठरतात ,प्रत्यक्षात फक्त मृत्यू हा एकच त्या अभागी सैनिकांच्या सुटकेचा उपाय बनून राहतो ...अशी काहीशी कथा आहे .....

चित्रपट पाहिल्यावर् मनात काही विचार आले, एक तर ही 100 वर्षापूर्वीची कथा आहे. आज परिस्थिती फार निराळी आहे. आज प्रत्येक देशाकडे किंबहूना भारताकडे समर्थ व पुरेशा संख्याबलाचे सैन्य आहे. पण न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील? आज भौतिक सुख-साधने व ऐशोआराम यात गुंग झालेल्या म्हणा अथवा रोजगाराची अधिक साधने उपलब्ध झाल्याने म्हणा ,वैयक्तिक स्वार्थाला अधिक प्रेफरन्स देण्याची वृत्ती वाढीस लागल्याचे जाणवते. अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ? यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुखरी नस वगैरे काही नाही हो! मला तुम्हाला सुद्धा पर्सनली बोलायचे नव्हते किंवा मी तसे बोललेलो नाही, सभाशास्त्राचे नियम पाळून मी फ़क्त मुद्द्याचा प्रतिवाद केलाय, अणि बहुएक माझी भाषा ही कुठे असंसदीय किंवा वैयक्तिक शेरेबाजी करणारी नाही, तुम्ही पण तसे काही करू नका इतकी तुम्हाला विनंती करू शकतो मी, तुम्ही वय अन लिखाण अन माबो वरचा वावर प्रत्येक बाबतीत वरिष्ठ आहात तेव्हा कृपया मुद्द्यावर चालू असलेल्या चर्चेत मुद्दे जोड़ा वैयक्तिक शेरेबाजी नको, त्याने साधक असे काहीही निष्पन्न होणार नाही, उरता उरला नसांचा प्रश्न तर ट्रेनिंग ने मजबूत झालेल्या नसा ह्या इतक्यातितक्याने दुखावत नसतात काळजी नसावी,

आता थोड़े माझ्या मुद्द्याबद्दल, मला जो मुद्दा जसा कळला मी तसा प्रतिवाद केलाय, मी कुठला विपर्यास केला अन कुठे संदर्भहीन बोललो हे ज़रा स्पष्ट कराल काय?? माझ्यामते तुम्हाला शैक्षणिक पात्रता "अपुर्या" म्हणायचे होते अन मी ते "शैक्षणिक पात्रता नसणे" असे वाचले आहे, अर्थात ही माझी चुक असल्याकारणे मला आपली क्षमा मागितली पाहिजे व त्यात मला कमीपणा ही नाही!

>>>तेव्हा कृपया मुद्द्यावर चालू असलेल्या चर्चेत मुद्दे जोड़ा वैयक्तिक शेरेबाजी नको, <<<

हेच मीही म्हणतो आहे. तुम्ही विपर्यास केल्याप्रमाणे मला कुठे वाटले ते मी स्पष्ट केलेले आहे.

तुम्ही माझा प्रतिसाद कोट करून मग तुमचा प्रतिसाद दिला आहेत व त्यात हे वाक्य आहे.

>>>त्यामुळे बुद्धि नसलेले अंगाने वळु असलेलेच आर्मी मधे निवडले जातात हे पूर्णतः अमान्य<<<

हा माझ्या प्रतिसादाचा विपर्यास आहे असे माझे मत आहे.

बाकी वरिष्ठ, कनिष्ठ अशी माझ्याबाबतीत इतरांकडून अपेक्षा मी तरी करत नाही. आपण निर्धास्तपणे मला हवे ते बोलावेत. फक्त माझे एवढेच म्हणणे आहे की जे मी चुकीचे बोललो आहे त्यावरच विरोध करावात, जे मी बोललेलोच नाही त्यावर नको. असो. Happy

सोन्याबापू,

इथे सभाशास्त्र वगैरे पाळलं तर डुप्लिकेट आयड्या घेऊन लचके तोडायची पद्धत आहे. भलेभले बळी पडतात त्याला.

दुसरं, ते वय लिखाण वावराबाबतले वरिष्ठ इतरांचे 'ललित'लेखन वाचत नाहीत. त्यामुळे तुम्ही नक्की कोण, ते त्यांच्या लक्षात आलेले नाहिये.

त्यामुळे असून्द्यात, दुखरी नस तर दुखरी. ती का दुखतेय ते समजले की वरमतील कदाचित Wink

दीड मायबोलीकर,

कोणी वरमावे अशी आमची इच्छा नाही, किंवा उगीच माझ्याकडे वर्दी आहे म्हणुन मलाच काय ती समज आहे असा अभिनिवेश ही नाही, मुद्दाफ़क्त इतकाच होता/आहे/राहील की जर कोणी आपल्या मुद्द्याचे मिसइंटरप्रिटेशन केले तर त्याला थोड़े प्रेमाने शिस्तीत समजवले तर बहुसंख्य लोकांस समजते, त्यात असली शेरेबाजी आली की गालबोट लागते, ह्यूमन एरर होणे काही अशक्य नसते, बाकी मी सुद्धा माझे लेखन (जितके काही पावशेर आधपावशेर आहे) वाचा म्हणुन अक्षता वाटत नाही, न वाटता सुद्धा मला तुमच्या सारख्या असंख्य मित्रमंडळी चे भरभरुन प्रेम मिळाले अन मिळतच राहील! मी फ़क्त येईल तसे लिहित जाणार लिहविणेस शारदा समर्थ आहे!!

आपण दाखवलेल्या आपुलकी साठी कृतज्ञ _/\_

बाप्या

इथे सभाशास्त्र वगैरे पाळलं तर डुप्लिकेट आयड्या घेऊन लचके तोडायची पद्धत आहे. भलेभले बळी पडतात त्याला.
<<

फार, फार अनुभवाचे बोल आहेत, ह्या लचके तोडायच्या पध्दतीमुळेच तिसर्‍यांदा आयडी घेण्याची वेळ आली ह्यांच्यावर.

तेच @ प्रसाद.

अन असे लचके तोडणार्‍यांच्या कळपातले तुम्ही, मूळचे स्पार्टाकसच ना? मविदे त्यांचा आयडी आहे हे आपल्या लेखनाबद्दल त्यांनी गगोवर केलेल्या वल्गनांवरून कन्फर्म्ड ठाऊक आहे. पण तुमचे नक्की कन्फर्म होत नाहिये अजून.

पण हे झाले अवांतर. असो.

>>>कोणी वरमावे अशी आमची इच्छा नाही, किंवा उगीच माझ्याकडे वर्दी आहे म्हणुन मलाच काय ती समज आहे असा अभिनिवेश ही नाही, मुद्दाफ़क्त इतकाच होता/आहे/राहील की जर कोणी आपल्या मुद्द्याचे मिसइंटरप्रिटेशन केले तर त्याला थोड़े प्रेमाने शिस्तीत समजवले तर बहुसंख्य लोकांस समजते, त्यात असली शेरेबाजी आली की गालबोट लागते, ह्यूमन एरर होणे काही अशक्य नसते<<<

This is what the good nature is all about. Salute to you Sonya Bapu, my new friend. Also forgive me for my little too aggressive reply, if it was so.

Also, as it seems from your this reply, you should be in defense. So another salute. Happy

अन असे लचके तोडणार्‍यांच्या कळपातले तुम्ही, मूळचे स्पार्टाकसच ना?
<<

हाय रे कर्मा, आधी प्रत्येक आयडी(डु) हा मंदार जोशी ह्यांचा असल्याचा साक्षात्कार तुम्हाला व्हायचा,
आता डायरेक्ट स्पार्टाकस? छान प्रगती आहे. चालुद्या. आणि तुमच्या सारखे "ठेवणीतील आयडी" ठेवायची सवय नाही मला, दोन तीन वर्षांनी मुळ आयडी उडाला तर पुन्हा दुसरा वापरायला.

bbp,

>> का ,लाज वाटते का ईग्लंडचे नाव घ्यायला? घ्या हो बिंधास्त नाव,सगळ्यांना तुमचे उत्तर माहीती आहे.

सगळ्यांना माझं उत्तर ठाऊक आहे, तर मग मला परत परत कशाला विचारताहत? कारण तुम्हाला माझ्या तोंडून इंग्लंड ऐकायचंय. आणि मी ते तुम्हाला ऐकवणार नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

सगळ्यांना माझं उत्तर ठाऊक आहे, तर मग मला परत परत
कशाला विचारताहत? कारण तुम्हाला माझ्या तोंडून इंग्लंड
ऐकायचंय. आणि मी ते तुम्हाला ऐकवणार नाहीये.
आ.न.,
-गा.पै.>>>>>>>>>>आपण मातृभूमीशी प्रतारणा करुन आंग्लांच्या बाजूने उभे आहात हे मान्य केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.

देशावर संकट सीमेवर हल्ला झाला तरच येते असे आहे का?
बेरोजगारी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, गुन्हेगारीतली वाढ ही सुद्धा देशावरची संकटेच आहेत की. आपण आपली कामे निष्ठेने, सचोटीने केली.. उदा. कामावर वेळेवर गेलो आणि काम पाट्या टाकल्यासारखे न करता चोख केले.., शहर स्वच्छ ठेवायला मदत केली, कायद्याच्या चौकटीत वागलो.. टॅक्स वेळेवर लांडीलबाडी न करता भरला, देशात आणि बाहेरही देशाला अभिमानास्पद वर्तन केले तरी ती देशभक्ती झालीच की..त्यासाठी बंदुक घेउन लढायलाच का जायला हवे? (आणि सगळ्याना जमेल/झेपेल का ते?)
जेवढी आपल्याला झेपते तेवढी जरी देशभक्ती जर प्रत्येकाने केली तर किती चांगले होइल? आपले सैन्य अतिशय सक्षम आहे..त्यांना त्यांचे काम करु द्या आणि आपले काम आपण नीट करुया..

टॅक्स वेळेवर लांडीलबाडी न करता भरला, ><> एकट्या गुजरात राज्यातल्या लोकांनी किमान ४०% टॅक्स व्यवस्थित भरला तरी त्या राज्यावरील कर्जे काही वर्षातच उतरून जातील. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे

bbp,

>> आपण मातृभूमीशी प्रतारणा करुन आंग्लांच्या बाजूने उभे आहात हे मान्य केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.

धन्यवाद! फक्त एक विनंती आहे. तुमचं हे मत प्रत्येकाला सांगत सुटा. माझी यथेच्छ बदनामी करा. गामा पैलवान मातृभूमीशी प्रतारणा करुन आंग्लांच्या बाजूने उभा आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे.

पुनश्च धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

So another salute.
<<
त्या बापूंचं दिल मिल्ट्रीवाल्याचं हाये. मोकळं ढाकळं. ह्ये दाकवूब द्याची बी गरज न्हाई त्यास्नी.

पण काये ना?

>>
Also, as it seems from your this reply, you should be in defense.
<<
सिरियसली बेफि. त्यांची ती अकादमी नामक सेरिज वाचाच. ललित म्हणून नव्हे, तर जस्ट आत्मकथन म्हणून. इट्स नॉट फिक्शन यू क्नो Wink

मान्यवर प्रशासक,

आपल्या सूचनेस मान देऊन प्रतिसाद संपादीत करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून इब्लिस आणि त्यांचे भाऊबंद ज्याच्याशी माझा काही संबंध नाही असा स्पार्टाकस हा आयडी माझा होता असा सतत आरोप आणि प्रचार करत आहेत. या प्रकाराला कृपया पायबंद घालावा ही नम्र विनंती.

Pages