Submitted by लाजो on 11 July, 2015 - 09:32
मडका - तफावत....
आज पुन्हा एकदा
नि:शब्द गोठल्या सडका
बांधावर थिजले दवं
थंडीचा वाढला कड्डका...
गपगार बसलो ओढुन
जुना फाटका फडका...
ऊब तरी मिळेल कोठे
झोपडाच माझा पडका...
कोपर्यात बसली ती
कुशीत घेऊनी लडका
जोजवे अंगाई गाऊन
न बघवे चेहरा रडका ....
पलीकडे उंच कोठीत
पार्टीचा धुम धडाका
मद्याची भरली पात्रे
उसळे कारंजा व्होडका...
जेवणाच्या उठती पंगती
सुग्रास भोजने तडका
इथे मात्र पोटात
न अन्नाचा दाणा सडका...
आज पाहुनी सारे
रागाने उडाला भडका...
दैवाच्या, अन्यायाच्या
का बसती आम्हाच धडका ...
तफावत ही नशिबाची
कुणा अमाप पैसा अडका
गरीबाच्या पदरी मात्र
रिकामाच घडा मडका....
असंच सुचलं म्हणून.... मी पण 'डका'रले....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्तम कविता. समाजाबद्दल
उत्तम कविता.
समाजाबद्दल तुम्हाला वाटणारी कळ कळ सर्वांना डकाराचा अर्थ कळावा म्हणुन तुम्ही घेतलेली मेहनत अगदी स्पष्ट दिसते
कड्ड्का हा नविन शब्द सुंदर (मला तर तुमच्यासारखा लिहीताही आला नाही बघा)
तडका शब्दाबद्दल विशेष आस्था निर्माण झाल्याने तो सुग्रास भोजनाबरोबर बरा वाटला नाही
बाकी तुम्ही तुमच्या प्रोफाइलची अगदी लाज राखलीत ते वेगळं .. नैतिकते चा फार सुंदर वापर केलात
अभिनंदन आणि पुढच्या मडक्यासाठी खूप खूप शुभे च्छा
कुंभारवाड्यात फार छान मडकी मिळतात पुण्यात!
धन्यवाद मीन्वाजी... तुम्हाला
धन्यवाद मीन्वाजी... तुम्हाला माझा मडका आवडला... मला खुप म्हणजे खुप्पच आणंद झाला
तुमच्या भडका, लाडका वरुनच इण्स्पिरेशन मिळालं मला... महणुन परत एकदा धण्यवाद
कुंभारवाड्याचे सांगितलेत ते बरे झाले... पुढच्या वेळेस तिथल्या मडक्यावरच मडका करेन म्हणते
पाहुनिया 'डका' कविता येईल कवी
पाहुनिया 'डका' कविता
येईल कवी तो चिडका
मग डुक्कर डुक्कर म्हणूनी
धावेल कुणी 'बे' धडका
तू हसू नको मजवरती
पाडेन दात मी कीडका
आणखी कसे बदडावे
आधिच तू हडका तुडका
हे मडकं चांगलं पक्क झालंय...
हे मडकं चांगलं पक्क झालंय...
जोजो तूच गं तूच...
जोजो तूच गं तूच...
रिकामाच घडा मडका.... << पालथा
रिकामाच घडा मडका....
<<
पालथा म्हणायचं होतं का?
(No subject)
Feels like -६ ने कमाल
Feels like -६ ने कमाल केली
आमची लाजो मायबोलीवर परत आणली
वेलकम ब्याक
वा वा
वा वा
(No subject)
(No subject)
(No subject)
वेल्कम बॅक जो.. आता एक तडका
वेल्कम बॅक जो..
आता एक तडका पण होउन जाउदे, बर्याच दिवसात नवी रेसिपी नाही